नोव्हेंबरसाठी सेवा सभा
नोव्हेंबर ६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६ (४)
१० मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१५ मि:“प्रात्येक शास्त्रलेख सद्बोधाकरिता उपयोगी आहे.” नवीन जग भाषांतर (इंग्रजी) याच्या वैशिष्ट्यांची चर्चा करा व ते इतर पुस्तकांपेक्षा श्रेष्ठ का आहे ते दाखवा. आधुनिक भाषेत त्याचा अनुवाद केलेला असल्यामुळे त्याचे फायदे स्पष्ट करा. (पाहा “प्रात्येक शास्त्रलेख” (इंग्रजी) पुस्तक, पृष्ठ ३२८, परिच्छेद ४-६.) दोन प्रात्यक्षिके प्रास्तुत करा; एकामध्ये नवीन जग भाषांतर व दुसऱ्यामध्ये खास दरात स्थानिकरित्या उपलब्ध असणारी १९२ पृष्ठांची दोन जुनी पुस्तके सादर करताना दाखवा.
२० मि:“बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्यकता.” भाषण. परिच्छेद १४-१८ पूर्ण करताना, एक प्रात्यक्षिक दाखवा ज्यामध्ये एक पिता आपल्या किशोरवयीन मुलासोबत बेथेल सेवेच्या ध्येयाविषयी बोलत आहे व दिलेल्या सूचनांच्या एकवाक्यतेत मुलगा तयारी करण्यासाठी काय करू शकतो हे दाखवा. मंडळीत बेथेल कुटुंबाचे आधीचे किंवा सध्याचे सदस्य असल्यास, पिता आपल्या मुलासोबतच्या चर्चेमध्ये यातील एक किंवा दोन बांधवांचा समावेश करू शकतात. १९-२३ परिच्छेदांची चर्चा प्राश्नोत्तरांनी केली जावी.
गीत २ (११३) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर १३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३३ (१३)
१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. सप्ताहांताला क्षेत्र सेवेच्या कार्यहालचालींच्या योजनेची उजळणी करा.
१५ मि:“सभांना नियमित उपस्थिती—टिकाव धरता यावा म्हणून आवश्यक.” भाषण व श्रोत्यांशी चर्चा.
२० मि:“सुवार्तेला शोभेल अशा पद्धतीने वागा.” प्राश्नोत्तरे. जून १५, १९८९, टेहळणी बुरूज, पृष्ठे १६-१७, परिच्छेद ५-९ वर आधारित अधिक विवेचने मांडा.
गीत २३ (१९) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २० ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६४ (३५)
१० मि:स्थानिक घोषणा.
१५ मि:स्थानिक गरजा. (किंवा जून १५, १९९४, टेहळणी बुरूज, पृष्ठे ८-११ वर आधारित “तुम्हाला व्यक्तिगत अभ्यास आवडतो का?” हे भाषण द्या.)
२० मि:“बायबलच्या मूल्याची गुणग्राहकता बाळगण्यास इतरांची मदत करा.” बायबल अभ्यास सुरू करण्याच्या ध्येयाने आपण पुनर्भेटी का कराव्यात याची चर्चा वडील दोन किंवा तीन प्राचारकांशी करतात. सराव सत्रामध्ये करतात त्याप्रामाणे, पुनर्भेटींसाठी सुचवलेल्या प्रास्तावनांची उजळणी करा व त्यांचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ८ (८८) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ९६ (३०)
५ मि:स्थानिक घोषणा.
१५ मि:“वरील गोष्टींवर तुमचे मन एकाग्र करा.” प्राश्नोत्तरे.
१० मि:“योग्य शब्द अयोग्य शिकवणुकींना उलथून पाडतात.” भाषण. संस्थेच्या प्राकाशनांमध्ये वापरलेली ईश्वारशासित परिभाषा शिकण्याबद्दल दक्ष असण्यास बांधवांना उत्तेजन द्या.
१५ मि:डिसेंबर दरम्यान सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करणे. पुस्तकाच्या आकर्षक वैशिष्ट्यांची उजळणी करा—आकर्षक अध्यायांचे शीर्षक व मनोरंजक चित्र तसेच साधी स्पष्टीकरणे, लहान आकार व प्राश्नांचा कौशल्यपूर्ण उपयोग करा. स्थानिक क्षेत्रामध्ये लोकांना आवडतील असे बोलण्याजोगे मुद्दे निवडा. सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक व एखादी पर्यायी सादरता, अनंतकाल जगू शकाल पुस्तक याच्या प्रास्तुतीचे एखादे प्रात्यक्षिक दाखवा. अनंतकाल जगू शकाल पुस्तक बायबल अभ्यासासाठी बनवले आहे, आणि बायबल अभ्यास सुरू करण्याच्या हेतूने सर्व वाटपांचा मागोवा घेण्यासाठी खास प्रायत्न केला पाहिजे. डिसेंबर दरम्यान क्षेत्रात या पुस्तकांचा चांगला उपयोग करण्यासाठी सर्वांना उत्तेजन द्या.
गीत ७८ (११२) व समाप्तीची प्रार्थना.