पुनर्भेटींमध्ये आस्था वाढवणे
१ सेवेची तुलना योग्यपणे शेतीबरोबर करण्यात आली आहे. तसेच पुनर्भेटींची तुलना मशागत करणे व पाणी घालणे याच्याशी केली आहे. (मत्त. १३:२३; लूक १०:२; २ करिंथ. ९:१०) “देवाचे सहकारी,” या नात्याने, आम्ही, नवीन बीजांकुराला प्रौढतेप्रत वाढण्यास व फलदायी होण्यास मदत करण्याच्या बंधनाखाली आहोत. (१ करिंथ. ३:६, ९) आम्ही हे उत्तमरित्या कसे साध्य करू शकतो?
२ आस्था प्रदर्शित करणाऱ्या सर्वांच्या पुनर्भेटी घेण्यास तत्पर असा. तुमच्या घरोघरच्या कार्याच्या नोंदपत्रकांची उजळणी करा. कोणाला भेट द्यावी व काय चर्चा करावी याचा विचार करा. सामान्यतः, सुरवातीच्या भेटीदरम्यान जी चर्चा झाली त्यावरूनच तुमच्या चर्चेचा विषय ठरवला जाईल. लवचीक असा. वापरता येतील अशा इतर शास्त्रवचनीय विचारांना मनात राखा. पवित्र शास्त्राची हृदयापर्यंत पोहंचण्याची शक्ती ओळखून, त्याचा उपयोग करणे नेहमीच चांगले ठरते.—इब्री. ४:१२.
३ ज्या लोकांनी आपल्या समस्या हे माहितीपत्रक स्वीकारले त्यांच्या परिणामकारी पुनर्भेटी कशा कराव्यात यावरील सूचनांसाठी, ऑगस्ट १९९२ ची आमची राज्य वा पृ. ४ पाहा.
“देव खरोखरी आपली काळजी करतो का?” हे माहितीपत्रक तुम्ही दिले असल्यास तुम्ही असे काहीतरी म्हणून सुरवात करू शकता:
▪“पुष्कळ प्रामाणिक लोक असा विश्वास बाळगतात की, देव पृथ्वीचा नाश करणार आहे. इतरांना अशी भीती आहे की, मनुष्य स्वतःच तसे करील. तुम्हाला काय वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की, पृथ्वीचा नाश करण्याऐवजी, देव तिला अधार्मिकतेपासून शुद्ध करील व शांती आणि सुरक्षिततेचे ठिकाण बनवील.” पृष्ठ २२ वर लक्ष वेधवा व तेथे अवतरित केलेले नीतीसूत्रे २:२१, २२ वाचा. आस्था दिसून आल्यास, गृह पवित्र शास्त्राभ्यासाच्या व्यवस्थेबद्दल समजावून सांगा किंवा अलिकडील नियतकालिके सादर करा. पुन्हा येण्यासाठी व देवाच्या अभिवचन दिलेल्या नव्या जगाबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी वेळ निश्चित करा.
४ तुम्ही “पहा!” हे माहितीपत्रक, दिले असल्यास कदाचित असे म्हणू शकता:
▪“माझ्या आधीच्या भेटीत, तुम्हाला दिलेल्या माहितीपत्रकाच्या मुखपृष्ठावर चित्रित केल्याप्रमाणे, पृथ्वी ही नंदवनवन बनवण्याच्या देवाच्या अभिवचनाबद्दल आपण पवित्र शास्त्रातून वाचले. देवाच्या इच्छेबद्दल व त्याचा आम्हावर कसा परिणाम होतो याबद्दल अधिक शिकल्याने आम्ही या आशीर्वादाचा आनंद लुटू शकतो.” योहान १७:३ वाचा त्यानंतर पृष्ठ २७ वरील परिच्छेद ५२ आणि ५३ काढा. देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान घेणे जरुरीचे का आहे याची संक्षिप्त चर्चा करा.
५ चर्चला जाणाऱ्या व्यक्तीला “जीवनाचा उद्देश” हे माहितीपत्रक दिल्यानंतर त्याचा मागोवा घेताना, तुम्हाला कदाचित असे म्हणणे उचित वाटेल:
▪“तुम्ही प्रभूची प्रार्थना पुष्कळ वेळा म्हटलीच असेल. देवाचे राज्य यावे अशी प्रार्थना करताना तुमच्या मनात कोणता विचार येतो?” घरमालकाच्या प्रतिसादानंतर पृष्ठ २६ वरील ८ आणि ९ परिच्छेदाचा संदर्भ घ्या व नंतर दानीएल २:४४ वाचा. कदाचित तुम्ही संभाषण पुढे चालू ठेवून समजावून सांगू शकता की, देवाच्या राज्याचे येणे म्हणजे दुष्टाई व पीडेचा अंत होय. आपण देवाच्या नजरेत धार्मिक ठरलो तर, या पृथ्वीवर आपण नंदनवनात सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटू शकतो हे दाखवून द्या.
६ हे लक्षात ठेवा की, साहित्याचे वाटप झाले असले किंवा नसले तरी ऐकण्याची इच्छा दाखवणाऱ्या कोणाकडेही पुनर्भेटी केल्या जाऊ शकतात. पुनर्भेटी करण्यासाठी दर आठवडी काही वेळ बाजूला राखून ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आढळणाऱ्या आस्थेला वाढवण्यासाठी यहोवा तुमच्या परिश्रमपूर्वक प्रयत्नांना आशीर्वादित करील. तुमच्या प्रयत्नांना त्याच्या स्तुतीस्तव फळ मिळो.—योहान १५:८.