वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०९ पृ. ३
  • दररोज यहोवाची स्तुती करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दररोज यहोवाची स्तुती करा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • बालकांनो, यहोवाची स्तुती करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • विश्‍वभर आनंदी स्तुतीकर्ते होण्याकरता वेगळे केलेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ७/०९ पृ. ३

दररोज यहोवाची स्तुती करा

१. देवाचे सेवक काय करण्यास प्रेरित होतात व का?

१ राजा दाविदाने ‘प्रतिदिवशीच’ नव्हे तर अनंतकाळ यहोवाची स्तुती करण्याचा निर्धार व्यक्‍त केला. (स्तो. १४५:२, ७, २१) आपल्याजवळही यहोवाची दररोज स्तुती करण्यासाठी अनेक कारणे आहेत.—स्तो. ३७:१०; १४५:१४, १८; २ पेत्र ३:१३.

२. कुटुंबे दररोज यहोवाची स्तुती कशी करू शकतात?

२ घरात असताना यहोवाची स्तुती करणे: दैनिक वचनाची चर्चा करण्याकरता, कौटुंबिक उपासना व सभांची तयारी करण्याकरता आपल्याकडे भरपूर उत्तेजनात्मक छापील साहित्य आहे ज्यामुळे आपण देव आणि बायबल यांवर अर्थपूर्ण आध्यात्मिक चर्चा करू शकतो. अनेक कुटुंबे दिवसातले निदान एक भोजन तरी एकत्र करण्याचे ठरवतात. यामुळे कुटुंबातल्या सर्वांना निवांतपणे चर्चा करता येते व यहोवाची स्तुती करण्याची संधी मिळते. पालकांनी सुरु केलेल्या अशा चर्चांमुळे ते आपल्या मुलांना ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवू’ शकतात.—इफिस. ६:४; अनु. ६:५-७.

३. बांधवांबरोबर असताना आपल्या सर्वांसमोर कोणती संधी असते?

३ बांधवांबरोबर असताना यहोवाची स्तुती करणे: क्षेत्र सेवेत किंवा मंडळीच्या सभांमध्ये असताना आपण आपल्या बंधूभगिनींबरोबर यहोवाची स्तुती करू शकतो. (नीति. १५:३०; फिलिप्पै. ४:८; इब्री १३:१५) आपल्या सर्वांचेच यहोवावर प्रेम असल्यामुळे, एकमेकांबरोबर बोलताना आपण खुल्या मनाने यहोवाच्या चांगुलपणाची स्तुती करू शकतो.—स्तो. १०६:१.

४. क्षेत्र सेवेव्यतिरिक्‍त इतर कोणकोणत्या प्रसंगी तुम्ही यहोवाची स्तुती करू शकता?

४ सत्यात नसलेल्यांबरोबर बोलताना यहोवाची स्तुती करणे: आपल्या परिस्थितीमुळे कदाचित आपल्याला दररोज क्षेत्र सेवेत जाता येणार नाही. अशा वेळी आपण, आपल्या सोबत काम करणाऱ्‍यांबरोबर, आपल्या शाळा सोबत्यांबरोबर आणि आपल्या आजूबाजूला असलेल्यांबरोबर यहोवाविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी थोडक्यात बोलू शकतो. यामुळे, प्रामाणिक मनाच्या लोकांमध्ये आशा निर्माण होऊ शकेल. (स्तो. २७:१४; १ पेत्र ३:१५) एकदा एका भगिनीने प्रवास करत असताना तिच्या सोबत प्रवास करणाऱ्‍या एका स्त्रीला साक्ष दिली. या स्त्रीला हा संदेश ऐकून इतके सांत्वन व प्रोत्साहन मिळाले की तिने आपल्या भगिनीला आपला पत्ता व फोननंबर दिला जेणेकरून दोघी एकमेकींच्या संपर्कात राहू शकतील. वाढत्या त्रासांमुळे व बिकट होत चाललेल्या परिस्थितीमुळे हे जग बेजार झाले आहे. पण यहोवाचे सेवक, ऐकू इच्छिणाऱ्‍या लोकांना “शुभवृत्त” सांगत आहेत. यामुळे लोकांना एक आशा मिळते व पर्यायाने यहोवाची स्तुती करण्याची प्रेरणा मिळते.—यश. ५२:७; रोम. १५:११.

५. आपण यहोवाची स्तुती का करू इच्छितो व यामुळे काय साध्य होते?

५ आपल्या सेवकांना दररोज आपली स्तुती करताना पाहून यहोवाला किती आनंद होत असेल! आपल्या सभोवतालची सृष्टी जशी यहोवाची स्तुती करते तशीच आपण देखील घरी, मंडळीत व जे अद्याप यहोवाची उपासना करणारे बनले नाहीत त्यांच्याशी बोलताना यहोवाची स्तुती करू शकतो.—स्तो. १९:१-४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा