वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९५ पृ. २
  • सुवार्तेला शोभेल अशा पद्धतीने वागा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्तेला शोभेल अशा पद्धतीने वागा
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या घरासाठी गुणग्राहकता दाखवा
    आमची राज्य सेवा—१९९४
  • शिष्टाचार—देवाच्या लोकांचा खास गुण
    आमची राज्य सेवा—२००१
  • यहोवाच्या उपासना स्थानास आदर दाखवा
    आमची राज्य सेवा—१९९८
  • वेळेचं पालन करण्याची स्वतःला सवय लावा
    आमची राज्य सेवा—२०१४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km ११/९५ पृ. २

सुवार्तेला शोभेल अशा पद्धतीने वागा

१ यहोवाचे साक्षीदार या नात्याने, आपली यहोवाच्या नावाला सन्मान देण्याची इच्छा असते. इतरजण खऱ्‍या उपासनेकडे कोणत्या दृष्टीने पाहतात यावर आपले वर्तन, भाषा, केशभूषा व वेशभूषा प्राभाव पाडू शकतात. सभांना उपस्थित असताना ही गोष्ट विशेषतः लागू होते. सभांमध्ये म्हटली जाणारी व केली जाणारी प्रात्येक गोष्ट सुवार्तेला शोभेल असे व यहोवाला सन्मानित करील अशी असण्याची खात्री आपण केली पाहिजे.—फिलिप्पै. २:४.

२ वेशभूषा आणि केशभूषा यांचे अनेक जगिक दर्जे ख्रिश्‍चनांकरता अस्वीकारणीय आहेत. सुवार्तेच्या सेवकांनी याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. जून १, १९८९ चे टेहळणी बुरूज, पृष्ठ २० वर असे म्हणते: “आपले कपडे महाग असण्याची गरज नाही परंतु ते स्वच्छ, सद्‌अभिरुचिचे व सभ्य असले पाहिजेत. आपली पादत्राणे देखील चांगल्या अवस्थेत व नीट दिसणारी असली पाहिजेत. त्याचप्रामाणे, सर्व सभांमध्ये, मंडळीच्या पुस्तक अभ्यासाच्या वेळी देखील आपण स्वच्छ असले पाहिजे व आपण नीट आणि योग्य पेहराव केला पाहिजे.”

३ वक्‍तशीरपणा, प्रोमळ कदर आणि विचारपूर्वकतेचे चिन्ह आहे. काहीवेळा, अनिवार्य परिस्थितींमुळे आपण एखाद्या सभेसाठी वेळेवर येऊ शकणार नाही. परंतु उशिरा येण्याच्या सवयीने सभांच्या पवित्र उद्देशाबद्दल आदराची उणीव व इतरांना विचलित न करण्याच्या जबाबदारीबद्दल कदर न बाळगल्याचे दिसून येते. उशिरा येणारे बहुधा इतरांचे लक्ष विचलित करतात व त्यांना कार्यक्रमाचा संपूर्ण लाभ घेऊ देत नाहीत. वक्‍तशीरपणा, उपस्थित असणाऱ्‍या सर्वांच्या भावना व रसिकतेबद्दल आदर व्यक्‍त करतो.

४ शेजाऱ्‍यांबद्दलच्या प्रोमाने, सभांच्या दरम्यान इतरांना विकर्षित न करण्याबद्दल काळजी बाळगण्यास प्रावृत्त केले पाहिजे. कुजबूजणे, खाणे, चुइंग गम चघळणे, कागदांची गुंडाळी करणे आणि शौचालयात अनावश्‍यक फेऱ्‍या मारणे हे सर्व इतरांच्या एकाग्रतेमध्ये अडथळा आणू शकते व यहोवाच्या उपासनेच्या ठिकाणाला योग्य तो सन्मान देण्यामध्ये कमीपणा आणू शकते. एखाद्या तातडीच्या समयी बांधवांना आपली जागा सोडून जाण्याची आवश्‍यकता असल्याशिवाय, मंडळीचा व्यवहार करणे किंवा इतरांशी बोलणे अनुचित आहे. अन्यथा, सर्वांनी स्वतःला व आपल्या कुटुंबाला लाभ मिळावा म्हणून आपल्या जागी बसून कार्यक्रम ऐकला पाहिजे. राज्य सभागृहात अशिष्टाचाराची वागणूक चालणार नाही कारण “प्रीति . . . गैरशिस्त वागत नाही.”—१ करिंथ. १३:४, ५; गलती. ६:१०.

५ सभांमध्ये आपल्या मुलांच्या उत्तम वागणुकीने देखील यहोवाच्या नावाला स्तुती व सन्मान दिला जातो. पालकांनी बारीक नजर ठेवणे अत्यावश्‍यक आहे. मुलांना ऐकण्यास व भाग घेण्यास उत्तेजन दिले पाहिजे. अनेक पालक आपल्या लहान मुलांसह अशा ठिकाणी बसतात ज्यामुळे इतरांना अनावश्‍यकपणे विकर्षित न करता ते सहजगत्या बाहेर जाऊन त्यांच्या लहान मुलांच्या गरजांकडे लक्ष देऊ शकतात.

६ पौलाने असा बोध केला: “सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा.” (फिलिप्पै. १:२७) तर मग, सभांना उपस्थित राहतेवेळी सभ्याचाराचे व इतरांबद्दल कदर बाळणारे असण्याचा आपण प्रायत्न करू या. सर्वांनी सहकार्य केल्यास, “परस्परांच्या विश्‍वासाच्या योगाने . . . उत्तेजन प्राप्त” होण्याची खात्री मिळेल.—रोम. १:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा