१९९५ “आनंदी स्तुतीकर्ते” यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन
१ मागील वर्षी, भारतामध्ये “ईश्वारी भय” प्रांतीय अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्या २३,३६३ लोकांपैकी एक असणे किती आनंददायक होते! एकूण ८३० जणांनी बाप्तिस्मा घेण्याकरवी योग्य ईश्वारी भय व्यक्त केले. या वर्षी, “आनंदी स्तुतीकर्ते” या १९९५ च्या तीन दिवसीय प्रांतीय अधिवेशनांकरता एकत्रित होणे किती उत्तेजनदायक असेल! या जिज्ञासा उत्पन्ना करणाऱ्या शीर्षकाने आपल्या सर्व बायबल विद्यार्थ्यांबरोबर उपस्थित राहण्यास सर्वतोपरी प्रायत्न करण्यासाठी आपल्याला खरेपणाने प्रावृत्त केले पाहिजे. आपण या शेवटल्या काळी विश्वासूपणे यहोवाची सेवा करत असताना हा कार्यक्रम आपल्या सर्वांना आध्यात्मिक तजेला देण्याचा खरा उगम ठरेल.
२ खात्रीने आधीच अधिवेशनाची व्यवस्था करा जेणेकरून तुम्ही तीनही दिवसांच्या सुखदायक आध्यात्मिक कार्यक्रमाचा सुरवातीच्या गीतापासून समाप्तीच्या प्रार्थनेपर्यंत आनंद लुटण्यास तेथे असू शकाल. मदत हवी असणाऱ्यांचा, खासकरून नवीन आस्थेवाईक जणांचा तुमच्या योजनांमध्ये दयाळुपणाने समावेश करा जेणेकरून ते देखील प्रात्येक कार्यक्रमास उपस्थित राहू शकतील. उपस्थित राहण्याची योजना करणाऱ्या कोणत्याही बायबल विद्यार्थ्यांसोबत या पुरवणीतील माहितीचा विचार करणे मदतदायक ठरेल. (गलती. ६:६, १०) शुक्रवारी सकाळी ९.४० वाजता संगीताने कार्यक्रम सुरू होतो आणि अदमासे संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होतो. शनिवारचा कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता सुरू होतो व गीत व प्रार्थनेसह अदमासे संध्याकाळी ४.५० वाजता समाप्त होतो. रविवार सकाळची सभा ९.३० वाजता सुरू होते व त्या दिवसाचा कार्यक्रम अदमासे दुपारी ३.५० वाजता समाप्त होतो.
३ मंडळीच्या सभा, विभागीय संमेलने, खास संमेलन दिवस किंवा प्रांतीय अधिवेशने अशा कोणत्याही आध्यात्मिक मेजवान्यांना उपस्थित असणे किती रोमांचक आहे! का बरे? देव-भिरू व्यक्तींबरोबरचा सहवास उत्साहवर्धक असतो आणि अशा प्रासंगी सादर केलेल्या आध्यात्मिक गोष्टी आपल्याला अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींची आठवण करून देतात.
४ अलीकडील वर्षात, अशा आध्यात्मिक मेळाव्यांकडे हजारोंनी लोक आकर्षित झाले आहेत. सन १९८५ व १९९४ या वर्षांदरम्यान, जगभरातील मंडळ्यांच्या संख्येमध्ये ४९,७१६ पासून ७५,५७३ पर्यंत म्हणजेच, ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. यहोवा एकत्रीकरणाचे कार्य वाढवतो तसे, प्रांतीय अधिवेशनांची व विभागीय संमेलनांची संख्याही वाढते. (यश. ६०:२२) भारतात, प्रांतीय अधिवेशनांची उपस्थिती १९८५ मध्ये ११,२४३ पासून १९९४ मध्ये २३,३६३ एवढी वाढली—दहा वर्षात १०८ टक्क्यांची वाढ! संघटनेतील प्राचंड वाढ यावरून दिसते. ही अधिवेशने आयोजित करण्यात व त्यांची पाहणी करण्यात गोवलेले परिणामी कार्य वाढतच आहे. या मेजवान्यांसाठी तयार करण्यात आलेल्या आध्यात्मिक कार्यक्रमातून लाभ मिळवण्यास आपण एकत्र आल्यामुळे शारीरिक गरजेची काळजी घेताना व्यावहारिक आहे तितके सुलभ करणे सुज्ञतेचे ठरेल.
५ उचलण्याची पावले: आपण प्रागतिशीलपणे पुढे जातो तसे यहोवाकडून आशीर्वाद मिळण्याची वाट पाहतो. त्याने त्याच्या लोकांना बुद्धी व समज यांचा आवश्यक आत्मा पुरवला आहे हे पाहण्यास आपल्याला आनंद होतो. विश्वासू दास वर्गाकरवी, यहोवाच्या उद्देशाची पूर्णता अद्भुत रीतीने होण्यासाठी येशूने परिणामकारकपणे गोष्टींना निर्देशित केले आहे हे आपल्याला कबूल करावेच लागते. (मत्त. २४:४५-४७; कलस्सै. १:९, १०) जूनच्या आमची राज्य सेवा यातील एका घोषणेत असे म्हटले होते: “येथून पुढे, प्रांतीय अधिवेशने, विभागीय संमेलने व खास संमेलन दिवस या दरम्यान केवळ अल्पोपहार उपलब्ध करून दिला जाईल. कॅफेटेरिया पद्धतीने जेवण दिले जाणार नाही. उपस्थित असणारे लोक, इच्छा असल्यास आपापले जेवण, अल्पोपहाराच्या स्टॉलमध्ये उपलब्ध असणाऱ्या पदार्थांसोबत खाण्यासाठी घेऊन येऊ शकतात.” ही व्यवस्था लागलीच कार्यवाहित करण्यात आली आहे व या घोषणेला सकारात्मक प्रातिसाद दाखवण्यात आला. हा बदल लाभदायक कसा ठरेल हे जाणण्यास तुम्ही उत्सुक असाल. हा बदल कशामुळे करावा लागला याची पुढील उजळणी, कदाचित, अधिवेशनांमध्ये काम सुलभ केल्यामुळे आपल्याला आधीच मिळालेल्या लाभांची चांगली स्मरणिका ठरेल.
६ सुलभ करण्यास पूर्वीच्या तडजोडी: स्वयंसेवा व राहण्याची सोय, यासारख्या प्रांतीय अधिवेशनांच्या प्रामाणबद्ध व सुलभ योजनांना अंमलात आणण्यापूर्वी अधिवेशनाच्या आधीच्या कार्यात हजारो स्थानिक बांधव व भगिणींना पुष्कळ काम करावे लागत होते. दररोजच्या जीवनामुळे आपल्या बांधवांवर आणले जाणारे दबाव व अपेक्षा तसेच संघटनेची सतत वाढ यामुळे काम सुलभ करण्यासाठी बदल करणे निश्चितच आवश्यक होते. त्याशिवाय, केवळ अमेरिकेत, भोजन व्यवस्था सुलभ करण्यात आल्यामुळे, आम्हाला जेवण पुरवण्यासाठी कार्यक्रमादरम्यान जास्त काम करणाऱ्या ७०,००० पेक्षा अधिक बंधु व बहिणींना १९७८ मध्ये कार्यक्रम ऐकण्यास वाव मिळाला. सन १९८७ मध्ये, अधिवेशनांमध्ये व त्या राष्ट्रातील पुढील सेवा वर्षातील संमेलन सभागृहांमध्ये, आणखी सुलभ पद्धती अंमलात आणल्या गेल्या. या वर्षापासून, त्या राष्ट्रामध्ये, अधिवेशने किंवा संमेलनांसाठी कोणतेच भोजन पुरवले जात नाही. हे बदल लाभदायक ठरले आहेत, त्यामुळे काम कमी होते व अधिवेशनाच्या आध्यात्मिक पैलूंकडे अधिक लक्ष देण्यास वाव मिळतो तसेच काम करणाऱ्यांना कार्यक्रम ऐकण्यास व त्याचा आनंदही लुटण्यास मिळतो. (अनु. ३१:१२) आपल्यामध्ये पुष्कळ वर्षांपासून एकनिष्ठेने सेवा करणाऱ्या विश्वासू जणांना त्या प्रागती चांगल्या रीतीने आठवतात व दिलेल्या निर्देशनासाठी त्यांनी गुणग्राहकता व्यक्त केली आहे. परंतु, या राष्ट्रात, अधिवेशनातील कामाचा बोजा कमी करण्यास व आणखी इतरांना आध्यात्मिक कार्यक्रमाचा पूर्णपणे लाभ घेणे शक्य करण्यासाठी असेच बदल केले जाऊ शकत होते का?
७ अपेक्षित बदल: इतर राष्ट्रांमध्ये, या वर्षांदरम्यान, साधे भोजन तयार करून पुरवण्यात येत होते तेव्हा तुलनात्मकरीत्या “थोडक्याच गोष्टींचे” खरोखरच “अगत्य” होते असे निरीक्षण करण्यात आले. (पडताळा लूक १०:३८-४२.) उपस्थित असलेल्यांकरता पूर्ण जेवण बनवण्यासाठी, पुष्कळ पुरवठा लागतो व काम करावे लागते त्याचप्रामाणे, खर्चीक साधने एकतर भाड्याने किंवा विकत घेऊन त्यांची काळजी घ्यावी लागते व तेथील विभागांना वाहून न्यावे लागते. त्यानंतर, त्या व्यवस्था संघटित करण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुष्कळ स्वयंसेवकांची गरज लागते. अन्ना निदान काही वेळेकरता तरी साठवून ठेवावे लागते. कॅफेटेरिया खात्यामधून निश्चित किती व्यक्ती जेवण घेतील याचा अंदाज काढणे बहुतेक अशक्यच असते, यामुळे काही प्रासंगी जेवण अपुरे पडते व बांधव त्या कमतरतेची पूर्ती करण्याच्या तयारीत नसतात किंवा काही वेळेस अन्ना वाया जाते. यामुळे बांधवांना, संस्थेला मोठ्या गोष्टींची भरपाई करून द्यावी लागली आहे. ज्या विभागांकडे स्वतःच्या स्वयंपाकाची साधने आहेत त्यांना त्यांची काळजी घेणे, जपून ठेवणे व वाहून नेणे या गोष्टी कराव्या लागतात व त्यामध्ये काम, वेळ व खर्च गोवलेला आहे. भोजनाची व्यवस्था सुलभ केल्यावर, यापैकीचे पुष्कळ काम करावे लागणार नाही व अनेक बांधवांना देखील या कामातून सुटका मिळेल.
८ या संबंधित क्षेत्रांमध्ये ज्यांनी स्वयंसेवक या नात्याने स्वेच्छेने सेवा केली आहे त्यांची सेवा खूप मूल्याची व प्राशंसनीय होती. तथापि, अशाप्राकारे भोजनाची व्यवस्था सुलभ केल्यामुळे, साहित्याची काळजी घेणे, खरेदी, तयारी, स्वयंपाक तसेच अन्ना वाढणे यासाठी काम केलेल्या शेकडो बंधू व बहिणींना इतर आवश्यक राज्याच्या गोष्टींमध्ये तसेच अधिवेशनात संगतीचा आनंद पूर्णपणे घेता येईल. भोजन व्यवस्थेसाठी सेवा करणारे पुष्कळ स्वयंसेवक आता इतर खात्यांमध्ये जसे की, सेवक व स्वच्छतेच्या खात्यांमध्ये मदत देऊ शकतील. यामुळे सर्वांचाच भार हलका होईल व भोजन व्यवस्था पाहणाऱ्या बहुतेकांच्या बाबतीत होते त्याप्रामाणे पुष्कळांना रात्री उशिरापर्यंत, पहाटे किंवा कार्यक्रमांच्या दरम्यान काम करण्याची गरज राहणार नाही.
९ योजनांना पाठिंबा देणे: या वर्षांमध्ये, तुम्हा बांधवांनी व बहिणींनी “खऱ्या मनाने” अधिवेशनाच्या योजनांना तसेच जेवणाच्या व्यवस्थेला दिलेल्या उत्तम पाठिंब्याबद्दल संस्था खूप प्राशंसा करते. (१ इति. २९:९) यामुळे अनेक मार्गांनी मदत मिळाली आहे. यामुळे उत्तम इमारती भाड्याने घेता आल्या व अधिवेशनाचा खर्च भागवता आला. यामुळे उपस्थितांना दुपारच्या लहान सुटीच्या वेळी अधिवेशनाच्या ठिकाणी थांबून राहण्यास, सोयीस्कर पद्धतीने जेवण मिळवण्यास व ताजेतवाने होऊन पुन्हा आध्यात्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरता मदत मिळाली आहे. तसेच या तरतूदींसाठी अनुदान देण्याची बंधू व बहिणींची उदारता व पाठिंबा सतत मिळत राहील यात शंकाच नाही. व्यावहारिक पद्धतीने त्यांच्या गुणग्राहकतेचे ते वक्तव्य होते.—नीती. ११:२५; लूक १६:९.
१० तुमच्या भोजनाच्या गरजेची काळजी घेणे: तथापि, हे बदल केल्यामुळे, आपल्या दुपारच्या सुटीत जेवणासाठी वैयक्तिकांना व कुटुंबांना स्वतःसाठी अन्ना घेऊन येण्याची गरज भासेल. आपण आध्यात्मिक कार्यक्रमाच्या उत्तम लाभांना खूप महत्त्व देतो. शारीरिक अन्नाला फाजील महत्त्व दिले जाणे मूर्खपणाचे ठरेल. या बाबतीत, प्रात्येक जणाने ‘जे श्रेष्ठ ते पसंत करावे’ हे अत्यावश्यक आहे. (फिलिप्पै. १:९, १०अ) अलीकडील पोलंड, रशिया व यूक्रेन येथील त्याचप्रामाणे इतर ठिकाणांतील यहोवाच्या लोकांची मोठी अधिवेशने भोजन व्यवस्था न करता यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. शिवाय, या राष्ट्रातील काही विभागांनी आधीच आपली संमेलने व खास संमेलन दिवसाचे कार्यक्रम पूर्ण जेवण न पुरवता अल्पोपहार देऊनच चालवले गेले आहेत. काहींनी दुपारच्या जेवणासाठी आपले स्वतःचे भोजन आणले. सॅन्डविचीस, उकडलेली अंडी व फळे असा अल्पोपहार उपलब्ध असेल आणि हे अनेक प्रातिनिधींसाठी पुरेसे होईल. भरपूर अन्ना हवे असणाऱ्या इतरांनी दुपारचे केवळ हलके अन्ना सोबत आणले तर, त्यांना मानसिकरीत्या दक्ष राहता येईल असे आढळून येईल व यामुळे त्यांना दुपारच्या कार्यक्रमातून पूर्ण लाभ प्राप्त करण्यास मदत मिळेल. याच्या सुसंगतेत, जेवण आणणाऱ्यांनी साधे व पौष्टिक जेवण आणावे. उदाहरणार्थ, येशूने लोकसमुदायांना खाऊ घातले तेव्हा त्याने त्यांना केवळ दोनच गोष्टी, म्हणजे भाकर व मासे पुरवले. (मत्त. १४:१६-२०; तसेच लूक १०:४२अ पाहा.) त्यासाठी, दुपारच्या अल्पावधीची सुटी व आपण उपयोगात आणत असलेल्या सोयींचा प्राकार लक्षात घेता, काय उचित व व्यावहारिक असेल याबद्दल आम्हाला काही सूचना देण्यास आवडेल.
११ येथूनपुढे, अधिवेशनात भोजन व्यवस्था नसल्यामुळे चांगली योजना केल्यास, उपस्थित राहणाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासोबत घरी किंवा स्थानिक ठिकाणाच्या उपहार गृहामध्ये न्याहारी करावयास आवडेल. आदल्या रात्री पुरेसा आराम घेतल्यावर, सकाळच्या पौष्टिकतेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळवण्यास तुम्ही लवकर उठले पाहिजे व इतर प्रातिनिधींबरोबर सहवास राखण्यासाठी अधिवेशनाच्या ठिकाणी थोड्या वेळा आधी आले पाहिजे. या नवीन व्यवस्थेचा आणखी एक लाभ म्हणजे, भोजन व्यवस्थेच्या स्वयंसेवकांना त्यांच्या कुटुंबासोबत येण्याची परवानगी दिली जात होती तितक्या लवकर सभागृह उघडण्याची किंवा मदतनिसांना कामाला लावण्याची गरज लागणार नाही. बहुतेक प्रासंगी, इमारतीचे दरवाजे सर्व प्रातिनिधींकरता सकाळी ८.०० वाजता उघडण्यात येतील परंतु, विशिष्ट कामाच्या नेमणूकांमुळे लवकर प्रावेश करावा लागणाऱ्यांकरता हे अपवादात्मक असेल. पहिल्याप्रामाणे, अधिवेशनाच्या ठिकाणी जागा शोधण्यासाठी घाईघाईने जाण्याची गरज नाही कारण अंदाज केलेल्या समूहासाठी पुरेशी बसण्याची जागा आयोजित केली आहे.
१२ पहिल्या अधिवेशनांमध्ये होती त्यापेक्षा दुपारची सुटी अल्पावधीची असेल. तथापि, थोडासा अल्पोपहार घेण्याकरता व इतरांसोबत सहवास राखण्याकरता वेळ मिळेल. अल्पोपहारासाठी उपलब्ध असलेल्या पदार्थांपेक्षा काही वेगळे हवे असल्यास, अधिवेशनाच्या शहरामध्ये, किंवा जवळपास राहणाऱ्या व दररोज संध्याकाळी घरी परतणाऱ्या बंधू व बहिणींना दुपारच्या सुटीसाठी सहजपणे कुटुंबातील प्रात्येक सदस्याकरता थोडेसे जेवण तयार करून आणता येईल. मुले शाळेत जाताना जेवणाचा डबा नेतात त्याचप्रामाणे हे असेल. पुष्कळ लोक त्यांच्या ऐहिक कामाच्या ठिकाणी असेच जेवणाचे डबे घेऊन जातात.
१३ यामुळे, अधिवेशन शहरापासून दूर राहणाऱ्यांकरता हे नक्कीच आव्हान असेल व त्यांना दुपारचे जेवण हवे असल्यास, त्याकरता आधीच योजना करावी लागेल. काही सुके पदार्थ व साठवण्याजोगे पदार्थ गरज भागवण्यास पुरेसे आहेत असे काहींना आढळेल व ते पदार्थ घरातून देखील आणले जाऊ शकतात. दररोजच्या दुपारच्या सुटीसाठी इतर खाण्याचे पदार्थ अधिवेशनाच्या शहरातील दुकानात मिळतील.
१४ लक्षात ठेवा, हॉटेलच्या खोल्यांमध्ये स्वयंपाक करू नका, तेथे तशी सोय असेल तर ठीक आहे. असे करणे धोकेदायक व काहीवेळेस बेकायदेशीर असते आणि त्यामुळे खोलीतील सामानसुमानावर डाग किंवा तेलकट गोष्टी लागून ते खराब होऊ शकते. यास्तव खोलीत असा वास राहतो जो पुष्कळ दिवसांपर्यंत जात नाही. यामुळे हॉटेलला ती खोली पूर्णपणे स्वच्छ करण्याच्या खर्चाविना व कामाविना पुन्हा भाड्यावर देणे कठीण होते. यास्तव, निदान अधिवेशनाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या दिवशी वापरता येतील असे टिकाऊ खाण्याचे पदार्थ घरातून आणणे किंवा विकत घेण्याचा विचार करणे सुज्ञतेचे ठरेल. तुम्ही एखादे हॉटेल शोधू शकता जेथून सकाळीच दुपारच्या जेवणासाठी हलके, कोरडे जेवण अधिवेशनाच्या ठिकाणी तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. अशा सोबत आणलेल्या जेवणामुळे हॉटेलच्या खोल्यांमध्ये स्वयंपाक करावा लागणार नाही.
१५ अधिवेशनाचे ठिकाण अधिवेशनाच्या दरम्यान खरे म्हणजे मोठ्या राज्य सभागृहाप्रामाणे असल्यामुळे, दुपारच्या सुटीत तेथे सहलीचे वातावरण निर्माण करण्याचे टाळणे सुज्ञतेचे असेल. आपण राज्य सभागृहातील सभांदरम्यान खात नाही त्याचप्रामाणे आपण अधिवेशनाच्या कार्यक्रमांदरम्यान खाणार पिणार नाही. सभागृहात अतिशय मोठे जेवणाचे डबे आणणे सुज्ञतेचे ठरणार नाही. त्यामुळे धोका संभावू शकतो व ते वाटेत किंवा बसण्याच्या सीटवर ठेवता येऊ शकत नाहीत. आपल्या दुपारच्या जेवणासाठी लागणाऱ्या हलक्या खाण्याच्या पदार्थांकरता प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा पॅकेट योग्य असतील. आवश्यकता भासल्यास, सीटवर नव्हे तर, सीटच्या खाली ठेवता येऊ शकणारा लहान डबा किंवा प्लॅस्टिकचे डबे उपयोगात आणले जाऊ शकतात.
१६ आपण अधिवेशनाच्या ठिकाणी कोणत्या प्राकारचे डबे आणतो याबाबतीतही दक्षता बाळगण्याची गरज आहे. कोणत्याही प्राकारची काचेची भांडी धोकेदायक असू शकतात. काही सुविधांमध्ये त्यांची मनाई देखील आहे. यास्तव, कोणतीही काचेची भांडी किंवा बाटल्या त्या ठिकाणी घेऊन येऊ नयेत अशी विनंती आम्ही करत आहोत.
१७ अधिक लाभ: अशा तडजोडी केलेल्या व्यवस्था किती सुज्ञतेच्या आहेत हे आपण खरोखर पाहू शकतो. सर्वजण आपल्या एकत्र मिळण्याचा खरा हेतू—आध्यात्मिक लाभ मिळवण्याकडे पूर्ण लक्ष देऊ शकतील. आपण उपभोगत असलेल्या सहवासामध्ये तसेच कार्यक्रमामधून देखील हे लाभ पुरवले जातात. यास्तव, जेवणासाठी इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याऐवजी, अल्पोपहाराच्या खात्यातून मिळणाऱ्या गोष्टींपेक्षाही अधिक काही आपल्याला हवे असल्यास, आपल्यासोबत काहीतरी घेऊन येणे किती फायदेकारक ठरेल. यामुळे आपण आपल्या बंधू व बहिणींसोबतच्या सहवासाचा आनंद घेऊ शकतो व दुपारचा कोणताही कार्यक्रम चुकवला जाण्याचे टाळू शकतो.
१८ दुपारच्या कार्यक्रमानंतर आध्यात्मिकरीत्या तजेला प्राप्त झाल्यामुळे, स्थानिक उपहार गृहांमध्ये कुटुंब व मित्रांसोबत जेवण करत असताना, काहीजण ख्रिस्ती सहवास व शिकलेल्या गोष्टींविषयी संभाषण करण्याचा आनंद घेतील. इतरजण एखाद्या हॉटेलमधून किंवा दुकानातून काही खाण्याचे पदार्थ विकत घेतील. आपापल्या घरी जाऊ शकणारे लोक, इतर दिवशी ऐहिक कामावरून किंवा क्षेत्र सेवेवरून आल्यावर घरी जाऊन संध्याकाळचे जेवण करतात त्याचप्रामाणे आता देखील घरी जेवण करण्याचे ठरवतील.
१९ आपल्याला नवीन प्राकाशने, उत्तम शिक्षण व व्यावहारिक सल्ला प्राप्त होतो त्या संमेलनांमध्ये व अधिवेशनांमध्ये मिळणाऱ्या आध्यात्मिक मेजवानीचा आपण खरोखर आनंद लुटतो. देवाच्या एकत्रित झालेल्या लोकांसह असण्याच्या आनंदासोबत हे आशीर्वाद सर्वांच्या आठवणीत राहतात. नीतीसूत्रे १०:२२ म्हणते: “परमेश्वाराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.” याचे कारण म्हणजे, यहोवाचे लोक या नात्याने आपण भौतिक गरजा किंवा सुखसोयी दृष्टीसमोर ठेवून अधिवेशनांना उपस्थित राहत नाही. आपण आध्यात्मिक पद्धतीने शक्य तेवढा अधिक लाभ मिळवण्याच्या सकारात्मक इच्छेने एकत्र जमतो व आपण दाखवत असलेल्या आत्म्यासाठी यहोवा समृद्धतेने प्रातिफळ देतो.—१ तीम. ६:६-८; इत्त्वी. ११:६.
२० उत्तेजनाचे हे प्रासंग आपल्याला आध्यात्मिक कापणीच्या प्रागतीची आठवणही करून देतात. (योहा. ४:३५, ३६) यशया ५४ अध्यायाचे सुरवातीचे शब्द हर्षदायक वाढींची तयारी करण्यासाठी यहोवाच्या पत्नीसमान संघटनेचा धावा करतात. यशयाने भाकीत केल्याप्रामाणे, पुढील वाढ, विस्तार व पुन्हा प्राप्त झालेला जोम नजीकच्या भवितव्यात आहे: “आपल्या डेऱ्यांची जागा वाढीव, आपल्या राहुट्यांच्या कनाथी पसरू दे; अटकाव करू नको: आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक. कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल.” या आनंदविणाऱ्या भविष्यवाणीची पूर्णता, आपण आज पाहत असणाऱ्या खऱ्या उपासनेच्या अद्भुत विस्तारात परिणीत झाली आहे.—यश. ५४:१-४.
२१ या सुलभ अधिवेशनाच्या व्यवस्थेला अंमलात आणणे खरोखर चांगला निर्णय असल्याचे आढळते जेणेकरून सर्वजण विचलित न होता तयार करण्यात आलेल्या आध्यात्मिक कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतील. यावरही यहोवाचा आशीर्वाद असेल असा आमचा भरवसा आहे कारण यामुळे पुढील वाढीची परिणामकारक हाताळणी करण्यास वाव मिळेल. आवश्यक असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून, आपण आनंदी सहवास व चांगल्या आध्यात्मिक गोष्टींसाठी योजलेल्या दिवसांचा आनंद घेऊ शकू. आपण सतत एकत्र येतो व यहोवाच्या मेजावर खातो तसे यहोवा आपले सर्व प्रायत्न आशीर्वादित करील ही आपली प्रामाणिक प्रार्थना आहे.—पडताळा अनुवाद १६:१४, १५.
[३ पानांवरील चौकट]
सुलभ केलेल्या भोजन व्यवस्थेचे लाभ
◼ कार्यक्रमाच्या आधी, नंतर व त्या दरम्यान कमी काम असल्यामुळे अधिक सहवास राखण्यास वाव दिला जातो
◼ थोड्याच भोजन साहित्यांची काळजी घ्यावी लागते
◼ अधिक लोक आध्यात्मिक कार्यक्रमाकडे पूर्ण लक्ष देऊ शकतात
◼ इतर खात्यांना मदत करण्यासाठी अधिक स्वयंसेवक उपलब्ध होतात
◼ इतर ईश्वारशासित कार्यांसाठी आणखी वेळ उपलब्ध होतो
इच्छा असल्यास दुपारच्या सुटीसाठी आणण्यास सुचवलेल्या गोष्टी
◼ हलके, साधे व पौष्टिक पदार्थ
◼ पोळ्या किंवा पराठा व त्यासोबत सुक्या भाज्या
◼ सुका मेवा, कवच असणारी फळे, वाफेवर शिजवलेले पदार्थ, ताजी फळे
◼ ज्या अधिवेशनाच्या सुविधेमध्ये प्रातिनिधींना खाण्यासाठी जागा आहे तेथे डब्यात भात व भाज्या देखील भरून आणले जाऊ शकते
अधिवेशनाच्या सुविधेमध्ये आणू नका
◼ मद्य
◼ काचेची भांडी किंवा बाटल्या
◼ कुटुंबाला पुरेल इतक्या मोठ्या आकाराचे डबे
मांसाहारी जेवण आणण्याबद्दल दक्ष असा. पुष्कळ सभागृहांमध्ये असे जेवण आणण्यास मनाई आहे. शंका असल्यास, ते पदार्थ टाळणे बरे ठरेल.