वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९४ पृ. ३
  • १९९४ “ईश्‍वरी भय” प्रांतीय अधिवेशन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १९९४ “ईश्‍वरी भय” प्रांतीय अधिवेशन
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • १९९६ “ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक” प्रांतीय अधिवेशन
    आमची राज्य सेवा—१९९६
  • १९९२ चे “ज्योती-वाहक” प्रांतिय अधिवेशन
    आमची राज्य सेवा—१९९२
  • माणसाचे नव्हे—देवाचे वचन
    आमची राज्य सेवा—१९९०
  • १९९५ “आनंदी स्तुतीकर्ते” प्रांतीय अधिवेशन
    आमची राज्य सेवा—१९९५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ९/९४ पृ. ३

१९९४ “ईश्‍वरी भय” प्रांतीय अधिवेशन

१ भारतामध्ये, १९९३ च्या “ईश्‍वरी शिक्षण” प्रांतीय अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्या २१,५९७ पैकी पुष्कळांकडून, आध्यात्मिक तजेला देणाऱ्‍या कार्यक्रमाबद्दल गुणग्राहकतेचे मनःपूर्वक वक्‍तव्य ऐकायला मिळाले. पवित्र शास्त्रात आढळणाऱ्‍या ईश्‍वरी शिक्षणाकडे लक्ष दिल्यामुळे बाप्तिस्माप्राप्त झालेल्या नवोदितांची एकूण संख्या ८३० होती. मागील वर्षाच्या उभारणीकारक कार्यक्रमाचा आनंद लुटल्यामुळे, या वर्षाच्या १९९४ च्या “ईश्‍वरी भय” प्रांतीय अधिवेशनांसाठी योजिलेल्या उद्दीपित करणाऱ्‍या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याकरता परिश्रम घेण्यास आपण खरोखरीच प्रवृत्त झाले पाहिजे. आज मानवजातीला इतक्या समस्यांचा सामना करावा लागत असताना, आमचे पवित्र शास्त्र विद्यार्थी तेथे आपणासोबत असण्यासाठी आपण सर्वजण त्यांना आमंत्रित करू व त्यांच्यासाठी योजना करण्याचा प्रयत्न करू. भविष्यात कोणतेही अडथळे आले, तरी ईश्‍वरी भयासहित यहोवाची सेवा करीत राहणे, आपल्यासाठी खरोखरीच उत्तेजन आणि शक्‍ती प्रदान करणारा उगम ठरेल.

२ हाबेल आणि नोहाच्या काळापासून, आजपर्यंत विश्‍वासू व्यक्‍तींनी “ईश्‍वरी भय” प्रदर्शित केले आहे. (इब्री. ११:४, ७, NW) ईश्‍वरी भय प्रदर्शित करणे म्हणजेच, “भीतीयुक्‍त आदर आणि निर्माणकर्त्याबद्दल खोल भक्‍तिभाव व त्याला असंतुष्ट करण्याची हितकारक भीती” दाखवणे होय. (it-1 पृ. ८१८) “ईश्‍वरी भय” प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याद्वारे आपण हा खोल भक्‍तिभाव प्रदर्शित करू. त्या सबंध कार्यक्रमाचा उपभोग घेण्यासाठी तुम्ही तेथे असाल का?

३ आरंभाच्या गीतापासून ते समाप्तीच्या प्रार्थनेपर्यंतच्या सुखकारक आध्यात्मिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी, तुम्ही तेथे असावे म्हणून तुमच्या अधिवेशनाच्या योजना काळजीपूर्वक आणि प्रार्थनापूर्वक आखा. तुमच्या योजनांमध्ये प्रेमळपणाने साहाय्याची गरज असणाऱ्‍या, विशेषकरून नवोदित आस्थेवाईकांचा समावेश करा जेणेकरून ते देखील प्रत्येक कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकतील. उपस्थित राहण्याची योजना करणाऱ्‍या एखाद्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यासोबत या पुरवणीतील माहितीचा विचारविनिमय करणे फारच मदतदायी ठरेल.—गलती. ६:१०.

४ तीन-दिवसीय अधिवेशन: भारतात या वर्षी, हा कार्यक्रम, १६ अधिवेशनांद्वारे प्रस्तुत केला जाईल. या पुरवणीत त्या ठिकाणांची यादी दिली आहे. इंग्रजीशिवाय, कन्‍नड, कोंकणी, गुजराती, तामिळ, तेलगू, बंगाली, मल्याळम, मराठी आणि हिंदीमध्ये अधिवेशने घेण्यात येतील. पुष्कळ ठिकाणी, शुक्रवारी, हा कार्यक्रम सकाळी १०:२० वाजता संगीताद्वारे सुरू होईल व संध्याकाळी अदमासे ५:०० वाजता समाप्त होईल. शनिवारी, सकाळी ९:३० वाजता कार्यक्रम सुरू होईल आणि संध्याकाळी अदमासे ५:०० वाजता गीत व प्रार्थनेद्वारे समाप्त होईल. रविवारी, सकाळचा कार्यक्रम, ९:३० वाजता सुरु होईल आणि त्या दिवसाचा कार्यक्रम संध्याकाळी अदमासे ४:१५ वाजता समाप्त होईल.

५ दर वर्षी, आपण प्रांतीय अधिवेशनाची आतुरतेने वाट पाहतो. पुष्कळ व्यक्‍तिगत प्रयत्न आणि खर्च लागत असला, तरी मिळणारे आशीर्वाद अमाप आहेत. आपण आनंदाने, संतुष्ट होऊन आणि आध्यात्मिकरित्या दृढ होऊन घरी परततो. (पडताळा १ राजे ८:६६.) बांधवांचा सहवास उद्दीपित करणारा आहे आणि या अधिवेशनामुळे नित्यक्रमात एक बदल होतो. परंतु, आपण यहोवाची उपासना करावयास जमतो हे लक्षात ठेवा. तसे करण्याची तो आपल्याला आज्ञा देतो. आपण स्वतःचा लाभ कसा करवून घ्यावा हे तो आपल्याला शिकवत आहे.—अनु. ३१:१२, १३; स्तोत्र. १२२:१.

६ यहोवाबद्दलचा खोल भक्‍तिभाव आपल्याला उपस्थित राहण्यास प्रवृत्त करतो: पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना, ‘देवाची सेवा, ईश्‍वरी भय व भीतीयुक्‍त आदरासह’ करण्याचा सल्ला दिला. (इब्री. १२:२८, NW) या वर्षाचे आपले प्रांतीय अधिवेशन, आपल्याला तेच करण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. उपस्थित राहण्याच्या आपल्या निश्‍चयाची परीक्षा घेणारे अडथळे आपल्याला आढळतील. ते पर्वताप्राय वाटतील, परंतु यहोवाच्या मदतीने त्यांच्यावर विजय मिळवला जाऊ शकतो. (मत्त. १७:२०) शुक्रवार सकाळपासून, शनिवार दुपारपर्यंतच्या सबंध अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता, तुम्ही प्रार्थनापूर्वकतेने तुमच्या मालकाकडे सुटी मागितली आहे का? (याको. १:६-८) शाळा सुरू असताना, अधिवेशनासाठी उपस्थित राहणाऱ्‍या शालेय मुलांनी, त्यांच्या शिक्षकांना आदराने हे कळवावे की, त्यांच्या धार्मिक उपासनेच्या या महत्त्वपूर्ण भागाकरता ते शुक्रवारी आणि शनिवारी शाळेत हजर राहू शकणार नाहीत.

७ गुंतवणूकीचा फायदा घ्या: ती कोणती गुंतवणूक आहे? अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी खर्च केलेला वेळ आणि परिश्रम. या वर्षाच्या प्रांतीय अधिवेशनासाठी, काळजीपूर्वक प्रयत्न केल्यावर, रविवारी संध्याकाळीच घरी पोहंचण्यासाठी कार्यक्रमाचा एक मोठा भाग चुकवणे किती असुज्ञतेचे ठरेल. केवळ इतर बाबींची काळजी घेण्यासाठी तुम्ही मेजवानीतून मध्येच उठून याल का? मागील वर्षी, पुष्कळ अधिवेशनांमध्ये असे निरीक्षण करण्यात आले की, काहीजण सकाळच्या कार्यक्रमानंतर निघून गेले. तथापि, आपली आध्यात्मिक प्रौढता आणि ईश्‍वरी भय यांनी, यहोवाने आपल्यासाठी तयार केलेल्या कोणत्याही गोष्टीला चुकवण्यासाठी अनुमती देऊ नये.—पडताळा १ करिंथकर २:९, १०.

८ आपल्यापैकी पुष्कळजण, कदाचित लवकर निघून जाण्याचा विचार करणार नाही. तरी आपल्याकडून कार्यक्रमाचा एक चांगला भाग चुकवला जाऊ शकतो. हे कसे घडू शकते? सादर केलेल्या भागांचा जास्तीतजास्त लाभ मिळवण्याची योजना न केल्यामुळे. पुरेसा नाश्‍ता करायला आणि कार्यक्रम सुरु होण्याआधी आपल्या जागी असण्यासाठी इतर आवश्‍यक बाबींची काळजी घ्यायला आपल्याला दिवसाची सुरवात लवकर करावीशी वाटेल. रात्रीची चांगली झोप देखील आवश्‍यक आहे जेणेकरून आपण दक्ष राहू आणि संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमावर मन एकाग्र करू शकू.

९ संक्षिप्त टिपण घेतल्याने, कार्यक्रमाचा अधिक लाभ होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे. टिपण घेणे हे, प्रौढांप्रमाणेच लहान मुलांकरता देखील तितकेच महत्त्वाचे आहे. एक १६ वर्षांची प्रचारक म्हणते: “भाषणात उल्लेखिलेल्या शास्त्रवचनांना मी टिपून घेते. मग मी घरी त्या भाषणाची उजळणी करू शकते.” आणखी एक १६ वर्षांचा युवक म्हणतो: “मी मुख्य मुद्दे लिहितो. त्यामुळे माझे मन एकाग्र होण्यास मदत होते.” बहुधा, तुम्हाला कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य म्हणजे, तुमचे पवित्र शास्त्र, एक गीतपुस्तक, एक मध्यम आकाराची टिपण वही आणि पेन किंवा पेन्सील. अर्थात, लहान मुले असणाऱ्‍या पालकांनी त्यांच्या गरजांची काळजी घ्यावी; परंतु खाद्य-पदार्थांचे मोठे डबे आणि अवास्तव व्यक्‍तिगत सामानाने आपण स्वतःला तसेच इतरांना गैरसोय होईल असे काही करू नये.

१० काही बांधव, घरी पुन्हा चालवण्यासाठी, ऑडिओकॅसेट रेकॉर्डर किंवा व्हिडिओ कॅमेऱ्‍याचा उपयोग करून कार्यक्रमाचे रेकॉर्डींग करतात. जो कोणी तसे करतो ती त्याची व्यक्‍तिगत बाब आहे, परंतु काहींचा अनुभव असा आहे की, ते त्यांच्या नित्यक्रमात पुन्हा गुंतले की रेकॉर्डींग केलेल्या गोष्टी ऐकण्यासाठी त्यांच्याजवळ वेळच नसतो. त्याशिवाय, ध्वनिमुद्रण उपकरणाची जुळवणी करेपर्यंत भाषणातील काही मुख्य मुद्दे चुकवले जाऊ शकतात.

११ कार्यक्रम सुरु होण्याआधी आपण आपल्या जागी असण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या जुन्या मित्रांशी काही आनंददायक गोष्टींची देवाणघेवाण करत असताना, अध्यक्षांनी कार्यक्रम सुरु होत असल्याचे घोषित केले, तर लागलीच संभाषण थांबवून आपल्या जागी बसल्याने, कार्यक्रमात भाग घेणाऱ्‍यांकरता आणि विशेषकरून आपल्या बांधवांकरता आदर दिसून येतो.

१२ यहोवाच्या विपुल आशीर्वादांमुळे, प्रांतीय अधिवेशने ही नेहमीच आनंददायक प्रसंग असतात. आपल्याला आध्यात्मिक तसेच भौतिक असे दोन्ही लाभ प्राप्त होतात. अधिवेशन ठिकाणाचे भाडे देण्यासाठी बराच खर्च येतो हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. तसेच खाद्य-पदार्थांचे दर वाढत आहेत आणि प्रत्येक अधिवेशनात संस्था आपल्यासाठी चांगल्या प्रतीचे अन्‍न विकत घेते. हे आणि इतर खर्च कसे भागवले जातात? “द वॉचटावर सोसायटी,” या नावावर रोख किंवा चेकद्वारे केलेल्या ऐच्छिक अनुदानांकरवी. हे, ‘परमेश्‍वराची थोरवी गा; त्याच्या अंगणात अर्पण आणा’ या स्तोत्र ९६:८ मध्ये उल्लेखिलेल्या आत्म्याच्या एकमतात आहे.

१३ तुमची वर्तणूक स्तुती आणील का? प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहात असताना, आमची राज्य सेवा आम्हाला दर वर्षी, चांगल्या वर्तणुकीच्या महत्त्वाची नम्रतेने आठवण करून देते. अर्थातच, आमची वर्तणूक नेहमीच उदाहरणीय असावी. परंतु आपण जमावाने भेटतो, तेव्हा सर्वसामान्यपणे आपण सत्याबाहेरच्या लोकांच्या अगदीच बारीक नजरेत असतो. आपली चांगली किंवा वाईट वर्तणूक आपल्या प्रचारकार्यापेक्षा अधिक काही सांगू शकते. आपण जे बोलतो आणि करतो त्याद्वारे यहोवाची स्तुती व्हावी अशी आपली इच्छा आहे.—नीती. २७:२; १ पेत्र २:१२.

१४ मागील वर्षाच्या “ईश्‍वरी शिक्षण” प्रांतीय अधिवेशनानंतर, एका मोटेल्स्‌मधील सुरक्षा पहारेकऱ्‍याने असे निरीक्षिले: “पुष्कळ काळापासून मी पाहिलेले हे सर्वात चांगले युवक आहेत.” त्यानंतर, इतर तरुण लोकांच्या वाईट वागणूकीबद्दल आणि विध्वंसक वृत्तीबद्दल सांगितल्यावर, त्याने साक्षीदार मुलांबद्दल असे म्हटले: “त्यांची वागणूक चांगली आहे आणि त्यांना सभोवती पाहणे एक आनंदच आहे. येथे घेतली जाणारी इतर अधिवेशने अशीच असती तर किती चांगले झाले असते.”

१५ एका वृत्तपत्राच्या स्तंभलेखकाने अधिवेशनाबद्दल असे निरीक्षण केले: “स्त्रिया व मुलींनी उत्तम पेहराव केला होता आणि पुरुष आणि मुलांनी कोट व टाय घातले होते. चार दिवसांच्या वक्त्यांची भाषणे ऐकताना ते सर्वजण मनःपूर्वकतेने टिपण घेत होते. देवाखालोखाल स्वच्छतेला महत्त्व असते ही म्हण खरी आहे, तर यहोवाचे साक्षीदार या तत्त्वाचे एक उच्च स्थर राखतात.” तथापि, सर्वच अहवाल असे सकारात्मक नाहीत.

१६ एका अधिवेशनात असा अहवाल देण्यात आला की, कार्यक्रमादरम्यान तेथे पुष्कळजण ये-जा करत होते. शनिवारी दुपारच्या कार्यक्रमात जवळ जवळ १,००० पेक्षा अधिक जण (त्यातली अनेक लहान मुले होती) सभागृहाच्या मार्गात किंवा आसपास आढळले. त्यावरून असे दिसून येते की, पालकांनी मुलांना अधिक शिक्षण देण्याची आणि देखरेख ठेवण्याची गरज आहे. सभागृहामधल्या मार्गांमध्ये, गोंगाट केल्यामुळे, ऐकू इच्छिणाऱ्‍यांचे लक्ष विचलित होते. कार्यक्रमादरम्यान, काहींना आवश्‍यक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, परंतु बाकीच्यांनी आपआपल्या जागी बसून एकाग्र चित्ताने ऐकू नये का?

१७ पुष्कळ पालक त्यांच्या मुलांसोबत, दर आठवडी सभांना उपस्थित राहण्याच्या बाबतीत कडक असतात. मुले त्यांच्या बाजूला बसली आहेत आणि कार्यक्रमादरम्यान सभागृहाच्या मार्गांमध्ये ये-जा करत नाहीत याबाबतीतही त्यांनी तेवढेच कडक असू नये का? अधिवेशनाचे ठिकाण एका मोठ्या राज्य सभागृहात परिवर्तीत करण्यात येते, परंतु ह्‍या जगाची व्यवस्था सैतानाची आहे आणि दुष्ट लोक अयोग्य हेतूंनी इमारतीत येऊ शकतात. तुमची मुले कोठे आहेत आणि ती नेहमी काय करीत आहेत हे तुम्ही जाणले पाहिजे.

१८ वेशभूषा आणि केशभूषा: आपण अशा युगात राहतो, जेथे निष्काळजी आणि गबाळ्या प्रकारचा पेहरावही स्वीकारार्ह मानला जातो. पुष्कळ लोक, अतिशय निष्काळजी पोशाखात चर्चला आणि संगीत जलसात किंवा हॉटेलांमध्ये जातात. परिच्छेद १५ मध्ये उद्धृत केलेल्या निरीक्षणावरून असे दिसून येते की, विशेषकरून शिष्टाचाराच्या उपासनेच्या बाबतीत प्रतिष्ठित पोशाखाची प्रशंसा करणारे लोक अजूनही आहेत. गबाळा, निष्काळजी पोशाख आणि अयोग्य केशभूषा आपल्याबद्दल पुष्कळ सांगते. अधिवेशनाची इमारत एक विस्तारित राज्य सभागृह आहे ही गोष्ट कधीही विसरू नका. काहीजण अधिवेशनासाठी सभ्य पोशाख घालतात परंतु कार्यक्रम संपल्यावर स्थानिक रेस्टॉरंट्‌समध्ये अयोग्य किंवा असभ्य पद्धतीने पोशाख घालून जातात.

१९ बाप्तिस्मा घेणाऱ्‍या उमेदवारांना याची आठवण करून देणे आवश्‍यक आहे की, पोहण्याचे विशिष्ट पोशाख त्या प्रसंगासाठी अनुचित आहेत. तो पोशाख सभ्य आणि उचित असला पाहिजे. हे कोणी ठरवावे? मंडळीतून बाप्तिस्मा घेणाऱ्‍या कोणाही व्यक्‍तीने अडखळणाचे कारण होऊ नये याकडे लक्ष देण्याची जबाबदारी वडिलांची आहे. (२ करिंथ. ६:३, ४) त्यामुळे, अत्याधिक प्रदर्शन करणारा पोहण्याचा पोशाख आणि जगिक घोषवाक्य किंवा जाहिराती असणारे टी-शर्ट अनुचित ठरतील. वडिलांना, आवर मिनिस्ट्री पुस्तकातील प्रश्‍नांची उजळणी करताना उमेदवारासोबत या बाबीची चर्चा करणे उचित ठरेल.

२० हॉटेल: हॉटेलात आल्याची नोंद करताना, धीर आणि सहानुभवाची आवश्‍कता असते. बरेच लोक एकाच वेळी आले, तर थोडा उशीर होऊ शकतो. आपल्याला नेहमीच, परंतु विशेषकरून, हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या कामगारांसोबत वागताना आत्म्याची फळे प्रदर्शित करण्याची गरज आहे. उचितपणे बक्षीस देण्याबद्दलही आपल्याला आठवण करून देण्याची गरज आहे. जून २२, १९८६ च्या अवेक! अंकातील पृष्ठे २४-७ वरील “टू टीप—ऑर नॉट” आणि “टीप्स्‌ ऑन टिप्पींग” या लेखांची कृपया काही मिनिटांसाठी उजळणी घ्या.

२१ ध्वनिमुद्रणाची उपकरणे: आधीच सांगितल्याप्रमाणे, ध्वनिमुद्रणाची उपकरणे आणि विशेषतः व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर्स वापरणे हा एक वैयक्‍तिक निर्णय आहे. तुम्ही रेकॉर्डींग करण्याचा निश्‍चय केला तर, तुमच्या भोवती असणाऱ्‍यांबद्दल कृपया विचार करा. एखाद्याने ध्वनिमुद्रण त्याच्या जागेवरून केले, तरी ते विचलित करणारे असू शकते. चित्रण करताना, सह-उपस्थितांना पाहताना अडथळा आणू नये. शिवाय, ध्वनिमुद्रणाचे कोणतेही उपकरण, विद्युत किंवा ध्वनिव्यवस्थेला जोडू नये किंवा खुर्च्यांमधले मार्ग आणि वाटा अडवू नयेत.

२२ बैठक: जागा राखण्याशी संबंधित असेलेल्या समस्यांकडे अजूनही लक्ष देण्याची गरज आहे. पुन्हा आम्हाला ही आठवण करून द्यावीशी वाटेल की: जागा केवळ तुमचे जवळचे कौटुंबिक सदस्य व जे कोणी तुम्हासोबत प्रवास करतात त्यांच्यासाठीच राखल्या जाव्यात. काही अधिवेशनांमध्ये दररोज सकाळी ७:३० वाजता दरवाजे उघडली जात होती, तेव्हा बंधू व भगिणींची आत शिरताना धक्काबुक्की होत असे. असे निरक्षिले गेले की, “साधारण गतीने चालत जाणाऱ्‍या मित्रांना सभागृहात पाठीमागच्या बाजूलाच जागा मिळत होत्या. पुष्कळ जण जवळ जवळ संपूर्ण विभागच राखून ठेवत होते आणि त्यांनी राखून ठेवलेल्या पुष्कळ जागांवर कोणी बसलेले नव्हते.” अशा या अविचारीपणाच्या सवयी, वारंवार आठवण देऊनही चालूच आहेत असे दिसते. आपण या बाबतीत आत्म-परीक्षण आणि फिलिप्पैकर २:३, ४ मधील तत्त्वांवर मनन करू नये का?

२३ बहुतेक अधिवेशने, विशेष आवश्‍यकता असणाऱ्‍यांसाठी म्हणजेच, वयस्कर किंवा शारीरिकरित्या अपंग असणाऱ्‍यांसाठी तरतूदी करतात. तुम्ही त्यासाठी पात्र नसाल, तर कृपया अशा विभागांमध्ये न बसण्याची खात्री करा. अशा विशेष आवश्‍यकता असणाऱ्‍यांसोबत कोणी त्यांची जबाबदारी घेणारा नसेल, तर त्यांना जागा शोधण्यात मदत करण्याबद्दल दक्ष असा.

२४ साहित्य व जेवणाची व्यवस्था: आपण प्रांतीय अधिवेशनासाठी एकत्रित होतो, तेव्हा शारीरिक आणि आध्यात्मिक अन्‍नाची विपुलता असते व त्यांचा फायदा आपण घेतो. दोन्ही गोष्टींना वाया न घालवता, उपकारस्मरण करून ग्रहण करावे. (२ इति. ३१:१०; नीती. ३:१०; योहा. ६:१२) आम्हाला यहोवाच्या सर्व तरतूदींबद्दल गुणग्राहकता प्रदर्शित करण्याची इच्छा आहे. पालकांनो, तुमच्या मुलांना अन्‍न वाया न घालण्याचे महत्त्व कळते का? तुम्ही त्यांच्यासाठी एक चांगले उदाहरण राखले पाहिजे. जेवण वाटपाच्या ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी, जेवण किंवा अल्पोपहार मिळताच तेथून दूर होऊन, खाण्यासाठी व्यवस्था केलेल्या ठिकाणी जाणे उत्तम ठरेल. जेवण वाटपाच्या ठिकाणाहून पुढे जाण्यास बांधवांना विनंती करण्यासाठी सेवक दक्ष असतील जेणेकरून वाटपाच्या जागी गर्दी होणार नाही.

२५ नोव्हेंबर ४, १९९४ रोजी, पहिल्या “ईश्‍वरी भय” प्रांतीय अधिवेशनाची सुरवात होईल. तुमची तयारी झाली का? तुम्ही तीन दिवसांचा आनंददायक सहवास आणि चांगल्या आध्यात्मिक गोष्टींचा आनंद लुटण्यास तयार आहात का? या वर्षी एकत्र मिळण्याच्या तुमच्या परिश्रमांना यहोवा आशीर्वादित करील आणि “ईश्‍वरी भय” प्रांतीय अधिवेशनामध्ये यहोवाच्या चांगल्या गोष्टींच्या मेजावरून तो तुम्हाला भरवेल अशी आमची मनःपूर्वक प्रार्थना आहे.

[चौकट]

प्रांतीय अधिवेशनाच्या स्मरणिका

बाप्तिस्मा: बाप्तिस्मा घेणाऱ्‍या उमेदवारांनी, शनिवारी सकाळी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी त्यांच्यासाठी योजलेल्या विभागात आपआपल्या खुर्च्यांवर असावे. बाप्तिस्मा घेणाऱ्‍या इच्छुकांनी विनयशील असा आंघोळीचा पेहराव व टॉवेल आणावा. बाप्तिस्म्याचे भाषण व वक्त्याने केलेल्या प्रार्थनेनंतर, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाप्तिस्मा घेणाऱ्‍या उमेदवारांना संक्षिप्त सूचना देतील व नंतर गीत होईल. शेवटच्या कडव्यानंतर, सेवक बाप्तिस्मा घेणाऱ्‍या उमेदवारांना बाप्तिस्म्याच्या ठिकाणाकडे नेतील. बाप्तिस्मा हा एखाद्याच्या समर्पणाचे द्योतक असून, ही गोष्ट यहोवा व त्या व्यक्‍तीमधील वैयक्‍तिक बाब असल्यामुळे, दोन किंवा अधिक बाप्तिस्मा घेणारे उमेदवार बाप्तिस्मा घेताना मिठी मारतात किंवा हात पकडतात अशा भागीदारीच्या बाप्तिस्म्याची तरतूद येथे नाही.

बॅज कार्डस: कृपया १९९४ चे बॅज कार्ड अधिवेशनात व अधिवेशन ठिकाणाकडे येताना किंवा जाताना लावा. हे आम्हास प्रवास करताना उत्तम साक्ष देणे शक्य करते. हे मागील वर्षी मॉस्को आणि कीव येथे घेण्यात आलेल्या अधिवेशनांबद्दल विलक्षणरित्या खरे ठरले. बॅज कार्डस तुमच्या मंडळीतून प्राप्त केली जावीत कारण ती अधिवेशनात उपलब्ध नसतील. तुमचे चालू वैद्यकीय अधिकृत कार्ड सोबत घेण्याचे लक्षात असू द्या. बेथेल कुटुंबाचे सदस्य आणि पायनियरांकडेही त्यांचे ओळखपत्र असले पाहिजे.

निवास व्यवस्था: तुम्हाला एखाद्या हॉटेलबद्दल काही समस्या असतील तर, रुमींग डिर्पाटमेंटच्या पर्यवेक्षकांच्या लक्षात ती गोष्ट आणून देण्यासाठी कचरू नका, जेणेकरून ते तुम्हाला तेव्हाच ती समस्या सोडवण्यास मदत करतील. मंडळीच्या सचिवांनी, रूम रिक्वेस्ट फॉर्म्स उचित अधिवेशन पत्त्यावर पाठविले आहेत का याची खात्री करून घ्यावी. तुमचे आरक्षण रद्द करणे तुम्हास जरूरीचे वाटते, तर हॉटेल आणि अधिवेशनातील रुमींग डिर्पाटमेंटला तत्काळ कळवावे ज्यामुळे खोली दुसऱ्‍या कोणास उपलब्ध करून दिली जाईल.

स्वयंसेवक सेवा: तुम्हाला अधिवेशनात एखाद्या विभागात मदत करण्यासाठी योजना करता येईल का? आमच्या बांधवांची, केवळ काही तासांसाठी सेवा केल्याने ते साहाय्यकारी आणि समाधानकारकही ठरेल. तुम्ही मदत करू शकत असल्यास, कृपया अधिवेशनाच्या ठिकाणी स्वयंसेवक विभागास कळवा. १६ वर्षांखालील मुलेही, त्यांच्या पालकांच्या किंवा इतर जबाबदार प्रौढांच्या निर्देशनाखाली काम करून उत्तमप्रकारे हातभार लावू शकतात.

सावधानतेचा इशारा: संभाव्य समस्यांबद्दल दक्ष राहिल्याने आपण स्वतःला अनावश्‍यक त्रासापासून वाचवू शकतो. बहुतेकवेळा, घरापासून दूर असणाऱ्‍या व्यक्‍तींनाच चोर किंवा भामटे लुटतील. चोर आणि खिसेकापूंना मोठ्या मेळाव्यांमध्येच अधिक फायदा मिळतो. तुमची कोणतीही मौल्यवान वस्तू अधिवेशनातील खुर्चीवर मागे सोडून जाणे हे सुज्ञतेचे ठरणार नाही. तुमच्या भोवतालचे सर्वजण ख्रिस्ती आहेत ही खात्री तुम्ही बाळगू शकत नाही. मग संधी का द्यावी? काही बाहेरच्या लोकांनी लहान मुलांना पळवून नेण्याच्या हेतूने आमिषे दाखवली आहेत अशी माहिती मिळाली आहे. तुमच्या मुलांना सतत तुमच्या नजरेसमोर ठेवा.

पुष्कळ हॉटेलांमध्ये केबल दूरदर्शनद्वारे कधीकधी असभ्य व अश्‍लील चित्रपटे दाखवली जातात. या पाशापासून सावध राहा आणि मुलांना देखरेखीविना टी.व्हीला हात लावण्याची अनुमती देऊ नका.

कृपया अधिवेशन सभागृहाच्या व्यवस्थापकांना फोन करून अधिवेशनांच्या बाबींबद्दल विचारणा करू नका. वडिलांकडून माहिती उपलब्ध नसल्यास, कृपया अधिवेशन पत्त्यावर लिहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा