बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्यकता
१ या शेवटल्या काळात, यहोवा जे मोठे कार्य करत आहे ते पाहून आपल्याला आनंद होतो. स्तोत्र ११०:३ दाखवते की, या काळात, राज्य सेवेत क्रियाशील भाग घेण्याची इच्छा हा देवाच्या लोकांचा एक उल्लेखनीय गुण असेल. जगभरात, यहोवाचे लोक राज्याच्या सुवार्तेचा प्राचार करण्यासाठी खपत आहेत. उद्घोषक (इंग्रजी) पुस्तक, पृष्ठ २९५ वर असे म्हणते: “काहीजण जागतिक बेथेल कुटुंबाचे सदस्य म्हणून सेवा करतात. बायबल साहित्य तयार करण्यासाठी व प्राकाशित करण्यासाठी, आवश्यक कार्यालयीन कामे करण्यासाठी व अशा कार्यांना पाठिंबा देणाऱ्या सेवा पुरवण्यात नेमलेले कोणतेही काम करण्यास स्वेच्छा दाखवलेल्या पूर्ण-वेळ सेवकांचा हा एक कर्मचारी वर्ग आहे. या कामाद्वारे त्यांना व्यक्तिगत प्रामुख्य किंवा भौतिक मालमत्ता प्राप्त होत नाही. यहोवाचा सन्मान करण्याची त्यांची इच्छा आहे व अन्ना, राहण्याची सोय आणि व्यक्तिगत खर्चांसाठी मर्यादित भत्ता अशा तरतुदी पुरवल्यामुळे ते समाधानी आहेत.” तुम्ही बेथेलला भेट दिली असल्यास, तेथे होत असलेल्या कामाचा काही प्रामाणात तुम्हाला आधीच परिचय असेल. तथापि, सेवेच्या या अद्वितीय विशेषाधिकाराबद्दल तुमची गुणग्राहकता वाढवण्यास आणि संस्थेच्या गरजांबद्दल तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी आम्ही अधिक माहिती पुरवू इच्छितो.
२ बेथेल सेवा आणि त्याच्या समृद्ध परंपरेचे चित्र मनासमोर उभे करण्यासाठी, यहोवाच्या संघटनेचा—काही प्राचीन आणि काही आधुनिक—इतिहास आपण पाहू या. सुमारे १९ वर्षांपर्यंत, वॉचटावर संस्थेचे मुख्यालय ५६-६० आर्क स्ट्रीट, ॲलेघेनी, पेन्सिल्व्हानिया येथे चार-मजली विटांच्या इमारतीत होते. त्यास बायबल गृह असे म्हटले जात होते. तथापि, १९०८ पर्यंत, बायबल गृहाचा परिवार किंवा संस्थेच्या मुख्यालयाच्या कर्मचारी वर्गाची संख्या ३० सदस्यांपेक्षा अधिक वाढली होती. विस्तार करण्याची वेळ आली होती. ईश्वारी मार्गदर्शन प्राप्त केल्यावर, बांधवांनी, ब्रुकलिन कामासाठी उचित ठिकाण असेल असा निर्णय घेतला. यास्तव, संस्थेच्या कार्यालयांसाठी व मोठ्या सभागृहासाठी, ब्रुकलिनमध्ये १३-१७ हिक्स स्ट्रीट येथील एक इमारत खरेदी करण्यात आली. ही कार्यालये जानेवारी ३१, १९०९ रोजी उघडण्यात आली, परंतु या हिक्स स्ट्रीटच्या इमारतीत निवासाची काहीच सोय नव्हती. निवासस्थाने भाड्याने घेता येऊ शकतील असा सुरवातीला विचार करण्यात आला. परंतु, ब्रुकलिन हाईट्समधील कोणतीही घरे भाड्याने उपलब्ध नव्हती. पण पुढे, बांधव, १२४ कोलंबिया हाईट्स येथे चार-मजली तपकिरी दगडांची एक इमारत जी, पूर्वी हेन्री वार्ड बीचर यांचे निवासस्थान होते, ती “किफायतीच्या सौद्यात” खरेदी करू शकले तेव्हा त्यांना आश्यर्च वाटले आणि आनंद झाला. मग, १२६ कोलंबिया हाईट्स देखील उपलब्ध झाली. मार्च १, १९०९ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) मध्ये अशी हर्षाने घोषणा करण्यात आली: “बायबल गृह” या पिट्सबर्गच्या संज्ञेऐवजी “नवीन गृहाला आपण बेथेल असे नाव देऊ.” म्हणून, एप्रिल १९०९ रोजी, बेथेलचे कार्य सुरू झाले आणि बेथेल कुटुंब या नवीन ठिकाणी गेले. ब्रुकलिन बेथेल ८६ वर्षांपासून याच ठिकाणी आहे.
३ संस्थेच्या मुख्यालयांसाठी बेथेल हे उचित नाव होते का? हे नाव आणि त्याचा संबंध यांविषयी बायबलचा उगम विचारात घ्या. उत्पत्ति २८ अध्याय, ३,७०० पेक्षा अधिक वर्षांआधीच्या ७७ वर्षांच्या अविवाहित याकोबाचा अनुभव सांगतो. याकोब पवित्र गोष्टींबद्दल कदर बाळगत होता पण त्याचा जुळा भाऊ, एसाव त्याचा द्वेष करीत असे. आपला पिता, इसहाक याच्या मार्गदर्शनानुसार, याकोब बैरशेबा येथून उत्तरेकडील प्रादेशात राहणाऱ्या अत्त्वाहामाच्या नातेवाईकांकडे पळून गेला, ज्यांच्यामधून पत्नी शोधण्याचा त्याचा विचार होता. सुमारे ६२ मैल प्रावास केल्यावर, यहुदीय डोंगरांमध्ये लूज या ठिकाणी रात्रीच्या वेळी विश्रांती घेण्यासाठी तो थांबला. उत्पत्ति २८:१०-१९ येथे, यहोवाने याकोबाला ईश्वारी पाठिंब्याची पूर्ण खात्री कशी दिली या मनोवेधक माहितीविषयी आपण वाचतो. याकोबाने स्वप्नात, पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत एक शिडी पाहिली. देवदूत या शिडीवरून चढतउतरत होते, आणि यहोवा वर उभा होता. त्यानंतर यहोवा बोलला, व अत्त्वाहामाला संततीबद्दल दिलेले वचन आता याकोबाला दिल्याची खात्री त्याने दिली आणि यहोवा त्याला त्यागणार नाही असेही त्याने म्हटले. आध्यात्मिक मनोवृत्तीच्या याकोबासाठी हा किती भय-प्रोरक अनुभव होता! हे ठिकाण त्याच्या दृष्टीने विशेष ठरले यात काही आश्चर्य आहे काय? त्याला हे ठिकाण “देवाचे घर” असे होते, किंवा इत्त्वी भाषेत, बेथ-ʼएलʹ, बेथ म्हणजे “घर” आणि ʼएलʹ म्हणजे, “देव.”—उत्प. २८:१९, तळटीप, NW.
४ अशा प्राकारे, बेथेल या नावाची समृद्ध ऐतिहासिक पार्श्वाभूमी आहे आणि ते यहोवाच्या लोकांच्या जागतिक मुख्यालयांसाठी उचित आहे. आज, देवाच्या सेवकांना ईश्वारी प्रोरणेची स्वप्ने पडत नाहीत. बेथेलपासून स्वर्गापर्यंत शिडीवरून देवाचे देवदूत चढतउतरत असलेले दिसत नाहीत. बांधवांना दृष्टांत होत नाहीत किंवा त्यांना प्रात्यक्षात देवाचा आवाज ऐकू येत नाही. तरीही, गेल्या ८६ वर्षांत बेथेलमध्ये बंधू रस्सेलच्या काळापासून आतापर्यंत जे काही घडले त्याचा विचार केल्यास, यहोवाचा हात, बेथेलमध्ये अत्त्वाहामाच्या आध्यात्मिक संततीचा भाग म्हणजेच त्याच्या अभिषिक्त सेवकांवर राहिला आहे यात काहीच शंका नाही. यास्तव, यहोवाच्या आधुनिक दिवसांतील साक्षीदारांच्या इतिहासातील अनेक उल्लेखनीय घटना ब्रुकलिन बेथेलशी निगडित आहेत. काही ठळक मुद्यांचा विचार करा:
▪ ऑक्टोबर २, १९१४ रोजी, बंधू रस्सेल जेवणघरात आले तसे, त्यांनी अचूकपणे अशी घोषणा केली: “विदेश्यांच्या काळाची समाप्ती झाली; त्यांच्या राजांची घटका भरली आहे.”
▪ १९२० च्या दशकाच्या सुरवातीला, प्रातःकालीन उपासनेच्या वेळी, संस्थेच्या संपादकीय कर्मचारी वर्गाच्या एका सदस्याने “देवाची संघटना” ही संज्ञा वापरली. यामुळे त्यांच्या विचाराला इतके उत्तेजन मिळाले की, १९२५ पर्यंत बांधवांना, यहोवाची व सैतानाची अशा दोन वेगळ्या व विरुद्ध संघटना असल्याचे दिसून आले होते.—w८५ ३/१५ पृ. १०.
▪ एकदा, १९३१ मध्ये एके दिवशी सकाळच्या प्राहरी, कोलंबस, ओहायोमधील अधिवेशनानंतर काही काळातच, संस्थेचे अध्यक्ष, बंधू रदरफोर्ड यांना अशी समज प्राप्त झाली की, यहोवाचे साक्षीदार हे नाव खरोखर देवाच्या लोकांचे व ते करत असलेल्या कामाचे वर्णन करत होते आणि त्याचे साक्षीदार म्हणून त्यांना ओळखले गेले पाहिजे.—yb७५ पृ. १५१.
▪ सन १९३५ च्या सुरवातीला, “मोठा लोकसमुदाय” किंवा “प्राचंड समुदाय” कोण आहे याविषयी प्राश्न उपस्थित करण्यात आले. (प्राकटी. ७:९; सुबोध भाषांतर) त्या वेळी स्वतःचे मत केलेल्यांपैकी काहींनी ते पार्थिव वर्गातील असल्याचे सुचवले. मे ३१, १९३५ रोजी, वॉशिंग्टन, डी.सी., अधिवेशनात एक समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आले.—jv पृ. १६६.
५ बेथेलमध्ये यहोवाने त्याच्या पवित्र आत्म्याकरवी त्याच्या विश्वासू अभिषिक्त सेवकांना मार्गदर्शन व पाठिंबा कसा दिला आहे हे या काही उदाहरणांवरून स्पष्ट होते. आणि देवदूतांविषयी काय? आपल्या शत्रूंकडील सर्व कटू विरोध आणि ठेव्यांची कमतरता होती त्या कठीण वर्षांचा विचार केल्यास, या सर्व वर्षांमध्ये, देवदूतीय संरक्षण आणि साहाय्याविना बेथेल इतक्या उल्लेखनीयरित्या कार्य करू शकले नसते यात काहीच शंका नाही.
६ अमेरिकेतील मुख्यालयांच्या कर्मचारी वर्गाव्यतिरिक्त, लोनावळ्याच्या शाखेप्रामाणे १०० शाखांमध्ये बेथेल कुटुंबे जगभरात विखुरलेली आहेत. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित (इंग्रजी), पृष्ठ ११६, येथे असे म्हणते: “बेथेल हे नाव . . . ईश्वारशासित कार्यहालचालीच्या या केंद्रांसाठी निश्चितच योग्य आहे.” बेथेल स्वयंसेवकांना कोणत्या प्राकारचे कार्य करण्यास नेमले आहे?
७ कार्याची विविधता: बेथेल कुटुंबाच्या सदस्यांना दिलेल्या कामाच्या नेमणुका वेगवेगळ्या आहेत. ब्रुकलिन तसेच भारतासहित इतर अनेक शाखांमध्ये, काही बांधव जागतिक वितरणासाठी पुस्तके, (तसेच, काही शाखांमध्ये बायबल) नियतकालिके, माहितीपत्रके व पत्रिका छापणाऱ्या कारखान्यांच्या छपाई यंत्रांवर काम करतात. इतरजण बायबल आणि पुस्तकांची बांधणी करण्यात भाग घेतात, तर आणखी इतरांच्या कामात या प्राकाशनांना जगभरातील मंडळ्यांमध्ये पाठवणे समाविष्ट आहे. या साधनांची व इमारतींची काळजी घेण्यास काहींना नेमले जाते. बेथेल गृहात, कुटुंबाची काळजी घेण्यामध्ये पुष्कळ कार्य गोवलेले असते. उदाहरणार्थ, ब्रुकलिन बेथेलमध्ये, अदमासे ३,७०० लोकांना १२ जेवणघरांमध्ये २० मिनिटांत न्याहारी दिली जाते. लाँड्रीत, बंधू व बहिणी प्रात्येक आठवडी १६,००० किलो वजनाचे कपडे तसेच १३,००० शर्ट धुतात. याशिवाय, ब्रुकलिनमधील २१ निवास इमारतींमध्ये घरातील व्यवस्था पाहणारे, स्वच्छतेचा उच्च दर्जा राखतात व इतर अनेक महत्त्वपूर्ण कार्ये पार पाडतात. याच सोयी भारतातील बेथेल कुटुंबाच्या २३० सदस्यांना पुरवल्या जातात.
८ योग्यता आणि अपेक्षा: यातील पुष्कळ कार्यासाठी शारीरिक कुवत व शक्ती लागते याचा विचार केल्यास, सध्या चांगल्या प्राकृतीच्या अविवाहित तरुणांची गरज आहे. बेथेल सेवेसाठी अर्ज देण्याकरता, एका तरुण पुरुषाने समर्पण केलेले असले पाहिजे व बाप्तिस्मा घेऊन निदान एक वर्ष तरी पूर्ण झाले असले पाहिजे. तो निष्ठावान, आध्यात्मिक व्यक्ती असला पाहिजे. तसेच, श्रमाचे कार्य करण्यास तो इच्छुक असला पाहिजे. आज जगात, अनेक लोक श्रमाचे कार्य टाळण्याचा विचार करतात. म्हणून, बेथेल सेवेसाठी अर्ज दिलेल्या तरुण पुरुषाने इतपत नवीन व्यक्तिमत्त्व धारण केले पाहिजे की, त्याला श्रमाचे काम करण्याची इच्छा असली पाहिजे, जे चांगले ते आपल्या हातांनी त्याने केले पाहिजे. (पडताळा इफिसकर ४:२८.) याचा अर्थ, त्याचे लक्ष व्यक्तिगत सुखसोयी, करमणूक किंवा मनोरंजन यांचा पिच्छा करण्याकडे नसावे. बेथेल सेवेचा विचार करताना त्याने तारुण्याची अशी लक्षणे आधीच सोडून दिली पाहिजेत. १ करिंथकर १३:११ मधील पौलाचे शब्द योग्यपणे लागू होतात: “मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धि असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.”
९ तुम्ही १९ आणि ३५ वर्षांच्या वयोगटातील आहात काय? शारीरिक आणि भावनात्मकरित्या तुमची प्राकृती चांगली आहे का? तुम्हाला निदान थोडेफार इंग्रजी बोलता येते का? यहोवा व त्याच्या संघटनेबद्दल गाढ प्रीती असलेली आध्यात्मिक व्यक्ती तुम्ही आहात का? बेथेलला तुम्हाला बोलावण्यात आल्यावर, निदान एक वर्षासाठी तरी त्या सेवेत तुम्ही विश्वासूपणे टिकून राहाल का व दिलेले कोणतेही काम कराल का? तुम्ही या प्राश्नांना होय अशी उत्तरे दिल्यास, बेथेल सेवेच्या अद्वितीय विशेषाधिकाराचा विचार करणे तुमच्यासाठी योग्य असेल. याचे आशीर्वाद विपुल आहेत.
१० बेथेल सेवेचे आशीर्वाद: जून १५, १९९४ चे टेहळणी बुरूज मधील “‘देवाच्या घराकडे’ गुणग्राहकतेने पाहणे” या लेखाने असे म्हटले: “संमेलनाला उपस्थित असताना, तुमच्या अवतीभोवती यहोवाचे आनंदी उपासक असल्यामुळे तुम्हाला अधिक समाधानी असल्याचे वाटते का? बेथेल सदस्याला, प्रात्येक दिवशी बांधवांच्या समुदायात यहोवाची सेवा करण्याची सुसंधी असते, याची जरा कल्पना करा! (स्तोत्र २६:१२) ते आध्यात्मिक वाढीसाठी किती उत्कृष्ट भवितव्य प्रादान करते! एका बांधवाने असे म्हटले की, तो बेथेलमध्ये त्याचे व्यक्तिमत्त्व घडविण्यास मदत करणारे इतके काही शिकला जे तो इतर ठिकाणी तीन वर्षांतही शिकला नव्हता. का बरे? कारण इतर कोठेही प्रौढ ख्रिश्चनांच्या व्यक्तिमत्त्वाचा विश्वास ग्रहण करण्यास व त्यांचे अनुकरण करण्यास त्याला संधी मिळाली नाही.” (नीति. १३:२०) खरेच, बेथेल सेवेच्या आशीर्वादांपैकी हा एक अद्वितीय आशीर्वाद आहे.
११ बेथेलमध्ये स्वयंसेवक, शाखा समितीच्या तसेच इतर दीर्घकालीन विश्वासू बांधवांच्या निकट सहवासात असतात. एखाद्याला कोणत्याही कार्याची नेमणूक असली, तरी अशा विश्वासू व निष्ठावान सोबत्यांशी मिळून कार्य करणे हा एक आशीर्वाद आहे. ब्रुकलिन बेथेल कुटुंबाच्या सदस्यांची ही काही विवेचने आहेत ज्यातून सेवेच्या या मौल्यवान विशेषाधिकारात भाग असणाऱ्यांच्या भावना दिसून येतात:
▪ ६२ वर्षे बेथेल सेवा केलेल्या व या वर्षांमध्ये विविध नेमणुकांमध्ये कार्य केलेल्या बांधवाने बेथेलमधील मनोवृत्तीबद्दल असे विवेचन मांडले: “आम्ही सर्व एक कुटुंब आहोत; आम्ही सर्व बंधू आहोत. आम्ही एकत्र काम करतो. आम्हा सर्वांना आमच्या नेमणुका आहेत. बांधव परिश्रमाने काम करत असल्याचे पाहिल्यावर चांगले वाटते; ते करत असलेले श्रम दिसून येतात. आमचे बांधव स्वच्छतेचे काम करतात. परिसर स्वच्छ असतो तेव्हा कुटुंबही निरोगी राहते. कुटुंब निरोगी असते तेव्हा ते फलदायी असते. ते अत्यावश्यक आहे. दफ्तरात लोक असणे महत्त्वपूर्ण आहे. आम्ही सर्वजण मिळून, जगभरात राज्याची साक्ष हे फळ उत्पन्ना करतो. यहोवाची सेवा करण्याचे करियर बनवण्यासाठी जगातील ही सर्वात उत्तम जागा आहे. तुम्हाला पूर्ण-वेळेच्या सेवेत राहायचे असल्यास, तुम्ही ते उत्तम काम अगदी येथे करू शकता. सर्वकाही तुम्हाला उपलब्ध आहे. येथे काही जादा वस्तूंचा आम्ही आनंद लुटतो. खरे म्हणजे, यामुळे तुम्ही संघटनेचे कार्य पाहू शकता कारण पृथ्वीच्या सर्व काना-कोपऱ्यांतून तुम्हाला तिच्याविषयी ऐकायला मिळते.”
▪ ७५ वर्षांचे एक अभिषिक्त बांधव, ज्यांची सुमारे ४८ वर्षांआधी पुस्तक-बांधणी करणे ही कामाची पहिली नेमणूक होती, त्यांनी असे निरीक्षिले: “यहोवाच्या समर्पित, बाप्तिस्मा घेतलेल्या सेवकांसोबत राहणे हा एक सुंदर अनुभव आहे. बेथेलमध्ये कोणी तरुण व्यक्ती आली, तर यहोवाचे आभार मानण्यासाठी माझे हृदय भरून येते कारण येथे बेथेलमध्ये या व्यक्तीचे आनंदी जीवन असणार हे मला ठाऊक असते.” बेथेलच्या आठवणींविषयी ते पुढे म्हणाले: “मला येथील लोक अतिशय आवडतात. ते खूप चांगले आहेत असे मला वाटते. बेथेलमध्ये पुष्कळ वर्षांपासून असणाऱ्या बांधवांच्या बाबतीत अशी काही बाब आहे जी इतर कोणत्याही ठिकाणी मिळणार नाही. ऊबदारपणा, समजूतदारपणा आणि ऐक्य कल्पनेच्या मर्यादेबाहेर पाहावयास मिळते.”
▪ बेथेल सेवेत ६२ पेक्षा अधिक वर्षांपासून असलेल्या बांधवाने आणखी लाभांबद्दल विवेचन मांडले: “बेथेलला आल्याने प्राकाशनाच्या क्षेत्रात खास शिक्षण प्राप्त करण्यास मदत मिळते. . . . आणि याहून अधिक म्हणजे, तुम्हाला जगात कोठेही पाठवले, तरी यहोवा देवाचा योग्य प्रातिनिधी होण्यास सज्ज करण्याचे बायबल शिक्षण मिळते.”
▪ आता ९२ वर्षांचे नियमन मंडळाचे एक सदस्य, बेथेलमध्ये ५८ वर्षांपासून सेवा करत आहेत. त्यांना बेथेल सेवेविषयी काय वाटते? “येथील आणि जगभरातील बेथेल कुटुंब निष्ठावान लोकांची एक अद्भुत व्यवस्था आहे.”
▪ काही महिन्यांआधी, आपल्या नेमणुकीत विश्वासू राहून ९८ व्या वर्षी मरण पावलेल्या नियमन मंडळाच्या सदस्याने असे म्हटले: “मला बेथेलमध्ये सेवा करण्यास खूप आवडते. पृथ्वीवरील हे सर्वात उत्तम ठिकाण आहे.”
▪ बेथेल सेवेबद्दल एका तरुण व्यक्तीचा दृष्टिकोन काय आहे? एका तरुण बांधवाने अलीकडेच असे लिहिले: “‘दिल्याने सर्वात मोठा आनंद प्राप्त होतो,’ असे येशूने म्हटल्यामुळे, मी भेट दिलेल्या सर्व ठिकाणांपैकी बेथेल हे सर्वात आनंदी ठिकाण ठरले आहे.” त्याने बेथेलचा आत्मा आत्मसात केला आहे—देणे.
▪ ५१ वर्षे पूर्ण-वेळ सेवा केलेल्या बांधवाने असे म्हणून चांगल्या पद्धतीने सारांश दिला: “बेथेल सेवा खरोखर अद्वितीय आहे. ही सेवा, येथे पृथ्वीवर यहोवाचा उद्देश पूर्ण करण्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यास्तव, बेथेलमध्ये सेवा करण्याचा विशेषाधिकार असणाऱ्याने त्यास अत्यंत मौल्यवान समजले पाहिजे. खरोखर, ईश्वारी भक्तीचे जीवन पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी बेथेल आपल्याला मदत करते.”
१२ नित्यक्रम: बेथेल कुटुंबाच्या सदस्याचा नित्यक्रम त्याला पूर्णपणे राज्य कार्यहालचालीच्या जीवनक्रमात गुंतवतो. सोमवार ते शनिवार सकाळी ७.०० वाजता प्रातःकालीन उपासना डायनींग हॉलमध्ये सुरू होते. कुटुंबाचे सदस्य दैनिक वचनावर विवेचन देतात आणि त्यानंतर शाखा समितीचे सदस्य किंवा अधिक वर्षे पूर्ण-वेळ सेवा केलेला दुसरा बांधव, सारांश देतो व मग प्रातःकालीन प्रार्थना होते. दिवसाच्या कार्यहालचालीसाठी हा कार्यक्रम कुटुंबाला आध्यात्मिकरित्या बळकट करतो. तो दिवसातील ठळक मुद्दा असल्याचे बेथेल कुटुंबाचे सदस्य तुम्हाला सांगतील. पोटभर न्याहारी केल्यावर, बेथेल कुटुंबाचे सदस्य उत्सुकतेने त्यांच्या कामाच्या विविध नेमणुकांवर जातात. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत कामाचा दिवस सकाळी ८.०० वाजल्यापासून संध्याकाळी ५.१० पर्यंत असतो, व दुपारच्या जेवणासाठी एक तास बाजूला राखलेला असतो. शनिवारी देखील सकाळी ८.०० वाजल्यापासून सकाळी ११.५५ पर्यंत काम नेमून दिलेले असते. संध्याकाळच्या वेळी, शनिवारी दुपारी व रविवारी बेथेल सदस्य आपल्या मंडळीच्या सभांना जातात, घरोघरच्या कार्यात किंवा बायबल अभ्यासाच्या कार्यात भाग घेतात किंवा व्यक्तिगत जबाबदाऱ्या पूर्ण करतात. व्यक्तिगत अभ्यास किंवा सभांची तयारी करण्यासाठी ते बेथेलच्या ग्रंथालयातील सोयींचा उपयोग करू शकतात. आणि हो, आवश्यक आराम व विरंगुळ्यासाठी वेळ असतो. (मार्क ६:३१, ३४) या संक्षिप्त वर्णनावरून, बेथेल सेवा एखाद्या व्यक्तीला दररोज आपला अधिकांश वेळ या जुन्या व्यवस्थीकरणाच्या विकर्षणांपासून मुक्त असलेल्या पवित्र सेवेसाठी अर्पण करण्यास देते हे स्पष्टपणे दिसून येऊ शकते.
१३ मंडळीच्या कार्यहालचाली: न्यूयॉर्क शहरातील भागात ब्रुकलिन बेथेल कुटुंबांचे सदस्य ३५० पेक्षा अधिक मंडळ्यांत नेमण्यात आले आहेत त्याचप्रामाणे लोनावळ्यातील बेथेल कुटुंबाचे सदस्य तीन मंडळ्यांत नेमले गेले आहेत. त्यांची आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यास ते स्थानिक मंडळीच्या भूमिकेचे मूल्य जाणतात. अशा प्राकारे, त्यांच्या मंडळीसोबत पाच सभांना उपस्थित राहण्यात व त्यांच्या बांधवांसोबत क्षेत्र सेवेत नियमितपणे भाग घेण्यासाठी ते क्रियाशील आहेत. मंडळीच्या सभांव्यतिरिक्त, सोमवार संध्याकाळी बेथेल कुटुंबाचा आपला टेहळणी बुरूज अभ्यास असतो; सर्वांच्या लाभास्तव बेथेल सदस्यांना आळीपाळीने विवेचने देण्यास नेमणूक दिली जाते. बेथेलचा आराखडा आध्यात्मिक गोष्टींवर भर देत असल्यामुळे, ते यहोवाला आनंदी, हर्षदायक सेवेचे जीवन देण्यात परिणीत होते.—१ करिंथ. १५:५८.
१४ बेथेल सेवेसाठी तयारी: बेथेल सेवेसाठी तयारी करण्यास काय केले जाऊ शकते असे तरुणजन नेहमी विचारतात. सभासद समितीमध्ये सेवा करणाऱ्या नियमन मंडळाच्या एका सदस्याने असे म्हटले: “तुम्ही बेथेलला येता तेव्हा सेवा करवून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी या. तुम्ही सेवा करण्याचे जितके शिकाल तितकाच तुमचा आनंद वाढेल. घेण्यास नव्हे तर देण्यास शिका. सभ्य, नम्र असा. आत्म्याची फळे जेथे आहेत—तेथेच खरा ख्रिस्ती विश्वास आहे.” होय, तुमची आध्यात्मिकता व यहोवाबरोबर निकटचा नातेसंबंध विकसित करणे या गोष्टी बेथेलमध्ये यशस्वी होण्याच्या गुरूकिल्ल्या आहेत. यास्तव, बेथेलसाठी नवीन स्वयंसेवकांची निवड केली जाते त्यावेळी बहुधा पायनियरांची निवड केली जाते. एका व्यक्तीने प्राचार करणे आणि शिकवणे व इतरांना देणे यात प्रात्येक महिन्याला ९० तास खर्च करण्याची तसेच स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक काम योजण्याची तालीम काही काळासाठी स्वतःला दिलेली असते तेव्हा बेथेल सेवेकरता आणि तिच्या जीवनाच्या सुव्यवस्थित मार्गाकरता तिने चांगला आध्यात्मिक पाया घातलेला असतो. तथापि, बेथेल सेवा, पायनियरींग करणाऱ्यांपुरतीच मर्यादित नाही याची कृपया नोंद घ्या. मूलभूत आवश्यकता पूर्ण करणारे कोणीही अर्ज करू शकतात.
१५ शिवाय, आपल्या हातांनी काम कसे करावे हे तरुण पुरुषांकरता शिकणे चांगले असते. या जुन्या व्यवस्थीकरणात श्रम करणे आवडीचे समजले जात नाही. स्वतःविषयी प्रोम असल्यामुळे, अनेक लोकांना कमी परिश्रमाचे किंवा प्रातिष्ठेचे बाह्य स्वरूप प्राकट करणारे काम करण्याची इच्छा असते. तरीही, विविध अवजारे व साधने कशी वापरावीत याचे ज्ञान व्यावहारिक व उपयोगी ठरू शकते. (नीति. २२:२९) तरुण पुरुष बहुधा, आपल्या पालकांकडून किंवा राज्य सभागृहातील विविध प्राकारचे काम करणाऱ्या अनुभवी, प्रौढ लोकांना मदत करून किंवा वयस्कर लोकांना त्यांच्या घरातील काही आवश्यक दुरुस्ती करण्यात मदत करून श्रम करण्याचे शिकू शकतात.
१६ काहीवेळा तरुण मुले विचारतात: “बेथेल सेवेला पात्र ठरण्यासाठी मला जादा ऐहिक प्राशिक्षण प्राप्त करण्याची जरूरी आहे का?” केवळ ऐहिक प्राशिक्षण घेतल्याने एखादी व्यक्ती बेथेल सेवेकरता पात्र ठरत नाही. आध्यात्मिक गुण सर्वात महत्त्वपूर्ण आहेत आणि आमंत्रित केलेल्या सर्वांकडून त्यांची अपेक्षा केली जाते. आम्ही पालकांना तसेच शाळकरी मुलांना फेब्रुवारी १, १९९३ चे टेहळणी बुरूज पृष्ठ ८ ते ११ मध्ये सादर केलेल्या प्रापंचिक शिक्षणाबद्दल समतोल दृष्टिकोनाचा काळजीपूर्वक विचार करण्यास उत्तेजन देतो. प्रापंचिक शिक्षण घेण्याचा निर्णय एक व्यक्तिगत बाब आहे. एखाद्या व्यक्तीने कोणताही निर्णय घेतला, तरी सत्याची साक्ष देण्याच्या यहोवाच्या लोकांच्या प्रामुख कार्यावर लक्ष केंद्रित ठेवून आपली आध्यात्मिक प्रागती टिकवली जाऊ शकते याची तिने खात्री केली पाहिजे.
१७ एखाद्याला कोणतेही ऐहिक प्राशिक्षण मिळत असले, तरी कसा विचार करावा हे शिकणे अतिशय मौल्यवान आहे. बायबल, विचारशक्ती व व्यावहारिक बुद्धीची शिफारस करते. (नीति. १:४; ३:२१) कसा विचार करावा व कशी माहिती ठेवावी हे शिकल्याने, तुमच्याकरता व यहोवाच्या जागतिक संघटनेकरता उपयुक्त ठरेल असे ज्ञान व कौशल्य प्राप्त करण्यास ते तुमची मदत करील. शेवटी, एखाद्याजवळ कोणत्याही कुशलता असल्या, तरी इतरांसोबत चांगले जमवून घेणे ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. बेथेल स्वयंसेवकांनी काम पूर्ण करण्यासाठी संघ या नात्याने खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. अशा प्राकारे, स्वतंत्र किंवा स्पर्धात्मक आत्म्याच्या ऐवजी, सहयोगी आणि प्रोमळ मनोवृत्ती व ईश्वारशासित मार्गदर्शनाच्या अधीन होण्याची स्वेच्छा असली पाहिजे.—पडताळा इफिसकर ४:१६.
१८ यहोवाच्या संघटनेतील तरुण लोकांना, वर उल्लेखिलेल्या क्षमता विकसित करण्यास प्रायत्न करण्याची सुंदर संधी आहे. मग, बेथेलमध्ये सेवा करण्यास आमंत्रित केल्यावर पुढील जबाबदाऱ्यांसाठी यहोवाच्या संघटनेद्वारे शिक्षण प्राप्त करण्यास ते चांगल्या स्थितीत असतील. आम्ही तुम्हा ख्रिस्ती पालकांना व वडिलांना हा विषय तरुणांसमोर सतत ठेवण्याचे आर्जवतो. पुष्कळ पालक आपल्या मुलांना बेथेलला भेट देण्यास नियमितपणे घेऊन येतात व यामुळे येथे काय चालते त्याचा परिचय त्यांना होतो. यामुळे अनेकजण आपले शिक्षण पूर्ण केल्यावर बेथेलला आले आहेत.
१९ अनुभवी जण: काहीवेळा ३५ पेक्षा अधिक वय असलेल्या व बेथेलला गरज असेल ते प्राशिक्षण आणि कौशल्य असणाऱ्या एखाद्या बंधूला किंवा बहिणीला येण्याचा वाव मिळतो. संस्था सध्या करत असलेल्या पुष्कळशा कामासाठी अनुभवी जणांची गरज आहे जे प्राशिक्षण दिले जाऊ शकेल अशा दणकट, कार्यक्षम तरुण पुरुषांसोबत सेवा करतील, जणू ‘गुरुसोबत शिष्य.’—१ इति. २५:८.
२० आजकालच्या अधिकांश कार्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सची पार्श्वाभूमी किंवा कम्प्यूटर प्रोग्रामींगचा अनुभव असलेल्या लोकांची गरज आहे. संस्थेकडे अक्षरशः पुष्कळ फोटोकॉपी यंत्रे, लेसर प्रिंटर व पर्सनल कम्प्यूटर आहेत व या सर्वांची काळजी घ्यावी लागते. अभियांत्रिकी, प्लंबिंग, विद्युतविषयक व वातानुकूलन अशा बांधकामाच्या उद्योगात कुशल असलेले उपयुक्त ठरू शकतात. जमाखर्चाविषयी खास माहिती असलेले, विशेषतः प्रामाणित लेखापाल असलेले प्रौढ बांधव मदतदायक असतील. खर्च कमी करण्यासाठी, संस्थेकडे वाहतूक आणि साहित्य पोहंचवण्यात पाठबळ देणाऱ्या स्वतःच्या गाड्या आहेत. यास्तव, अनुभवी चालक व यांत्रिकांची गरज आहे.
२१ समर्पित सडे बांधव आणि विशेष कौशल्य असणारे बांधव ज्यांच्यापैकी काहीजण विवाहित असतील यांची आम्हाला अतिशय गरज आहे. प्रांतीय अधिवेशनात बेथेल सेवेकरता आस्था असलेल्यांकरता घेण्यात येणाऱ्या खास सभेमध्ये तुम्ही बेथेल अर्ज मिळवू शकता किंवा तुम्ही वॉच टावर सोसायटी, पोस्ट बॅग १०, लोनावळा, महा. ४१० ४०१ या पत्त्यावर पत्र लिहू शकता. तुम्ही विवाहित असल्यास, तुमचा सोबती देखील आध्यात्मिकरित्या, भावनात्मकरित्या व शारीरिकरित्या बेथेल सेवेकरता पात्र असला पाहिजे हे लक्षात ठेवा. आधी उल्लेखिलेल्या कोणत्याही एका क्षेत्रात तुम्ही प्राशिक्षित आणि अनुभवी असाल, तर कृपया माहिती देणारा एक सारांश लिहा आणि तो तुमच्या बेथेल अर्जासोबत जोडा.
२२ तुम्ही निकडीच्या बोलावण्याला प्रातिसाद देऊ शकाल का? बेथेल स्वयंसेवकांची एक निकडीची गरज आहे. तुम्ही बेथेल सेवेच्या अपेक्षा पूर्ण करत असल्यास, या निकडीच्या बोलावण्याला प्रातिसाद देऊन तुम्ही बेथेल अर्ज करावा असे तुम्हाला खासपणे आर्जवले जाते. तुम्हाला लागलीच बोलवण्यात आले नाही, तर निरुत्साहित होऊ नका. तुम्ही एक वर्षाने पुन्हा अर्ज करू शकता. यामुळे तुमच्या उपलब्धतेची आम्हाला अलीकडील माहिती मिळते.
२३ यशया संदेष्टा ऐकत असताना यहोवाने विचारले: “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” कुचराई न करता यशयाने प्रातिसाद दिला: “हा मी आहे! मला पाठीव.” अशा प्राकारे, यशयाने देवाचा संदेष्टा या नात्याने एका उल्लेखनीय करियरची सुरवात केली. “हा मी आहे! मला पाठीव” असे तुम्ही म्हणू शकता का? “देवाचे घर,” बेथेल येथे सेवा करण्यास तुम्हाला बोलावले गेल्यास तुमच्याकरता अनेक आशीर्वाद आहेत.—यश. ६:८.