प्रश्न पेटी
◼ आता आपल्याकडे सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक असल्यामुळे गृह बायबल अभ्यास किती काळासाठी घेतला पाहिजे?
गत काळात, नवीन आस्थेवाईक लोकांबरोबर दोन पुस्तके संपेपर्यंत गृह बायबल अभ्यास घेतला पाहिजे अशी शिफारस करण्यात आली होती. आता आपल्याकडे ज्ञान पुस्तक आल्यामुळे, जानेवारी १५, १९९६ च्या टेहळणी बुरूज अंकामधील पृष्ठ १३ व १४ वर सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमात बदल करणे उचित आहे, असे वाटते.
ज्ञान पुस्तक, ‘सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्यांना’ यहोवाला समर्पण करण्यासाठी व बाप्तिस्मा घेण्यासाठी त्यांना काय माहीत असण्याची गरज आहे हे शिकण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. (प्रे. कृत्ये १३:४८) यास्तव, या नवीन प्रकाशनाचा अभ्यास पूर्ण केल्यावर, त्याच विद्यार्थ्याबरोबर दुसऱ्या पुस्तकाचा अभ्यास करण्याची गरज नसावी. तुमचे बायबल विद्यार्थी जसजसे सत्याचा स्वीकार करत जातात तसतसे तुम्ही त्यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहून तसेच बायबल आणि इतर ख्रिस्ती प्रकाशने वाचून पूर्ण ज्ञान घेण्याचे प्रगतीशीलपणे उत्तेजन देऊ शकता.
आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित (इंग्रजी), या पुस्तकाच्या पृष्ठ १७५ ते २१८ वरील प्रश्नांशी तुम्ही चांगल्याप्रकारे परिचित असल्यास हे फायदेकारक ठरू शकेल. तुम्ही या प्रश्नांचा उल्लेख करू नये अथवा तुमच्या बायबल विद्यार्थ्याबरोबर त्यांची उजळणी करू नये, तरीदेखील ज्ञान पुस्तकातून या मुद्यांवर जोर देणे उचित असेल जेणेकरून वडीलजन बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवाराशी त्या प्रश्नांची उजळणी घेतात तेव्हा विद्यार्थी मूळ बायबल सत्यांची योग्य समज व्यक्त करू शकेल.
ज्ञान पुस्तकासोबत आणखी माहिती जोडण्याची, बाहेरील माहितीची किंवा बायबलच्या शिकवणींना पाठबळ देणाऱ्या वा खोट्या शिकवणींचे खंडन करणाऱ्या आणखी वचनांची आवश्यकता नाही. यामुळे अभ्यास आणखी दीर्घपल्ल्यासाठी लांबवला जाईल. त्याऐवजी, होता होईल तितक्या लवकर, कदाचित सुमारे सहा महिन्यांमध्येच पुस्तकाचा पूर्ण अभ्यास करता येईल अशी आशा केली जाते. त्यातील साहित्याची चांगल्याप्रकारे पूर्वतयारी करण्याच्या गरजेवर हे जोर देते, जेणेकरून आपण ते स्पष्ट व संक्षिप्तरीत्या सादर करू शकतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला देखील पूर्व तयारी करण्यास, उल्लेखित शास्त्रवचने काढून पाहण्यास व प्रत्येक अध्यायाद्वारे ते पुस्तक काय शिकवते ते स्पष्टपणे समजण्याचा प्रयत्न करण्यास आर्जवण्यात यावे.
टेहळणी बुरूज नियतकालिकाने यहोवाच्या साक्षीदारांनी अल्प काळामध्ये मोठ्या संख्येने प्रभावकारी बायबल अभ्यास चालवावेत या गरजेवर जोर दिला आहे. (पाहा यशया ६०:२२.) ज्ञान पुस्तकाचा प्रभावकारी उपयोग, नवीन लोकांना सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान प्राप्त करण्यास व त्यानुसार जीवन व्यतीत करण्यास मदत करू शकते.—योहान १७:३.