पुन्हा एकदा पावसाळा आला!
पावसाळा, उन्हाळ्याच्या उष्णतेपासून आराम देतो खरा, परंतु सेवेसाठी प्रावास करणे व तिच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी देखील तो समस्या उभ्या करतो. तथापि, ईश्वारशासित कार्यहालचालींना प्राथम स्थान दिले पाहिजे याची आपण स्वतःला आठवण करून द्यावी. तरीसुद्धा, आपण क्षेत्र सेवेत नियमित सहभाग घेतला पाहिजे आणि त्याचा अहवाल तत्काळ मंडळीला दिला जातो याची खात्री केली पाहिजे. याचा अर्थ, आपल्याला पावसाळ्यात सेवेसाठी सुसज्ज असण्याची गरज आहे—चांगली छत्री किंवा रेनकोट आणि साक्षकार्याची वॉटरप्रुफ बॅग असली पाहिजे. आपण नेहमीच योग्य साहित्य सोबत ठेवल्यास, अनौपचारिक साक्षकार्य करण्यास संधी मिळते तेव्हा आपण काहीतरी सादर करू शकतो.
२ शाळेत जाऊ लागणाऱ्या युवकांना क्षेत्र सेवेत नियमित असण्यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे. आपणा सर्वांनी आपल्या व्यक्तिगत अभ्यासाचा आराखडा टिकवून ठेवण्याचा प्रायत्न केला पाहिजे; त्यामध्ये बायबल वाचन आणि प्रात्येक आठवडी सभांमध्ये पूर्ण केल्या जाणाऱ्या साहित्याचा समावेश होतो. पावसाळ्याच्या महिन्यांमुळे आपल्या दैनिक नित्यक्रमात बदल होत असला, तरी आपल्याला अजूनही ‘श्रेष्ठ आध्यात्मिक गोष्टींच्या’ बरोबरीने राहायचे आहे.—फिलिप्पै. १:१०.