वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १/१५ पृ. १०-१४
  • मानवजातीला देवाच्या ज्ञानाची आवश्‍यकता आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मानवजातीला देवाच्या ज्ञानाची आवश्‍यकता आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “देवाविषयीचे ज्ञान”
  • पीक फार आहे!
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९६
  • प्रांतीय अधिवेशनात नवीन पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे सर्व आनंदित
    आमची राज्य सेवा—१९९६
  • जीवनाप्रत नेणारे ज्ञान प्राप्त करण्यास इतरांना मदत करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • शिष्य बनविण्याच्या निकडीच्या कार्यावर एक प्रगत दृष्टिकोन
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १/१५ पृ. १०-१४

मानवजातीला देवाच्या ज्ञानाची आवश्‍यकता आहे

“परमेश्‍वराच्या [यहोवाच्या, NW] भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.”—नीतिसूत्रे २:५.

१. मानवी हृदय ईश्‍वरी अभियांत्रिकीची सर्वोत्कृष्ट कृती आहे असे का म्हणता येऊ शकते?

पृथ्वीवर या क्षणाला, सुमारे ५,६०,००,००,००० मानवी हृदयांचे ठोके पडत आहेत. दर दिवशी तुमच्या स्वतःच्या हृदयाचे १,००,००० इतके ठोके पडत असतात आणि ते तुमच्या शरीराच्या १,००,००० किलोमीटर लांबीच्या कार्डियोवॅस्कुलर संस्थेतून ७,६०० लीटरच्या बरोबरीचे रक्‍त पंप करत असते. ईश्‍वरी अभियांत्रिकीच्या या सर्वोत्कृष्ट कृतीपेक्षा अधिक इतर कोणतेही स्नायू कार्य करीत नाही.

२. तुम्ही लाक्षणिक हृदयाचे वर्णन कसे कराल?

२ यासोबतच, पृथ्वीवर कार्य करणारे ५,६०,००,००,००० इतकी लाक्षणिक हृदये देखील आहेत. लाक्षणिक हृदयात आपल्या भावना, आपल्या प्रेरणा, आपल्या मनसा आहेत. ते, आपले विचार, आपली समज, आपली इच्छा यांचे केंद्रस्थान आहे. लाक्षणिक हृदय गर्विष्ठ किंवा नम्र, निस्तेज किंवा आनंदी, उदास किंवा प्रज्वलित असू शकते.—नहेम्या २:२; नीतिसूत्रे १६:५; मत्तय ११:२९; प्रेषितांची कृत्ये १४:१७; २ करिंथकर ४:६; इफिसकर १:१६-१८.

३, ४. सर्व हृदयांप्रत सुवार्ता कशी पोहंचवली जात आहे?

३ यहोवा देव मानवी हृदय पारखू शकतो. नीतिसूत्रे १७:३ म्हणते: “रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्‍वर हृदये पारखितो.” परंतु, प्रत्येक हृदय नुसतेच पारखून न्यायदंड बजावण्यापेक्षा यहोवा मानवी हृदयांपर्यंत सुवार्ता पोहंचवण्यासाठी त्याच्या साक्षीदारांचा उपयोग करत आहे. हे प्रेषित पौलाच्या शब्दांच्या सुसंगतेत आहे की, “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. तर ज्याच्यावर त्यांनी विश्‍वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करितील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्‍वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्‍यांवाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करितील? ‘चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्‍याचे चरण किती मनोरम आहेत!’ असा शास्त्रलेख आहे.”—रोमकर १०:१३-१५.

४ “चांगल्या गोष्टींची सुवार्ता” सांगण्यासाठी तसेच ग्रहणक्षम हृदय असलेल्यांना शोधण्यासाठी पृथ्वीच्या टोकांपर्यंत आपल्या साक्षीदारांना पाठवण्यास यहोवाला आनंद वाटला आहे. आपली आता संख्या ५०,००,००० पेक्षा अधिक आहे—पृथ्वीवरील जवळजवळ १,२०० लोकांसाठी १ साक्षीदार असे त्याचे प्रमाण आहे. पृथ्वीच्या कोट्यावधी लोकांपर्यंत सुवार्ता नेणे इतके सोपे नाही. पण देव हे कार्य येशू खिस्तामार्फत मार्गदर्शित करत आहे व नम्र अंतःकरणाच्या लोकांना एकत्र करत आहे. अशा प्रकारे, यशया ६०:२२ मधील भविष्यवाणी खरी ठरत आहे की, “जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्‍वर [यहोवा] हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.”

