ऑक्टोबरसाठी सेवा सभा
ऑक्टोबर २ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १४९ (६९)
१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. आमची राज्य सेवा च्या या अंकासोबत दिलेला “१९९६ करता ईश्वारशासित सेवा प्राशालेचा आराखडा” याची व्यक्तिगत प्रात ठेवण्यास सर्वांना उत्तेजन द्या. सन १९९६ दरम्यान त्यातून संदर्भ घेण्यासाठी ते सहजपणे सापडेल अशा ठिकाणी ठेवा.
१५ मि:“नित्य यहोवाची स्तुती करा.” प्राश्नोत्तरे. उल्लेखित व उद्धृत केलेल्या शास्त्रवचनांच्या अवलंबावर जोर द्या.
२० मि:“प्रात्येक प्रासंगी वर्गण्या सादर करा.” मुख्य मुद्यांची चर्चा करा, व वर्गणी सादर केली जाऊ शकेल अशा अलीकडील अंकांमधील लेखांची उजळणी करा. दोन किंवा तीन सादरतांची प्रात्यक्षिके करा. वर्गणी नाकारली जाते तेव्हा नियतकालिकांच्या किरकोळ प्राती नक्की सादर करा.
गीत १५३ (४४) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर ९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १३१ (५५)
१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि:स्थानिक गरजा. किंवा जुलै १५, १९९५, टेहळणी बुरूज, पृष्ठे २५-७ वरील “बहिष्कृत करणे—प्रोमळ तरतूद?” या लेखावर आधारित वडिलांचे भाषण.
२० मि:“आपण जागृत राहत अर्थात विकर्षणे टाळत आहोत काय?” प्राश्नोत्तरे. वेळ अनुमती देते त्याप्रामाणे, मे १, १९९२, टेहळणी बुरूज पृष्ठे २०-२ वर आधारित अधिक विवेचने मांडा.
गीत १२८ (८९) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर १६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १२० (२६)
१० मि:स्थानिक घोषणा. गुड न्यूझ फॉर ऑल नेशन्स् या पुस्तिकेकडे लक्ष केंद्रित करा, ज्यामध्ये ५९ भाषांमध्ये सादरता दिली आहे. आपल्याला येत नसलेल्या भाषेचे लोक भेटल्यावर या पुस्तिकेचा उपयोग करण्याचे उत्तेजन द्या.
१५ मि: “भारतामध्ये सेवा प्राशिक्षण प्राशालेचा पहिला वर्ग.” सचिवांचे भाषण. आध्यात्मिक लाभांवर जोर द्या व पात्र ठरणाऱ्या मंडळीतील कोणत्याही बांधवांना तुमच्या पुढील विभागीय संमेलनाच्या वेळी अर्ज करण्यास उत्तेजन द्या.
२० मि: “उद्देशास्तव केल्या जाणाऱ्या पुनर्भेटी.” पुनर्भेटी करण्यात आपली ध्येये काय आहेत याची चर्चा करा. कार्यक्षम प्राचारकांना दोन वेगवेगळ्या सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवण्याची योजना करा. प्राथम भेटीत वर्गणी करण्यास नकार दिला असल्यास, पुनर्भेटीत ती कशी सादर करावी हे दाखवा.
गीत १३० (५८) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर २३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १०० (५९)
१० मि:स्थानिक घोषणा.
१५ मि:“आपल्याला मंडळीची गरज आहे.” प्राश्नोत्तरे.
२० मि:संघटनेकडे आस्था वळवा. सेवा पर्यवेक्षक, यहोवाचे साक्षीदार—जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत या माहितीपत्रकाचा उपयोग करून, दोन किंवा तीन प्राचारकांशी चर्चा करतात. आस्थेवाईक जणांना, संघटना कशी कार्य करते, विविध कार्यहालचाली कशा आयोजित केल्या जातात व ते यात सामील कसे होऊ शकतात याची जाणीव करून देणे फायदेकारक का आहे हे स्पष्ट करा. पृष्ठे १४ व १५ वरील “प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन देण्यासाठी सभा” यातील मुद्यांची उजळणी करा. आस्थेवाईक व्यक्तीला उपस्थित राहण्याची गरज समजण्यास मदत करण्यासाठी पुनर्भेटीत किंवा बायबल अभ्यासाच्या वेळी चर्चेत या साहित्याचा समावेश कसा केला जाऊ शकतो याचे संक्षिप्त रूपात प्रात्यक्षिक हा गट दाखवतो.
गीत १२६ (१०) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर ३० ने सुरू होणारा सप्ताह
गीत १५९ (६७)
१० मि:स्थानिक घोषणा. डिसेंबरमध्ये जगिक सुट्या मिळणार असल्यामुळे, साहाय्यक पायनियर या नात्याने नावे नोंदवण्यास सर्वांना विचार करण्याचे उत्तेजन द्या.
१५ मि: तुम्ही उल्लेखितांकडे जाऊन पाहिले आहे का? भाषण. काही प्राचारक अशा पद्धतीने नवीन बायबल अभ्यास सुरू करू शकले आहेत: काही काळासाठी आस्थेवाईक व्यक्तीशी अभ्यास केल्यावर, तिचे मित्र, नातेवाईक किंवा परिचितांपैकी कोणी बायबल अभ्यास करण्यास आस्थेवाईक असल्याचे तिला ठाऊक आहे का अशी विचारणा ते करतात. बहुधा अनेकांची नावे दिली जातात. यांना भेटी देताना तुम्ही त्या व्यक्तीचे नाव सांगू शकता का ते विचारा. भेट देताना, तुम्ही असे म्हणू शकता, “अमुक-अमुक व्यक्तीला बायबल अभ्यास इतका आवडला की, तुम्हाला देखील आमच्या मोफत बायबल अभ्यास कार्यक्रमातून लाभ घ्यावयास आवडेल असे तिला वाटले.” असे केल्याने तुम्हाला अशा पुष्कळ उपयुक्त पुनर्भेटी प्राप्त होतील ज्या फलदायक बायबल अभ्यासांमध्ये परिणित होतील. अशा प्राकारे ज्यांना आस्थेवाईक व्यक्ती भेटल्या किंवा ज्यांनी नवीन अभ्यास सुरू केले अशा प्राचारकांकडून एक किंवा दोन अनुभव विचारा.
२० मि: नोव्हेंबर दरम्यान, द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? या पुस्तकासहित न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन सादर करा. रिझनींग पुस्तकातील पृष्ठे २७६-८० वर दिलेल्या न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या वैशिष्ट्यांची उजळणी करा. “व्याख्या” वाचा व ते का उत्पादित करण्यात आले ते समजावून सांगा. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन सादर करण्याबाबत सकारात्मक असण्यास, पण त्यासोबतच तुमच्या भाषेत उपलब्ध असणारी १९२ पृष्ठांची जुनी पुस्तके, किंवा आमची राज्य सेवा यात या महिन्यासाठी सुचवलेली एखादी सादरता सोबत घेण्याबाबत सर्वांना उत्तेजन द्या. कार्यक्षम प्राचारकाला, द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? पुस्तकातील पृष्ठ १८४ वर अध्याय १४ साठी दिलेल्या प्रास्ताविक विवेचनांचा उपयोग करून एक संक्षिप्त सादरता करण्यास सांगा. दुसऱ्या प्रात्यक्षिकात, स्थानिकरित्या उपयोगात आणल्या जाणाऱ्या पर्यायी सादरतेची प्रास्तुती दाखवा. या आठवडी सेवेत उपयोग करण्यासाठी प्राती घेण्याची आठवण सर्वांना करून द्या.
गीत १३८ (७१) आणि समाप्तीची प्रार्थना.