पुष्कळ दिले आहे—पुष्कळ मागण्यात येते
१ सत्य आपल्याजवळ आहे त्यामुळे आपण किती कृपा लाभलेले लोक आहोत! यहोवाला आपले समर्पण केल्यामुळे, ‘सुवार्ता आपल्यावर सोपविण्यात आली आहे.’ (१ थेस्सलनी. २:४) ही गोष्ट आपल्यावर मोठी जबाबदारी आणते. येशूने म्हटले: “ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल.”—लूक १२:४८ब.
२ ते शब्द किती सत्य आहेत! देवाच्या वचनाचे ज्ञान, बांधवांचा सुंदर सहवास आणि एक अद्भुत आशा या गोष्टींनी आपल्याला आशीर्वादित केल्यामुळे आपल्याला पुष्कळ दिले गेले आहे असे खरेपणाने म्हटले जाऊ शकते. रास्तपणे, या बदल्यात पुष्कळ अपेक्षिले जाते.
३ गरजांबद्दल योग्य दृष्टिकोन राखा: काहींनी असा निष्कर्ष काढला आहे की, आपल्याकडून पुष्कळ अपेक्षिले जाते. ख्रिस्ती मंडळीचा मस्तक या नात्याने, ती सुरळीत चालावी यासाठी ‘जे काही आवश्यक आहे’ ते येशू ख्रिस्त ठरवतो. (इफिस. ४:१५, १६) ‘त्याचे जूं सोयीचे व त्याचे ओझे हलके आहे’ याची शाश्वाती तो आपल्याला देतो. (मत्त. ११:२८-३०) ज्यांना काही मर्यादा आहेत अशांचा तो प्रोमळपणे विचार करतो. (लूक २१:१-४) प्रामाणाची गय न करता आपले उत्तम ते दिले, तर आपण आशीर्वादित होऊ.—कलस्सै. ३:२३, २४.
४ स्वतःला विचारा, ‘माझ्या जीवनात राज्य आस्था प्राथम स्थानी आहेत का? मी माझा वेळ आणि माझी मालमत्ता यांचा उपयोग देवाच्या नावाची स्तुती होईल आणि इतरांना लाभ मिळेल अशाप्राकारे करतो का? भौतिक गोष्टींचा स्वार्थीपणाने आनंद घेण्याऐवजी यहोवाची सेवा केल्याने मला अधिक समाधान प्राप्त होते असे मला वाटते का?’ या प्राश्नांची प्रामाणिक उत्तरे आपल्या अंतःकरणातील हेतूंना प्राकट करतात.—लूक ६:४५.
५ वाईट करण्याच्या मोहात पडण्याचे टाळा: स्वहित, लोभ आणि विषयासक्त उपभोगाबद्दल प्रोम अशा गोष्टींबद्दल आधी कधीही नव्हता इतका मोह आणि दबाव आहे. दररोज आपल्यासमोर नैतिक आव्हान आणि हातमिळवणी करण्याचे मोह सामोरे येतात. या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आपण यहोवाकडे आपल्याला मदत करण्यासाठी विचारणा केली पाहिजे. (मत्त. २६:४१) त्याच्या आत्म्याद्वारे तो आपल्याला दृढ करू शकतो. (यश. ४०:२९) देवाचे वचन दररोज वाचणे हे फार मदतदायक आहे. (स्तोत्र १:२, ३) आत्मशिस्त आणि आत्मसंयमन यांची देखील प्रामुख भूमिका आहे.—१ करिंथ. ९:२७.
६ चांगल्या गोष्टींबद्दल केवळ प्रोम बाळगणे पुरेसे नाही—परंतु आपण वाईटाचाही द्वेष केला पाहिजे. (स्तोत्र ९७:१०) याचा अर्थ, वाईट गोष्टींची अभिलाषा विकसित न करणे. यहोवा ज्या सात गोष्टींचा द्वेष करतो त्यांची यादी नीतीसूत्रे ६:१६-१९ मध्ये दिली आहे. स्वाभाविकपणे, यहोवाला संतुष्ट करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीने अशा गोष्टींचा द्वेषही केला पाहिजे. सत्याच्या अचूक ज्ञानाने आशीर्वादित झाल्यामुळे, आपण त्या ज्ञानाच्या एकवाक्यतेत कार्य केले पाहिजे व चांगल्या गोष्टींवर आपली मने केंद्रित केली पाहिजेत.
७ “प्राभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर” असण्यास अनुकूल परिस्थितींसाठी प्रार्थना करणे योग्य आहे. (१ करिंथ. १५:५८) पुष्कळांना असे आढळले आहे की, यहोवाच्या सेवेत व्यग्र आराखडा असणे हे एक संरक्षण आहे कारण त्यामुळे अनुचित गोष्टींचा पाठलाग करण्याकरता अल्प वेळ मिळतो.
८ सर्व गोष्टींचा विचार केल्यावर, यहोवा आपल्याकडून जे अपेक्षितो ते अगदीच योग्य आहे. (मीखा ६:८) सेवेच्या हरएक विशेषाधिकाराबद्दल कृतज्ञ असण्यासाठी आपल्याजवळ प्रात्येक कारण आहे. (इफिस. ५:२०) यास्तव, आपल्याकडून अपेक्षिले जाते त्यापेक्षा आपले बक्षीस असीम आहे असा आत्मविश्वास बाळगून आपण ‘श्रम व खटपट करीत राहतो.’—१ तीम. ४:१०.