वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९५ पृ. १
  • नित्य यहोवाची स्तुती करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नित्य यहोवाची स्तुती करा
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • बालकांनो, यहोवाची स्तुती करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • प्रथम देवाचे राज्य मिळवण्यास झटा —स्तुतीचे यज्ञ नित्य अर्पण करून
    आमची राज्य सेवा—१९९४
  • दररोज यहोवाची स्तुती करा
    आमची राज्य सेवा—२००९
  • यहोवाची स्तुती दररोज करा
    आमची राज्य सेवा—१९९५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km १०/९५ पृ. १

नित्य यहोवाची स्तुती करा

१ काही कार्यहालचाली इतक्या महत्त्वाच्या आहेत, की त्यांच्याकडे नित्य लक्ष देणे जरूरीचे असते. त्यामध्ये आपण खाणे, श्‍वासोच्छ्‌वास करणे व झोपणे यांचा समावेश करतो. स्वतःला शारीरिकरित्या जिवंत ठेवायचे आहे, तर या आवश्‍यक आहेत. प्रोषित पौलाने, “स्तुतीचा यज्ञ आपण . . . देवाला नित्य अर्पण करावा,” असे आर्जवले त्या वेळी त्याने सुवार्तेच्या प्राचाराला अशाच वर्गात समाविष्ट केले. (तिरपे वळण आमचे.) (इत्त्वी. १३:१५) यास्तव, यहोवाची स्तुती करण्याकडेही आपण नित्य लक्ष देणे जरूरीचे आहे. आपण असे दररोज करण्याचा प्रायत्न केला पाहिजे, आपल्या स्वर्गीय पित्याची स्तुती नित्य केली पाहिजे.

२ इतरांनी येशूचे लक्ष विचलित करण्याचा प्रायत्न केला त्यावेळी तो म्हणाला: “मला . . . देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे.” (लूक ४:४३) त्याच्या साडेतीन वर्षाच्या सेवाकार्यात, तो प्रात्येक दिवशी जे काही करत होता ते कोणत्या ना कोणत्या प्राकारे देवाला गौरव देण्याशी थेटपणे संबंधित होते. पौलाने १ करिंथकर ९:१६ मध्ये, “मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा!” असे जे म्हटले, ते लक्षात घेऊन त्यालाही अशाच प्राकारे वाटत होते हे आपल्याला ठाऊक आहे. इतर ख्रिश्‍चनांना त्यांच्या आशेचे समर्थन इतरांसमोर करण्यासाठी सतत तयार राहण्याचे उत्तेजन दिले जात होते. (१ पेत्र ३:१५) आज लाखो आवेशी पायनियर व मंडळीचे लक्षावधी प्राचारक अशा उत्तम उदाहरणांचे अनुकरण करण्याचा प्रायत्न करत आहेत.

३ आपला आदर्श, येशू ख्रिस्त, याने संपूर्ण अंतःकरणाने प्रादर्शित केलेल्या आवेशाचा आपण विचार करतो तेव्हा, त्याच्या पावलांचे जवळून अनुकरण करण्यास आपण प्रावृत्त होतो. (१ पेत्र २:२१) काहीवेळेस आपल्याला दैनिक जीवनातील समस्यांना तोंड द्यावे लागते तेव्हा आपण निरुत्साहित होऊ शकतो. आपण पूर्ण वेळेची ऐहिक नोकरी करत असल्यास, यहोवाची स्तुती करण्यासाठी दररोज संधींचा फायदा कसा घेऊ शकतो? त्याचप्रामाणे, आपला अधिक वेळ घेणाऱ्‍या कौटुंबिक कर्तव्यांचा देखील आपण त्याग करू शकत नाही. अधिकांश युवक, आवश्‍यक दैनिक शाळा शिकण्यात गुंतलेले असतात. म्हणून, दररोज यहोवाची स्तुती जाहीरपणे करणे अशक्य आहे असे काहींना वाटेल. कधीकधी, काहीजण कोणत्याही प्राकारे सुवार्तेचा प्राचार न करता संपूर्ण महिना तसाच जाऊ देतील.

४ यिर्मया असा मनुष्य होता जो शांत राहू शकत नव्हता. यहोवाच्या नामाबद्दल थोड्या वेळासाठी तो बोलला नाही तेव्हा, त्याच्यामध्ये असह्‍य अग्नी जळत आहे असे त्याला वाटले. (यिर्म. २०:९) जबर संकटातही, यहोवाच्या संदेशाबद्दल इतरांना सांगण्याचा कोणता ना कोणता मार्ग त्याला नित्य मिळत होता. धैर्याच्या त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करून दररोज आपल्या निर्माणकर्त्याची स्तुती करण्याच्या संधी आपण चिकाटीने शोधू शकतो का?

५ यहोवाविषयी बोलणे केवळ मंडळीतील क्षेत्रात इतर प्राचारकांशी साक्षकार्याच्या औपचारिक, पूर्वनियोजित समयांपुरतेच मर्यादित नसावे. केवळ ऐकणारी व्यक्‍ती असावी हेच आवश्‍यक आहे. आपण दररोज लोकांना भेटतो—ते आपल्या घरी येतात, कामावर आपण त्यांच्यासोबत असतो, दुकानात आपण त्यांच्या शेजारी उभे असतो किंवा बसमध्ये आपण त्यांच्यासोबत प्रावास करतो. यासाठी केवळ एखादे मैत्रीपूर्ण अभिवादन आणि संभाषण सुरू करण्याकरता विचारास प्रावृत्त करणारा प्राश्‍न किंवा टिप्पणी करणे जरूरीचे असते. अनेकांना हा त्यांच्या साक्षकार्याचा सर्वात फलदायी प्राकार असल्याचे आढळले आहे. इतरांशी सुवार्तेबद्दल बोलण्यासाठी इतक्या संधी आपल्याकडे असताना, एक संपूर्ण महिना राज्याची साक्ष न देणे असा आपण विचारसुद्धा केला नसता.

६ यहोवाची स्तुती करण्याची सुसंधी नाही असे कधीच होणार नाही. स्तोत्रकर्त्याने दर्शवल्याप्रामाणे, प्रात्येक जिवंत प्राण्याने यहोवाची स्तुती केली पाहिजे, आणि यामध्ये आपला समावेश व्हावा असे आपल्याला नक्की वाटेल. (स्तोत्र १५०:६) असे नित्य करण्यासाठी आपले अंतःकरण आपल्याला प्रावृत्त करत असल्यास, यहोवा आणि त्याच्या वचनाबद्दल बोलण्याच्या संधींचा फायदा आपण दररोज घेऊ या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा