वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९५ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९५
आमची राज्य सेवा—१९९५
km ११/९५ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता

नोव्हेंबर: शक्य असेल तेथे, बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी) या पुस्तकासह पवित्र शास्त्रवचनांचे नवीन जग भाषांतर (इंग्रजी) ७५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जावे. पर्याय म्हणून, देवासाठी मानवजातीचा शोध (इंग्रजी) हे पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जावे. इंग्रजी येत नसलेल्या घरमालकांना आमची राज्य सेवा यात आधी दिलेले १९२ पृष्ठांचे कोणतेही पुस्तक खास सादरतेची पुस्तके म्हणून ८.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात. आमच्याजवळ उपलब्ध असलेल्या या प्राकारातील पुस्तकांच्या यादीसाठी, ऑगस्ट १९९५ ची आमची राज्य सेवा यातील ‘घोषणा’ हा स्तंभ पाहा. आपल्या समस्या किंवा “पहा!” माहितीपत्रक बंगाली किंवा पंजाबी भाषा येत असलेल्या व्यक्‍तींना व नेपाळी वाचणाऱ्‍या लोकांना जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! हे माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते. मल्याळम भाषेत हवे असणाऱ्‍या व्यक्‍तींना, तुमचे तारुण्य—त्यापासून सर्वात अधिक लाभ घेणे! (इंग्रजी) हे पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. हे पुस्तक खास दरात सादर केले जाऊ नये याची कृपया नोंद घ्या.

डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात. आळीपाळीने, बायबल कथांचं माझं पुस्तक (इंग्रजी) किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक त्याच अनुदानात सादर केले जाऊ शकते (लहान आकाराचे अनंतकाल जगू शकाल पुस्तक २५.०० रुपयांना).

जानेवारी: आमची राज्य सेवा यात आधी दिलेल्या खास सादरतेची पुस्तके म्हणून १९२ पृष्ठांच्या पुस्तकांपैकी कोणतेही ८.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते.

फेब्रुवारी: प्राकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आहे! हे पुस्तक ५०.०० रुपयांच्या अनुदानात. आळीपाळीने, आमची राज्य सेवा यात खास सादरतेची पुस्तके म्हणून दिलेली १९२ पृष्ठांची कोणतीही पुस्तके ८.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात.

▪ अधिवेशनाच्या काळात आमची राज्य सेवा प्रात्येक आठवड्यासाठी सेवा सभेची योजना करील. “आनंदी स्तुतीकर्ते” प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याला वाव देण्यास व नंतर पुढील आठवडी सेवा सभेत कार्यक्रमाच्या ठळक मुद्यांची ३० मिनिटांची उजळणी देण्यास मंडळ्या आवश्‍यकतेप्रामाणे काही तडजोडी करतील. प्रांतीय अधिवेशन कार्यक्रमाच्या प्रात्येक दिवसाची उजळणी करण्याकरता आगाऊरित्या दोन किंवा तीन बांधवांना नेमण्यात यावे जे ठळक मुद्यांवर लक्ष केंद्रित करतील. या चांगल्या प्राकारे तयारी केलेल्या उजळणीमुळे, व्यक्‍तिगत अवलंब करण्यासाठी आणि क्षेत्रात वापरण्यासाठी मंडळीला मुख्य मुद्दे लक्षात ठेवण्यास मदत करील. श्रोत्यांकडील विवेचने आणि कथित अनुभव संक्षिप्त व मुद्याला धरून असले पाहिजेत.

▪ उपलब्ध असलेली नवी प्राकाशने:

टेहळणी बुरूज प्राकाशनांची सूची १९९०-१९९४ (इंग्रजी) —इंग्रजी (पायनियरांकरता ११.०० रुपये; प्राचारक आणि जनतेकरता १८.०० रुपये.)

▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्राकाशने:

तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता (पत्रिका क्र. १३) —इंग्रजी, मल्याळम

यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे? (पत्रिका क्र. १४) —इंग्रजी, मल्याळम

शांतीदायक नव्या जगातील जीवन (पत्रिका क्र. १५) —इंग्रजी, तामीळ, मल्याळम

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा