भारतामध्ये सेवा प्राशिक्षण प्राशालेचा पहिला वर्ग
भारताच्या विविध भागातून, सिक्कीम व नेपाळ येथून देखील तेवीस विद्यार्थी व दोन निरीक्षक लोनावळ्यात भरवलेल्या सेवा प्राशिक्षण प्राशालेच्या पहिल्या वर्गासाठी उपस्थित राहिले. यातील दोन विद्यार्थी वडील होते व बाकीचे सर्व सेवा सेवक होते. सात जण खास पायनियर, नऊ नियमित पायनियर व इतर, मंडळीतील प्राचारक होते. दोन शिक्षक, मे २२ पासून जुलै १६, १९९५ पर्यंत आठ आठवड्यांकरता विद्यार्थ्यांना शिकवण्यात समाविष्ट होते. एकूण, सुमारे २७० तास वर्गातील शिक्षण देण्यात आले व विद्यार्थ्यांनी गृहपाठ करण्यात व अभ्यास प्राकल्प तयार करण्यात याहून अधिक तास खर्च केले. येथे बेथेलमध्ये त्यांनी काही कामाचा व्यावहारिक अनुभव देखील प्राप्त केला.
२ रविवार, जुलै १६ रोजी बेथेल राज्य सभागृहात एक सुसंघटित पदवीदान समारंभ भरवण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना त्यांच्या नेमणूका देण्यात आल्या. अनुकूल परिस्थितीमुळे इतर ठिकाणी जाऊ शकणाऱ्या सहा जणांना खास पायनियर म्हणून नेमण्यात आले. उर्वरित जण आपआपल्या मंडळ्यांमध्ये परतले, तेथे ते नियमित पायनियर किंवा मंडळीतील प्राचारक या नात्याने त्यांची सेवा चालू ठेवतील.
३ विद्यार्थ्यांनी जे शिक्षण प्राप्त केले त्याची खूप प्राशंसा करण्यात आली. परंतु असे शिक्षण केवळ त्यांना स्वतःलाच आध्यात्मिकरित्या सज्ज करण्यास नव्हे, तर ते ज्या मंडळ्यांशी सहवास राखत आहेत त्यांचे साहाय्य करण्यासाठी देखील मदत करील याची आम्हाला खात्री आहे. अशा प्राशिक्षणाची पुष्कळ आवश्यकता आहे म्हणून २३ आणि ५० वयोगटातील अधिक बांधव ज्यांनी निदान दोन वर्षांकरता सेवा सेवक म्हणून कार्य केले आहे ते स्वतःचे नाव भावी वर्गांसाठी नोंदतील अशी आशा आम्ही बाळगतो.
४ दर वर्षी आम्ही भारतामध्ये, सेवा प्राशिक्षण प्राशालेचा एक वर्ग घेण्याची योजना करत आहोत. यास्तव, बांधव पुढील वर्गासाठी पात्र ठरण्याकरता कार्य करू शकतात. उदाहरणार्थ, इंग्रजीचे ज्ञान आवश्यक असल्यामुळे, इतर मार्गांनी पात्र ठरणारे परंतु चांगली इंग्रजी येत नसलेले त्यांची इंग्रजी सुधारण्यासाठी शिकवणी लावू शकतात. पुढील वर्गात नाव नोंदवण्याची इच्छा असणाऱ्यांनी त्यांच्या प्रांतीय पर्यवेक्षकांशी संपर्क साधावा व त्यांच्या पुढील विभागीय संमेलनात भावी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या सभेला उपस्थित राहावे अशी विनंती केली जाते. सभेमध्ये त्यांनी प्राथमिक अर्ज मिळवावा, तो तात्काळ भरून आम्हाला पाठवण्यासाठी प्रांतीय पर्यवेक्षकांना द्यावा. संस्था, योग्य विद्यार्थ्यांशी संपर्क साधेल.