यहोवाच्या उपासना स्थानास आदर दाखवा
१ आपण एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जातो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या मालमत्तेचा आदर करतो; त्याच्या मालमत्तेची हानी होईल असे आपण काही करत नाही तसेच त्या कुटुंबाच्या सुव्यवस्थित नित्यक्रमात देखील ढवळाढवळ करत नाही. जेव्हा आपण यहोवाकडे पाहुणे या नात्याने जातो तेव्हा आपण किती अधिक आदर दाखवण्यास हवा! त्याच्या घरात आपण कशा प्रकारे वागावे, हे जाणून घेणे आपल्यासाठी अगत्याचे आहे. (स्तोत्र १५:१; १ तीम. ३:१५) आपल्या ख्रिस्ती सभा राज्य सभागृहात, एखाद्याच्या घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी असतील; आपल्यांपैकी बहुतेक लोक आपल्या उपासनेच्या स्थानाचा नेहमी आदर करतात जणू काही ते यहोवाचेच घर आहे, कारण त्याचे “ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर आहे.”—स्तोत्र १४८:१३.
२ काही बांधव सभांप्रती इतका आदर प्रदर्शित करत नाहीत कारण ते त्याठिकाणी गलबला करतात तसेच सादर करण्यात येणारी माहिती इतकी महत्त्वाची नाही, अशा प्रकारे ते तेथे वागतात. काही प्रौढ व्यक्ती सभा चालू असताना लॉबीमध्ये, साहित्य आणि नियतकालिक कक्षाच्या आसपास, टॉयलेटमध्ये किंवा राज्य सभागृहाच्या बाहेर अनावश्यक गप्पा मारत असतात. लहान मुलाला सांभाळण्यासाठी एखाद्या मोठ्या मुलाला सांगितले जाते तेव्हा ते दोघेही खेळण्यात गुंग होतात आणि त्यामुळे त्यांना कार्यक्रमाचा पुरेपूर फायदा घेता येत नाही. काही तरुणांना राज्य सभागृहाच्या बाहेर खेळताना, मोठ्याने किंचाळताना इतकेच नव्हे तर एकमेकांना कराटेसारख्या हालचाली दाखवताना पाहण्यात आले आहे. काही ठिकाणी त्यांनी आसपासच्या लोकांच्या नाकात अगदी दम आणला आहे किंवा रस्त्यावरील वाहतुकीत व्यत्यय आणला आहे.
३ अनादरणीय होण्याचे टाळणे: आपल्या उपासनेचे श्रेष्ठत्व आणि पावित्र्य जाणून घेतल्याने, आपण कुजबूज करण्याद्वारे, खाण्याद्वारे, च्युइंग गम खाण्याद्वारे, कागद चुरगळण्याद्वारे, टॉयलेटच्या अनावश्यक फेऱ्या मारण्याद्वारे किंवा सभांमध्ये सवयीने उशिरा येण्याद्वारे इतरांचे लक्ष विचलित व्हावे असे आपल्याला निश्चितच वाटणार नाही. आदर दाखवणारे आणि कदर करणारे पालक आपल्या मुलांना जमिनीवर कागद टाकण्यास किंवा पुस्तक अभ्यास ज्या ठिकाणी होतो त्या राज्य सभागृहातील किंवा घरातील खुर्च्या वा भिंती घाण करण्याची परवानगी देत नाहीत. आणि यात कोणतीही शंका नाही, की आपल्या सभांमध्ये कोणत्याही प्रकारच्या लज्जास्पद वर्तनास, फालतू गोष्टींस किंवा बीभत्स थट्टेस कोणतेही स्थान नाही.—इफिस. ५:४.
४ आपल्या सभांच्या उद्देशाला आपण नेहमी लक्षात ठेवल्यास, आपण या गोष्टीची खात्री बाळगू की आपण आणि आपली मुले अशा स्थानाला योग्य तो आदर दाखवू कारण तेथील ‘द्वारपाळ होण्याचा’ आपण निर्णय घेतला आहे.—स्तोत्र ८४:१०.