समयोचित राज्य वार्ता हिचे जगभर वितरण करावयाचे आहे
१ रविवार, एप्रिल २३ रोजी, “खोट्या धर्माचा शेवट जवळ आहे” या मनोवेधक विषयावर एक खास जाहीर भाषण देण्यात येईल. त्या दिवसाच्या समाप्तीस, चार पृष्ठांची व विचारास प्रावृत्त करणारी राज्य वार्ता प्राकाशित करण्यात येईल. त्यामधील समयोचित संदेश, एप्रिल २४ ते मे १४ पर्यंतच्या तीन आठवड्यांच्या कालावधीत जगभरात वितरीत करण्यात येणार आहे.
२ जगाच्या सर्व भागात, लोक गोंधळात पडलेले आहेत. कोठेही राहत असले, तरी ते समस्यांनी ग्रस्त आहेत. जे घडत आहे त्याबद्दल प्रामाणिकपणे चिंता करणाऱ्या लोकांसाठी राज्य वार्ता वास्तविकरित्या आस्थेची असेल, कारण मनुष्याच्या अचूक मार्गदर्शनाचा उगम म्हणून ते त्यांना देवाच्या वचनाकडे निर्देशित करील. (स्तोत्र ११९:१०५) एप्रिल २३ रोजी राज्य वार्ता प्राकाशित करण्यात येईल त्यावेळी आपण सर्वजण तिची एक प्रात मिळवण्याची वाट पाहू या. त्या दरम्यान, या जोरदार तीन आठवड्यांच्या मोहिमेच्या तयारीसाठी पुष्कळ काही करावयाचे आहे.
३ सर्वांना आवेशी सहभाग घेण्यासाठी उत्तेजन द्या: त्या कार्यात कोण सहभाग घेऊ शकतात? निश्चितच, जे अगोदरच प्राचारक आहेत ते सर्वजण तसे करण्यासाठी उत्सुक असतील! नियमितरित्या मंडळीच्या सभांना उपस्थित राहणाऱ्या बायबल विद्यार्थ्यांबद्दल काय? काहीजण बऱ्याच काळापासून आपल्या सहवासात राहिले आहेत आणि स्थिरतेने प्रागती करीत आहेत. ते आपले जीवन शास्त्रवचनीय तत्त्वांच्या एकवाक्यतेत जगत असतील, तर राज्याचे उद्घोषक म्हणून गणले जाण्यास ते पात्र आहेत का? बायबल अभ्यास चालवणारा प्राचारक, विद्यार्थ्यासोबत या बाबीची चर्चा करू शकतो आणि तो विद्यार्थी क्षेत्र सेवेत सहभाग घेण्यास इच्छित असल्यास, दोन वडील ऑरगनाइझ्ड टू अकंप्लिश आवर मिनिस्ट्री या पुस्तकातील पृष्ठे ९८ व ९९ वरील साहित्याची उजळणी त्याच्यासोबत करतील. हे लवकरात लवकर करण्यात यावे जेणेकरून बाप्तिस्मा न घेतलेले प्राचारक या नात्याने जे पात्र ठरतील ते या मोहिमेत पूर्ण सहभाग घेऊ शकतात. बाप्तिस्मा न घेतलेले प्राचारक गणले जाण्यास बायबल विद्यार्थी अद्याप पात्र नसले तरीही त्यांना परिचित व्यक्तींसोबत किंवा कौटुंबिक सदस्यांसोबत समयोचित राज्य वार्ता हिची सहभागिता करण्यास उत्तेजन दिले जाऊ शकते.—टेहळणी बुरुज नोव्हेंबर १५, १९८८, पृष्ठ १७, परिच्छेद ८ देखील पाहा.
४ हे कार्य काही कठीण नाही; त्यात सर्वजण सहभाग घेऊ शकतात. साप्ताहिक कौटुंबिक बायबल अभ्यासाचा भाग या नात्याने पालक, राज्य वार्ता हिचा उपयोग करून सरावसत्रही घेऊ शकतात जेणेकरून ती घरोघरी सादर करण्यास कुटुंबाचे सर्व सदस्य चांगल्या तयारीत असतील. बहुतेकवेळा सोपी सादरता उत्तम असते. संक्षिप्त प्रास्तावना दिल्यावर, घरमालकाला राज्य वार्ता सादर करा आणि ती वाचून काढण्यास त्याला उत्तेजन द्या. घरमालक आस्था प्रादर्शित करतात तेव्हा, त्याची नोंद करा जेणेकरून तुम्ही आस्था विकसित करण्यास पुन्हा जाऊ शकता. (१ करिंथ. ३:६, ७) यशाची गुरुकिल्ली म्हणजे, एक सोपी, चांगल्यारीतीने तयार केलेली सादरता असणे होय.
५ एप्रिल आणि मे दरम्यान “अधिकाधिक” करण्याजोगे असेल. आमची राज्य सेवा हिच्या पुढच्या महिन्याच्या अंकात, ‘प्राभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक करण्यास आहे,’ असे शीर्षक असलेली पुरवणी अधिक माहिती देईल.—१ करिंथ. १५:५८.