आताच वेळ आहे
१ प्रेषित पौलाने करिंथकरांना त्याचे दुसरे पत्र लिहिले तेव्हा त्यांनी जरूसलेममधील त्यांच्या सह बांधवांकरता उत्तम मदतीचे कार्य करण्याचे ठरविले होते याबद्दल त्यांना आठवण करून दिली. तथापि, एक वर्ष उलटून गेले आणि तरीही त्यांनी सुरु केलेले काम पूर्ण केले नव्हते. यास्तव त्याने त्यांना आर्जवले: “मग एवढ्या उत्साहाने आरंभ केलेले हे कार्य तेवढ्याच आनंदाने . . . आता पूर्ण केले पाहिजे.”—२ करिंथ. ८:११, सुबोध भाषांतर.
२ आपण सर्वांनी कधी ना कधी स्वतःसाठी काही ध्येये राखली असतील. आपण कदाचित सेवेतील आपला सहभाग वाढवण्याचे, आपल्या बांधवांना अधिक चांगल्यारीतीने जाणण्याचे, सेवेच्या सुसंधीसाठी पात्र होण्याचे, किंवा एखाद्या कमजोरपणावर मात करण्याचे ठरवले असेल. आपण चांगल्या हेतूंसहित सुरवात केली असेल परंतु कदाचित ते ध्येय गाठण्यासाठी त्याचा पिच्छा पुरवला नसेल. त्याची जाणीव होईपर्यंत, काहीच प्रगती न करता आठवडे, महिने किंवा वर्षेही उलटली असतील. मग आपल्याला, जे सुरु केले ते ‘पूर्ण करा’ हा सल्ला स्वतःला लागू करून घ्यावयाची गरज आहे का?
३ आपली ध्येये गाठणे: व्यक्तिगतपणे मनात ठरवणे सोपे असते परंतु ठरवलेली गोष्ट पार पाडणे अधिक कठीण असते. दिरंगाईने कोणतीही प्रगती निष्फळ ठरू शकते. आपल्याला मनाशी निश्चय करण्याची गरज आहे आणि मग विलंब न करता त्याचा माग घेतला पाहिजे. व्यक्तिगत संघटनेची आवश्यकता आहे. ते काम पूर्ण करण्यास लागणारा वेळ बाजूला राखणे आणि त्या वेळेचा त्याच हेतूसाठी उपयोग केला जातो याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. एक अंतिम रेषा आखणे आणि त्यातच काम पूर्ण करण्याची खात्री करण्यासाठी स्वतःला शिस्त लावणे ही उत्तम कल्पना आहे.
४ आपली ध्येये गाठणे कठीण होते तेव्हा ‘मी ते नंतर करीन,’ अशी सबब अगदी सहजपणे मांडली जाते. परंतु भविष्यात काय होईल याची जाणीव आपल्याला नसते. नीतीसूत्रे २७:१ म्हणते: “उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही.” शिष्य याकोबाने भविष्याबद्दल फाजील आत्मविश्वासी होण्याबद्दल ईशारा दिला कारण “तुम्हाला उद्याचे समजत नाही. . . . चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे.”—याको. ४:१३-१७.
५ इतक्या विचलित करणाऱ्या गोष्टी तसेच इतरांच्या वेगवेगळ्या मागण्या असताना आपली ध्येये सहजगत्या अस्पष्ट होऊ शकतात. त्यांना मनात ताजे राखण्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. ती बाब आपल्या प्रार्थनांमध्ये ठेवणे मदतीचे ठरेल. आपल्याशी परिचित असणाऱ्यांना आठवण करून देण्यास किंवा उत्तेजन देण्यास सांगितल्याने बराच फरक होऊ शकतो. दिनदर्शिकेवर त्याची नोंद केल्याने आपल्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यास ती एक चांगली स्मरणिका ठरेल. एखाद्या व्यक्तीने “अंतःकरणात जशी योजना केली असेल” तसा मनाशी निश्चय केला पाहिजे.—२ करिंथ. ९:७, पं.र.भाषांतर.
६ ऑक्टोबरचा महिना आपल्या ध्येयांवर अधिक लक्ष देण्यास चांगली संधी पुरवतो. घरोघरच्या कार्यात आणि पुनर्भेटींमध्ये आपण टेहळणी रुज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या सादर करणार आहोत. साध्य करू शकतो अशी उचित ध्येये आपण राखू शकतो का? ठराविक वर्गण्या करण्याचे ध्येय ठेवणे कसे असेल? किंवा आपल्या नियतकालिकांचे वाटप वाढवण्याच्या ध्येयासाठी प्रयत्न करणे कसे असेल? अधिक पुनर्भेटी घेणे किंवा नवीन बायबल अभ्यास सुरु करणे ही पुष्कळांकरता रास्त ध्येये असतील.
७ हे जग ‘नाहीसे होत’ असल्यामुळे महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी विलंब करणे सुज्ञतेचे ठरणार नाही. (१ योहा. २:१७) यहोवाच्या सेवेतील खास विशेषाधिकार आणि आशीर्वाद आपल्याला आता उपलब्ध आहेत. त्यांचा फायदा घेणे हे आपल्यावर अवलंबून आहे.