अनंतकाल जगू शकाल या पुस्तकामध्ये आस्था वाढवा
१ आम्ही लोकांच्या घरी भेटी देतो तेव्हा, बहुतेकवेळा ते “या व्यवस्थीकरणाच्या चिंता” यांमध्ये गुंतलेले असल्याचे आम्हास आढळते. (मार्क ४:१९, NW) विचार करण्यास लावणाऱ्या एखाद्या सादरतेद्वारे त्यांचे लक्ष केंद्रीत करण्याचे आव्हान यावेळी आम्हासमोर असते. प्रारंभी, आम्हाला जे म्हणायचे असते त्याबद्दल पुष्कळ लोकांना कमी आस्था असू शकते. त्यांच्या जीवनावर प्रभाव पाडणारे असे काही आपण म्हणू शकलो, तर आम्ही राज्य संदेशाबद्दल काही आस्था उत्तेजित करू शकू. अनंतकाल जगू शकाल या पुस्तकातून अपील करणारे बोलण्याजोगे मुद्दे निवडणे ही संभाषणे सुरू करण्याची एक गुरुकिल्ली आहे. तुम्ही काय म्हणू शकता?
२ तुम्ही कदाचित हा प्रस्ताव वापरू शकता:
▪“तुमच्याजवळ सामर्थ्य असते तर, तुम्ही आमच्या दिवसातील कोणत्या यातनादायक समस्येला सुधारले असते? [प्रतिसादास वाव द्या व उचित असल्यास, पुष्कळ लोक अशाचप्रकारे विचार करतात हे मान्य करा.] आतापर्यंत, जागतिक नेत्यांना आजच्या पुष्कळ कठीण समस्यांचे उपाय मिळवण्यात जराही यश मिळालेले नाही. परंतु मानवजातीला पीडित करणाऱ्या सर्व समस्यांचा अंत करू शकणारी व अंत करील अशी एक व्यक्ती आहे. कृपया स्तोत्र १४५:१६ येथे जे सांगण्यात आले आहे याची नोंद घ्या. [ते शास्त्रवचन वाचा, व पृष्ठे ११-१३ वरील चित्रांकडे निर्देश करा.] पृष्ठ १४ वरील परिच्छेद १४ आम्ही आताच चर्चिलेला प्रश्न उपस्थित करतो व पुढे विचारतो: ‘परंतु हे सर्व कधी होईल?’” ते पुस्तक याचे उत्तर देईल हे समजावून सांगा व २० रुपये अनुदानात ते पुस्तक सादर करा.
३ किंवा तुम्ही असे म्हणू शकता:
▪“प्रिय व्यक्तीला मृत्युत गमावल्यामुळे होणाऱ्या पोकळीची तुम्हाला कदाचित जाणीव असेल. कदाचित त्यामुळे तुम्हाला फारच निराश व असाहाय्य असे वाटले असेल. तुम्ही या प्रश्नांवर कदाचित विचार केला असेल: [पृष्ठ ७६ वरील परिच्छेद १ मधील प्रश्न वाचा.] या प्रश्नांची उत्तरे मिळणे सांत्वनदायक नसेल काय? मृत जनांसाठी पवित्र शास्त्र एक निश्चित आशा देते हे जाणून तुम्हाला उत्तेजन मिळेल. [योहान ५:२८, २९ वाचा.] हे पुस्तक आम्हाला मृतांच्या स्थितीविषयी व भविष्यासाठी कोणती आशा आहे हे समजण्यास मदत करते.” संक्षिप्तपणे ८ ते २० अध्यायांचा संदर्भ द्या. घरमालकाला पुस्तकाचे परीक्षण करण्याची संधी द्या व त्याची सादरता करा.
४ अनौपचारिकरित्या साक्ष देण्यासाठी तुम्हाला संधी मिळतील याची अधिक शक्यता आहे. तसे असल्यास, तुम्ही कदाचित तुमच्या शब्दात असे म्हणू शकता:
▪“आजकाल जग समस्यांनी भरलेले आहे व तुम्हालाही त्या असतीलच यात काही शंका नाही. परंतु याचे दुःख वाटते की, निरपराधी जणांना अधिककरून भोगावे लागते. देव या सर्व दुःखांचा अंत करील असे तुम्हाला वाटते का? [प्रतिसादास वाव द्या.] देव त्याची सेवा करणाऱ्यांसाठी काय करण्याचे अभिवचन देतो ते मला तुम्हाला दाखवू द्या. [स्तोत्र ३७:४० वाचा व नंतर अनंतकाल जगू शकाल या पुस्तकातील पृष्ठ ९९ उघडा.] देवाने दुष्टाईस परवानगी का दिली व तो तिचा अंत कसा करील याविषयी हे पुस्तक स्पष्टीकरण देते.”
५ तुम्ही एक तरुण प्रचारक असल्यास, पृठे १५६-८ वरील चित्रांवर आधारित सादरतेचा उपयोग करू शकता. तुम्ही कदाचित असे विचारून सुरवात करू शकता:
▪“अशाप्रकारच्या जगात राहण्यास तुम्हाला आवडेल का? [प्रतिसादास वाव द्या.] यापैकीचे प्रत्येक सुंदर चित्र देवाचे वचन, पवित्र शास्त्र यामध्ये सांगितलेल्या अभिवचनावर आधारित आहे. [शास्त्रवचनीय संदर्भ दाखवा.] संपूर्ण पृथ्वी नंदनवन बनवण्याच्या देवाच्या अभिवचनाबद्दल अधिक शिकण्यासाठी, हे पुस्तक तुम्हाला मदत करील. त्यामध्ये जीवन रक्षक माहिती आहे आणि ते वाचण्यात घालवलेला वेळ सार्थकी लागेल.”—योहा. १७:३.
६ हे पुस्तक सादर करताना, सकारात्मक व उत्साहपूर्ण असा. त्यामध्ये आस्था वाढवा व आमच्या सुंदर राज्य आशेची इतरांसोबत सहभागिता करा.