वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९५ पृ. ७
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९४
  • जबाबदारीचा आमचा भार स्वतः वाहणे
    आमची राज्य सेवा—१९९१
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९३
  • देवाचे वचन स्वीकारणे, त्याचा अवलंब करणे व लाभ मिळवून घेणे
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km १२/९५ पृ. ७

विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम

१ मार्च १९९६ पासून सुरवात होऊन, विभागीय संमेलनांचे शीर्षक “देवाच्या वचनाचे पालन करण्यासाठी ऐका व शिका,” हे असेल. अनुवाद ३१:१२, १३ वर आधारलेले हे शीर्षक सबंध कार्यक्रमासाठी जे धडे आपण शिकले व लागू केले पाहिजेत ते ठळकपणे मांडण्यास योग्य आधार पुरवते.

२ बहुतांशी लोक आज दिशाभूल करणाऱ्‍या प्रोरित अभिव्यक्‍तींकडे लक्ष देत असले, तरी आपल्यातील प्रात्येकाला देवाच्या वचनातून ऐकण्याची व त्याप्रामाणे चालण्यास शिकण्याची अत्यंत गरज आहे. (लूक ११:२८; १ तीम. ४:१) हे लक्षात ठेवून, विभागीय संमेलनाचा कार्यक्रम प्राचारकांना, कुटुंबांना, वडिलांना व पायनियरांना उत्तेजन व मदत पुरवण्यासाठी बनवला गेला आहे. शनिवारी, “देवाच्या वचनाकडे लक्ष देऊन—आपल्या समस्यांचा सामना करणे” या विषयावर चार भागांचा एक परिसंवाद असेल. तसेच रविवार सकाळी, “शास्त्रवचने नीतिशिक्षण कसे देतात” या शीर्षकावर एक परिसंवाद असेल. संपूर्ण कार्यक्रम असे आध्यात्मिक उत्तेजन देईल जे तुम्ही व तुमच्या कुटुंबाने चुकवू नये.

३ शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी, क्षेत्र सेवेसाठी व्यावहारिक सूचना सादर केल्या जातील व त्यांचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल. उत्तेजनात्मक तसेच बोधक अनुभव व मुलाखती देखील सादर केल्या जातील. म्हणून, उपस्थित राहिल्यामुळे व जे शिकत आहात त्याचा अवलंब करण्याच्या हेतूने ऐकल्यामुळे देवाच्या वचनातील आज्ञांचे पूर्णपणे पालन करण्यास तुम्ही चांगल्या स्थितीत असाल.

४ नवीन समर्पित बंधू आणि बहिणींचा बाप्तिस्मा, विभागीय संमेलनाचे एक वैशिष्ट्य असेल. त्यांच्या समर्पणाच्या या जाहीर घोषणेच्या बऱ्‍याच आधी, उमेदवारांनी अध्यक्षीय पर्यवेक्षकांजवळ बाप्तिस्मा घेण्याची इच्छा व्यक्‍त करावी जेणेकरून त्यांच्याशी भेट घेण्यास अध्यक्षीय पर्यवेक्षक वडिलांची योजना करू शकतील.

५ या विभागीय संमेलनाच्या श्रृंखलेच्या जाहीर भाषणाचा विषय “बायबलद्वारे मार्गदर्शित का व्हावे?” हा आहे. आस्थेवाईक व्यक्‍तींना उपस्थित राहण्यास आमंत्रण द्या. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला जे अत्यावश्‍यक उत्तेजन व साहाय्य मिळेल त्यांची वाट पाहत असताना सबंध कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निश्‍चित योजना करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा