१९९५ “आनंदी स्तुतीकर्ते” प्रांतीय अधिवेशन
१ आनंदी असण्याकरता आपल्याजवळ किती कारणे आहेत? कदाचित आपल्यापैकी फारच अल्पजणांनी त्यांची यादी करण्याचा प्रायत्न केला असेल. गडबडीच्या व अनिश्चिततेच्या जगात राहत असताना देखील, आनंदी असण्यास आपल्याकडे अनेक कारणे आहेत. पूर्वी घोषित केल्याप्रामाणे, “आनंदी स्तुतीकर्ते” हे १९९५ प्रांतीय अधिवेशनांचे उत्तेजनात्मक शीर्षक आहे.
२ यहोवाने आपल्याला सत्य शिकवल्यामुळे आपण त्याची स्तुती करतो. (यश. ५४:१३; योहा. ८:३२) मग, सुरक्षितता व आनंदाच्या शोधात असणाऱ्या सर्वांशी आपण सत्याची सहभागिता आनंदाने करतो. (यहे. ९:४; प्रो. कृत्ये २०:३५) आपल्या ख्रिस्ती बंधुत्वामुळे देखील आपल्याला आनंद प्राप्त होतो. प्रोमळ आध्यात्मिक कुटुंबामुळे समाधान व खुशी मिळते. यहोवाची स्तुती करण्यास आपल्याला प्रावृत्त करणाऱ्या आनंदाची ही केवळ काही कारणे आहेत. या त्रस्त शेवटल्या काळात, आनंद करण्याकरता आणखी शास्त्रवचनीय कारणांसाठी अधिवेशनातील भाषणे व प्रात्यक्षिके आपले लक्ष आकर्षित करतील.
३ तीन-दिवसीय अधिवेशन: अधिवेशनाच्या सर्व तीन दिवसांना उपस्थित राहण्याकरता तुमच्या मालकाकडे रजा मागण्यासाठी तुम्ही योजना केली आहे का? शाळा सुरू असताना, एका अधिवेशनाकरता उपस्थित राहणाऱ्या शालेय मुलांच्या पालकांनी शिक्षकांना आदराने हे कळवावे की, त्यांच्या धार्मिक उपासनेच्या या महत्त्वपूर्ण भागाकरता मुले शुक्रवारी आणि शनिवारी शाळेत हजर राहू शकणार नाहीत. तुम्हाला सर्वात जवळ असणारे अधिवेशन कोठे आहे? भारतातील सर्व १६ अधिवेशनांची ठिकाणे, फेब्रुवारी १५, १९९५ च्या टेहळणी बुरूज नियतकालिकात देण्यात आली आहेत. आतापर्यंत तुमच्या मंडळीतील सचिवांनी तुमच्या मंडळीकरता माहिती सांगितलीच असेल. इंग्रजीशिवाय, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नाड, कोंकणी, मल्याळम, मराठी, तामीळ व तेलगू या भाषांमध्येही अधिवेशने होतील.
४ बहुतेक ठिकाणी हा कार्यक्रम शुक्रवार सकाळी ९:४० वाजता सुरू होऊन रविवार दुपारी सुमारे ३:५० वाजता समाप्त होईल. शनिवार व रविवारचा कार्यक्रम सकाळी ९:३० वाजता सुरू होईल. सकाळी ८:०० वाजल्यापासून साक्षीदारांचे व जनतेचे स्वागत आहे, परंतु विशिष्ट कामाची नेमणूक असलेल्यांना त्याहूनही लवकर प्रावेश करण्यास अनुमती दिली जाईल.
५ तुम्ही उपस्थितांमध्ये असाल का?: अधिवेशनाच्या सर्व तीन दिवसांकरता उपस्थित राहण्यास आपल्याला आर्जवले जात आहे. असे का बरे? कारण आपण तेथे असावे अशी यहोवाची इच्छा आहे. आज आपल्या विश्वासावर व आध्यात्मिक आरोग्यावर तीव्र हल्ला केला जात आहे. यहुदीयामधील ख्रिस्ती अतिशय दबाव अनुभवत असताना पौलाने ‘एकत्र मिळणे न सोडण्याच्या’ बाबतीत सल्ला दिला. (इत्त्वी. ३:१२, १३; १०:२५) फिलिप्पैकर “कुटिल व विपरीत पिढीत” जगत होते. तरीसुद्धा, ते ‘ज्योतीसारखे जगात प्राकाशत होते.’ (फिलिप्पै. २:१५) हे पहिल्या शतकातील ख्रिस्ती वेगळे का होते? कारण ज्या पवित्र आत्म्याने त्यांना ‘प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन देण्याकरता’ एकत्र मिळण्यासाठी निर्देशित केले त्याचे मार्गदर्शन त्यांनी आज्ञाधारकपणे अनुसरले.—इत्त्वी. १०:२४.
६ नाहीतर, जग आपल्यावर प्राभाव पाडील, आपल्या बंधुंसोबत एकत्र मिळण्याची व यहोवाची स्तुती करण्याची आपली इच्छा कमकुवत करील. अशा प्राकारे, यहोवाच्या आत्म्याच्या अधीन होण्यास व अधिवेशनाच्या तीनही दिवसांचा आनंद लुटण्यास आपल्याला आमंत्रित केले जात आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबासहित उपस्थित राहण्यास आपण दृढनिश्चयी आहोत का? आपली प्रीती व विश्वास नियमितरित्या बळकट करण्याची आपल्याला गरज आहे. या बाबतीत आपली मदत करण्याकरता यहोवाने वार्षिक अधिवेशनांची तरतूद केली आहे.
७ घरी संपत्ती घेऊन जा: अधिवेशनातून तुम्ही सर्वाधिक लाभ कसा घेऊ शकता? एका शब्दात त्याचे उत्तर “एकाग्रता” असे आहे. आजच्या अधिक तणावग्रस्त व घाई-गडबडीच्या समाजात हे काही सोपे नाही. उत्साही युवकांना मन एकाग्र करण्यास कठीण वाटत असेल, पण प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित असताना आपल्या सर्वांना तोंड द्यावे लागणारे हे एक आव्हान आहे. आपण पूर्वयोजना केल्यास, मन एकाग्र करणे सोपे असल्याचे आपल्याला आढळून येईल. स्वतःला विचारा, ‘अधिवेशनाचे शीर्षक काय आहे?’ त्यावर मनन करा! ‘मी तेथे का जात आहे व त्या तीन दिवसांदरम्यान मी काय करीन? माझी संध्याकाळची वेळ मनोरंजनाने भरलेली आहे की आराम घेण्याकरता व अधिवेशनाच्या ठळक मुद्यांची उजळणी करण्याकरता मी पुरेसा वेळ बाजूला राखला आहे?’
८ फेब्रुवारी १, १९८४ च्या वॉचटावर नियतकालिकातील “तुम्ही मनन करता की केवळ दिवास्वप्न पाहता?” या लेखाने एखाद्या सभेतून सर्वाधिक लाभ कसा घेतला जाऊ शकतो यावर अनेक सूचना दिल्या आहेत व अशी समाप्ती केली: “मानसिक शिस्त हा कदाचित सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे.” वक्ता भाषण सुरू करतो त्या वेळी आपण बहुधा लक्ष देऊन ऐकत असतो, पण कदाचित भाषणाचा काही भाग झाल्यावर, आपले “मन भटकू देण्यास आपण अनुमती देतो.” हे आपण कसे टाळू शकतो?
९ गतकाळात सादर केलेल्या सूचनांशी प्राभावकारी असल्यामुळे त्यांची पुनरुक्ती करणे प्रासंगोचित आहे. शक्य असल्यास, प्रात्येक रात्री पुरेसा आराम घेण्याचा प्रायत्न करा. प्रावास करावा लागत असल्यामुळे हे नेहमीच सोपे नसेल, व तुम्ही हॉटेलमध्ये राहत असल्यास, घरी असताना तुम्ही झोपी जाता तितक्या लवकर किंवा तितक्या चांगल्यारितीने आराम घेऊ शकणार नाही. चांगली योजना केल्याने तुम्हाला बहुधा आवश्यक तो आराम घेणे शक्य होईल.
१० मन एकाग्र करण्यामध्ये साध्या नोंदी घेणे मदतदायक ठरले आहे. तुम्ही अधिक माहिती घेण्याचा प्रायत्न केला, तर काही महत्त्वपूर्ण मुद्दे संपूर्णतः सुटतील. सल्ला म्हणून, एखाद्या बायबल विद्यार्थ्याला किंवा घराबाहेर पडू न शकणाऱ्या व्यक्तीला कार्यक्रमाचा सारांश सादर करण्याच्या हेतूने टिपणी घ्या. तुमच्या मनात कोणी विशिष्ट व्यक्ती नसली, तरी टिपणी घेण्यात तुमचा काही हेतू असेल, व अधिवेशनानंतर ख्रिस्ती विश्वासात नसणाऱ्या कौटुंबिक सदस्यांना अनौपचारिकरित्या साक्ष देताना कार्यक्रमाचे ठळक मुद्दे सादर करण्याची तुम्हाला संधी मिळेल. टिपणी घेतल्याने व ऐकलेल्या गोष्टी इतरांना सांगितल्याने तुम्ही सहजगत्या ती माहिती विसरणार नाही. व्यक्त केल्याने धारणशक्ती आणखी वाढते.
११ अधिवेशनाची इमारत भाड्याने घेण्यामध्ये पुष्कळ खर्च होतो ज्यामध्ये ध्वनिवितरण योजना, जादा बैठकींची सोय वगैरे समाविष्ट असते. हा खर्च कसा भागवला जातो? “द वॉचटावर सोसायटी” या नावावर रोख किंवा चेकद्वारे केलेल्या ऐच्छिक अनुदानांकरवी. हे स्तोत्र ९६:८ व २ इतिहास ३१:१२ च्या सुसंगतेत आहे.
१२ आनंदी स्तुतीकर्ते ईश्वारी वर्तणुकीने यहोवाचा सन्मान करतात: मागील वर्षी, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून व अधिवेशनाची सोय केलेल्या ठिकाणातील कामगारांकडून आपल्या वर्तणुकीबद्दल उत्तेजन देणारी सकारात्मक विवेचने मिळाली. एका हॉटेलच्या व्यवस्थापकाने म्हटले: “साक्षीदारांना राहण्याची सोय करून द्यायला आम्हाला नेहमीच आवडते कारण ते सहनशील असतात, सहकार्य देतात व आपल्या मुलांवर लक्ष ठेवतात.” दुसऱ्या एका हॉटेलच्या संचालकाने म्हटले की, इतर कोणत्याही गटांपेक्षा साक्षीदार आनंदी व अधिक संघटित असल्याचे दिसून आले आहे. आपले अधिवेशन त्या भागात सर्वात मोठे होते, तरी ते म्हणाले: “यापेक्षाही लहान गटांच्या तुलनेत आम्हाला अतिशय कमी तक्रारी व अडचणी आहेत.”
१३ दुसऱ्या हॉटेलच्या कर्मचाऱ्याने सांगितले की आपल्या अधिवेशनाआधी अलीकडेच दुसरे एक अधिवेशन भरवले गेले होते व यामुळे पुष्कळ नुकसान झाले तसेच सर्व कर्मचारी उपस्थित असतानाही चोरी झाली. परंतु, आपल्या अधिवेशनाबद्दल तो पुढे म्हणाला: “साक्षीदारांच्या बाबतीत आम्हाला त्याची चिंता करावी लागत नाही. . . . ते येथे असतात तेव्हा, आम्हाला केवळ मेंटेनन्सचे एक किंवा दोन कर्मचारी कामावर ठेवावे लागतात व तेही यंत्रामध्ये काही आकस्मिक बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी.”
१४ सर्व अहवाल एकसारखे असते तर बरे झाले असते अशी आशा आम्ही केली होती, परंतु तसे झाले नाही. एका अधिवेशनाच्या अध्यक्षांनी असे निरीक्षिले: “कार्यक्रमांनंतर, पुष्कळ किशोरवयीन मुले रात्री उशिरा [हॉटेलच्या] दालनात जमा होऊन मोठ्याने हसतात व ओरडतात. यामुळे इतर अतिथिंना त्रास होतो व ते चिडतात. काही युवक हॉटेलच्या दालनात धावतात व एकदुसऱ्यांच्या खोलीत जात असताना दरवाजे आपटतात आणि खोल्यांमध्ये मोठ्याने बोलतात.”
१५ अनेक वर्षांपासून आणखी एक समस्या म्हणजे, पुष्कळ बांधव कार्यक्रम सुरू असताना हॉलच्या दालनात किंवा बाहेर उभे राहून बोलत असतात. मागील वर्षी, वर्गणीच्या पेटीत एका बायबल विद्यार्थ्याकडून एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये असे लिहिले होते: “भाषणे दिली जात असताना हॉलच्या दालनांत जितका आवाज, हालचाल, बोलणे व अयोग्यपणे वागणे चालू असते त्याने मला अतिशय धक्का बसला आहे . . . मी अद्याप एक साक्षीदार नाही, केवळ अभ्यास करणारा व ईश्वारी भय आणि आदर शिकणारा आहे.” निश्चितच, आपण यहोवाच्या तरतुदींकरता गुणग्राहकता दाखवत नाही असा प्राभाव पाडण्यास आपल्यापैकी कोणालाही आवडणार नाही.
१६ प्रात्येक वेळी आपण स्वतःला विचारले पाहिजे: ‘मी कोणाचे प्रातिनिधीत्व करत आहे व मी या अधिवेशनाला का उपस्थित आहे?’ आपली आध्यात्मिकता व ईश्वारी भक्ती आपल्या बोलण्यात, वर्तणुकीत व आध्यात्मिक तरतुदींबद्दलच्या गुणग्राहकतेत प्रातिबिंबित होते. (याको. ३:१३; १ पेत्र २:२, ३, १२) अनेक वर्षे निर्बंध व बंदी यांचा अनुभव घेतलेले बांधव अधिवेशनांत अधिक लक्ष देतात व आदरणीय असतात, स्वस्थ बसतात, भाषणे व प्रात्यक्षिके ऐकण्यात गढून जातात असे आढळून आले आहे.
१७ तुमचा पेहराव व केशभूषा संदेश देतात: १ शमुवेल १६:७ मध्ये आपल्याला आठवण करून दिली जाते की, “मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वार [यहोवा, NW] हृदय पाहतो.” यास्तव, लोक बहुधा आपल्या स्वरूपावरून आपला न्याय करतात. आपण विशेषतः उपासना व ख्रिस्ती जीवनशैलीबद्दल सूचना प्राप्त करण्यासाठी एखाद्या अधिवेशनाला उपस्थित राहतो तेव्हा आपला पोषाख व केशभूषा यांचे जवळून निरीक्षण केले जाते. तुम्ही शाळेत जाणारे युवक आहात किंवा जगिक पद्धती अनुसरणाऱ्या लोकांशी संपर्क येतो अशा ठिकाणी तुम्ही ऐहिक नोकरी करता, तर सभ्य पेहरावासाठी ख्रिस्ती दर्जांना अनुसरणे आव्हानात्मक असेल.
१८ जगामध्ये वेश आणि केशभूषेचे दर्जे वेगवेगळे असतात. ख्रिश्चनांकडून सभ्य व सुव्यवस्थित पोषाख घालण्याची अपेक्षा केली जाते. हे कोणी ठरवावे? आपली किशोरवयीन मुले शाळेतील जगिक युवकांप्रामाणे पोषाख करत नाहीत याची खात्री पालकांनी करावी. या संवेदनशील बाबीविषयी योग्य निर्णय घेण्यास आपली मदत करण्यासाठी विधायक मार्गदर्शन पुरवण्यात आले आहे. फेब्रुवारी ८, १९८७ अवेक! मधील “तुमच्याकरता वस्त्रांचा काय अर्थ होतो?” या लेखाची उजळणी करण्यास आम्ही तुम्हाला उत्तेजन देतो. मागच्या वर्षी आमच्या काही अधिवेशनांमध्ये काय निरीक्षिले गेले?
१९ एका “ईश्वारी भक्ती” प्रांतीय अधिवेशनानंतर, असे निरीक्षण केलेले आम्हाला कळवण्यात आले: “या वर्षी अधिवेशनाकरता बंधू व बहिणींनी त्यांच्या पेहरावात, केशभूषेत व वर्तणुकीत पुष्कळ सुधारणा केली होती. . . . तथापि, अशा काही परिस्थिती व सवयी अद्यापही आहेत ज्यात अजून सुधारणा केली पाहिजे.” आणखी एका अधिवेशनानंतर असे वृत्त मिळाले की, असभ्य पेहराव फारच नजरेत भरण्याजोगा होता. काहींचा पेहराव इतरांना अडखळविणारा होता असे त्या अहवालाने दर्शवले. बाहेरच्या काही लोकांनी देखील त्या असभ्य पेहरावाची नोंद घेतली. काहींची वस्त्रे फारच शरीर प्रादर्शन करणारी व अतिशय घट्ट होती.
२० अधिवेशनाच्या ठिकाणी असताना बहुतांश बंधू व बहिणी सभ्य, मर्यादशील वस्त्रे घालतात. तथापि, नंतर, हॉटेल किंवा रेस्टॉरंट्समध्ये काही बंधू व बहिणींनी अद्यापही त्यांचे बॅज कार्ड लावून, “देवाच्या लोकांना न शोभणारे . . . टी-शर्ट्स व जुने डेनिम, अतिशय आखूड विजारी व फॅशनेबल वस्त्रे” घातली होती. काहींना रिकाम्या वेळेत असा पेहराव करण्याचा कल असल्याचे वडिलांनी निरीक्षिले, तर ख्रिस्ती अधिवेशनाला उपस्थित राहणारे प्रातिनिधी या नात्याने खासकरून असा पेहराव योग्य नाही असे अधिवेशनाआधी नम्रपणे परंतु खंबीर सल्ला देणे उचित असेल. वर दिलेल्या वर्तणूक व पेहरावाबद्दलच्या मार्गदर्शनाची उजळणी, कृपया अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या तुमच्या बायबल विद्यार्थ्यांशी करा.
२१ हॉटेल: कोणावरही आर्थिक ओझे लादले जाऊ नये म्हणून प्रात्येक वर्षी कमी दरात राहण्याची सोय करून देण्याकरता पुष्कळ प्रायत्न केले जातात. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी व्यवहार करताना कृपया सहनशील व नम्र असण्याचे लक्षात ठेवा. प्रावासामुळे तुम्ही थकलेले असाल व राहण्याच्या व्यवस्थेसाठी उभ्या असलेल्या लोकांची रांगही लांब असेल, परंतु तुमच्या सहनशीलतेकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. योग्य पद्धतीनुसार, बक्षीसी देण्याबद्दलही आपण लक्षात ठेवले पाहिजे.—जून २२, १९८६, अवेक!
२२ कॅमेरा व रेकॉर्डींगची उपकरणे: कॅमेरा व रेकॉर्डींगच्या उपकरणांविषयी प्रोमळ स्मरणिका देणे उचित आहे. कृपया लक्षात ठेवा, तुम्ही कॅमेरा, व्हिडीयो कॅमेरा किंवा कोणत्याही प्राकारच्या रेकॉर्डींगच्या उपकरणाचा उपयोग करण्याचा विचार करत असल्यास, तुमच्या सभोवतालच्या लोकांचा विचार करा. कार्यक्रमादरम्यान ये-जा करणे किंवा तुमच्या जागेवर बसून रेकॉर्डींग करणे देखील इतरांना विचलित करणारे असू शकते. विद्युत किंवा ध्वनि व्यवस्थेला कोणत्याही प्राकारची रेकॉर्डींगची उपकरणे जोडू नयेत, तसेच या उपकरणांनी दालनात किंवा वाटेत अडथळा देखील करू नये. फोटो काढणे किंवा व्हिडियो कॅमेराने अथवा ऑडियो कॅसेट रेकॉर्डरने कार्यक्रमाचे काही भाग रेकॉर्ड करण्याचा तुम्ही निर्णय घ्यावा की नाही ही वैयक्तिक बाब आहे. नंतर फोटो व रेकॉर्डींग केलेले पाहिल्यामुळे तुम्हाला गोड आठवणींचे स्मरण करून दिले जाईल. अशी सर्व उपकरणे काळजीने वापरावीत जेणेकरून इतर त्यामुळे विचलित होणार नाहीत किंवा तुम्हाला कार्यक्रमाचा सर्वाधिक लाभ मिळवण्यापासून अडथळा आणणार नाहीत. घरी परतल्यावर, तुमच्याकडे रेकॉर्डींग केलेले पुन्हा ऐकण्यास वेळ असेल का? टिपणी घेणे पुरेसे आहे असे तुम्हाला आढळेल.
२३ बैठक: सन १९९४ च्या “ईश्वारी भय” प्रांतीय अधिवेशनात जागा राखून ठेवण्याच्या बाबतीत तुम्ही सुधारणा झालेली पाहिली का? काही प्रागती करण्यात आली आहे, पण तरीसुद्धा या स्मरणिकेची आपल्याला अजूनही जाणीव असली पाहिजे: जागा केवळ तुमचे जवळचे कौटुंबिक सदस्य व जे कोणी तुम्हासोबत प्रावास करतात त्यांच्यासाठीच राखावी. आपण तेथे संस्थेचे पाहुणे या नात्याने आहोत. ऐच्छिक अनुदानांकरवी त्या सभागृहाचे भाडे देण्यात आले आहे. ज्या जागेवर कोणी बसेल अशी खात्री नसलेली जागा राखून ठेवणे प्रोमळपणाचे व कनवाळुपणाचे असेल का? अलर्जीसारख्या वातावरणाच्या समस्या असणाऱ्यांकरता आम्ही वेगळे भाग किंवा खोल्यांसाठी देण्यात आलेल्या विनंत्या स्वीकारू शकणार नाही याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
२४ अनेक अधिवेशनांमध्ये, वृद्ध व शारीरिकरित्या अपंग असणाऱ्यांप्रामाणे खास गरजा असलेल्या लोकांसाठी सोय केली जाते. तुम्ही यासाठी पात्र नसल्यास, या भागातील जागेवर तुम्ही बसलेले नाहीत अशी कृपया खात्री करा. तसेच अशा विशेष आवश्यकता असणाऱ्यांसोबत कोणी त्यांची जबाबदारी घेणारा नसेल, तर त्यांना जागा शोधण्यात मदत करण्याबद्दल दक्ष असा.
२५ तुमच्या अधिवेशनाच्या भोजन व्यवस्थेची काळजी घेणे: तुम्हाला माहीत आहे त्याप्रामाणे, जून १९९५ ची आमची राज्य सेवा ह्यामध्ये अशी घोषणा केली: “येथून पुढे, प्रांतीय अधिवेशने, विभागीय संमलने व खास संमेलन दिवशी केवळ अल्पोपहार उपलब्ध करून दिला जाईल. कॅफेटेरिया पद्धतीने जेवण दिले जाणार नाही. उपस्थित असणारे लोक, इच्छा असल्यास आपआपले जेवण, अल्पोपहाराच्या स्टॉलमध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टींसोबत खाण्यासाठी घेऊन येऊ शकतात.” त्यानंतर जुलै १९९५ ची आमची राज्य सेवा यातील पुरवणीने हा बदल का करण्यात आला याचे स्पष्टीकरण दिले व अधिवेशनात प्रात्येकजण स्वतःच्या खाण्याच्या गरजांची काळजी कशी घेऊ शकतो यावर उत्तम सूचना दिल्या. केवळ स्वतःहून पुरवणीची उजळणी करणेच, नव्हे तर आपले बायबल विद्यार्थी अधिवेशनाला उपस्थित राहण्यास तयारी करतात तेव्हा त्यांच्यासोबत देखील त्याची चर्चा करणे सर्वांकरता उत्तम असेल. सर्व बायबल विद्यार्थ्यांना हे कळवणे महत्त्वपूर्ण आहे की, उपस्थित असलेल्या सर्वांना, अल्पोपहाराच्या खात्याकडून पुरवले जाते त्यापेक्षा काही जास्त हवे असल्याची गरज भासल्यास, ते खाण्यासाठी स्वतःहून काही घेऊन येऊ शकतात.
२६ काही मुद्यांवर जोर देण्यासाठी, तुमच्या दुपारच्या भोजनाकरता तुम्हाला हे सुचवलेले पदार्थ लक्षात ठेवावेसे वाटतील: हलके, साधे व पोषक भोजनाचे पदार्थ, जे बहुधा कामाला जाणारे लोक सोबत नेतात जसे की, कोल्ड सॅन्डविचेस, पोळ्या व त्यासोबत सुक्या भाज्या, बिस्कीटे, वाफेवर शिजवलेले पदार्थ व ताजी फळे. अधिवेशनाच्या ठिकाणी अल्पोपहारासाठी पेयांमध्ये चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स व फ्रुट ज्यूस हे उपलब्ध असेल. तुमच्या स्वतःच्या अनत्त्वोकेबल पाण्याच्या बाटल्या आणावे असे तुम्हाला वाटल्यास, त्या तुमच्या खुर्चीखाली मावत असल्या तर तुम्ही आणू शकता. तथापि, कुटुंबासाठी असलेल्या मोठ्या आकाराचे पाण्याचे कॅन, मद्य किंवा काचेची भांडी अधिवेशनाच्या ठिकाणी आणली जाऊ नयेत. कार्यक्रम सुरू असताना खाणे किंवा अल्पोपहार घेणे टाळावे. यामुळे दिल्या जाणाऱ्या आध्यात्मिक अन्नाबद्दल अनादर दाखवला जाईल.
२७ आणखी एक दक्षतेची गोष्ट म्हणजे, हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी खोल्यांमध्ये स्वयंपाक करण्याची अनुमती दिल्याशिवाय व त्यांनी याची तरतूद केल्याशिवाय हॉटेलच्या खोल्यांमध्ये स्वयंपाक केला जाऊ नये. दुपारची सुटी अशा प्राकारे ठेवण्यात आली आहे जेणेकरून आपण हलका अल्पोपहार घेऊन आपल्या बंधू व बहिणींसोबत ईश्वारशासित सहवासाचा लाभ घेऊ शकतो ही वास्तविकता लक्षात ठेवणे चांगले असेल. यहोवाचे लोक या नात्याने, भौतिक वस्तूंच्या तुलनेत अधिवेशनातील आध्यात्मिक अन्ना प्रामुख्याने महत्त्वाचे आहे हे आपण जाणतो, व त्यानुसार आपण योजना केली पाहिजे.
२८ भारतात “आनंदी स्तुतीकर्ते” प्रांतीय अधिवेशनातील पहिले अधिवेशन ऑक्टोबर २०, १९९५ रोजी सुरू होईल. तुम्ही तुमची तयारी केली आहे का, आणि तीन दिवसांचा आनंदी सहवास व आध्यात्मिक उत्तम गोष्टींचा आनंद उपभोगण्यास तुम्ही तयार आहात काय? यहोवाचे आनंदी स्तुतीकर्ते कसे व्हावे यावर आपण विचार करत असताना तुमच्या बंधू व बहिणींसोबत पुढील महिन्यांमध्ये अधिवेशनास उपस्थित राहण्याकरता यहोवा तुमच्या परिश्रमांना आशीर्वादित करो ही आमची मनःपूर्वक प्रार्थना आहे.
[६ पानांवरील चौकट]
प्रांतीय अधिवेशनाच्या स्मरणिका
बाप्तिस्मा: बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी शनिवारी सकाळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विशेष आयोजित केलेल्या विभागात त्यांच्या स्थानी उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे बाप्तिस्मा घेण्याची इच्छा राखून आहेत त्या प्रत्येकाने आंघोळीचा विनयशील पोषाख व टॉवेल आणावा. बाप्तिस्म्याचे भाषण व वक्त्याने केलेल्या प्रार्थनेनंतर, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना संक्षिप्त सूचना देतील व नंतर गीताबद्दल सांगतील. शेवटच्या ओळीनंतर सेवक, बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना बाप्तिस्म्याच्या ठिकाणाकडे घेऊन जातील. बाप्तिस्मा हा एखाद्याच्या समर्पणाचे द्योतक असून ही गोष्ट यहोवा व त्या व्यक्तीमधील वैयक्तिक व खाजगी बाब असल्यामुळे, दोन किंवा अधिक बाप्तिस्मा घेणारे उमेदवार बाप्तिस्मा घेताना मिठी मारतात किंवा हात पकडतात अशा भागीदारीच्या बाप्तिस्म्याची तरतूद येथे नाही.
बॅज कार्ड्स: कृपया १९९५ चे बॅज कार्ड अधिवेशनात व अधिवेशन ठिकाणाकडे येताना किंवा जाताना लावा. यामुळे प्रवास करताना आपल्याला उत्तम साक्ष देणे शक्य होते. बॅज कार्ड्स तुमच्या मंडळीतून प्राप्त करावीत कारण ती अधिवेशनात उपलब्ध नसतील. तुमचे चालू आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्ड सोबत आणण्याचे लक्षात ठेवा. बेथेल कुटुंबाच्या सदस्यांनी आणि पायनियरांनी त्यांच्यासोबत त्यांचे ओळखपत्र ठेवावे.
राहण्याच्या व्यवस्था: तुम्हाला एखाद्या हॉटेलबद्दल काही समस्या असतील, तर रुमींग डिपार्टमेंटच्या पर्यवेक्षकांच्या लक्षात ती गोष्ट आणून देण्यासाठी कचरू नका, जेणेकरून ते तुम्हाला लागलीच ती समस्या सोडवण्यास मदत करतील. मंडळीच्या सचिवांनी, रूम रिक्वेस्ट फॉर्मस् उचित अधिवेशन पत्त्यांवर पाठविले आहेत का याची खात्री करून घ्यावी. तुमचे आरक्षण रद्द करणे तुम्हास जरूरीचे वाटते, तर हॉटेल आणि अधिवेशनातील रुमींग डिपार्टमेंटला तत्काळ कळवावे ज्यामुळे खोली दुसऱ्या कोणास उपलब्ध करून दिली जाईल.
स्वयंसेवक सेवा: तुम्हाला अधिवेशनात एखाद्या विभागात मदत करण्यासाठी योजना करता येईल का? आपल्या बांधवांची, केवळ काही तासांसाठी सेवा केल्याने ते साहाय्यकारी आणि समाधानकारकही ठरू शकते. तुम्ही मदत करू शकत असल्यास, कृपया अधिवेशनाच्या ठिकाणी स्वंयसेवक विभागास कळवा. १६ वर्षांखालील मुलेही, त्यांच्या पालकांच्या किंवा इतर जबाबदार प्रौढांच्या निर्देशनाखाली काम करून उत्तम प्रकारे हातभार लावू शकतात.
सावधानतेचा इशारा: संभाव्य समस्यांबद्दल दक्ष राहिल्याने आपण स्वतःला अनावश्यक त्रासापासून वाचवू शकतो. बहुतेकवेळा, घरापासून दूर असणाऱ्या व्यक्तींनाच चोर किंवा भामटे लुटतात. चोर आणि खिसेकापूंना मोठ्या मेळाव्यांमध्येच अधिक फायदा मिळतो. तुमची कोणतीही मौल्यवान वस्तू अधिवेशनातील खुर्चीवर ठेवून जाणे सुज्ञतेचे ठरणार नाही. तुमच्या भोवतालचे सर्वजण ख्रिस्ती आहेत ही खात्री तुम्ही बाळगू शकत नाही. मग संधी तरी का द्यावी? काही बाहेरच्या लोकांनी लहान मुलांना पळवून नेण्याच्या हेतूने आमिष दाखवले आहे अशी माहिती मिळाली आहे. तुमच्या मुलांना सतत तुमच्या नजरेसमोर ठेवा.
पुष्कळ हॉटेलांमध्ये केबल दूरदर्शनद्वारे कधीकधी असभ्य व अश्लील चित्रपट दाखवले जातात. या पाशांपासून सावध राहा आणि मुलांना देखरेखीविना टी.व्हीला हात लावण्यास अनुमती देऊ नका.
कृपया अधिवेशन सभागृहाच्या व्यवस्थापकांना फोन करून अधिवेशनाच्या बाबींबद्दल विचारणा करू नका. वडिलांकडून माहिती उपलब्ध नसल्यास, कृपया अधिवेशन पत्त्यावर लिहा.