“प्रतिदिवशी” यहोवाचा धन्यवाद करा
१ स्तोत्र १४५:२ मध्ये राजा दावीदाने यहोवाला असे वचन दिले: “मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन.” आपल्याकडे देखील आपल्या स्वर्गीय पित्याचा धन्यवाद आणि स्तुती करण्याचे कारण आहे! परंतु, आपण “प्रतिदिवशी” यहोवाचे सार्वभौमत्व उंचावण्यात दावीदाच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?
२ यहोवाप्रती कृतज्ञतेने आपली अंतःकरणे भरा: देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास, यहोवाने आपल्याकरता जे केले, जे करीत आहे व जे अद्याप करणार आहे त्याविषयी कृतज्ञता वाढवतो. त्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल आपली कृतज्ञता वाढत जाते तसतसे आपण त्याच्या चांगुलपणाविषयी उत्साहाने सांगत राहतो. (स्तोत्र १४५:७) प्रत्येक उचित प्रसंगी आपण यहोवाची उत्सुकतेने स्तुती करू.
३ दररोजच्या संभाषणात यहोवाची स्तुती करा: शेजारी, शाळासोबती, सहकामगार व दररोज आपला संपर्क येतो त्या इतरांशी संभाषण करत असताना, आपल्या आशेची सहभागिता करण्याच्या संधी आपल्याला आढळतील. एखादा शेजारी समाजातील गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त करील; एखादा शाळासोबती मादक औषधांचा दुरुपयोग किंवा अनैतिकता यांविषयी चिंतित असेल; सहकर्मचारी एखाद्या राजकारणी विषयाबद्दल मत प्रगट करील. आपण, देवाच्या वचनातील तत्त्वे आणि अभिवचने यांकडे लक्ष वेधवू शकतो, जी दाखवतात की सध्या कोणता योग्य मार्ग अनुसरला पाहिजे व या समस्यांवरील शेवटचा उपाय कोणता आहे. असे “समयोचित” बोल आशीर्वाद ठरू शकतात!—नीति. १५:२३.
४ यहोवाविषयी पूर्ण-वेळ बोलत राहा: ज्या व्यक्तीला यहोवाप्रती गाढ कृतज्ञता वाटते तिला शक्य तितक्या लोकांसोबत सुवार्तेची सहभागिता करण्याची इच्छा असते. (स्तोत्र ४०:८-१०) या बाबतीत, आपण स्वतःला विचारले पाहिजे, ‘माझ्या परीने होईल तितके मी करत आहे का?’ काहींना असे आढळले आहे, की वाजवी तडजोडी करून ते नियमित पायनियर बनू शकले आहेत. सद्य परिस्थिती यास अनुमती देत नसल्यास, आपण साहायक पायनियर म्हणून आपले नाव नोंदवू शकतो का?
५ नवीन जणांना आपल्यासोबत यहोवाचा धन्यावाद करण्यास मदत करणे: येशूच्या मृत्यूच्या स्मारक विधीचा सोहळा, आपल्याला यहोवाचे आभार मानण्याच्या व त्याच्या नावाची स्तुती करण्याच्या कारणांची सतत आठवण देत राहतो. आपल्या विद्यार्थ्यांना आपल्यासोबत मिळून यहोवाच्या राजत्वाविषयी जाहीरपणे बोलण्यास उत्तेजन देण्याची ही विशेषतः उत्तम वेळ आहे. सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकामध्ये पृष्ठे १७३-५ वरील परिच्छेद ७-९ मध्ये दिलेल्या गोष्टींवर प्रार्थनापूर्वक मनन करण्यास त्यांना आर्जवा. ते पात्र ठरल्यास, केवळ त्यांना अनुभव नाही म्हणून स्वतःला अडवून धरण्याची काही गरज नाही. कार्यक्षम प्रचारक त्यांना राज्य प्रचाराचे कार्य कसे केले जाते ते दाखवण्यास इच्छुक असतात. नवोदितांना सुवार्ता सांगण्यास धैर्य एकवटणे शक्य असले, तर यहोवा त्यांना मदत करील याविषयी ते आत्मविश्वास बाळगू शकतात.—प्रे. कृत्ये ४:३१; १ थेस्सलनी. २:२.
६ आपण प्रतिदिवशी यहोवाचा धन्यवाद करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्वतःकरता तसेच इतरांकरता अनंतकालिक आशीर्वाद मिळवतो.