५. ज्ञान काय आहे व जगीक ज्ञानाबद्दल काय म्हटले जाऊ शकते?

५ तो समय आताचा आहे, आणि एक गोष्ट स्पष्ट आहे—पृथ्वीच्या कोट्यावधी लोकांना ज्ञानाची गरज आहे. मूलभूतपणे, ज्ञान म्हणजे अनुभव, परीक्षण किंवा अभ्यास याद्वारे प्राप्त झालेल्या वस्तुस्थितींशी परिचित असणे होय. जगाने पुष्कळ ज्ञान जमवले आहे. वाहतूक, आरोग्याची काळजी आणि दळणवळण यासारख्या क्षेत्रांमध्ये पुष्कळ प्रगती करण्यात आली आहे. पण खरे पाहता मानवजातीला जगाच्या ज्ञानाची आवश्‍यकता आहे का? क्वचितच! युद्धे, जुलूम, आजार आणि मृत्यू मानवजातीला कायम पीडित करत आहे. अनेकवेळा, जगाचे ज्ञान अस्थिर, अविश्‍वसनीय ठरले आहे.

६. रक्‍ताच्या बाबतीत देवाच्या ज्ञानाची तुलना जगीक ज्ञानासोबत कशी होते?

६ उदाहरणार्थ: काही शतकांआधी, शीर तोडणे या मानलेल्या इलाजाचा उपयोग करण्याची रूढी होती. अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांची त्यांच्या जीवनाच्या शेवटल्या घटकांमध्ये वारंवार शीर तोडण्यात आली होती. एकदा तर ते असेही म्हणाले: “मला शांतपणे जाऊ द्या; मी जास्त काळ टिकणार नाही.” त्यांनी जे म्हटले ते खरे ठरले कारण अगदी त्याच दिवशी—डिसेंबर १४, १७९९ रोजी त्यांचा मृत्यू घडला. शीर तोडण्याऐवजी आज, मानवी शरीर यामध्ये रक्‍त संक्रमित करण्यावर जोर दिला जातो. दोन्ही पद्धती प्राणघातक समस्यांनी ग्रस्त आहेत. तथापि, या सर्व काळामध्ये देवाच्या वचनाने म्हटले आहे: ‘रक्‍त वर्ज्य करावे.’ (प्रेषितांची कृत्ये १५:२९) देवाचे ज्ञान नेहमीच अचूक, विश्‍वसनीय, अद्ययावत असते.

७. अचूक शास्त्रवचनीय ज्ञानाची तुलना मुलांचे संगोपन करण्याविषयीच्या जगीक ज्ञानासोबत कशी होते?

७ अविश्‍वसनीय जगीक ज्ञानाच्या आणखी एका उदाहरणाचा विचार करा. अनेक वर्षांसाठी मोकळीक देऊन मुलांचे संगोपन करण्याची शिफारस मानसशास्त्रज्ञांनी केली होती, पण त्यांच्यातील एका समर्थकाने नंतर कबूल केले, की असे करणे चुकीचे होते. जर्मन फायलोलॉजिकल असोसिएशनने एकदा म्हटले, की अशा प्रकारे मोकळीक देणे, “तरुणांबरोबर आपण आता ज्या समस्यांना तोंड देत आहोत त्यासाठी अप्रत्यक्षपणे तरी जबाबदार आहे.” जगीक ज्ञान, जणू काय वाऱ्‍याच्या तडाख्यामुळे हेलकावे खाईल, पण अचूक शास्त्रवचनीय ज्ञान अढळ राहिले आहे. बायबल मुलांच्या प्रशिक्षणाविषयी समतोल सल्ला देते. “तू आपल्या मुलास शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जिवाला हर्ष देईल,” असे नीतिसूत्रे २९:१७ म्हणते. अशा प्रकारची शिस्त प्रेमाने दिली पाहिजे कारण पौलाने लिहिले: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणांत त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:४.

“देवाविषयीचे ज्ञान”

८, ९. मानवजातीला खरोखरच ज्या ज्ञानाची गरज आहे त्याबद्दल नीतिसूत्रे २:१-६ काय म्हणते याचे तुम्ही स्पष्टीकरण कसे द्याल?

८ पौल एक सुशिक्षित मनुष्य होता, तरीसुद्धा तो म्हणाला: “कोणी स्वतःला फसवून घेऊ नये; ह्‍या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहो असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे. कारण ह्‍या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे.” (१ करिंथकर ३:१८, १९) केवळ देवच, मानवजातीला ज्या ज्ञानाची आवश्‍यकता आहे ते पुरवू शकतो. त्याच्याविषयी नीतिसूत्रे २:१-६ म्हणते: “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारिशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेविशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्‍वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल, कारण ज्ञान परमेश्‍वर [यहोवा] देतो; त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात.”

९ चांगल्या अंतःकरणांनी प्रवृत्त होणारे, देवाने दिलेल्या ज्ञानाचा सदुपयोग करून सुज्ञानाकडे लक्ष देतात. शिकत असलेल्या वस्तुस्थितींचे काळजीपूर्वक मूल्यमापन करून त्यांची अंतःकरणे समजबुद्धीकडे प्रवृत्त होतात. खरे पाहता, ते समज अथवा एका विषयाचे पैलू एकदुसऱ्‍यांशी कसे संबंधित आहेत हे पाहण्यासाठी क्षमतेची मागणी करतात. प्रामाणिक अंतःकरणाचे लोक, जणू काय रुप्याचा किंवा गुप्त निधींचा शोध करत असल्यासारखे कार्य करतात. पण ग्रहणक्षम अंतःकरणाच्या लोकांना कोणता मोठा निधी प्राप्त होतो? ते “देवाविषयीचे ज्ञान” आहे. ते काय आहे? सोप्या शब्दात सांगायचे तर, देवाचे वचन, बायबलमध्ये मिळणारे ते ज्ञान आहे.

१०. निरोगी आध्यात्मिक स्वास्थ्याचा उपभोग घ्यावयाचा आहे तर आपण काय केले पाहिजे?

१० देवाचे ज्ञान विश्‍वसनीय, स्थिर, जीवन देणारे आहे. त्यामुळे आध्यात्मिक आरोग्य लाभते. पौलाने तीमथ्याला आर्जवले: “ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्‍वास व प्रीति ह्‍यांमध्ये दृढपणे राख.” (२ तीमथ्य १:१३) एखाद्या भाषेत शब्दांचे नमुने असतात. त्याचप्रकारे, शास्त्रवचनांच्या ‘शुद्ध वाणीत’ “सुवचनांचा नमुना” आहे. तो खासकरून, यहोवाच्या सार्वभौमत्वाचे राज्याकरवी समर्थन करणे या बायबलच्या विषयावर आधारित आहे. (सफन्या ३:९) आपण सुवचनांचा हा नमुना आपल्या मनात व अंतःकरणात ठेवला पाहिजे. आपल्याला लाक्षणिक हृदयाचे आजार टाळावयाचे आहेत व आध्यात्मिकरीत्या निरोगी राहायचे आहे तर आपण आपल्या दैनंदिन जीवनात बायबलला लागू केले पाहिजे आणि देव ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ ज्या आध्यात्मिक तरतूदी पुरवतो त्यांचा पूर्णपणे उपयोग केला पाहिजे. (मत्तय २४:४५-४७; तीत २:२) निरोगी आध्यात्मिक स्वास्थासाठी देवाच्या ज्ञानाची आवश्‍यकता आहे हे आपण नेहमी ध्यानात ठेवू या.

११. मानवजातीला देवाच्या ज्ञानाची आवश्‍यकता का आहे याची काही कारणे कोणती?

११ पृथ्वीवरील कोट्यावधी लोकांना देवाच्या ज्ञानाची आवश्‍यकता का आहे याच्या इतर कारणांचा विचार करा. पृथ्वी आणि मानव अस्तित्वात कसे आले हे सर्वांना माहीत आहे का? नाही, त्यांना माहीत नाही. सर्व मानवजात खरा देव आणि त्याचा पुत्र यांना ओळखते का? ईश्‍वरी सार्वभौमत्व आणि मानवी सचोटी याविषयी सैतानाने जे वादविषय निर्माण केले होते त्याची सर्वांना जाणीव आहे का? नाही. आपण वृद्ध होतो व मरतो ते का हे सर्वसामान्यपणे लोकांना माहीत आहे का? पुन्हा एकदा आपण नाही असे म्हटले पाहिजे. देवाचे राज्य आता शासन करीत आहे व आपण शेवटल्या दिवसांमध्ये जगत आहोत याची पृथ्वीच्या रहिवाश्‍यांना जाणीव आहे का? ते दुष्ट आत्मिक शक्‍तींबद्दल जागृत आहेत का? आनंदी कौटुंबिक जीवन कसे मिळवावे यासाठी सर्व मानवांकडे विश्‍वसनीय ज्ञान आहे का? शिवाय आज्ञाधारक मानवजातीकरता परादीसमध्ये आनंदी जीवन हा आपल्या सृष्टिकर्त्याचा उद्देश आहे हे लोकांच्या समुहाला माहीत आहे का? या प्रश्‍नांना देखील नाही हेच उत्तर आहे. स्पष्टतः मग, मानवजातीला देवाच्या ज्ञानाची गरज आहे.

१२. आपण देवाची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” कशी करू शकतो?

१२ येशूने त्याच्या पार्थिव जीवनाच्या शेवटल्या रात्री केलेल्या प्रार्थनेत जे म्हटले त्या कारणासाठी देखील मानवजातीला देवाच्या ज्ञानाची आवश्‍यकता आहे. “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला, व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे,” असे त्याने म्हटले तेव्हा त्याचे प्रेषित अतिशय प्रवृत्त झाले असावेत. (योहान १७:३) अशा प्रकारचे ज्ञान लागू करणेच, देवाची स्वीकारयोग्य पद्धतीने उपासना करण्याचा एकमात्र मार्ग होय. “देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे,” असे येशू म्हणाला. (योहान ४:२४) आपण विश्‍वास आणि प्रीतीने भरलेल्या अंतःकरणाने प्रवृत्त होतो तेव्हा देवाची उपासना “आत्म्याने” करतो. आपण त्याची “खरेपणाने” कशी उपासना करतो? त्याच्या वचनाचा अभ्यास करून व त्याने प्रगट केलेल्या सत्यानुरुप—‘देवाविषयीच्या ज्ञानानुरुप’ त्याची उपासना करून.

१३. प्रेषितांची कृत्ये १६:२५-३४ मध्ये कोणता अहवाल लिहिलेला आहे व त्यातून आपण काय शिकू शकतो?

१३ हजारो लोक प्रत्येक वर्षी यहोवाची उपासना करण्यास सुरवात करतात. तरी, आस्थेवाईक लोकांबरोबर बायबल अभ्यास दीर्घकाळासाठी घेतला पाहिजे का, किंवा प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना अल्पावधीत बाप्तिस्मा घेणे शक्य आहे का? प्रेषितांची कृत्ये १६:२५-३४ मध्ये उल्लेखित बंदिशाळेचा नायक आणि त्याच्या घराण्याचे काय झाले ते पाहा. पौल आणि सीला या दोघांना फिलिप्पै येथील कारागृहात टाकण्यात आले, पण मध्यरात्री एका मोठ्या भूमिकंपामुळे बंदिशाळेचे दरवाजे उघडले. सर्व बंदिवान पळून गेले व आता त्याला कडक शिक्षा दिली जाईल असा तर्क करून बंदिशाळेचा नायक आत्महत्या करणार होता इतक्यात, ते सर्व तेथेच होते असे पौलाने त्याला सांगितले. पौल आणि सीलाने “त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.” तो नायक आणि त्याचे कुटुंब पवित्र शास्त्रवचनांची काहीही माहीत नसलेले विदेशी होते. तरीदेखील, त्या एका रात्रीत ते विश्‍वासी बनले. त्याहूनही अधिक म्हणजे, “त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला.” अर्थात ते असामान्य प्रसंग होते, पण नव्या लोकांना मूलभूत सत्य शिकवले जात होते आणि मग ते मंडळीतील सभांमधून इतर गोष्टी शिकत होते. आजही असेच शक्य असले पाहिजे.

पीक फार आहे!

१४. अल्पावधीत मोठ्या संख्येत प्रभावकारी बायबल अभ्यास चालवण्याची गरज का आहे?

१४ यहोवाच्या साक्षीदारांना अल्पावधीत पुष्कळ प्रभावकारी बायबल अभ्यास घेता आले तर फार उत्तम होईल. याची खरोखरच अत्यंत गरज आहे. उदाहरणार्थ, पूर्व युरोपसारख्या देशांमध्ये लोकांना बायबल अभ्यासांसाठी प्रतिक्षा यादीत नाव द्यावे लागते. इतरत्र देखील अशीच परिस्थिती आहे. डॉमिनिकन प्रजासत्ताक येथील एका शहरात, पाच साक्षीदारांकडे इतक्या विनंत्या होत्या की त्यांना सर्व अभ्यास चालवता आले नाहीत. तेव्हा त्यांनी काय केले? त्यांनी आस्थेवाईक लोकांना राज्य सभागृहात होणाऱ्‍या सभांना उपस्थित राहण्याचे व आपले नाव बायबल अभ्यासासाठी प्रतिक्षा यादीत नोंदवण्याचे उत्तेजन दिले. संपूर्ण पृथ्वीवर अशा प्रकारच्या अनेक परिस्थिती आहेत.

१५, १६. देवाचे ज्ञान जलद गतीने पसरविण्यासाठी काय पुरवण्यात आले आहे व त्याच्या काही वस्तुस्थिती कोणत्या?

१५ विस्तृत क्षेत्र—कापणीसाठी तयार झालेली मोठी शेती—देवाच्या लोकांसाठी खुली होत आहेत. ‘पिकाचा धनी,’ यहोवा आणखी कामकऱ्‍यांना पाठवत असला तरी पुष्कळ काम बाकी आहे. (मत्तय ९:३७, ३८) यास्तव, देवाचे ज्ञान होता होईल तितके लवकर पसरविण्यासाठी ‘विश्‍वासू दासाने’ असे काही तरी पुरवले आहे जे संक्षिप्त रुपात विशिष्ट माहिती देते जेणेकरून बायबल विद्यार्थी प्रत्येक प्रकरणानंतर आध्यात्मिक प्रगती करू शकतात. ते एक नवे प्रकाशन आहे ज्याला अल्पावधीतच—कदाचित काही महिन्यांमध्येच गृह बायबल अभ्यासांमध्ये अभ्यासले जाऊ शकते. शिवाय ते आपण सहजपणे आपल्या ब्रिफकेसमध्ये, आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या खिश्‍यांमध्ये देखील वागवू शकतो! यहोवाच्या साक्षीदारांच्या “आनंदी स्तुतीकर्ते” या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या शेकडो हजारोंना सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे १९२ पानांचे नवे पुस्तक प्राप्त करण्यास आनंद झाला.

१६ विविध देशातील लेखकांनी यातील मजकूर तयार केला जो काळजीपूर्वकतेने ज्ञान या पुस्तकासाठी अखेर ठरवण्यात आला. त्यामुळेच ते आंतरराष्ट्रीयरीत्या अपीलकारक ठरले पाहिजे. परंतु, जगातील लोकांच्या भाषेत हे नवे प्रकाशन प्रकाशित होईपर्यंत खूप उशीर झालेला असेल का? नाही, कारण १९२ पानांचे पुस्तक मोठ्या पुस्तकांपेक्षा लवकर भाषांतरीत करता येते. ऑक्टोबर १९९५ पर्यंत, नियमन मंडळाच्या लिखाण समितीने इंग्रजीतून सुमारे १३० पेक्षा अधिक भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर करण्याची मान्यता दिली होती.

१७. कोणत्या कारणांमुळे ज्ञान पुस्तकाचा वापर करण्यास सोपे झाले पाहिजे?

१७ ज्ञान पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातील खुलासेवार माहितीने विद्यार्थ्यांना साधारणपणे जलद आध्यात्मिक प्रगती करण्यास शक्य केले पाहिजे. ते पुस्तक शास्त्रवचनीय सत्यांना उभारणीकारक मार्गाने सादर करते. ते खोट्या सिद्धांतांना सविस्तरपणे मांडत नाहीत. भाषेचा अस्खलितपणा आणि तर्कशुद्ध विकासामुळे बायबल अभ्यास चालवण्यास तसेच देवाचे ज्ञान उमजण्यास लोकांना मदत करण्यासाठी सोपे गेले पाहिजे. उद्धृत शास्त्रवचनांच्या व्यतिरिक्‍त, तेथे उल्लेखित बायबल वचने आहेत ज्यांना विद्यार्थी चर्चेची तयारी करताना पाहू शकतो. मुख्य मुद्दे झाकाळले जाऊ शकतील असे जादा साहित्य आणणे सुज्ञतेचे ठरणार नसले तरी वेळ अनुमती देते त्याप्रमाणे ती वचने वाचली जाऊ शकतात. त्याऐवजी बायबल अभ्यास घेणाऱ्‍यांनी, ते पुस्तक प्रत्येक प्रकरणात काय सिद्ध करत आहे ते समजून विद्यार्थ्याला सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचा अर्थ असा होतो, की शिक्षकाने त्याचा लक्षपूर्वक अभ्यास केला पाहिजे जेणेकरून त्यातील मुख्य विचार त्याच्या मनामध्ये स्पष्ट होतील.

१८. ज्ञान पुस्तकाचा वापर करण्याविषयी कोणत्या सूचना दिल्या आहेत?

१८ सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक कशा प्रकारे शिष्य बनवण्याचे कार्य जलद गतीने पार पाडू शकते? या १९२ पानी पुस्तकाचा अभ्यास तुलनात्मकरीत्या अल्पावधीत केला जाऊ शकतो, व ‘सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्यांना’ त्याच्या अभ्यासाद्वारे यहोवाला समर्पण करण्यास व बाप्तिस्मा घेण्यास पुरेसे शिकून घेता आले पाहिजे. (प्रेषितांची कृत्ये १३:४८) यास्तव, आपण सेवेमध्ये ज्ञान या पुस्तकाचा चांगला उपयोग करून घेऊ या. एखाद्या बायबल विद्यार्थ्याने दुसऱ्‍या एका पुस्तकाचा जवळजवळ पुष्कळ भाग अभ्यास केलेला असेल तर ते पुस्तक पूर्ण करणे व्यवहार्य ठरेल. नाहीतर, ज्ञान पुस्तकातून बायबल अभ्यास घेण्यास सुरवात करावी असे सुचवले जाते. या नव्या प्रकाशनाचा अभ्यास संपल्यावर त्याच विद्यार्थ्याबरोबर दुसऱ्‍या पुस्तकाचा अभ्यास करण्याचे सुचवले जात नाही. सत्याचा स्वीकार करणारे, यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहण्याद्वारे तसेच स्वतःहून बायबलचे आणि इतर विविध ख्रिस्ती प्रकाशनांचे वाचन करण्याद्वारे त्यांच्या ज्ञानात वाढ करू शकतात.—२ योहान १.

१९. ज्ञान पुस्तकातून बायबल अभ्यासास प्रारंभ करण्याआधी आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित या पुस्तकाच्या पृष्ठे १७५ ते २१८ वरील प्रश्‍नांची उजळणी करणे मदतदायी का असेल?

१९ यहोवाचे साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या प्रचारकांबरोबर वडील ज्या प्रश्‍नांची उजळणी घेतात त्यांची उत्तरे देण्यास एखाद्या व्यक्‍तीला मदत व्हावी या हेतूने ज्ञान पुस्तक लिहिण्यात आले होते. तेव्हा, तुमचे सध्याचे बायबल अभ्यास या नव्या प्रकाशनातून घेण्यास सुरवात करण्याआधी, आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटितa पुस्तकाच्या पृष्ठे १७५ ते २१८ वरील प्रश्‍नांची उजळणी करण्यास काही तास खर्च करा अशी शिफारस केली जाते. असे केल्याने, ज्ञान या पुस्तकातून बायबल अभ्यास करताना अशा प्रश्‍नांच्या उत्तरांवर जोर देण्यासाठी तुम्हाला साहाय्य मिळेल.

२०. सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाचा वापर कशासाठी करण्याचे तुम्ही ठरवले आहे?

२० ही सुवार्ता, लोकांनी सर्वतः ऐकली पाहिजे. होय, मानवजातीला देवाच्या ज्ञानाची आवश्‍यकता आहे आणि ती सर्वांना सांगण्यासाठी यहोवाकडे त्याचे साक्षीदार आहेत. आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याने विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाकरवी पुरवलेले एक नवे पुस्तक आता आपल्याकडे आहे. सत्य शिकवण्यास व यहोवाच्या पवित्र नावाला आदर देण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग कराल ना? सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुष्कळांना उपलब्ध करून देण्याचा प्रयास करताना यहोवा तुम्हाला निश्‍चितच आशीर्वाद देईल.

[तळटीपा]

a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ तुम्ही लाक्षणिक हृदयाचे वर्णन कसे कराल?

◻ देवाचे ज्ञान काय आहे?

◻ मानवजातीला देवाच्या ज्ञानाची आवश्‍यकता का आहे?

◻ कोणते नवे पुस्तक उपलब्ध आहे व त्याचा वापर कसा करावयाचे तुम्ही ठरवता?

[१० पानांवरील चित्रं]

पृथ्वीवरील कोट्यावधी लोकांना देवाच्या ज्ञानाची आवश्‍यकता का आहे यासाठी अनेक कारणे आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा