वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९६ पृ. २
  • जूनसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जूनसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • उपशिर्षक
  • जून ३ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून १० ने सुरू होणारा सप्ताह
  • जून १७ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून २४ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९६
km ६/९६ पृ. २

जूनसाठी सेवा सभा

जून ३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १८१ (१०५)

१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. देशाच्या तसेच स्थानिक मंडळीच्या मासिक क्षेत्र सेवा अहवालाबद्दल टिपणी करा.

१५ मि: “त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा.” प्रश्‍नोत्तरे. सप्टेंबर १५, १९९१, टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकातील पृष्ठ १३ वरील चौकटीत दिलेल्या विश्‍वासाच्या पुराव्यांची उजळणी करा. अनेक वर्षांपासून आपली नियमित राज्य कार्यहालचाल टिकवून ठेवण्यास कशामुळे मदत मिळाली हे पाहण्यासाठी एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या.

२० मि: “सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्‍या ज्ञानाचा प्रसार करणे.” (परिच्छेद १-३) पहिला परिच्छेद पूर्ण करा. (जानेवारी १५, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठे १२-१३, परिच्छेद ११-१२ मधील विवेचने समाविष्ट करा.) आमची राज्य सेवा याच्या मागील पानाचे नवीन स्वरूप आपल्याला प्रथम भेटींचा मागोवा घेण्यास चांगल्या तयारीत असण्याकरता मदत करण्यासाठी बनवले गेले आहे हे स्पष्ट करा. बहुधा, जास्त वेळ थांबण्यापेक्षा एक किंवा दोन दिवसांतच पुनर्भेट करणे सुज्ञतेचे असल्यामुळे एकाच सेवा सभेत घरोघरी भेटीच्या तसेच पुनर्भेटीच्या सुचवलेल्या सादरतांचा विचार आपण करणार आहोत. संक्षिप्तपणे २ आणि ३ परिच्छेदांची उजळणी करा व त्यानंतर प्रत्येकावर प्रात्यक्षिक दाखवा. सुरवातीच्या प्रस्तुतीमध्ये, जागतिक कार्यासाठी देणगी कशी दिली जाऊ शकते यावरील संक्षिप्त विवेचनांचा समावेश करा. लेखातील उर्वरित प्रस्तुती पुढील दोन सेवा सभांमध्ये पूर्ण केल्या जातील.

गीत १४३ (७६) व समाप्तीची प्रार्थना.

जून १० ने सुरू होणारा सप्ताह

गीत ६३ (३२)

५ मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१० मि: “‘प्रतिदिवशी’ यहोवाचा धन्यवाद करा.” प्रश्‍नोत्तरे. साहायक आणि नियमित पायनियर कार्याबद्दल सकारात्मक उत्तेजन द्या.

१० मि: “सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्‍या ज्ञानाचा प्रसार करणे.” (परिच्छेद ४-५) संक्षिप्त प्रस्तावनेनंतर, परिच्छेद ४ आणि ५ मधील प्रथम भेटीच्या व पुनर्भेटीच्या प्रस्तुतींची प्रात्यक्षिके दाखवा. प्रचारकांना, तत्परतेने ज्ञान पुस्तकाच्या सर्व वाटपांचा मागोवा घेण्याचे उत्तेजन द्या.

२० मि: “ज्ञान पुस्तकाद्वारे शिष्य कसे बनवावेत.” परिच्छेद १-२ वर आधारित सुरवातीची संक्षिप्त विवेचने मांडा. परिच्छेद ३-११ प्रश्‍नोत्तराने पूर्ण करा. पुरवणीतील उर्वरित भाग जुलै आणि ऑगस्टच्या सेवा सभांमध्ये विचारात घेतला जाईल हे स्पष्ट करा. सर्वांना ती जपून ठेवण्याचे उत्तेजन द्या.

गीत ९२ (५१)  व समाप्तीची प्रार्थना.

जून १७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १५७ (७३)

१० मि: स्थानिक घोषणा.

१५ मि: “मैत्रिपूर्ण संभाषणे अंतःकरणापर्यंत पोहंचू शकतात.” प्रश्‍नोत्तरे. मैत्रिपूर्ण प्रस्ताव केल्यामुळे चांगला प्रतिसाद कसा मिळाला हे दाखवणारे प्रोत्साहनात्मक अनुभव कथित करण्यास एक किंवा दोन प्रचारकांना आमंत्रण द्या.

२० मि: “सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्‍या ज्ञानाचा प्रसार करणे.” (परिच्छेद ६-७) पुनर्भेट करण्याच्या ध्येयांवर जोर द्या: आस्था निर्माण करा, अभ्यास सुरू करा, पुन्हा येण्यासाठी विशिष्ट योजना करा. परिच्छेद ६ आणि ७ मधील सादरतांची संक्षिप्त रूपात उजळणी केल्यावर, अभ्यासाची सुरवात कशी करावी हे दाखवून प्रत्येकाचे प्रात्यक्षिक दाखवा. जानेवारी १५, १९९६, टेहळणी बुरूज नियतकालिकातील पृष्ठ १४ वरील परिच्छेद १७ वाचा.

गीत २११ (६६) व समाप्तीची प्रार्थना.

जून २४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ६ (४)

५ मि: स्थानिक घोषणा.

८ मि: क्षेत्र सेवेत मुलांना प्रशिक्षण देणे. वडिलांचे भाषण. लहान वयातच, आपली मुले आपल्यासोबत सेवेमध्ये सक्रिय असली पाहिजेत. त्यांना प्राप्त होणारे प्रशिक्षण आणि अनुभव नंतरच्या काळात त्यांचा विश्‍वास आणि आवेश यांकरता दृढ आधार पुरवील. त्यांनी सेवेला गांभिर्याने घेण्याच्या व स्वतःची वर्तणूक उचित ठेवण्याच्या गरजेस समजून घेणे महत्त्वपूर्ण आहे. मुलांनी दंगामस्ती करू नये: सेवा ही खेळण्याची वेळ नव्हे. त्यांनी प्रौढांसोबत कार्य करावे हे उत्तम आहे. त्यांच्या क्षमतांनुसार प्रस्तुती देण्याकरता त्यांना मदत केली पाहिजे. (पाहा ऑगस्ट १, १९८८, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठ १५, परिच्छेद २०.) पालक, देखरेख करण्यास जबाबदार आहेत; त्यांनी, मुलांवर नजर ठेवण्याकरता एखाद्या प्रौढ व्यक्‍तीशिवाय त्यांना सेवेच्या सभांना पाठवू नये. मुले चांगले कार्य करतात तेव्हा त्यांची प्रशंसा करा.

१२ मि: स्थानिक गरजा. (किंवा जानेवारी १, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठे २९-३१ वर आधारित ‘सत्याचे वचन नीट हाताळणे’ यावर भाषण द्या.)

२० मि: “पुन्हा सेवा करण्यास त्यांना मदत करा.” वडिलांचे भाषण व चर्चा. ऑगस्ट १, १९९२, टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकातील “तुम्ही माझ्याकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळीन” हा लेख निष्क्रिय जणांना उत्तेजन देण्याकरता उपयोगात आणण्याचे सुचवा. काही मुख्य मुद्यांचा उल्लेख करा.

गीत ७१ (९६) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा