घोषणा
▪ साहित्य सादरता
सप्टेंबर: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २०.०० रुपयांना (मोठ्या आकाराचे ४०.०० रुपयांना)
ऑक्टोबर: अवेक! किंवा टेहळणी बुरुज यांची वर्गणी. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ६०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची व पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ३०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही.
नोव्हेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स यासोबत द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स्? इंग्रजीशिवाय इतर भाषांमध्ये स्कूल माहितीपत्रकाऐवजी कोणतेही माहितीपत्रक किंवा १९२-पृष्ठांचे कोणतेही पुस्तक सादर केले जाऊ शकते.
डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक ४०.०० रुपयांना. तुमच्या साठ्यात हे पुस्तक नसल्यास किंवा परिस्थितीमुळेच पर्यायी सादरता करावी लागल्यास, तुम्ही कदाचित माय बुक ऑफ बायबल स्टोरिज् या पुस्तकाचा वापर करू शकता किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक त्याच किंमतीत देऊ शकता (लहान आकाराचे अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २०.०० रुपयांना).
▪ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणा एकाने, सप्टेंबर १ रोजी किंवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर, मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यावर, मंडळीत त्याची घोषणा करा.
▪ ऑक्टोबरमध्ये साहाय्यक पायनियरींग करू इच्छिणाऱ्या प्रचारकांनी त्यांचे अर्ज लवकर द्यावेत. यामुळे वडिलांना साहित्य आणि क्षेत्राची आवश्यक व्यवस्था करण्यास मदत मिळेल.
▪ वडिलांना याची आठवण करून दिली जाते की, पुन्हा घेतले जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या बहिष्कृत किंवा मंडळीपासून अलिप्त केलेल्या व्यक्तींच्या बाबतीत, त्यांनी एप्रिल १५, १९९१, च्या वॉचटावर, पृष्ठे २१-३ वरील सूचनांचे अनुसरण करावे.
▪ आतापासून, ‘रेकॉर्ड ऑफ डिस्फेलोशिपींग ऑर डिस्असोसिएशन,’ चे S-79b कार्ड, हिरव्या रंगाचे असण्याऐवजी फिक्या तपकिरी रंगाचे असेल. S-79a हे कार्ड नारंगी रंगाचेच असेल. दोन्ही कार्ड भरण्याची पद्धत तीच राहील.
▪ जून १९९३, आमची राज्य सेवा यात उल्लेखिल्याप्रमाणे, या वर्षी देखील आम्ही केरळच्या कोणत्याही अधिवेशनांसाठी विशिष्ट विभाग नेमून देत नाही. त्याऐवजी, केरळच्या डिसेंबर ३०, १९९४ ते जानेवारी १, १९९५ च्या कोट्टायम मधील अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यास आम्ही सर्व साक्षीदार आणि आस्थेवाईकांना उत्तेजन देतो. भारतातील सर्व बांधवांना, इच्छा असेल, तर या अधिवेशनासाठी उपस्थित राहावयास आम्ही उत्तेजन देतो, जेणेकरून तेसुद्धा या मोठ्या एकत्रीकरणात भाग घेऊ शकतील. परंतु राहण्याच्या व्यवस्थेसाठी त्यांनी कोट्टायम येथील अधिवेशन मुख्यालयाला लवकर लिहावे अशी आम्ही विनंती करतो. केरळचे—जानेवारी ६-८, १९९५ मधील कालिकत येथील—दुसरे अधिवेशन लहान असेल. ते, आजारपणामुळे किंवा काही घरातील जबाबदाऱ्यांमुळे कोट्टायम अधिवेशनाला उपस्थित न राहता आलेल्या व्यक्तींकरता ठेवण्यात आले आहे.
▪ आम्हाला बंगाली भाषेसाठी अधिक भाषांतरकार आवडतील. पूर्ण-वेळेच्या भाषांतर कार्यासाठी प्रशिक्षण घेण्यात आस्था असलेल्या बंधू व भगिणींना, भाषांतराच्या चाचणीच्या साहित्यासाठी लिहून विनंती करावयास आमंत्रण आहे. अर्जदार १९ ते ३५ या वयोगटातील असावेत, ते अविवाहित किंवा विवाहित, मुले नसलेले, बेथेलमध्ये सेवा करण्यास पात्र असलेले आणि बंगाली व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असलेले असावेत. पायनियरांना प्राधान्य दिले जाईल.
▪ संस्था व्यक्तिगत प्रचारकांच्या साहित्याच्या मागण्या पुरवीत नाही. एखादी वस्तू हवी असणाऱ्या व्यक्तीने साहित्य सेवकाला कळवावे जेणेकरून ते तत्काळ मंडळीच्या पुढील साहित्य मागणीत त्याचा समावेश करतील. मंडळीने संस्थेला साहित्याची मागणी पाठवण्याआधी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी प्रत्येक वेळी घोषणा करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून व्यक्तिगत साहित्याच्या वस्तू मिळवण्यास इच्छुक असणारे सर्वजण साहित्य हाताळणाऱ्या बांधवाला कळवू शकतील.
▪ आम्ही आता बंगाली, हिंदी, मराठी व नेपाळी या भाषांमध्ये अवेक! याला, शीर्षक व तारखासह त्रैमासिक असे प्रकाशित करणार आहोत. अवेक! माहितीपत्रकांच्या स्थायी मागण्या असणाऱ्या मंडळ्यांना आम्ही ही मासिके पाठवून देऊ. येथून पुढे डिस्ट्रीब्यूटर ऑर्डर फॉर्म, (M-AB-202) याचा उपयोग करून मंडळ्यांनी अवेक! नियतकालिकांच्या या आवृत्तींच्या मागणीतील बदल किंवा नवीन मागण्या पाठवाव्यात, अशी विनंती करण्यात येते. संस्थेकडे ज्यांची स्थायी मागणी आहे त्यांना आम्ही नियतकालिके पाठवीत राहू. ही अवेक! त्रैमासिके वर्गण्यांद्वारे उपलब्ध नसतील, परंतु इतर भाषांप्रमाणेच या भाषांमध्येही टेहळणी बुरुज आणि अवेक! यांच्या किरकोळ प्रतींची सादरता मिळून करण्याचे उत्तेजन तुम्हाला दिले जाते.