आपण जागृत राहात अर्थात विकर्षणे टाळत आहोत काय?
१ येशूने, निश्चितपणे येणाऱ्या विपत्तींना “चुकवावयास . . . समर्थ व्हावे म्हणून . . . जागृत राहा,” असा इशारा दिला. (लूक २१:३६) आपण मानवी इतिहासातील सर्वात संकटमय काळात जगत आहोत. ज्यांना आध्यात्मिक गुंगी येते, त्यांच्याकरता भवितव्यात विपत्ती आहे. यामुळे आपल्यातील प्रात्येकासमोर धोका आहे. येशूने खाणे, पिणे व दैनिक जीवनाच्या चिंतांचा उल्लेख केला. का बरे? कारण या बाबी देखील आपल्याला गुंतवू शकतात, विकर्षणे ठरू शकतात व घातक आध्यात्मिक गुंगी आणू शकतात.
२ सर्वसामान्य विकर्षणे: काहीजण अति किंवा आक्षेपार्ह करमणुकीत गुंतले आहेत, एवढेच नव्हे तर, टी. व्हीचे व्यसनी देखील बनले आहेत. अर्थात, प्राथम राज्य मिळवण्यास झटा याचा अर्थ आपण सर्व प्राकारची करमणूक टाळावी असा होत नाही. आपण समजूतदारपणा व समतोल अवलंबतो त्यावेळी करमणूक फायदेकारक ठरू शकते. (पडताळा १ तीमथ्य ४:८.) परंतु आपल्या जीवनात ती महत्त्वपूर्ण बाब बनते, आपला वेळ, आपला ठेवा किंवा राज्य-प्राचार कार्यातील आपला सहभाग यातील अधिक समय घेते त्यावेळी ती विकर्षण ठरते.
३ अनावश्यक भौतिक वस्तूंचा हव्यास हे आध्यात्मिक गुंगी आणणारे दुसरे एक सर्वसामान्य विकर्षण आहे. यामुळे एका व्यक्तीने ऐहिक कामावर अधिक वेळ खर्च करावा अशी मागणी तिच्याकडून केली जाते व परिणामस्वरूप आध्यात्मिक ध्येयांना स्थान दिले जात नाही. काहीजण, अधिक आरामदायी जीवन प्राप्त करण्यासाठी भौतिक संपत्ती मिळवण्यात दंग झाल्याने आध्यात्मिक ध्येये त्यांच्या दृष्टिआड झाली आहेत. आपल्याला “अन्नावस्त्र” आवश्यक असले, तरी विश्वासापासून बहकवू शकणाऱ्या द्रव्याचा लोभ विकसित करण्याबद्दल आपण दक्ष असले पाहिजे. (१ तीम. ६:८-१०) राज्य आस्थांवर आपली नजर केंद्रित करण्यात अपयशी ठरल्याने आपल्या कुटुंबाच्या गरजांची काळजी घेण्यात आपण ढिले पडू शकतो व आपले सेवाकार्य साध्य करण्यात अपयशी ठरू शकतो.—१ तीम. ५:८; २ तीम. ४:५.
४ तरीपण, इतरजण ‘संसारांच्या चितांनी त्यांची अंतःकरणे भारावून जाण्यास’ इतपत अनुमती देतात, की ते आध्यात्मिकरित्या झोपी जातात. (लूक २१:३४) काहीवेळेस, स्वास्थ्य समस्या किंवा दुःखी करणाऱ्या कौटुंबिक परिस्थितींमुळे चिंता वाटते. परंतु, अशा वैयक्तिक चिंतांमुळे या व्यवस्थीकरणाच्या जलद गतीने येणाऱ्या समाप्तीची जाणीव लयास जाऊ देऊ नये.—मार्क १३:३३.
५ आपल्याला कल्पनातरंगात रमवणे, म्हणजे एखाद्या जगिक स्वप्नाचा पाठलाग करवण्यात यश मिळवणे हे दियाबलाला कोणत्याही इतर कार्यापेक्षा अधिक आनंदविणारे असेल. आध्यात्मिकरित्या जागृत राहण्याकरता आपल्याला लढा द्यावयाचा आहे. ‘यहोवाचा दिवस चोरासारखा येत आहे’ हे आपल्याला ठाऊक आहे व आपण “जागे व सावध राहावे” हे अत्यावश्यक आहे. (१ थेस्सलनी. ५:२, ६) आपण स्वतःमध्ये गुंगी आल्याची लक्षणे पाहतो, तर “अंधकाराची कामे टाकून द्यावी” हे निकडीचे आहे.—रोम. १३:११-१३.
६ आपल्याला जागे राहण्यास मदत करणारी साधने: अशी साधने कोणती आहेत? प्रार्थना आवश्यक आहे. आपण निरंतर प्रार्थना केली पाहिजे. (१ थेस्सलनी. ५:१७) ख्रिस्ती मंडळीशी जवळीक ठेवल्याने “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन” मिळेल. (इत्त्वी. १०:२४) स्वतःचे नियमित, प्रामाणिक परीक्षण आपल्याला कमजोरींवर मात करण्याच्या गरजेबद्दल दक्ष असण्यास मदत करू शकते. (२ करिंथ. १३:५) व्यक्तिगत अभ्यासाच्या चांगल्या सवयी ‘विश्वासाच्या वचनांनी आपले पोषण करतील.’ (१ तीम. ४:६) आपण मेहनती असलो, तर आपण विकर्षणांकडे दुर्लक्ष करू शकू, सावध व विश्वासात स्थिर राहू शकू.’—१ करिंथ. १६:१३.