तुम्हाला आढळलेल्या आस्थेचा मागोवा घ्या
१ घरोघरी कार्य करताना, एखाद्या आस्थेवाईक व्यक्तीसोबत आपण घालवतो ती वेळ बहुधा मर्यादित असते. बहुतेकवेळा, आपण पुनर्भेटी देतो आणि बायबल अभ्यास चालवतो तेव्हाच खरोखरचे शिकवण्याचे कार्य केले जाते. (मत्त. २८:१९, २०) पुनर्भेट देत असताना, प्रथम भेटीत आपण ज्याची चर्चा केली त्याची उजळणी करण्याची गरज असते आणि त्यानंतर पुढील चर्चेसाठी तयारी करावयाची असते.
२ तुम्ही कौटुंबिक व्यवस्थेच्या अस्थिरतेविषयी बोलला असाल, तर “अनंतकाल जगू शकाल” पुस्तकातील २९ साव्या अध्यायामधील साहित्य कदाचित वापरू शकता. तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “आनंदी कौटुंबिक जीवन असण्यासाठी बायबलच्या सल्ल्याचे अनुकरण करण्याच्या सुज्ञतेविषयी आपण सुरवातीला बोललो होतो. आज, कुटुंबांना एकत्र आणण्याची गुरुकिल्ली काय आहे असे तुम्हाला वाटते?” प्रतिसादासाठी वाव द्या. पृष्ठ २४७ वरील परिच्छेद २७ चा संदर्भ द्या आणि कलस्सैकर ३:१२-१४ वाचा. खरे प्रेम कुटुंबांना एकत्र कसे ठेवू शकते हे दाखवण्यासाठी आणखी विवेचने द्या. अनंतकाल जगू शकाल पुस्तकाच्या पद्धतशीर अभ्यासाने समस्या सोडवण्यासाठी कशी मदत होऊ शकते याचे स्पष्टीकरण द्या.
३ तुमच्या प्रथम भेटीत खालावत चाललेल्या जागतिक परिस्थितींबद्दल तुम्ही बोलला असाल, तर कदाचित असे म्हणून ती चर्चा कायम ठेवू शकता:
▪ “आपण भवितव्यात कधी शांतीत जगणार असलो, तर त्यासाठी मोठे बदल होण्याची गरज आहे याच्याशी तुम्ही सहमत असाल याची मला खात्री आहे. बायबल दाखवते की, आपल्या समस्यांचे सर्वात मुख्य कारण सैतान आहे. देवाने त्याला इतक्या काळापर्यंत जगण्यासाठी का दिले याबद्दल पुष्कळ लोक बुचकळ्यात पडले आहेत. तुम्हाला काय वाटते?” प्रतिसादासाठी वाव द्या. अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील पृष्ठ २० परिच्छेद १४ आणि १५ काढा आणि सैतानाचा अद्याप नाश का झाला नाही ते समजावून सांगा. त्यानंतर, रोमकर १६:२० वाचा. आपण निकट भवितव्यात कशाची अपेक्षा करू शकतो हे ते दाखवते.
४ राज्य सत्तेमध्ये साध्य होणाऱ्या आशीर्वादांबद्दल तुम्ही आधी बोलला असल्यास, तुमच्या पुनर्भेटीत असे म्हणू शकता:
▪ “देवाचे राज्य पृथ्वीवर आणि मानवजातीवर उदात्त आशीर्वाद आणील. १२ आणि १३ पृष्ठांवर या आशीर्वादांचे चांगले चित्र दिले आहे. तुम्हाला अपीलकारक वाटणारी कोणती गोष्ट दिसते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] अशा जगात जगणे हे कसे असेल याची कल्पना करा.” परिच्छेद १२ वाचा. आस्था असल्यास, परिच्छेद १३ वरील प्रश्न विचारा आणि उत्तराची चर्चा करा. हा अध्याय राज्य आशीर्वादांबद्दलच्या अधिक प्रश्नांची उत्तरे देतो आणि तुमच्या पुढील भेटीत याची चर्चा करण्यास तुम्हाला आनंद वाटेल हे सांगा.
५ तुम्ही असे म्हणून अभ्यास सुरु करू शकाल:
▪ “या पुस्तकाच्या उपयोगाने पुष्कळ लोकांना त्यांच्या बायबलच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.” अनुक्रमणिका काढा आणि विचारा: “येथील कोणता विषय तुम्हाला सर्वात आस्थेचा वाटतो?” प्रतिसादासाठी वाव द्या, त्यांची आस्था उत्पन्न करणारा अध्याय काढा आणि पहिला परिच्छेद वाचा. प्रत्येक पृष्ठाच्या तळाशी दिलेले प्रश्न प्रत्येक परिच्छेदातील मुख्य मुद्यांना ठळकपणे कसे दाखवतात हे समजावून सांगा. आणखी एक किंवा दोन परिच्छेदांची चर्चा करून स्पष्टीकरण द्या आणि त्यानंतर पुन्हा भेट देण्याची योजना करा.
६ अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील आस्थेचा मागोवा घेतल्याने आपली सेवा पूर्ण करण्याची इच्छा प्रदर्शित होते. (२ तीम. ४:५) आपण आपले ऐकणाऱ्यांना सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मदत करू शकतो.—योहा. १७:३.