जुलैसाठी सेवा सभा
जुलै ४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १४१ (६४)
१० मि:स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यातील लागू होणाऱ्या घोषणा. मंडळीच्या साठ्यात असणाऱ्या पुस्तिकांच्या शिर्षकांचा उल्लेख करा; सेवेत वापरण्याकरता पुरवठा मिळवण्यासाठी प्रचारकांना उत्तेजन द्या. मंडळीकडे एका विशिष्ट भाषेत कोणत्याच पुस्तिका नसतील तर, त्या भाषेत वापरू शकतील अशा माहितीपत्रकांबद्दल सुचवा.
१७ मि:“खंड पडू न देता घरोघरी जाणे.” प्रश्नोत्तरे. दारोदारीच्या कार्याद्वारे संपर्क साधल्या गेलेल्या श्रोत्यांपैकी काहींकडून गुणग्राहकतेचे वक्तव्य मिळवा.
१८ मि:“इतरांना सत्य शिकण्यासाठी मदत करा.” श्रोत्यांशी चर्चा करा. दोन किंवा तीन सुचवलेल्या सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी कार्यक्षम प्रचारकांची व्यवस्था करा. संक्षिप्त, सरळ प्रस्तावाच्या लाभांवर जोर द्या.
गीत १२० (२६) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै ११ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ११५ (१५)
१२ मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल व संस्थेच्या कोणत्याही देणगीच्या पोचपावत्या वाचून दाखवा. देणगी दिल्याबद्दल प्रशंसा करा. (निर्ग. ३५:२९) प्रचारकांना सायंकाळचे साक्षकार्य करण्याचा विचार करण्यास उत्तेजन द्या. ती दारोदारचे कार्य किंवा पुनर्भेटी करण्याची उत्तम वेळ आहे.
१५ मि:स्थानिक गरजा. किंवा “कीप युवर डिस्टंस व्हेन डेंजर थ्रेटन्स्,” या फेब्रुवारी १५, १९९४ वॉचटावर, पृष्ठ २२-५ वरील लेखावर आधारित अनुभवी वडिलांकडून भाषण द्या.
१८ मि:“आम्ही पुन्हा गेल्यावाचून ते कसे ऐकतील?” श्रोत्यांशी चर्चा करा. परिच्छेद ३ व ४ मधील सूचनांचे प्रात्यक्षिक दाखवा. अभ्यास सुरु करण्याच्या ध्येयाने पुनर्भेटी का कराव्यात हे दाखवून अधिक विवेचने द्या.
गीत १२३ (६३) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै १८ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १२५ (४४)
१५ मि:स्थानिक घोषणा. सप्ताहांतासाठी क्षेत्र सेवा व्यवस्थांबद्दल सांगा, व नियतकालिक वितरणात सहभाग घेण्यासाठी उत्तेजन द्या.
८ मि:प्रश्न पेटी. प्रश्नोत्तराने चर्चा.
२२ मि:“रस्त्यावरील परिणामकारक साक्षकार्याद्वारे आस्थेवाईकांचा शोध घेणे.” सेवा पर्यवेक्षक किंवा दुसरे कार्यक्षम वडील जे साक्षकार्यात परिणामकारक आहेत ते, रस्त्यावरील साक्षकार्यात अनुभव असणाऱ्या दोन किंवा तीन प्रचारकांशी लेखाची चर्चा करतात. चर्चेमध्ये दोन किंवा तीन संक्षिप्त अनुभवांचा समावेश असू शकतो. चालू नियतकालिकांसह प्रस्तावांचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत १३४ (३३) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै २५ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १४० (७७)
१० मि:स्थानिक घोषणा. अलिकडील नियतकालिक अंकांच्या सादरतेचे प्रात्यक्षिक दाखवा. नियतकालिक वितरणामध्ये सर्वांना सहभाग घेण्यासाठी उत्तेजन द्या.
१५ मि:“तरुण लोकांना चांगल्या उदाहरणाची गरज आहे.” प्रश्नोत्तरे. चांगले उदाहरण असणाऱ्या एक किंवा दोन युवकांची मुलाखत घ्या. त्यांनी स्वतःसाठी कोणती आध्यात्मिक ध्येये राखली आहेत व त्यांच्या परिश्रमांद्वारे अधिक आशीर्वाद कसे प्राप्त झाले ते समजावून देण्यास त्यांना सांगा.
२० मि:आपल्या सादरतांचा परिणामकारकपणा सुधारणे. कुटुंबाच्या गटाचा, प्रशाला मार्गदर्शक पुस्तक (इंग्रजी) पृष्ठ ९९, परिच्छेद ९ वरील सूचनांवर आधारित सरावाचा कार्यक्रम होतो. कुटुंबाचा एक सदस्य सादरतेचे प्रात्यक्षिक दाखवतो, इतरजण प्रशंसा करतात व सुधारण्याबद्दल सूचना सादर करतात. तुमच्या भागात आढळणारा एक सर्वसामान्य आक्षेपाचा समावेश करा व त्यावर मात कशी करावी याबद्दल चर्चा करा.
गीत १८७ (९३) व समाप्तीची प्रार्थना.