सभांना नियमित उपस्थिती—टिकाव धरता यावा म्हणून आवश्यक
१ प्रोषित पौलाने आपल्याला ‘विश्वासात खंबीर राहण्यास’ आर्जवले. (तीत १:९, १४) मंडळीच्या सभांमध्ये, आपण हितकारक कल्पना विचारात घेतो आणि आपल्याला “सैतानाच्या डावपेचांपुढे . . . टिकाव धरता यावा म्हणून” स्वतः आध्यात्मिक शस्त्रसामग्री धारण करण्यास शिकवले जाते.—इफिस. ६:११; फिलिप्पै. ४:८.
२ सभा आपल्याला आवश्यक ते पुरवतात: खंबीरपणे टिकाव धरता यावा म्हणून सभांना नियमितपणे उपस्थित राहणे आवश्यक आहे. (१ करिंथ. १६:१३) सभांमध्ये प्रार्थना, देवाचे आभार मानण्यास व त्याची स्तुती करण्यास तसेच मंडळी व तिच्या गरजांसाठी त्याला विनंती करण्यास केल्या जातात. (फिलिप्पै. ४:६, ७) यहोवाची उपासना करताना, राज्य गीतांमध्ये भाग घेतल्याने आपल्या भावना व विचार व्यक्त करण्यासाठी आपण उन्नात होतो व आपल्याला मदत मिळते. (इफिस. ५:१९, २०) सभांच्या आधी व नंतर राज्य सभागृहात एकत्र सहवासामुळे आपण प्रोत्साहित होतो, आपली उभारणी होते व ताजेतवाने होतो.—१ थेस्सलनी. ५:११.
३ मागील वर्षी एप्रिलमध्ये, “खोट्या धर्माचा अंत समीप आहे,” या खास भाषणाने सत्याच्या रसिकांच्या मनांवर मोठ्या बाबेलमधून बाहेर निघण्यास तत्काळ कार्य करण्याच्या निकडीबद्दल जोरदारपणे ठसवले. (प्राकटी. १८:४) जून व जुलै दरम्यान नीतिमानांचा मार्ग प्राज्वलित केलेल्या प्राकाशाच्या चकाकण्यावरील टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या तीन लेखांचा अभ्यास करणे किती चालना देणारे होते! (नीति. ४:१८) त्या सभांना उपस्थित राहण्यामध्ये आपण निष्काळजीपणा केला असता, तर आपण केवढे गमावले असते याचा विचार करा.
४ आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित (इंग्रजी) हे पुस्तक पृष्ठ ७२ वर दाखवते त्याप्रामाणे, ईश्वारशासित सेवा प्राशाला सबंध मंडळीच्या सतत प्राशिक्षणासाठी एक तरतूद आहे. सध्या, इंग्रजी भाषेतील आराखड्याचे एक सदर, उद्घोषक (इंग्रजी) पुस्तकाचा उपयोग करून संघटनेच्या आधुनिक दिवसांतील इतिहासासोबत चांगले परिचित होण्यास आपली मदत करते. आपल्याला हे शिक्षण चुकवून चालणार नाही.
५ सेवेमध्ये अधिक प्राभावकारी होण्यास आपली सेवा सभा आपल्याला सुसज्ज करते. राज्य वार्ता क्र. ३४ चे अधिक प्रामाणात वितरण करण्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला सूचना मिळाल्या त्या सभेमध्ये हे स्पष्ट झाले होते. जगभरातील असाधारण निकालांमध्ये दिसून आल्याप्रामाणे, या कार्यावर यहोवाचे विपुल आशीर्वाद होते. (पडताळा २ करिंथ. ९:६, ७.) सभांना नियमितपणे उपस्थित राहणाऱ्यांना उत्तेजन मिळाले आणि त्यांनी त्या मोहिमेस दिलेल्या पाठिंब्याला हातभार लावण्यासाठी मदत दिली.
६ मंडळीच्या पुस्तक अभ्यासामध्ये, प्राकटीकरणाचा कळस या पुस्तकाच्या मदतीने देवाच्या वचनातून शिकत असलेल्या गोष्टींकरवी निकडीबद्दल आपली जाणीव वाढते. जगातील घटना वेगाने घडत असताना, प्राकटीकरणाच्या गाढ भविष्यवाण्यांच्या पूर्णतेची समज आपल्याला झाली पाहिजे.
७ सभांच्या नियमित उपस्थितीला प्राधान्य द्या: पुष्कळ देशांमध्ये परीक्षांनी पीडित असलेल्या आपल्या बांधवांना प्रात्येक आठवडी एकत्र येणे किती अत्यावश्यक आहे याची अद्यापही जाणीव होते. उदाहरणार्थ, बुरुंडी, रवांडा, लायबेरिया, व बॉसनिया आणि हर्जेगोविनामध्ये, सभांना उपस्थित असलेल्या प्राचारकांच्या संख्येपेक्षा नवोदित जणांची संख्या दोन किंवा तीन पटीने देखील जास्त असते. अशाप्राकारे, यहोवा, बांधवांना एका आत्म्यात टिकाव धरता यावा म्हणून मदत करतो.—फिलिप्पै. १:२७; इत्त्वी. १०:२३-२५.
८ जे कोणी सभांच्या नियमित उपस्थितीबद्दल निष्काळजीपणा दाखवत असतील त्यांनी ही सवय सुधारण्यासाठी आताच पावले उचलली पाहिजेत. (उप. ४:९-१२) टिकाव धरता यावा म्हणून, प्रौढ जणांसोबत नियमित सभांच्या उपस्थितीद्वारे पुरवली जाते ती परस्पर देवघेव करण्याची आपल्याला गरज असते.—रोम. १:११.