वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९६ पृ. ७
  • तुम्ही फारच व्यग्र आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही फारच व्यग्र आहात का?
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • वेळेचा सदुपयोग कसा करावा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • सर्वदा अधिकाधिक करण्यास आहे
    आमची राज्य सेवा—१९९५
  • प्रचार कार्यास ते अडखळण आहे का?
    आमची राज्य सेवा—२००१
  • यहोवाची सेवा जीवनात केंद्रस्थानी ठेवा
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९६
km ५/९६ पृ. ७

तुम्ही फारच व्यग्र आहात का?

१ “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक” कार्य आहे, असे पौलाने आग्रहाने विनवले. (१ करिंथ. १५:५८) आपल्याला व्यक्‍तिगत अभ्यासाचा नित्य सराव राखण्यास, सेवेमध्ये नियमाने भाग घेण्यास, न चुकता सभांना उपस्थित राहण्यास व मंडळीच्या नेमणुकींना परिश्रमपूर्वक सांभाळण्यास आर्जवले जाते. त्याशिवाय, गरजू लोकांना देखील आपण मदत केली पाहिजे. इतके काम असताना आपण काही वेळा दबले जाऊ शकतो, आपल्या कामाचे ओझे कमी करण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत, असा कदाचित आपल्या मनात विचार येऊ शकतो.

२ अशा काही परिस्थिती आहेत जेव्हा काही विशिष्ट कामे न करणे किंवा त्यांचे प्रमाण कमी करणे सुज्ञतेचे व तर्कशुद्ध असेल. काही लोकांना वाटते, की इतरांनी त्यांना सांगितलेली सर्वच कामे त्यांनी केली पाहिजेत. याबाबतीत समतोल न राखल्यामुळे त्या व्यक्‍तीवर दबाव व ताण येऊ शकतो जो कालांतराने हानीकारक ठरू शकतो.

३ समतोल राखा: ‘अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींची खात्री करा,’ या पौलाने दिलेल्या सल्ल्याचे अनुसरण करण्यामध्ये समतोल राखण्याची गुरुकिल्ली आहे. (फिली. १:१०) याचा अर्थ अगदी सोपा आहे, की महत्त्वपूर्ण गोष्टींवर लक्ष एकाग्र केले पाहिजे व वेळ आणि परिस्थिती अनुमती देत असल्यास आपण कमी महत्त्वाच्या काही गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्‍या निश्‍चितच महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टींपैकी प्रथम आहेत. विशिष्ट प्रापंचिक जबाबदाऱ्‍या हाताळल्या पाहिजेतच. परंतु, येशूने शिकवले, की आपल्या प्राथमिकता, राज्याला प्रथम स्थान देणे या तत्त्वावर आधारित असल्या पाहिजेत. आपण पहिल्यांदा, यहोवास केलेले आपले समर्पण पूर्ण करण्यासाठी शक्य करणाऱ्‍या गोष्टी केल्या पाहिजेत.—मत्त. ५:३; ६:३३.

४ हे सर्व लक्षात ठेवून, आपण आपल्या व्यग्र आराखड्यातून अनावश्‍यक व्यक्‍तिगत उद्योग, अत्याधिक मनोरंजन व इतरांना ज्यांची गरज नाही असे अनावश्‍यकपणे दिलेले शब्द, हे सर्व निश्‍चितच काढून टाकू याची खात्री करू या. प्रत्येक आठवड्याच्या कार्याची योजना करताना, आपण पुरेसा व्यक्‍तिगत अभ्यास, क्षेत्रसेवेमध्ये योग्य भाग, सभांची उपस्थिती व आपल्या उपासनेशी निकट संबंधित असलेल्या इतर गोष्टींसाठी वेळ बाजूला काढून ठेवू. उरलेला वेळ, राज्याला प्रथम स्थान देणारे संतुलित ख्रिस्ती होण्याचे आपले प्रमुख ध्येय गाठण्यास इतर कामे केवढ्या प्रमाणात हातभार लावतात यावर अवलंबून विभाजित केला जाऊ शकतो.

५ तरीदेखील आपल्याला आपले ओझे असहाय्य वाटत असेल. असे असल्यास, “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन,” या येशूने दिलेल्या आमंत्रणाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. (मत्त. ११:२८) तसेच, ‘प्रतिदिनी आमचा भार वाहणारा’ व भागलेल्यांस जोर देणाऱ्‍या यहोवाकडे पाहा. तो नीतिमानाला कधीही ढळू देणार नाही असे अभिवचन देतो. (स्तोत्र ५५:२२; ६८:१९; यश. ४०:२९) आपण याची खात्री बाळगू शकतो, की आपल्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल व ईश्‍वरशासित कार्याच्या सक्रिय जीवनात आपल्याला टिकून राहण्यास ते शक्य करील.

६ योग्य राज्य आस्थांचा पाठलाग करण्यात आपल्याला नक्कीच व्यग्र ठेवण्यात आले तरी, प्रभूच्या कामात घेतलेले श्रम व्यर्थ जाणार नाही हे ऐकून आपण आनंदी होऊ शकतो.—१ करिंथ. १५:५८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा