घोषणा
◼ साहित्य सादरता
जुलै आणि ऑगस्ट: पुढीलपैकी कोणतीही ३२-पृष्ठांची माहितीपत्रके ५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात: देव खरोखरी आपली काळजी करतो का?, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, “पहा! मी सर्व काही नवे करतो,” आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, द डिव्हाईन नेम दॅट वील एन्ड्यूर फॉरएव्हर, नंदनवन आणविणारे सरकार, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? आणि व्हेन समवन यू लव डाईझ.
सप्टेंबर: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना). गृह बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी प्रायत्न केले पाहिजेत.
ऑक्टोबर: अवेक! किंवा टेहळणी बुरुज यांची वर्गणी. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ७०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी व पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ३५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी नाही.
सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या साहित्याची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर ऑर्डर फॉर्म (S-AB-14) यावर पाठवावी.
◼ साहित्याची वार्षिक यादी तयार केली जाणार असल्यामुळे, ऑगस्ट १ नंतर मिळणाऱ्या मागण्या सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हाताळल्या जाणार नाहीत. यास्तव, मंडळ्यांनी आगाऊ त्यांच्या गरजांचा अंदाज काढावा व त्याप्रामाणे मागणी करावी.
◼ विभागीय पर्यवेक्षक लवकरच “ईश्वारी शिक्षण जगभर विजय मिळवते” हे जाहीर भाषण देणार आहेत—अलीकडेच “ईश्वारी शिक्षण” या खास आंतरराष्ट्रीय अधिवेशनांना ठळकपणे मांडणारी ही स्लाईडची सादरता आहे. हे भाषण विभागातील सर्व मंडळ्यांमध्ये देऊन होईपर्यंत विभागीय पर्यवेक्षक हेच भाषण देत राहतील. ते जुलै १, १९९५ पासून स्लाईड्स मिळेपर्यंत व पुन्हा जून १९९६ पर्यंत विभागातील सर्व मंडळ्यांना स्लाईड्स दाखवून होईपर्यंत “सर्व सांत्वनकर्त्या देवावर भरवसा ठेवा” हे भाषण देतील. पुढील नवीन भाषण जुलै १९९६ च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याचे निर्धारित करण्यात आले आहे.