सत्य नेहमी बोलत राहा
१ “जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही,” असे प्रेषितांनी घोषित केले. (प्रे. कृत्ये ४:२०) आज आपण देखील सत्य बोलत राहिले पाहिजे. टेहळणी बुरुज आणि सावध राहा! या नियतकालिकांच्या वितरणाद्वारेच, जे लोक ऐकू इच्छितात अशांना शोधता येत असले तरीही आस्थेवाईक लोकांना सत्याबद्दल आणखी शिकवण्यासाठी आपण त्यांच्याकडे पुन्हा गेलेच पाहिजे.
२ “युद्धे नसतील तेव्हा,” हे एप्रिल महिन्यादरम्यानचे खास “सावध राहा!” नियतकालिक दिल्यानंतर पुनर्भेट करतेवेळी, तुम्ही असा प्रश्न विचारून बायबल अभ्यास सादर करू शकता:
◼ “मागच्या वेळी आपण राष्ट्रांमध्ये चाललेल्या युद्धांबद्दल आणि त्यांमधील धर्माचा भाग याविषयी बोललो होतो. तुम्हाला हे माहीत होते का, की अशा प्रकारच्या घटना बायबल ज्याला शेवटले दिवस म्हणते त्या काळात आपण जगत आहोत हे स्पष्टपणे शाबीत करतात? [ज्ञान पुस्तक दाखवा. ११ व्या अध्यायाचा पहिला परिच्छेद वाचा आणि पृष्ठ १०२ वरील चौकोनाचे ठळक विवरण द्या.] हे पुस्तक या विषयासोबत येथे अनुक्रमणिकेत दाखवल्याप्रमाणे इतर १८ विषयांचे देखील स्पष्टीकरण देते. [पृष्ठ ३ दाखवा.] अनुमती असल्यास, या महत्त्वपूर्ण बायबल बाबींची समज मिळण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला कसे मदत करील ते तुम्हाला दाखवण्यास मला आवडेल.” अनुमती दिल्यास पृष्ठ ६ पासून अभ्यास सुरू करा.
३ तुम्ही पुन्हा येण्याची व आता एका सुरक्षित जीवनाचा उपभोग घेणे कसे शक्य आहे याचे स्पष्टीकरण देण्याची हमी दिल्यास, अशाप्रकारे काही म्हणू शकता:
◼ “आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी तुम्हाला मनुष्याच्या भवितव्याविषयी आशावादी होण्यास कारण पुरवणारा बायबलमधील एक उतारा दाखवला होता. सुरक्षिततेची भावना आत्ता प्रदान करणारा कोण आहे हे दाखवणाऱ्या गोष्टीकडे आज मी तुमचे लक्ष वेधवू इच्छितो.” स्तोत्र ४:८ वाचा. ज्ञान पुस्तकाचे पृष्ठ १६८ काढून १९ वा परिच्छेद वाचा. मग असे विचारा: “तुम्हाला देखील, तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची सुरक्षितता कशी मिळवता येईल हे स्पष्टपणे दाखवणारा मोफत गृह बायबल अभ्यास करावयास आवडेल का?” होय असे उत्तर आल्यास, १ अध्याय काढा.
४ पहिल्या भेटीत तुम्ही कामाच्या ठिकाणावरील प्रामाणिकतेची चर्चा केल्यास, पुनर्भेटी दरम्यान तुम्ही या प्रस्तावाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करू शकता:
◼ “मागच्या वेळी आपण, कामाच्या ठिकाणी प्रामाणिक असण्याच्या महत्त्वाविषयी बोललो होतो हे तुम्हाला कदाचित आठवत असेल. लूक १६:१० मध्ये लिहिल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचे विधान श्रमिक बाजारातील एखाद्याच्या भवितव्यावर प्रभाव पाडू शकते. [वचन वाचून त्यावर विवेचन मांडा.] बायबलमध्ये आधुनिक मनुष्यासाठी पुष्कळ व्यावहारिक सल्ला आहे, ज्यामध्ये मत्तय ४:४ मधील येशूच्या या शब्दांचा देखील समावेश होतो.” ते वचन वाचा. नियमितरीत्या बायबलचा अभ्यास करण्याचे महत्त्व दाखवून द्या. पहिल्या भेटीत वर्गणी स्वीकारली नसल्यास, आता ती सादर करा किंवा ज्ञान पुस्तकातून एक गृह बायबल अभ्यास सादर करा.
५ पुनर्भेटीत असे म्हणून तुम्ही थेटपणे अभ्यास सादर करू शकता:
◼ “बायबल काय शिकवते ते सर्वत्र लोकांना कळवण्यासाठी आम्ही आमच्या नियतकालिकांचे जगभरात वितरण करतो. लोक त्यांच्यामधून जे काही शिकतात त्याचे मोल त्यांनी जाणल्यास आम्ही त्यांना मोफत गृह बायबल अभ्यास सादर करतो. [टेहळणी बुरुज याच्या मागील पानावर ‘तुम्ही भेटीचे स्वागत करणार का?’ या चौकोनाचा संदर्भ द्या.] आम्ही सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक मार्गदर्शक या नात्याने वापरतो. अभ्यास कसा चालवला जातो त्याचे मी तुम्हाला संक्षिप्त वर्णन देतो.”
६ आपण सत्य बोलत राहिल्यास, काही ऐकतील व अनुकूलरीत्या प्रतिसाद देतील याची आपण खात्री बाळगू शकतो.—मार्क ४:२०.