बायबलच्या मूल्याची गुणग्राहकता बाळगण्यास इतरांची मदत करा
१ येशूने आपल्या शिष्यांना जे आवश्यक ते पुरवले. लूक २४:४५ असा अहवाल देते: “त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले.” त्यांना त्याच्या पित्याची स्वीकृती हवी असल्यास, देवाचे वचन, बायबल याचा अभ्यास करणे व त्याची समज मिळवणे अत्यावश्यक असल्याचे त्याला माहीत होते. (स्तोत्र १:१, २) आपल्या प्राचार कार्याचा देखील तोच हेतू आहे. आपले ध्येय बायबल अभ्यास सुरू करण्याचे आहे, जेथे आपण ‘लोकांना येशूने आज्ञापिलेले सर्वकाही पाळावयास शिकवू शकतो.’ (मत्तय २८:२०) हे लक्षात ठेवून, पुनर्भेटी करताना काय उपयुक्त ठरू शकते याविषयी पुढे काही सूचना दिल्या आहेत.
२ तुम्ही सुरवातीला “बायबल—देवाचे वचन की मानवाचे?” (इंग्रजी) या पुस्तकावर चर्चा केली असल्यास, तुमची चर्चा अशा प्राकारे पुढे चालू ठेवू शकता:
▪ “तुम्हाला बायबलच्या सल्ल्याचे व्यावहारिक मूल्य स्पष्ट करणारे असे आणखी काही दाखवण्यास मला आवडेल. अनेक लोकांचे इतरांशी पटत नाही. आपल्या सभोवतालच्या लोकांसोबत चांगला नातेसंबंध विकसित करण्यासाठी आपण काय करू शकतो? [प्रातिसाद दिल्यावर, १६७-८ पृष्ठे, परिच्छेद १५ काढा, व मत्तय ७:१२ वाचा. परिच्छेद १६ मध्ये व्यक्त केलेले विचारही यात जोडा.] बायबल सल्ल्यामध्ये आढळणाऱ्या सुज्ञतेचे हे आणखी एक उदाहरण आहे. पुढील वेळी मी भेट देईन तेव्हा, विवाहित जोडप्यांना आपल्या नातेसंबंधात अधिक आनंद प्राप्त करण्यास मदत करणारा बायबलमधील सल्ला तुम्हाला दाखवण्यास मला आवडेल.” पृष्ठे १७०-२ आनंदी कौटुंबिक जीवनाकरता बायबल कशाची शिफारस करते हे, वर सांगितले आहे त्याची चर्चा करण्यासाठी परतण्याची योजना करा.
३ बायबलमध्ये आस्था दाखवलेल्या व्यक्तीशी तुम्ही बोलला असल्यास, हा प्रास्ताव कदाचित अभ्यास सुरू करण्यात प्राभावकारी ठरू शकतो:
▪ “वास्तविकतेत, तुम्ही ज्यांच्याशी बोलता ते सर्वजण तुम्हाला सांगतील की, त्यांना शांतीमय व सुरक्षित जगात राहावयास आवडेल. प्रात्येकाला तेच हवे असल्यास, एवढी दंगल व हिंसा यांनी ग्रस्त असलेले जग का आहे? [प्रातिसादासाठी वाव द्या.] त्या प्राश्नाचे उत्तर बायबलमध्ये कोठे मिळेल हे नवीन जग भाषांतर (इंग्रजी) तुम्हाला दाखवते.” पृष्ठ १६५९ काढा व “चर्चेसाठी बायबलचे विषय” क्र. ४३अ, “जगातील दंगलींसाठी कोण जबाबदार आहे” हे दाखवा. २ करिंथकर ४:४ वाचा. देव दियाबलाचा नाश कसा करील व एक चिरस्थायी शांती आणि आनंदाचे जग कसे स्थापिल हे समजावून सांगा. प्राकटीकरण २१:३, ४ वाचा. मग तुम्ही असे म्हणू शकता: “पुढील वेळी मी तुम्हाला भेट देईन तेव्हा, दुःख नसलेल्या जगाची वाट तुम्ही का पाहू शकता याचे स्पष्टीकरण देणारी शास्त्रवचने तुम्हाला दाखवण्यास मला आवडेल.”
४ घरमालकाने १९२ पृष्ठांचे एखादे जुने पुस्तक स्वीकारले असल्यास, तुम्ही पुन्हा भेट द्याल तेव्हा कदाचित असे म्हणू शकता:
▪ “आपण आधी बोललो होतो तेव्हा, बायबलचा अभ्यास करणे लाभदायक का आहे याच्या काही कारणांची चर्चा आपण केली होती. तो अभ्यास अधिक करण्याच्या प्रामाणिक प्रायत्नामुळे, देवाने आपल्यासाठी जे राखून ठेवले आहे त्याविषयी गुणग्राहकता बाळगण्यास आपल्याला मदत मिळू शकते. [योहान १७:३ वाचा.] देवाने अभिवचन दिलेल्या गोष्टीविषयी व आपण त्याला संतुष्ट कसे करू शकतो याबद्दल अधिक शिकण्यास आम्ही एक अभ्यास कार्यक्रम योजला आहे ज्यामुळे हजारोंना मदत मिळाली आहे.” घरमालकाने घेतलेल्या प्राकाशनातील अध्यायांच्या शीर्षकांची उजळणी करा आणि आपण बायबल अभ्यास कसा चालवतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
५ देव वचनाच्या श्रेष्ठ मूल्याची कदर बाळगण्यास तुम्ही प्रामाणिक व्यक्तींना मदत करू शकत असल्यास, तुम्ही शक्य त्या सर्वोत्तम मार्गाने त्यांना मदत केली आहे. त्याचा अभ्यास केल्यामुळे ते जी सुज्ञता शिकू शकतात ती “जीवनवृक्षरूप” असू शकते व यामुळे त्यांना आणखी आनंद मिळेल.—नीति. ३:१८.