वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९४ पृ. २
  • ऑक्टोबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • उपशिर्षक
  • ऑक्टोबर ३ ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर १० ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर १७ ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर २४ ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर ३१ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९४
km १०/९४ पृ. २

ऑक्टोबरसाठी सेवा सभा

सूचना: प्रांतीय अधिवेशनाच्या काळातही, आमची राज्य वा यात प्रत्येक आठवड्याच्या सेवा सभेचा आराखडा असेल. प्रत्येक मंडळीने आवश्‍यकतेप्रमाणे, नेमण्यात आले आहे तेथे “ईश्‍वरी भय” प्रांतीय अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यास आणि पुढील आठवडी कार्यक्रमातील ठळक मुद्दे सांगण्यासाठी ३० मिनिटांची उजळणी घेण्याची व्यवस्था करावी. प्रांतीय अधिवेशन कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवसाची उजळणी घेण्यास आधीच दोन किंवा तीन योग्य बांधवांना नेमण्यात यावे जे ठळक मुद्यांवर लक्ष केंद्रीत करू शकतील. चांगली तयारी केलेली ही उजळणी मंडळीला व्यक्‍तिगत अवलंब करण्यासाठी मुख्य मुद्दे लक्षात ठेवण्यास आणि क्षेत्रात त्याचा उपयोग करण्यासाठी मदत करील. श्रोत्यांमधून दिलेली विवेचने आणि अनुभव संक्षिप्त आणि मुद्याला धरून असली पाहिजेत.

ऑक्टोबर ३ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २०३ (४३)

१० मि:स्थानिक घोषणा आणि आमची राज्य वा यातील निवडक घोषणा.

१७ मि:“आताच वेळ आहे.” प्रश्‍नोत्तरे. नोव्हेंबर १९९३, आमची राज्य वा याच्या पृष्ठ ४ व ५ वरील “आध्यात्मिक ध्येयांचा पाठलाग करा” या उपशिर्षकाखालील विवेचनांचा समावेश करा.

१८ मि:“ऑक्टोबरमध्ये वर्गण्यांबद्दल जाणीवपूर्वक असा.” श्रोत्यांशी चर्चा करा. संभाषण सुरु करण्याकरता नियतकालिकांचा उपयोग कसा करावा हे दाखवणारी दोन चांगली तयारी केलेली प्रात्यक्षिके सादर करा. प्रत्येक दारी वर्गण्या सादर करण्याच्या महत्त्वावर जोर द्या. घरमालकाने वर्गणी स्वीकारली नसल्यास, नियतकालिकांच्या किरकोळ प्रती सादर करण्याच्या गरजेवर जोर द्या. अशा घरमालकांसोबत नियतकालिक मार्ग सुरु करण्यासाठी व ते टिकवून ठेवण्यासाठी उत्तेजन द्या.

गीत २१२ (११०) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर १० ने सुरु होणारा सप्ताह

गीत १०४ (५७)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल आणि देणगीच्या कोणत्याही पोचपावत्या.

१५ मि:“पालकहो—आधार देणारे असा!” ऑगस्ट ८, १९९४, अक! नियतकालिकाच्या पहिल्या तीन लेखांवर आधारित वडिलांचे भाषण. साहित्याचा स्थानिक अवलंब करा. शिक्षकांसोबत किंवा शाळेच्या अधिकाऱ्‍यांसोबत बोलण्याचा अनुभव असणाऱ्‍या पालकाची संक्षिप्त रुपात मुलाखत घ्या. पालक मुलांना आधार देणारे कसे असू शकतात यावर जोर द्या.

२० मि:शाळेतील ख्रिस्ती वर्तणूक. तीन किंवा चार यौवनावस्थेतील युवकांसोबत वडिलांची चर्चा. शाळेमध्ये, आपले तरुण लोक बायबल तत्त्वांबद्दलच्या त्यांच्या आदराची हातमिळवणी करण्यासाठी पुष्कळ दबावाखाली आहेत. यापैकीच्या पुष्कळ कार्याचा संबंध प्रत्यक्ष वर्गासोबत नसतो. क्रिडा, भेटीगाठी करणे, आणि सामाजिक समारंभ, धोके प्रस्तुत करतात. वडील, स्कूल माहितीपत्रकाच्या पृष्ठे २२-५ चा उपयोग करून यौवनावस्थेतील युवकांशी “एक्स्ट्राकरीक्यूलर ॲक्टीव्हिटीज्‌” याची चर्चा करतात. तरुण लोकांच्या विवेचनांवरून दिसून येते की, या गोष्टींमध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणले जातात आणि त्यामुळे ते दिलेल्या सल्ल्याची गुणग्राहकता बाळगतात.

गीत १०८ (६९) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर १७ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १९४ (१०५)

७ मि:स्थानिक घोषणा.

१८ मि:चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. वडिलांचे भाषण. आध्यात्मिक थकवा, यहोवाच्या सेवेतील आपला हर्ष आणि आवेश कमी करू शकतो. जानेवारी १५, १९८६, वॉचटावर पृष्ठ १९ (पेटी) वरील सूचनांचा उपयोग करून आपल्या आध्यात्मिक शक्‍तीचे नूतनीकरण करण्याबद्दलच्या काही मार्गांची उजळणी करा. मंडळीच्या कार्यहालचालींना संपूर्ण अंतःकरणाने पाठिंबा देण्यावर जोर द्या.

२० मि:“आस्था दाखवणाऱ्‍यांची प्रेमळपणे मदत करा.” श्रोत्यांशी चर्चा करा. सुचवलेल्या सादरतांचा उपयोग करून दोन प्रात्यक्षिकांची योजना करा. उचित असल्यास, पहिल्या भेटीत एक किंवा दोन किरकोळ प्रती घेतलेल्या घरमालकाची पुनर्भेट घेत असताना वर्गणी सादर केली जाऊ शकते हे सांगा. बायबल अभ्यास सुरु करण्याचे ध्येय लक्षात ठेवण्यासाठी श्रोत्यांना उत्तेजन द्या.

गीत १५६ (११८) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर २४ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १४१ (६४)

१२ मि:स्थानिक घोषणा. “प्रकटीकरणाचा कळस पुस्तकाचा पुन्हा अभ्यास करणे” याची उजळणी करा. धड्यांचा आगाऊ अभ्यास करण्याच्या आणि नियमितपणे उपस्थित राहण्याच्या महत्त्वाबद्दल सर्वांना आठवण करून द्या. याकडे लक्ष आकर्षित करा की, आपला मंडळीचा पुस्तक अभ्यास आणि जगभरातील आपल्या पुष्कळ बांधवांचा अभ्यास आता समान आहे.

१५ मि:तुमची स्थायी मागणी आहे का? राज्य संदेशाचा प्रचार करण्यात टेहळणी रुज आणि सावध राहा! नियतकालिके मोठी साधने आहेत. आपण प्रत्येक संधीला त्यांना सादर केले पाहिजे. एप्रिल १९८४ आमची राज्य वा, यात पृष्ठ ५, परिच्छेद १८ मध्ये अशी शिफारस केली होती की, प्रत्येक प्रचारकाकडे “ठराविक अंकाच्या प्रतींसाठी . . . एक निश्‍चित नियतकालिक मागणी” असावयास हवी. नाहीतर असे आढळून येईल की, चालू अंक नसल्यामुळे आपल्याला पत्रिका आणि माहितीपत्रकांवर अवलंबून राहावे लागते. कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याची स्थायी मागणी असणे चांगले असेल. नियतकालिक खात्यावरच आपल्या मागण्या द्या. प्रत्येक आठवडी नियतकालिके घेण्याची खात्री करा. स्थायी मागणी असल्यामुळे काय लाभ होतात ते सांगा.

१८ मि:“प्रथम देवाचे राज्य मिळवण्यास झटा—स्तुतीचे यज्ञ नित्य अर्पण करून.” प्रश्‍नोत्तरे. आपण व्यक्‍तिगतरित्या झटू शकतो अशा काही फायदेकारक ध्येयांबद्दल सांगा. इतरांना अधिक करण्यास मदत करू शकतो अशा मार्गांची चर्चा करा.

गीत १७१ (५९) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर ३१ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १६९ (२८)

१२ मि:स्थानिक घोषणा. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जगिक सुट्या जवळ येत असताना, सर्वांना साहाय्यक पायनियर या नात्याने नाव नोंदवण्याबद्दल विचार करण्यास उत्तेजन द्या. तसे करण्यास आपल्याला अधिक वेळ कसा मिळेल यावर काही सूचना द्या.

१५ मि:स्थानिक गरजा. किंवा मे १५, १९९४, टेहळणी रुज नियतकालिकाच्या पाक्षिक आवृत्त्यांमध्ये, पृष्ठे २१-३ वरील “तुम्हाला सहनशीलता बाळगता येईल का?” या लेखावर आधारित भाषण देण्यास वडिलांना सांगा.

१८ मि:नोव्हेंबरच्या सादरतेसाठी तयारी करा. काही व्यक्‍तींना बायबलच्या ज्ञानाबद्दल कोणतीही पार्श्‍वभूमी नसली, परंतु त्यांना बायबल वाचण्यास आणि त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्यास आस्था आहे, तर आपण न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे उत्कृष्ट, वाचण्यास सोपे, उत्तम संदर्भ आणि अभ्यासाच्या साधनांनी युक्‍त असे आधुनिक इंग्रजी भाषांतर आहे असे सांगून सादर केले पाहिजे. बायबल असलेल्या व्यक्‍तींना आपण हे दाखवले पाहिजे की न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे त्यापेक्षा श्रेष्ठ का आहे. “ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशियल” (पृष्ठे ३२७-८, परि. १-६) या पुस्तकाचा संदर्भ द्या. यहोवाचे नाव का वापरले गेले आहे आणि प्रचारातील भाषेचा उपयोग केल्याने काय फायदे होतात हे दाखवणारी काही उदाहरणे द्या. “बायबल वडर्स्‌ इंडेक्सड्‌” सारख्या बायबलच्या मागील साहाय्यक सदरांबद्दल सांगा. परिचित वचने लवकर शोधण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. “बायबलच्या पुस्तकांची सूची,” कोणी पुस्तक लिहिले, कोठे व केव्हा लिहिले तसेच किती वेळ लागला हे सर्व दाखवते. रिझनिंग पुस्तकाचा संदर्भ द्या (पृष्ठ ५९, उपशिर्षक “बायबल प्रॉफेसी एक्सप्लेन्स्‌ द मिनींग ऑफ वर्ल्ड कंडीशन्स्‌”) आणि तुम्ही योहान १७:३ आणि स्तोत्र ३७:१०, ११, २९ वर आधारित शास्त्रवचनीय संभाषण कसे सुरु करू शकता यावर चर्चा करा. स्थानिक क्षेत्रात न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन आणि द बायबल—गॉड्‌स वर्ड ऑर मॅन्स्‌? हे पुस्तक कसे सादर केले जाऊ शकते त्याचे कार्यक्षम प्रचारकाकडून प्रात्यक्षिक दाखवा. दुसऱ्‍या प्रात्यक्षिकात प्रचारकाने मंडळीत उपलब्ध असलेली एकापेक्षा अधिक माहितीपत्रके किंवा १९२-पानी पुस्तके सादर करावीत.

गीत १३६ (६१) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा