प्रथम देवाचे राज्य मिळवण्यास झटा —स्तुतीचे यज्ञ नित्य अर्पण करून
१ प्रथम राज्य मिळवण्यास झटणारे नेहमीच यहोवा आणि त्याच्या राज्याबद्दल बोलण्याकडे लक्ष देत असतात. (स्तोत्र १४५:११-१३) त्याच्या नावाची स्तुती करण्याच्या आणि सुवार्तेविषयी बोलण्याच्या दररोज संधी असतात. (स्तोत्र ९६:२) यहोवाची स्तुती करणे स्तोत्रकर्त्यासाठी हर्षाचे होते, त्याने असे म्हटले: “आम्ही सतत देवाची स्तुती करतो.” (स्तोत्र ४४:८, NW) आपल्यालाही तसेच वाटत असल्यास, आपण राज्य सेवाकार्यात नियमितपणे भाग घेण्यास उत्सुक असू.
२ सेवाकार्यात किती वेळ घालवावा यासाठी यहोवाने काही विशिष्ट नियम स्थापिले नाहीत, परंतु त्याची “नित्य” स्तुती करण्यास तो आपल्याला उत्तेजन देतो. (इब्री. १३:१५) आपली व्यक्तिगत परिस्थिती अनुमती देत असल्यास, यहोवाची स्तुती दर आठवडी करण्यासाठी काही वेळ खर्च करण्याचे ध्येय आपण राखले पाहिजे. आधीच असे करत असणारे अधूनमधून किंवा नियमितपणे साहाय्यक पायनियर या नात्याने कार्य करण्यास आपल्या कामाची योजना कदाचित करू शकतील. साहाय्यक पायनियर सेवेचा आनंद घेणारे कदाचित नियमित पायनियर या नात्याने नाव नोंदवू शकतात.
३ आपली व्यक्तिगत परिस्थिती कोणतीही असो, स्तुतीचा यज्ञ वाढवण्यास आपल्याला शक्य आहे का? आवेश हा गुणग्राहकतेने उद्दीपित केला जातो. देव वचनाच्या व्यक्तिगत अभ्यासाने गुणग्राहकता उत्पन्न होते. मंडळीच्या सभा आपल्याला ती गुणग्राहकता व्यावहारिक पद्धतीने व्यक्त करण्यास चालना देतात. आवेशाने स्तुती करणाऱ्या इतरांसोबत जवळचा सहवास ठेवल्याने आपल्याला “सत्कर्मे करावयास उत्तेजन” मिळू शकते. (इब्री. १०:२४) मंडळीने केलेल्या सर्व तरतूदींचा फायदा घेतल्याने, आपण कदाचित आपल्या स्तुतीचा यज्ञ वाढवू शकतो.
४ हन्ना नावाच्या संदेष्ट्रीने यहोवाच्या सेवेत एक उत्तम उदाहरण राखले. ती ८४ वर्षांची असूनही, “मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस [पवित्र] सेवा करीत असे.” (लूक २:३७) मंडळीतील कार्यहालचालींमध्ये संपूर्ण हृदयाने भाग घेतल्याने तिला व्यक्तिगतरित्या मोठे समाधान प्राप्त झाले. तिच्या विश्वासू सेवेचा बायबलमधील अहवाल आज आपल्याला प्रोत्साहन पुरवतो.
५ ‘सशक्तांनी अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे,’ अशी शिफारस पौलाने केली. (रोम. १५:१) तुमच्या प्रेमळ साहाय्याने आणि उत्तेजनाने ज्यांचा लाभ होईल असे काहीजण तुमच्या मंडळीत असतील. तुमच्यासोबत क्षेत्रकार्यात येण्याचे आमंत्रणच केवळ योग्य गोष्ट असेल. एखाद्या प्रचारकाला वाहतूकीची किंवा त्याच्यासोबत कार्य करण्यास कोणा एकाची गरज असेल. आणखी एखाद्याची निरुत्साहीपणा ही समस्या असेल आणि कदाचित त्या व्यक्तीमध्ये पुन्हा राज्य सेवेबद्दल आवेश जागृत करण्यास आवश्यक असणारा उभारणीकारक आधार देणारे तुम्ही कदाचित असू शकाल. (१ थेस्सलनी. ५:१४) ‘पवित्र जनांच्या गरजा भागवण्याच्या’ तुमच्या तयारीवरून, यहोवाच्या नावाची स्तुती वाढवण्यास तुमची किती मनःपूर्वक इच्छा आहे ते प्रदर्शित होईल.—रोम. १२:१३.
६ यहोवाने आपल्यासाठी केलेल्या आणि पुढे करणार त्या सर्व गोष्टींची आपण गणती करूच शकत नाही. या आशीर्वादांची त्याला परतफेड करण्याचा आपल्याजवळ कोणताही मार्ग नाही. ‘प्रत्येक सजीव प्राण्याने यहोवाची स्तुती’ करावी यासाठी आपल्याजवळ तसे करण्यास किती भाग पाडणारी कारणे आहेत!—स्तोत्र १५०:६, सुबोध भाषांतर.