वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०६ पृ. ३-४
  • ‘जगाच्या प्रकाशाकडे’ लोकांचे लक्ष वेधा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘जगाच्या प्रकाशाकडे’ लोकांचे लक्ष वेधा
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • सर्वदूर यहोवाचे गुण प्रसिद्ध करा
    आमची राज्य सेवा—२००७
  • पाहिजेत—४,००० सहायक पायनियर तुम्ही मार्च, एप्रिल वा मे महिन्यांत सहायक पायनियरींग करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—१९९७
  • “देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा”
    आमची राज्य सेवा—२००२
  • तुम्ही सहायक पायनियरिंग कराल का?
    आमची राज्य सेवा—२०१३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km २/०६ पृ. ३-४

‘जगाच्या प्रकाशाकडे’ लोकांचे लक्ष वेधा

१. देवाच्या वचनात कोणत्या मोठ्या प्रकाशाविषयी भाकीत केले होते, व कोणत्या प्रसंगामुळे या प्रकाशाकडे लोकांचे लक्ष वेधता येते?

१ यहोवाने संदेष्टा यशयाद्वारे असे भाकीत केले: “अंधकारात चालणाऱ्‍या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशांत बसणाऱ्‍यांवर प्रकाश पडला आहे.” (यश. ९:२) देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या कार्यांवरून लोकांना हा “मोठा प्रकाश” दिसला होता. पृथ्वीवर असताना त्याची कार्ये आणि त्याने दिलेल्या बलिदानामुळे मिळालेले लाभ यांच्यामुळे आध्यात्मिक अंधकारात असलेल्यांची आध्यात्मिक स्थिती सुधारली. आजच्या अंधकारमय काळांत लोकांना याच प्रकाशाची नितांत गरज आहे. प्रभूचे सांज भोजन समारोह, ‘जगाच्या प्रकाशाकडे’ लोकांचे लक्ष वेधण्याकरता आपल्याला एक उत्तम संधी देतो. (योहा. ८:१२) गेल्या वर्षी, लाखो लोकांनी आपल्याबरोबर, “माझ्या स्मरणार्थ हे करा” या आज्ञेचे पालन करून काही प्रमाणात विश्‍वास दाखवला. (लूक २२:१९) या वर्षाचा स्मारकविधी जवळ येत आहे; तेव्हा यहोवाने परावर्तित होऊ दिलेल्या त्या मोठ्या प्रकाशाकडे लोकांचे लक्ष वेधण्याच्या कार्यात आपण कशाप्रकारे भाग घेऊ शकतो?—फिलिप्पै. २:१५.

२. खंडणी बलिदानाबद्दल आपण आपल्या मनातील कृतज्ञता आणखी कशी वाढवू शकतो आणि असे केल्यामुळे काय परिणाम होईल?

२ हृदयापासून कृतज्ञता वाढवणे: स्मारक विधीचा मोसम हा, मानवजातीसाठी खंडणी बलिदान देण्याकरता यहोवाने व येशूने दाखवलेल्या महान प्रेमावर मनन करण्याचा उत्तम मोसम आहे. (योहा. ३:१६; २ करिंथ. ५:१४, १५) मनन केल्याने या पवित्र प्रसंगाबद्दल आपल्या मनातील कृतज्ञता वाढते हे निश्‍चित. देवाच्या सर्व लोकांनी खास स्मारक बायबल वाचनाकरता वेळ काढून त्यावर मनन करण्याचा प्रयत्न करावा. हे बायबल वाचन शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे यांत दिलेले असते. खंडणीच्या तरतुदीत दिसणाऱ्‍या यहोवाच्या अतुलनीय गुणांवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा, यहोवाला आपला देव म्हणताना आपली मान अभिमानाने ताठ होते. खंडणीचा आपल्या स्वतःसाठी काय अर्थ होतो यावर जेव्हा आपण मनन करतो तेव्हा, देवाबद्दल व येशू ख्रिस्ताबद्दल आपल्या मनात असलेले प्रेम आणखी वाढते आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यास झटण्याची स्फूर्ती मिळते.—गलती. २:२०.

३. स्मारकविधीबद्दल आपण आपल्याला असलेली कृतज्ञता कशी व्यक्‍त करू शकतो?

३ तारणासाठी यहोवाने केलेल्या तरतुदींबद्दल आपली कृतज्ञता वाढल्यास, स्मारकविधीबद्दल आपल्याला असलेल्या आवेशाचा परिणाम, आपल्या बायबल विद्यार्थ्यांवर, आपण ज्यांना पुनर्भेट देतो त्यांच्यावर, आपल्या नातेवाईकांवर, शेजाऱ्‍यांवर, शाळासोबत्यांवर, आपल्यासोबत काम करणाऱ्‍यांवर आणि या खास प्रसंगासाठी आपण ज्यांना ज्यांना आमंत्रण देतो त्या सर्वांवर होतो. (लूक ६:४५) त्यामुळे, या सर्वांना आमंत्रण देण्याचा विशेष प्रयत्न करा. आठवण म्हणून त्यांना स्मारकविधीची छापील आमंत्रण पत्रिका द्या. काहींनी, स्मारकविधीला ते ज्यांना नियमितरीत्या बोलवतात अशांची एक यादी तयार केली आहे जेणेकरून कोणीही लक्षातून सुटत नाही व दरवर्षी या यादीत नवनवीन लोकांची नावे टाकली जातात. अशाप्रकारे सर्वकाही व्यवस्थित करणे व आस्थेवाईक लोकांना आमंत्रण देण्याचा हरतऱ्‍हेने प्रयत्न करणे हा, यहोवा देवाला त्याच्या “अवर्णनीय दानाबद्दल” आपली कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा उत्तम मार्ग आहे.—२ करिंथ. ९:१५.

४. मार्च व एप्रिल महिन्यांत सेवेत अधिक भाग घेण्याकरता कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकेल?

४ क्षेत्र सेवेत अधिक भाग घ्या: मार्च व एप्रिल महिन्यात तुम्ही क्षेत्र सेवेत अधिक भाग घेऊ शकाल का? ‘ख्रिस्ताच्या तेजाची सुवार्ता’ इतरांना सांगण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपल्याला नक्कीच देवाचे आशीर्वाद मिळतील. सर्व आध्यात्मिक प्रबोधनाचा स्रोत असलेल्या यहोवाने अशी आज्ञा दिली आहे: ‘अंधारातून उजेड प्रकाशित होवो.’ (२ करिंथ. ४:४-६) प्रचारकांच्या गरजेनुसार व सोयीनुसार वडील जन, ज्यादा वेळांसाठी व वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्र सेवेच्या सभांची योजना करतील आणि अधिक काळ साक्ष देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतील. यामध्ये, पहाटे रस्त्यावर साक्षकार्य करण्याचा किंवा दुपारी अथवा संध्याकाळी व्यापारी क्षेत्रात अथवा टेलिफोनवरून साक्षकार्य करण्याचा देखील समावेश होतो. सेवेमध्ये अधिक भाग घेता यावा म्हणून, तुम्ही किती तास करणार याचे एक तर्कशुद्ध ध्येय ठेवा आणि मग ते पूर्ण करण्याकरता झटा. पुष्कळ बंधूभगिनी साहाय्यक पायनियरींग करून यहोवाची जिवेभावे सेवा करतात.—कलस्सै. ३:२३, २४.

५. साहाय्यक पायनियरींगचे तास कमी केल्यामुळे काहींना कोणत्याप्रकारे फायदा झाला आहे?

५ तुम्ही साहाय्यक पायनियरींग करू शकाल का? साहाय्यक पायनियरींगचे तास कमी करून सात पेक्षा अधिक वर्ष झाली आहेत. या बदलामुळे पुष्कळांना साहाय्यक पायनियर सेवेच्या आशीर्वादांचा अनुभव घेता आला आहे. तुम्ही कधी साहाय्यक पायनियरींग केली आहे का? काहींनी दर वर्षी पायनियरींग करण्याचा एक प्रघातच बनवला आहे. अनेक मंडळ्यांमधील पुष्कळ प्रचारक एकत्रच या सेवेचे अर्ज भरतात तेव्हा त्या वर्षी ते मंडळीच्या कार्यांचे एक प्रतिफलदायी वैशिष्ट्य बनते. स्मारकविधीच्या काळातल्या साहाय्यक पायनियरींगच्या आनंदी महिन्यात तुम्ही साहाय्यक पायनियरींग करू शकाल का? एप्रिल महिना काहींसाठी विशेषकरून चांगला असेल कारण त्यात पाच शनिवार-रविवार आहेत.

६. कोणकोणत्या तरतुदी आपल्यासाठी करून ठेवल्या आहेत?

६ मार्च किंवा एप्रिल महिन्यात तुमच्या मंडळीची विभागीय पर्यवेक्षकांची भेट आहे का? मग तर तुम्हाला आणखी एक उत्तम सुसंधी मिळू शकते. २००६ सालादरम्यान विभागीय पर्यवेक्षकांची भेट असतानाच्या महिन्यात साहाय्यक पायनियरींग करणाऱ्‍यांना, भेटीच्या दरम्यान पायनियरांबरोबर होणाऱ्‍या सभेच्या पहिल्या अर्ध्या सभेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले जाईल, अशी आधी घोषणा करण्यात आली होती. या सभेत मिळणारी आध्यात्मिक पोषक माहिती निश्‍चितच अनेक साहाय्यक पायनियरांना सामान्य पायनियर बनण्यास मदत करेल. शिवाय, मार्च महिन्यात आपल्याला, बायबल नेमके काय शिकवते? या अभ्यासाच्या नवीन पुस्तकातून लोकांना आध्यात्मिक प्रकाशाकडे येण्यास मदत करण्याचा आनंद अनुभवता येईल. तेव्हा, या नवीन पुस्तकातून एखादा तरी बायबल अभ्यास चालवण्याचे ध्येय ठेवायला काय हरकत आहे?

७, ८. (क) कोणत्या गोष्टीच्या साहाय्यामुळे आपण साहाय्यक पायनियरींगचा एक आराखडा तयार करू शकू? (ख) कुटुंबातील प्रत्येक सदस्य सहकार्य कसे देऊ शकतो आणि यामुळे संपूर्ण कुटुंबाला फायदा कसा होतो?

७ साहाय्यक पायनियरींगचे ५० तास भरताना, कोणत्या आराखड्यामुळे तुम्हाला दर आठवडी सुमारे १२ तासांसाठी सत्याचा प्रकाश परावर्तित करण्यास मदत होईल ते ठरवा. ज्यांनी साहाय्यक पायनियरींग केली आहे अशा बंधूभगिनींबरोबर तसेच इतरांबरोबर याविषयी बोला. यामुळे कदाचित त्यांनाही तुमच्याबरोबर येण्याचे प्रोत्साहन मिळेल. चांगल्याप्रकारे योजना केल्यामुळे, बाप्तिस्मा घेतलेल्या तरुण व वृद्ध प्रचारकांना, हे प्रशंसनीय ध्येय पूर्ण करणे कठीण वाटले नाही. याविषयी प्रार्थना करा. मग, शक्य असेल तर योजना बनवा आणि साहाय्यक पायनियरींगचा आस्वाद लुटा!—मला. ३:१०

८ कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या परीने हातभार लावला तर कुटुंबातील एक सदस्य तरी निदान हे ध्येय पूर्ण करू शकतो, असे पुष्कळ कुटुंबांच्या पाहण्यात आले आहे. एका कुटुंबाने ठरवले, की त्यांच्या कुटुंबातील सर्व बाप्तिस्मा घेतलेल्या पाचही सदस्यांनी साहाय्यक पायनियरींग करायची. कुटुंबातील दोन मुले ज्यांचा अद्याप बाप्तिस्मा झाला नव्हता त्यांनी क्षेत्र सेवा वाढवण्याचा विशेष प्रयत्न केला. या कुटुंबाला याचे कोणते लाभ मिळाले? त्यांनी लिहिले: “हा खूप आनंददायक महिना होता. कुटुंबातील बंधन आणखी मजबूत झाल्याचे आम्हाला जाणवले. या सुरेख आशीर्वादासाठी आम्ही यहोवाचे आभार मानतो.”

९. स्मारकविधीच्या काळात आपण आपला प्रकाश कशाप्रकारे परावर्तित करू शकतो?

९ मार्च आणि एप्रिल महिन्यातील आपले खास कार्य स्फूर्तीदायक ठरेल का? ते आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याच्या आणखी निकट आणेल का? हे सर्व, यहोवा आणि येशू यांच्याबद्दल आपल्याला असलेली प्रीती आणखी वाढवण्यासाठी आणि सेवेमध्ये आणखी सहभाग घेण्यासाठी आपण जितके प्रयत्न करू त्याच्यावर अवलंबून आहे. आपणही स्तोत्रकर्त्याप्रमाणे दृढनिश्‍चय करू या; त्याने असे गायिले: “मी आपल्या तोंडाने परमेश्‍वराचे पुष्कळ उपकारस्मरण करीन, लोकसमुदायांत त्याला स्तवीन.” (स्तो. १०९:३०) स्मारकविधीच्या काळातल्या आपल्या आवेशी कार्यावर यहोवाचा आशीर्वाद निश्‍चितच असेल. तेव्हा, आपण होता होईल तितका अधिक प्रकाश परावर्तित करू या जेणेकरून अधिकाधिक लोक अंधकारातून बाहेर येऊन ‘आपल्याजवळ जीवनाचा प्रकाश’ बाळगतील.—योहा. ८:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा