१९९६ “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” प्रांतीय अधिवेशन
१ भारतातील १९९५ “आनंदी स्तुतीकर्ते” या प्रांतीय अधिवेशनांस उपस्थित राहिलेल्या २३,४४७ लोकांपैकी पुष्कळांकडून आध्यात्मिकरित्या उत्स्फूर्त कार्यक्रमाबद्दल प्रशंसेचे मनःपूर्वक उद्गार ऐकायला मिळाले. यहोवाच्या ८६१ स्तुतीकर्त्यांना आपल्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतल्याचे पाहून आमची अंतःकरणे हर्षित झाली होती. यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण (इंग्रजी) तसेच सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान ही दोन नवीन प्रकाशने प्राप्त करण्यास आम्हाला आनंद झाला होता. मागील वर्षी अशाप्रकारच्या उद्दीपक कार्यक्रमाचा आनंद लुटल्यामुळे, १९९६ “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” या प्रांतीय अधिवेशनांसाठी आयोजल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला हजर राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यास आपल्याला खरोखरच चालना मिळाली पाहिजे. आपण सर्वांनी निश्चितच आपल्या बायबल विद्यार्थ्यांना आमंत्रण दिले पाहिजे आणि आपल्यासोबत तेथे हजर असण्याकरता त्यांना मदत केली पाहिजे. या शेवटल्या काळात आपण हर्षाने यहोवाची सेवा सातत्याने करत असताना ही अधिवेशने उत्तेजन आणि बळकटी यांचा खरा स्रोत ठरतील.
२ अधिवेशनाकरता आगाऊ योजना करण्याची खात्री करा जेणेकरून सुरवातीच्या गीतापासून समाप्तीच्या प्रार्थनेपर्यंतच्या आल्हाददायक आध्यात्मिक कार्यक्रमाचा आनंद लुटायला तुम्ही तेथे उपस्थित राहू शकाल. तुमच्या योजनांमध्ये ज्यांना मदतीची आवश्यकता आहे अशांचा प्रेमळपणे समावेश करा, खासकरून नवोदित आस्थेवाईकांचा, जेणेकरून ते देखील प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील. जे बायबल विद्यार्थी कदाचित उपस्थित राहण्याची योजना करतील अशांसोबत या पुरवणीतील माहितीची चर्चा केल्यास ते अतिशय मदतदायी ठरेल. (गलती. ६:६, १०) या वर्षाचा प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम आपली ईश्वरी शांती टिकवून ठेवण्यास आपल्याला निश्चितच मदत करील त्याचप्रमाणे अशी शांती मिळवण्यास इतरांना मदत करण्यामध्ये आपली कोणती भूमिका आहे ते स्पष्ट करील. कोणताही कार्यक्रम चुकवला जाऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या योजना आखल्या आहेत काय?
३ तीन दिवसीय कार्यक्रम: मागील वर्षाच्या “आनंदी स्तुतीकर्ते” प्रांतीय अधिवेशनाबद्दल उद्गारलेले एक अनुकूल विवेचन अनेकांच्या भावना प्रकट करते: “तीन सुंदर दिवस आपण शांतीत, ऐक्यमय संगतीत, यहोवाची प्रशंसा करण्यात घालवल्यामुळे आपल्याला किती आनंद झालाय! आपण एका सुंदर आध्यात्मिक परादीसमध्ये राहतो अशी खात्री आपल्या अधिवेशनानं पटवून दिलीय. या त्रस्त जगातसुद्धा हर्ष प्रकट करण्याचं आपल्याकडे खरंच कारण आहे.” तुम्ही या वर्षाच्या अधिवेशनाचा देखील पूर्णपणे आनंद लुटाल आणि नव्या उत्साहाने घरी परताल हे आम्हाला ठाऊक आहे. (२ इति. ७:१०) या वर्षी पुन्हा एकदा आपला तीन दिवसीय कार्यक्रम असेल. प्रापंचिक कामावरून सुटी मिळवण्याची व्यवस्था तुम्ही आधीच केली आहे का, जेणेकरून तुम्हाला त्या संपूर्ण कालावधीसाठी उपस्थित राहता येऊ शकेल? पुष्कळशी अधिवेशने शाळेच्या सुट्या असतात तेव्हा होणार नाहीत. तुमची मुले शालेय वयाची असल्यास, त्यांच्या या आध्यात्मिक प्रशिक्षणाच्या महत्त्वपूर्ण भागामुळे ती एक अथवा दोन दिवसांकरता अनुपस्थित राहतील हे तुम्ही त्यांच्या शिक्षकांना आदरपूर्वक कळवले आहे का?
४ जुलै १ आणि १५, १९९६, टेहळणी बुरूज नियतकालिकाचे अंक भारतातील सर्व १५ अधिवेशनांच्या तारखांची आणि ठिकाणांची यादी देतात. इंग्रजी व्यतिरिक्त बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, तमीळ आणि तेलगू यांमध्ये देखील अधिवेशने होतील. तिन्ही दिवशी, कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता सुरू होईल आणि रविवारी संध्याकाळी सुमारे ४.०० वाजता समाप्त होईल. प्रवेश द्वारे सकाळी ८.०० वाजता उघडण्यात येतील. या आधी, केवळ कामाच्या नेमणुका असलेल्यांनाच प्रवेश करण्यास परवानगी दिली जाईल, तसेच त्यांना, सर्वांकरता ही इमारत उघडली जात नाही तोपर्यंत जागा राखून ठेवण्यास अनुमती दिली जाणार नाही. जे वृद्ध आणि दुर्बल बांधव आहेत अशांकरता सोयीस्कर आणि आरामदायी ठिकाणांतील जागा रिकाम्या ठेवून आपण चांगुलपणा प्रदर्शित करणार का? लक्षात असू द्या: “प्रीति . . . स्वार्थ पाहत नाही.”—१ करिंथ. १३:४, ५; फिलिप्पै. २:४.
५ तुम्ही पाणीदार केले जाल का?: नीतिसूत्रे २७:१७, “तिखे तिख्याला पाणीदार करिते” हे उद्धृत करून ऑगस्ट १५, १९९३, टेहळणी बुरूजने (इंग्रजी) असे निरीक्षण केले: “नियमितपणे पाणीदार करण्याची आवश्यकता असलेल्या अवजारांप्रमाणे आपण आहोत. यहोवाप्रती प्रेम प्रकट करणे आणि आपल्या विश्वासावर आधारित निर्णय घेणे याचा अर्थ जगापासून भिन्न असणे असा होत असल्यामुळे आपल्याला सतत बहुतांश लोकांपासून जणू एक निराळा मार्गच अनुसरण्याची गरज असते.” आपण तो सल्ला कसा लागू करू शकतो?
६ आपण जगापेक्षा भिन्न आहोत आणि तसे राहिलेच पाहिजे. आपल्याला चांगल्या कामात तत्पर असावयाचे असल्यास जगापेक्षा भिन्न असण्याचा आपला नित्य प्रयत्न टिकवून ठेवावयास हवा. (तीत २:१४) म्हणूनच, वर उद्धृत केलेल्या टेहळणी बुरूज लेखाने पुढे असे म्हटले: “यहोवाप्रती प्रेम असलेल्या इतरांसोबत आपले साहचर्य असते तेव्हा आपण एकमेकांना पाणीदार करतो—आपण एकमेकांना प्रीती आणि सत्कर्मे करण्यास उत्तेजन देतो.” प्रांतीय अधिवेशन, आपल्याला आध्यात्मिकरित्या तल्लख राहण्यास मदत करणारी यहोवाकडील एक तरतूद आहे. अधिवेशनाच्या तीन दिवसांदरम्यान प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास आपण दृढनिश्चयी असू या. कार्यक्रमाचा कोणताही भाग चुकवलेला आपल्याला चालणार नाही.
७ सुज्ञ व्यक्ती ऐकेल: आपल्याला जन्मतः ऐकण्याची क्षमता असते, पण जन्मतः कान देण्याची क्षमता नसते. श्रवण करणे ही एक कला आहे जी विकसित करावी लागते. असे म्हटले जाते, की सरासरी व्यक्तीच्या लक्षात त्याने ऐकलेल्या गोष्टींमधील केवळ निम्म्याच गोष्टी राहतात—मग त्याच्या मते त्याने कितीही लक्ष देऊन ऐकले असले तरीही. आपण विकर्षणांच्या युगात राहत असल्यामुळे, प्रदीर्घ काळासाठी मन एकाग्र करण्यास आपल्याला जड जात असेल. लक्ष देण्याची आपली कालमर्यादा आपण वाढवू शकतो का, खासकरून अधिक श्रोतागण असलेल्या ठिकाणी बसून कोणा एका व्यक्तीचे भाषण ऐकत असताना? अधिवेशनाहून घरी परतल्यावर तुम्हाला प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाचा सारांश सांगायला लावल्यास तुम्ही तो देऊ शकाल का? अधिवेशनातील कार्यक्रमात प्रस्तुत केला जाणारा प्रत्येक भाग कान देऊन ऐकण्याची आणि त्याकडे नीट लक्ष पुरवण्याची आपली कुवत आपण सर्वजण कशाप्रकारे सुधारू शकतो?
८ आत्यंतिक आस्था आवश्यक आहे, कारण स्मरणशक्तीचे ईश्वरी दान त्याशिवाय कार्यक्षमपणे कार्यरत होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती एखाद्या विषयाबद्दल जितकी अधिक आस्था दाखवते तितकेच तिला भाषणातील किंवा कार्यक्रमाच्या भागातील मुख्य मुद्दे लक्षात ठेवायला सोपे जाते. तरीही, प्रांतीय अधिवेशनांमध्ये आपल्याला ज्या गोष्टी ऐकण्याचा सुहक्क मिळतो त्यांकडे नेहमीपेक्षा जरा जास्तच लक्ष देण्यावर पुष्कळ काही निर्भर आहे. सा. यु. पू. १५१३ या काळातील इजिप्तमधील काही इस्राएली कुटुंबांनी वल्हांडणाच्या सूचनांकडे कमी लक्ष दिले असते तर काय घडले असते? निर्गम १२:२८ सांगते: “इस्राएल लोकांनी जाऊन तसे केले. परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी केले.” ईश्वरी सूचनांचे अनुपालन करणे म्हणजे इस्राएलच्या प्रथमवत्साचे संरक्षण होते. अधिवेशनातील कार्यक्रमाच्या प्रत्येक भागाबद्दल आत्यंतिक आस्था आणि त्याकडे लक्ष देणे यांचा आपल्या सद्य आध्यात्मिक परिस्थितीशी तसेच आपल्या भवितव्यातील प्रत्याशांशी संबंध आहे. अधिवेशनांमध्ये आपल्याला यहोवाचे मार्ग शिकवण्यात येतात आणि जीवन बचावण्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन दिले जाते. (१ तीम. ४:१६) तुम्ही, खवळलेल्या समुद्रातील वादळात सापडलेले एक जहाज आहात अशी कल्पना करा. यहोवाची अभिवचने उमेदीच्या भक्कम नांगरासमान आहेत. एखादी व्यक्ती ख्रिस्ती कार्यक्रमांकडे लक्ष देत नसेल व आपले मन भरकटू देण्यास अनुमती देत असेल तर काय होऊ शकते? तिला आध्यात्मिक नौकाभंग होण्यापासून सुरक्षित ठेवू शकतील असे सल्ला व मार्गदर्शनाचे मुख्य मुद्दे ती चुकवू शकते.—इब्री. २:१; ६:१९.
९ जगाच्या अनेक भागांमध्ये, आपले बांधव सभांना हजर राहण्याकरता शारीरिकरित्या पुष्कळ परिश्रम घेतात. ते अधिवेशनांमध्ये तल्लीन होऊन गेल्याचे पाहणे आश्चर्यकारक आहे. तथापि, काही ठिकाणी, अधिवेशनाच्या आवारात कार्यक्रम सुरू असताना घोळका करून फेरफटका मारत राहिल्याने काही व्यक्तींनी इतरांना विचलित केले आहे. इतरजण उशिरा येतात. गतकाळातील काही अधिवेशनांमध्ये, कार्यक्रमाच्या सुरवातीचे काही क्षण ऐकणे कठीण झाले होते कारण दालनात आणि बैठकींच्या मागील भागात पुष्कळांची वर्दळ होती. बहुतेक वेळा हे लोक, कामाच्या नेमणुका असणारे बांधव अथवा आपल्या लहान मुलांची काळजी घेणाऱ्या माता नसतात. पुष्कळसा गोंधळ विनाकारण ये-जा आणि गप्पागोष्टी करणाऱ्यांकडून होतो. या वर्षी मदतनीस खाते या समस्येकडे अधिक लक्ष देईल आणि अशी आशा केली जाते की, अध्यक्ष आपल्याला बसायचे आमंत्रण देतील तेव्हा सर्वजण बसतील. या बाबतीत तुमच्या सहकार्याची खूप प्रशंसा केली जाईल.
१० अधिवेशनाच्या कार्यक्रमाकडे अधिक लक्ष देण्यास आणि प्रस्तुत केल्या जाणाऱ्या अधिक गोष्टी मनी बाळगण्यास कोणते व्यावहारिक सल्ले आपल्याला मदत करतील? गत वर्षांमध्ये जे सांगण्यात आले होते त्याची पुनरुक्ती करण्याची आवश्यकता आहे: (अ) अधिवेशन शहरात जाण्याच्या मुख्य कारणावर लक्ष केंद्रित करा. ते म्हणजे, करमणूक करायला नाही तर कान देऊन ऐकण्यास आणि शिकण्यास जात आहोत हे आहे. (अनु. ३१:१२) प्रत्येक रात्री पुरेसा आराम घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही अधिवेशनाला अगदीच क्षीण अवस्थेत आलात तर मन एकाग्र करणे कठीण जाईल. (ब) एखादी जागा शोधण्यासाठी स्वतःजवळ पुरेसा वेळ असू द्या आणि कार्यक्रम सुरू होण्याआधीच आपल्या जागेवर बसा. शेवटल्या क्षणी जागेवर बसण्याची धावपळ केल्याने तुम्ही सुरवातीचा काहीसा भाग चुकवाल. (क) मुख्य मुद्यांची संक्षिप्त टिपणी घ्या. विस्तारित टिपणी घेणे, चांगल्या प्रकारे श्रवण करण्यामध्ये बाधा आणू शकते. लिहित असताना, टिपणींवर मन एकाग्र असल्यामुळे तुमच्याकडून इतर मुद्दे निसटणार नाहीत याची खात्री करा. (ड) अधिवेशनातील एखादा भाग प्रस्तुत केला जातो तेव्हा उत्सुकतेने त्याची अपेक्षा करा. स्वतःला विचारा, ‘यहोवाप्रती माझी कदर आणि प्रीती ज्यामुळे वाढेल असे मी या भागातून काय मिळवू शकतो? ही माहिती मला माझे नवीन व्यक्तिमत्त्व अधिक पूर्णपणे साकार करण्यास कशी मदत करू शकते? हे मला माझ्या सेवाकार्यात सुधारण्यास कशी मदत देऊ शकते?’
११ आपल्या सेवेला सुशोभित करणारी वर्तणूक: पौलाने तीतास “चांगल्या कामाचा कित्ता” असे आपणाला दाखीव असे प्रोत्साहन दिले. तीताने आपल्या शिकवणुकीत प्रामाणिकता दाखवून, इतरांनी “सर्व गोष्टीत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी,” यासाठी तो त्यांना मदत करणार होता. (तीत २:७, १०) अधिवेशनाला जाताना व तेथून परतताना तसेच आपण हॉटेलमध्ये किंवा उपहार गृहांमध्ये आणि खुद्द अधिवेशनाच्या ठिकाणी असतो तेव्हा ईश्वरी वर्तणूक राखणे इतके महत्त्वाचे का आहे याविषयी दर वर्षी आपल्याला नम्रपणे स्मरणिका दिल्या जातात. मागील वर्षी, आम्हाला पुन्हा एकदा काही आनंदविणारी विवेचने ऐकावयास मिळाली जी तुम्हालाही सांगण्यास आम्हाला आवडेल.
१२ एका हॉटेलच्या व्यवस्थापकाने असे म्हटले: “साक्षीदारांची सोय करण्यास आम्हाला नेहमीच आनंद होतो कारण ते धीर धरणारे, सहकार्य देणारे असतात व आपल्या मुलांवर बारीक नजर ठेवतात.” एका हॉटेलमधील डेस्क क्लर्क असे म्हणतो, की ‘साक्षीदार हॉटेलमध्ये दाखल होतात आणि हॉटेल सोडतात तेव्हा माझं काम खूप सोपं होतं कारण त्यांना रांगेत उभं राहावं लागलं तरी ते नेहमीच सभ्य, धीर धरणारे आणि समजदार असतात.’ साक्षीदार युवक जेथे राहत होते त्याच मोटेलमध्ये राहणारी न्यू इंग्लंड येथील एक स्त्री त्यांची वर्तणूक पाहून इतकी प्रभावित झाली की तिने आपल्या संघटनेबद्दलचे काही साहित्य मागवले.
१३ दुसऱ्या बाजूला पाहता, विशिष्ट भागांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. संस्थेला पाठवलेली काही निरीक्षणे तुम्हाला सांगण्यास आम्हाला आवडतील. एका प्रवासी पर्यवेक्षकांनी सांगितले की, हॉटेलमध्ये असताना यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. काहीजण दालनात धावपळ करत असल्याचे, लिफ्टमध्ये वर-खाली ये-जा करत असल्याचे, लॉबीमध्ये खूप गोंगाट केल्यामुळे इतर पाहुण्यांची झोपमोड करत असल्याचे आढळले आहे. आपल्या मुलांना, ख्रिस्ती वर्तणुकीचे वेळापत्रक नाही हे समजावून देण्याकरता शिकवण्याची गरज आहे. अधिवेशन सुविधेच्या बाहेर आल्यावर ख्रिस्ती वर्तणुक संपते असे नाही. ती दिवसातील २४ तासांसाठी कायम राहिली पाहिजे. आपली वर्तणूक, आपल्याला बांधवांसोबत कार्यक्रमादरम्यान बसून यहोवाविषयी शिकवले जाते तेव्हा जशी आदरपूर्ण असते तशीच हॉटेलमध्ये, उपहार गृहांमध्ये त्याचप्रमाणे रस्त्याने जाताना देखील असली पाहिजे.—यश. ५४:१३; १ पेत्र २:१२.
१४ आपल्या अधिवेशनांमध्ये, भोजन सेवा मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्यामुळे, भाड्याने सुविधा घेण्यासाठी तसेच इतर विविध बाबींची काळजी घेण्यासाठी जो अवाढव्य खर्च लागतो तो भरून काढायला आपल्या स्वेच्छा दानांची अधिक गरज आहे. किशोरवयीन मुलांसोबत अधिवेशनाला आलेल्या एका बहिणीजवळ मोजकेच पैसे होते. तरीही, तिने व तिच्या मुलांनी लहानशी देणगी देऊन मदत केली. प्रत्येक जण या बाबतीत काय ठरवतो ही एक व्यक्तिगत बाब आहे, पण तुम्ही अशा स्मरणिकांची कदर करता हे आम्हाला ठाऊक आहे.—प्रे. कृत्ये २०:३५; २ करिंथ. ९:७.
१५ पेहराव करण्याच्या आपल्या पद्धतीने ओळखले जाणे: आपण जसा पेहराव करतो त्याद्वारे स्वतःबद्दल तसेच इतरांप्रती आपल्या काय भावना आहेत ते प्रकट होते. शाळेमध्ये किंवा नोकरी करण्याच्या ठिकाणी, बहुतांश किशोरवयीन आणि पुष्कळ प्रौढांच्या सभोवताली अलीकडच्या, गबाळ्या पद्धतीचे पोषाख पाहावयास मिळतात. दर वर्षी पेहराव, अतिशयोक्तीचे एवढेच काय तर धक्कादायक देखील होत जातात. आपण सावधगिरी बाळगली नाही, तर आपणही जगिक समवयस्कांद्वारे प्रभावित होऊन त्यांच्याचप्रमाणे पेहराव करायला लागू. पुष्कळसे पेहराव उपासनेसाठी सभेला घालून जाण्यास अनुचित असतात. मागील वर्षाच्या एका अधिवेशनानंतर मिळालेल्या एका चिठ्ठीत कार्यक्रमाविषयी प्रशंसा व्यक्त केली होती पण त्यात पुढे असे म्हटले होते: “इतक्या तरुण मुली आखूड कपडे, खोल गळ्याचे टॉप्स आणि मोठ्या स्लिट्स असलेले कपडे का घालतात याचं मला आश्चर्य वाटलं.” निश्चितच, अधिवेशनाच्या ठिकाणी त्याचप्रमाणे कार्यक्रमानंतर एकमेकांसोबत वेळ घालवताना ख्रिस्ती सेवकांना साजेल असाच पेहराव करण्याची इच्छा आपण सर्वजण बाळगतो. “साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने” शोभवावे या पौलाच्या सल्ल्यावर पुनर्विचार करणे आपणाकरता सर्वच वेळी फायदेकारक ठरते.—१ तीम २:९.
१६ सभ्य, ‘साजेल असा’ पेहराव कोणता आहे हे कोणी ठरवावे? सभ्य असण्याचा अर्थ, “उद्धट किंवा फाजील आत्मविश्वास विशद न करणारा” असा होतो. शब्दकोश सभ्य याची व्याख्या “नम्र” असा देखील करतो. पेहराव अथवा केशभूषा यांविषयी संस्थेने किंवा वडिलांनी देखील नियम बनवू नयेत. असे असतानाही, कोणत्या प्रकारचे कपडे मुळीच सभ्य अथवा विनयशील नाहीत हे एखाद्या ख्रिश्चनाला स्पष्ट दिसू नये का? (पडताळा फिलिप्पैकर १:१०.) आपल्या केशभूषेने आणि कपड्यांनी अनुचित लक्ष आकर्षित करू नये. आपली वेशभूषा सुखकारक असली पाहिजे, जगिक किंवा अडखळणारी असू नये. सुवार्तेचे सेवक या नात्याने, आपला उचित पेहराव आणि केशभूषा यहोवाचा सन्मान करते आणि संघटनेबद्दल चांगली छाप पाडते. राज्य सभागृहात, सभांना उपस्थित असताना आपण सामान्यपणे जो पेहराव करतो तशाचप्रकारची वेशभूषा आणि पेहराव प्रांतीय अधिवेशनाच्या शहरात असताना देखील केला पाहिजे. यास्तव, पालक उदाहरणशील असतील आणि मग त्या प्रसंगासाठी आपल्या मुलांचा योग्य पेहराव असल्याची खात्री करतील. वडीलजन चांगले उदाहरण राखतील आणि आवश्यकतेनुसार नम्र सल्ला देण्याच्या तयारीत असतील.
१७ हॉटेल: आधी आम्ही अशा हॉटेल कर्मचाऱ्यांचे बोल उद्धृत केले ज्यांनी म्हटले की बांधव धीर धरणारे, नम्र आणि सहकार्य देणारे असल्यामुळे ते प्रभावित झाले होते. आपल्याला नाव नोंदवण्यासाठी रांगेत उभे राहावे लागल्यास आपण सातत्याने हेच ख्रिस्ती गुण प्रदर्शित केले पाहिजेत. ज्या हॉटेलांनी माफक किंमतीत खोल्या पुरवण्यासाठी संस्थेला सहकार्य दिले आहे त्यांची आम्ही प्रशंसा करतो. आपण प्रवासामुळे क्षीण झालेले असलो, तरी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी नम्रतेने व्यवहार करण्याचे लक्षात ठेवले पाहिजे. आपण असे केल्याने काहीजण सत्याचे अधिक बारकाईने परीक्षण करू लागतील. शिवाय, हॉटेलच्या खोल्यांमध्ये परवानगी असल्याशिवाय कसलाही स्वयंपाक केला जाऊ नये.
१८ व्हिडिओ कॅमेरा, कॅमेरा आणि टेप रेकॉर्डर: कॅमेरा आणि इतर रेकॉर्डींगची उपकरणे वापरण्यास परवानगी आहे, परंतु आपण उपस्थित असलेल्या इतरांबद्दल कदर दाखवली तरच. कार्यक्रमादरम्यान आपण आजूबाजूला फिरत छायाचित्रे घेऊ लागलो, तर जे ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत केवळ त्यांनाच विकर्षित करणार नाही तर आपण स्वतः देखील कार्यक्रमाचा काही भाग चुकवू. वक्त्यांकडे बारकाईने लक्ष दिल्याने आणि मोजक्याच टिपणी घेतल्याने आपण बहुधा अधिवेशनातून जास्त लाभ मिळवतो. घराबाहेर पडू न शकणाऱ्या बंधू अथवा बहिणीसाठी आपण रेकॉर्डींग करत असू; परंतु, स्वतःसाठी करताना, घरी परतल्यावर आपल्याला हे कळून येईल की, कार्यक्रमातील जास्तीत जास्त तास मुद्रित करण्यामध्ये घालवल्यावर रेकॉर्डींग केलेल्या गोष्टींची उजळणी करायला आपल्याला वेळ मिळणार नाही. कोणतीही रेकॉर्डींग उपकरणे विद्युत किंवा ध्वनी व्यवस्थेला जोडली जाऊ नयेत, तसेच उपकरणांनी ओळींमधील जागेत, दालनांत, किंवा इतरांच्या पाहण्यामध्ये अडथळा आणू नये.
१९ बैठक: जागा राखून ठेवण्याच्या बाबतीत आम्हाला सुधारणा दिसून येत आहे. मागील वर्षी, तुमच्यापैकी बहुतेकांनी “जागा केवळ तुमचे जवळचे कौटुंबिक सदस्य व जे कोणी तुम्हासोबत प्रवास करतात त्यांच्यासाठीच राखता येऊ शकते,” ही सूचना पाळली. बहुतेकजण या स्पष्ट सूचनांचे अनुपालन करत असल्यामुळे तुम्हाला कदाचित जास्त त्रास झाला नसेल. अति महत्त्वपूर्ण म्हणजे, तुमचे हे अनुपालन यहोवाला आणि आध्यात्मिक अन्न देणाऱ्या ‘विश्वासू दासाला’ संतुष्ट करणारे होते.—मत्त. २४:४५.
२० विशिष्ट आरोग्य गरजा असणारे आणि तरीही अधिवेशनाला येणारे असे आपले अधिकाधिक बांधव आहेत. काहीजण व्हीलचेअरमध्ये बसून येतात आणि कुटुंबाच्या सदस्यांना त्यांची काळजी घ्यावी लागते. इतरजण हृदयविकार किंवा झटके अशा चिरकालीन रोगांमुळे विविध औषधे घेत असतात. हे प्रिय बंधू व बहिणी जे कोणत्याही प्रकारचे आध्यात्मिक अन्न न चुकवण्याचा निर्धार करून असतात त्यांना अधिवेशनाला आल्याचे पाहून आपल्याला खरोखरच आनंद होतो. तथापि, काहीवेळा अधिवेशनाच्या दरम्यान काही व्यक्ती आजारी पडल्याची समस्या घडली आहे आणि त्यांची मदत करायला कुटुंबाचे अथवा मंडळीचे सदस्य नव्हते. काही प्रसंगी, अधिवेशन व्यवस्थापनाला, त्या बांधवास अथवा बहिणीस रुग्णालयात नेण्यासाठी तातडीची वैद्यकीय सेवा बोलवावी लागली आहे. चिरकालीन व्याधी असणाऱ्यांची काळजी घेण्याची प्रथम जबाबदारी कुटुंबाच्या सदस्यांवर आणि जवळच्या नातेवाईकांवर असली पाहिजे. अधिवेशनातील प्रथमोपचार खाते चिरकालीन व्याधी असणाऱ्यांची काळजी घेऊ शकत नाही. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची विशेष काळजी घ्यावी लागत असल्यास, आणीबाणीची परिस्थिती उद्भवते तेव्हा त्याला एकटे सोडले जात नाही याची कृपया खात्री करा. शिवाय, काहीप्रकारच्या ॲलर्जींमुळे जे सामान्य बैठकीच्या जागांमध्ये बसू शकत नाहीत त्यांच्याकरता अधिवेशनांमध्ये खास खोल्या देण्याची व्यवस्था नसेल. ज्यांच्या खास आरोग्य गरजा आहेत अशा आपआपल्या मंडळीतील लोकांबद्दल वडील जाणून घेतील आणि त्यांची काळजी घेण्याकरता आधीच व्यवस्था केली आहे याची खात्री करतील.
२१ अधिवेशनातील भोजन गरजा: अधिवेशनात भोजन दिले जाणार नाही अशी घोषणा मागच्या वर्षी केल्यावर आपल्यातील काहीजण जरा आशंकित झाले असावेत. पण नंतर, आपल्या बहुतांश बांधवांप्रमाणेच, हलकाच अल्पोपहार घेण्याचे किंवा स्वतःचे जेवण आणण्याचे फायदे पाहून आपल्याला अतिशय आनंद झाला असावा. एका बांधवाने लिहिले: “मला स्पष्टपणे यामुळे झालेला नफा दिसू शकतो. तो सर्व वेळ आणि शक्ती आता आध्यात्मिक बाबींसाठी दिली जाऊ शकते. मी कोणाच्याही तोंडून नकारात्मक टीका ऐकली नाही.” एका बहिणीने लिहिले: “उदाहरणाद्वारे तुम्ही प्रिय बांधव, व्यक्तिगत ख्रिस्ती या नात्याने आम्हाला स्वतःचे परीक्षण करायला आणि आमचे जीवन साधेसोपे करून ईश्वरशासित कार्यहालचाली वाढवण्याचे मार्ग शोधायला उत्तेजन देता.” एका प्रवासी पर्यवेक्षकांनी आधीच्या भोजन सेवा तरतुदीबद्दल असे लिहिले: “त्या जुन्या व्यवस्थेमुळे पुष्कळशा बांधवांना संपूर्ण संमेलनाचा कार्यक्रम चुकवावा लागत असे.” उपलब्ध असणाऱ्या हलक्या अल्पोपहाराबद्दल आणि बांधव जे भोजन आणतात त्याबद्दल एका वडिलांनी लिहिले: “त्यांना जे हवं होतं तेच त्यांनी आणलं.” शेवटी, आणखी एका बहिणीने असे लिहिले: “कार्यक्रम संपल्यानंतर शांती व निवांतपणा तसेच आनंदी वातावरण होते.” होय, प्रत्येक जण हलका अल्पोपहार घेऊ शकतो किंवा संपूर्ण दुपार ज्यावर भागवू शकेल इतकेच पुरेसे भोजन स्वतःकरता आणू शकतो. अनेकांनी या वस्तुस्थितीबद्दल म्हटले की, त्यांना मित्रमैत्रिणींना भेटायला पुष्कळ वेळ मिळाला.
२२ पुन्हा या वर्षी देखील, भोजन दिले जाणार नाही पण हलका अल्पोपहार मात्र उपलब्ध असेल. अधिवेशनाला घेऊन जाण्यासारखे कोणते खाद्य पदार्थ उचित व पौष्टिक आहेत त्यावरील सूचनांसाठी काही मिनिटांकरता कृपया जुलै १९९५ आमची राज्य सेवा यातील पुरवणीच्या पृष्ठ ६ वरील पेटीची उजळणी करा. कृपया लक्षात असू द्या, की अधिवेशन सुविधेमध्ये कोणतीही काचेची पात्रे किंवा मद्यार्क आणले जाऊ नयेत. पिण्याच्या पाण्याचे लहान कॅन्स् आवश्यक असल्यास, ते तुमच्या बैठकीच्या जागेखाली मावणारे असले पाहिजेत. हे ध्यानात ठेवा, की तुम्ही जे काही खाद्यपदार्थ सोबत आणले ते खायला प्यायला दुपारच्या सुटीत तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. आपल्या राज्य सभागृहात सभांदरम्यान आपण कार्यक्रम चालू असताना काही खाण्याचे नेहमीच टाळतो. याद्वारे आपण उपासनेच्या व्यवस्थेबद्दल आणि पुरवल्या जाणाऱ्या आध्यात्मिक अन्नाबद्दल आदर प्रदर्शित करतो.
२३ लवकरच, “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” ही प्रथम प्रांतीय अधिवेशने सुरू होतील. उपस्थित राहण्याकरता तुम्ही संपूर्ण तयारी केली आहे का आणि तुम्ही आता तीन दिवसांकरता आनंदी साहचर्य व उत्तम आध्यात्मिक गोष्टींचा उपभोग घेण्यास तयार आहात का? या वर्षीच्या अधिवेशनांना हजर राहण्याकरता यहोवा तुमच्या प्रयत्नांना आशीर्वादित करील ही आमची मनापासूनची प्रार्थना आहे.
[६ पानांवरील चौकट]
प्रांतीय अधिवेशनाच्या स्मरणिका
बाप्तिस्मा: बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी शनिवारी सकाळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विशेष आयोजित केलेल्या विभागात त्यांच्या जागी असले पाहिजे. जे बाप्तिस्मा घेण्याची इच्छा राखून आहेत त्या प्रत्येकाने पोहण्याचा विनयशील पोषाख व टॉवेल आणावा. बाप्तिस्म्याच्या उमेदवारांसोबत आपली सेवा (इंग्रजी) पुस्तकातील प्रश्नांची उजळणी घेणारे वडील प्रत्येकाला हे मुद्दे समजले आहेत याची खात्री करतील. बाप्तिस्म्याचे भाषण व वक्त्याने केलेल्या प्रार्थनेनंतर, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना संक्षिप्त सूचना देतील व नंतर गीत क्रमांक सांगतील. शेवटच्या ओळीनंतर सेवक, बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना बाप्तिस्म्याच्या ठिकाणाकडे निर्देशित करतील. बाप्तिस्मा हा एखाद्याच्या समर्पणाचे द्योतक असून ही गोष्ट यहोवा व त्या व्यक्तीमधील वैयक्तिक व खाजगी बाब असल्यामुळे, दोन किंवा अधिक बाप्तिस्मा घेणारे उमेदवार बाप्तिस्मा घेताना आलिंगन देतात किंवा हात पकडतात अशा भागीदारीच्या बाप्तिस्म्याची तरतूद येथे नाही.
बॅज कार्ड: कृपया १९९६ चे बॅज कार्ड अधिवेशनात व अधिवेशन ठिकाणाकडे येताना व जाताना लावा. यामुळे प्रवास करताना आपल्याला बहुतेकदा उत्तम साक्ष देणे शक्य होते. बॅज कार्ड्स तुमच्या मंडळीतून प्राप्त करावीत कारण ती अधिवेशनात उपलब्ध नसतील. अधिवेशन तोंडावर येईपर्यंत तुमच्या व तुमच्या कुटुंबासाठी कार्डस मिळवण्याकरता थांबून राहू नका. तुमचे चालू आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्ड सोबत आणण्याचे लक्षात ठेवा.
राहण्याच्या व्यवस्था: तुम्हाला एखाद्या हॉटेलबद्दल काही समस्या असतील, तर रुमींग डिपार्टमेंटच्या पर्यवेक्षकांच्या लक्षात ती गोष्ट आणून देण्यासाठी कचरू नका, जेणेकरून ते तुम्हाला लागलीच त्या समस्येचे निरसन करण्यास मदत करतील. मंडळीच्या सचिवांनी, रूम रिक्वेस्ट फॉर्मस् उचित अधिवेशन पत्त्यांवर तत्परतेने पाठविले जातात याची खात्री करून घ्यावी. अधिवेशन संघटनेद्वारे केलेली राहण्याची सोय तुम्हाला रद्द करणे जरूरीचे वाटल्यास, रुमींग डिपार्टमेंटला तत्काळ कळवावे जेणेकरून खोली दुसऱ्या कोणास उपलब्ध करून देता येईल.
स्वयंसेवक सेवा: आता कमी केलेल्या भोजन सेवेमुळे, त्या विभागात काम करणाऱ्या अनेकांना ते इतर ठिकाणी स्वयंसेवा करू शकतात असे आढळेल. अधिवेशनामध्ये एखाद्या विभागात मदत करण्यासाठी तुम्ही वेळ काढू शकता का? आपल्या बांधवांची, केवळ काही तासांसाठी सेवा केली तरी ते साहाय्यकारी आणि पुष्कळ समाधानकारकही ठरू शकते. तुम्ही मदत करू शकत असल्यास, कृपया अधिवेशनाच्या ठिकाणी स्वंयसेवक सेवा खात्यास कळवा. १६ वर्षांखालील मुलेही, त्यांच्या पालकांच्या किंवा इतर जबाबदार प्रौढांच्या निर्देशनाखाली काम करून उत्तम प्रकारे हातभार लावू शकतात.
सावधानतेचा इशारा: अनावश्यक त्रासापासून वाचण्यासाठी संभाव्य समस्यांबद्दल दक्ष राहा. बहुतेकवेळा, चोर किंवा भामटे घरापासून दूर असणाऱ्या व्यक्तींनाच लुटतील. चोर आणि खिसेकापुंचे खासकरून मोठ्या मेळाव्यांकडेच लक्ष असते. तुमच्या कोणत्याही मौल्यवान वस्तू स्वतःच्या खुर्चीवर ठेवून जाणे सुज्ञतेचे ठरणार नाही. तुमच्या सभोवतालचे सर्वचजण ख्रिस्ती आहेत ही खात्री तुम्ही बाळगू शकत नाही. मग संधी तरी का द्यावी? काही बाहेरच्या लोकांनी लहान मुलांना भुलवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त मिळाले आहेत. तुमच्या मुलांना सतत तुमच्या नजरेसमोर ठेवा.
पुष्कळ हॉटेलांमध्ये उपलब्ध असलेल्या केबल दूरदर्शनद्वारे आणि व्हिडिओ सेवेद्वारे बहुधा असभ्य व अश्लील कार्यक्रम दाखवले जातात. या पाशापासून सावध राहा आणि मुलांना देखरेखीविना टी.व्ही लावायला अनुमती देऊ नका.
कृपया अधिवेशन सभागृहाच्या व्यवस्थापनाला फोन करून अधिवेशनाच्या बाबींबद्दल विचारणा करू नका. वडिलांकडून माहिती उपलब्ध नसल्यास, तुम्ही आमची राज्य सेवा याच्या ऑगस्ट १९९६ यात दिलेल्या अधिवेशन मुख्यालयांच्या कोणत्याही एका पत्त्यावर लिहू शकता.