वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९६ पृ. ८
  • आपल्या शेजाऱ्‍यांशी सत्य बोला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या शेजाऱ्‍यांशी सत्य बोला
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • योग्य मनोवृत्ती असलेल्यांचा शोध घ्या
    आमची राज्य सेवा—१९९६
  • द वॉचटावर व अवेक!—सत्याची समयोचित नियतकालिके
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • नियतकालिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०११
  • नियतकालिक कसे सादर करावे?
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९६
km ५/९६ पृ. ८

आपल्या शेजाऱ्‍यांशी सत्य बोला

१ सर्वात मोठ्या दोन आज्ञांपैकी एक आज्ञा आहे: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्त. २२:३९) अशा प्रकारची प्रीती आपल्याला, आपल्याकडे असलेली सर्वात चांगली गोष्ट—देवाच्या वचनात आढळलेले सत्य—शेजाऱ्‍यांना सांगण्यास प्रवृत्त करील. टेहळणी बुरूज व सावध राहा! ही नियतकालिके बायबल सत्याच्या संदेशाचे महत्त्व वाढवत असल्यामुळे, मे महिन्यादरम्यान ही नियतकालिके सादर करणे हा, ‘शेजाऱ्‍याबरोबर खरे बोलण्याचा’ एक मार्ग होय.—इफिस. ४:२५

२ तुमचा एप्रिल २२ च्या “सावध राहा!” (इंग्रजी) नियतकालिकाचा साठा संपेपर्यंत तुम्ही तो सादर करावा. तुम्ही तुमच्या प्रस्तुतीची सुरवात असा प्रश्‍न विचारून करू शकता:

◼ “युद्ध नसलेल्या जगाबद्दल तुम्हाला काय वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] खरे पाहता जगाचे धर्म, युद्ध आणि हत्या यांस चेतवतात हे तुम्हाला माहीत होते का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] परंतु याच्या अगदी विरुद्धतेत, देवाचे खरे उपासक काय करतील यावर बायबल जे म्हणते त्याकडे लक्ष द्या.” नियतकालिकाच्या पृष्ठ ४ वरील वरच्या बाजूला असलेले यशया २:२-४ वचन वाचा आणि मग पृष्ठ १० वरील “शांतीच्या चाहत्यांना आमंत्रण” या पोटमथळ्याखालील पहिला परिच्छेद वाचा. नंतर, असे विचारा: “देव हे कसे करणार ते तुम्हाला माहीत आहे का? त्याचे उत्तर या नियतकालिकात आढळते. वर्गणी सादर करा; ती नाकारल्यास नियतकालिकाच्या किरकोळ प्रती सादर करा.

३ वर्गणीसाठी मे १५ चे “टेहळणी बुरुज” सादर करताना, लोकांना असुरक्षित वाटण्यास कारणीभूत ठरलेल्या एखाद्या अलीकडील बातमीचा उल्लेख करण्याचा प्रयत्न करा व मग असे विचारा:

◼ “या जीवनामध्ये आपल्याला खरोखरच सुरक्षित वाटण्यासाठी कशाची गरज आहे असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, मानवजातीला भेडसावणाऱ्‍या समस्या सोडवण्यासाठी मानवांवर भरवसा ठेवणे यथार्थ आहे का? [प्रतिसादासाठी वाव द्या; मग स्तोत्र १४६:३ वाचा.] स्तोत्रकर्ता पुढे आपल्याला भवितव्याबद्दल आशावादी असण्यासाठी कारण देतो. [स्तोत्र १४६:५, ६ वाचा.] पृथ्वीवर चांगली परिस्थिती आणण्यासाठी आपण यहोवा देवावर भरवसा का ठेवू शकतो त्याचे स्पष्टीकरण ‘खरी सुरक्षितता आज व सर्वदा’ हा लेख देतो.” वर्गणी सादर करा आणि आता सुरक्षित जीवन जगणे कसे शक्य आहे त्याची चर्चा करण्यासाठी तुम्ही पुन्हा याल असे सांगा.

४ बेकारीच्या समस्येवरील सार्वत्रिक चिंतेचा विचार करताना, मे २२ च्या “सावध राहा!” नियतकालिकाच्या मागील पानावरील “तो प्रामाणिकपणाच्या शोधात होता,” हा अनुभव कदाचित लोकांना आवडेल. तो तुम्ही असा प्रश्‍न विचारून सादर करू शकता:

◼ “तुमच्या मते, आजच्या स्पर्धात्मक श्रमिक बाजारात, मालकांना, ते ज्या लोकांना कामावर ठेवू पाहतात त्यांच्यामध्ये कोणते गुण हवे असतात? [प्रतिसादासाठी वाव द्या.] आपण मालक असो, कामगार असो किंवा कामाच्या शोधात असणारे असो, कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणाची आवश्‍यकता आहे याचे मूल्य आपण नक्कीच जाणतो. हा अनुभव प्रोत्साहनात्मकरीत्या दाखवून देतो, की प्रामाणिक कामागाराला कोणते प्रतिफळ मिळू शकते.” वर्गणी सादर करा व म्हणा: “पुढच्या भेटीत मला आपल्याला आणखी एक बायबलचे तत्त्व सांगण्यास आवडेल, की जे लागू केल्यास, या अनिश्‍चित काळांमध्ये आपल्या नोकऱ्‍या टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत करील.”

५ तुम्हाला एक संक्षिप्त प्रस्तुती हवी असल्यास, तुम्ही ही प्रस्तावना उपयोगात आणून पाहू शकता:

◼ “आजच्या बहुतेक लोकप्रिय नियतकालिकांची वैशिष्ट्ये मोठ्या प्रमाणात व्यापार, लैंगिक विषय किंवा हिंसाचार हीच असतात, असे अनेकांना वाटते. [त्यांना टेहळणी बुरुज व सावध राहा! दाखवा] बायबलवर आधारित असलेल्या या हितकारक नियतकालिकांचे आम्ही वितरण करीत आहोत. ती खूप शैक्षणिक आहेत व आपल्याला देवाची उपासना करण्यास, शेजाऱ्‍यांवर प्रीती करण्यास व शुद्धाचरण राखण्यास शिकवतात. अशा प्रकारचे वाचन साहित्य तुम्हाला हवे असल्यास, मला वाटते, या अंकांमध्ये मिळणारी माहिती तुम्हाला आवडेल.”

६ आपल्या शेजाऱ्‍यांबरोबर सत्य बोलण्यात आवेशी असल्यास आपण अनेकांना आनंद देणारे असू.—प्रे. कृत्ये ८:४, ८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा