शाळेमध्ये तयार राहा
१ आम्हापैकी पुष्कळ जण दिनचर्येत गोवलेले असताना, आपल्या तरुण लोकांना शाळेमध्ये वेगवेगळ्या परिस्थितींना तोंड द्यावे लागते. शाळेमध्ये आनंददायक कार्यहालचाली असतात, परंतु भीती निर्माण करणाऱ्या काही गोष्टी देखील असतात. दर वर्षी युवकांना विविध शिक्षकांच्या हाताखाली शिकावे लागत असेल, नवीन विषय घ्यावे लागत असतील आणि अनोळखी विद्यार्थ्यांच्या निकट संबंधात राहण्याचा सामना करावा लागत असेल. आपल्या तरुण लोकांना, शाळेच्या अधिकाऱ्यांना सहयोग द्यावासा वाटेल आणि त्यांच्या सहविद्यार्थ्यांशी जुळणारे असावयास आवडेल, परंतु आध्यात्मिकरित्या हानिकारक असणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल दक्ष असावे हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.—१ करिंथ. १५:३३.
२ जगाचा दूषित करणारा प्रभाव टाळणे हे साक्षीदार मुलांसाठी आणि युवकांसाठी अधिक चिंतेची बाब बनली आहे. तो आजच्या पुष्कळ देशातील शैक्षणिक व्यवस्थांमधून पसरला आहे. तरुण तसेच वृद्ध ख्रिश्चनांनी जगिक दर्जांना आणि नैतिक विषयांबाबत अलिकडे उत्तेजित केल्या जाणाऱ्या विचारांना धैर्याने नाकारले पाहिजे. त्यांनी यहोवाच्या वचनाचा सल्ला घेऊन आणि त्याद्वारे मार्गदर्शित होऊन ‘सावध राहिले’ पाहिजे. (स्तोत्र. ११९:९) मुलांना उचित मार्गदर्शन देता यावे म्हणून शाळेच्या अभ्यासक्रमात कशाचा समावेश आहे याबद्दल संबंधित पालकांना कळवण्यात आले पाहिजे. शाळेत किंवा इतर ठिकाणी शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी यहोवाच्या सेवकांकडून अपेक्षिल्या जाणाऱ्या पवित्रतेच्या आणि शुद्धतेच्या विरोधात असतील तर, त्यांना टाळण्यात आले पाहिजे.—१ पेत्र १:१५, १६.
३ त्याचप्रमाणे राष्ट्रीय समारंभ, सणाच्या सुट्या, खेळ, किंवा स्नेह संमेलने अशा विषयांचा समावेश असणाऱ्या गोष्टींचा सामना करणे देखील फारच सर्वसामान्य आहे. या बाबींमध्ये स्कूल ॲण्ड जेहोवाज विट्नेसेस हे माहितीपत्रक ख्रिस्ती युवकांना मदतदायी आहे. तरुणांचे पालक या प्रकाशनाची प्रत घेऊन शिक्षकांशी बोलण्यास पुढाकार घेतात, तेव्हा संभाव्य कठीण परिस्थितींवर मात केली जाऊ शकते किंवा त्यांचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. ते असे समजावून सांगू शकतात की, यहोवाचे साक्षीदार काही विशिष्ट कार्यहालचालींमध्ये सहभाग का घेत नाहीत हे समजावण्यात हे माहितीपत्रक त्यांची मदत करील. शिक्षकाला ही माहिती उपलब्ध करून देण्यामुळे सहकार्याचा आत्मा निर्माण करण्यात अधिक हातभार लागेल.
४ शिवाय, ख्रिस्ती विद्यार्थ्यांनी नेहमीच स्कूल माहितीपत्रकाची एक व्यक्तिगत प्रत त्यांच्या शाळा पुस्तकांसोबत ठेवली तर चांगले असेल. आपल्या विश्वासांवर लक्ष केंद्रीत केले जाते, तेव्हा विद्यार्थी प्रश्न विचारतात व अशाप्रकारे त्यांना साक्ष देण्याच्या पुष्कळ संधी प्रस्तुत होतात. तसेच, साक्षीदार मुलांनी नेहमीच व्यक्तिगतपणे अद्ययावत, साक्षीदारांच्या सह्या व स्वतः सही केलेले आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्ड व ओळखपत्र सोबत न्यावे. हा सल्ला लागू करणारे, निश्चितच “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो,” त्याच्याप्रमाणे असतील.—नीती. २२:३.