तरुण लोकांना चांगल्या उदाहरणाची गरज आहे
१ ‘यहोवाच्या नावाचे स्तवन’ करणाऱ्या तरुण लोकांची वाढती संख्या आम्हामध्ये असल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. (स्तोत्र १४८:१२, १३) त्यांच्यापैकी पुष्कळ जण अजूनही वयाने बरेच लहान आहेत. त्यांचे पालक व मंडळीतील इतर प्रौढ लोकांचे प्रशिक्षण व उदाहरण, यावरून त्यांची प्रगती बहुतेककरून ठरवली जाते. तथापि, इतर तरुण लोक विशेषकरून त्यांच्याहून मोठ्या यौवनावस्थेतील युवक व तरुण प्रौढ जो प्रभाव पाडतात, त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. तुम्ही या वयोगटातील असल्यास ही विवेचने तुम्हास फायदेकारक ठरतील.
२ यौवनावस्थेत पदार्पण केलेल्या तरुण लोकांचा त्यांच्याहून मोठ्या युवकांची नक्कल करण्याचा कल असतो. ते ज्यांची वाहवा करतात अशांचे जवळचे सोबती असण्याची त्यांची स्वाभाविक इच्छा असते. बहुधा, त्यांच्याहून किंचित वयाने मोठे असणाऱ्या व ज्ञानी व अधिकच पुढारलेले असल्याचे दाखवणाऱ्या इतर युवकांची प्रशंसा ते करत असतात. याचा परिणाम म्हणून ते तुमची बोलण्याची पद्धत व वागणूकीची नक्कल करू शकतात. त्याचप्रमाणे, ते आध्यात्मिक मूल्यांबद्दलची गुणग्राहकता व मंडळीच्या कार्यांमधील तुमच्या सहभागाचे देखील अनुकरण करतात.
३ प्रौढ युवक, या नात्याने तुम्हाला एक सुसंधी आहे तसेच, तुमच्यावर ही एक भारी जबाबदारी देखील आहे. आता, तुमचे उदाहरण तुमच्यापेक्षा तरुण असणाऱ्या सोबत्यांवर प्रभाव पाडीत आहे. स्वतःला विचारा, ‘तुमच्यापेक्षा लहान असणाऱ्या तरुण लोकांवर मी कोणत्या प्रकारचा प्रभाव पाडीत आहे? मी गंभीर-विचाराचा आहे का? मी मूर्खपणा व चुकीच्या ‘तरुणपणाच्या वासना’ टाळणारा आहे का? माझे पालक, वडील व इतर प्रौढ लोकांना मी आज्ञाधारकता व आदर प्रदर्शित करतो का?’ (२ तीम. २:२२; कलस्सै. ३:२०) तुम्ही जे म्हणता व करता ते तुमचे निरीक्षण करणाऱ्या इतर युवकांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण कारण ठरते.
४ राज्य संदेशाचा प्रचार करणे हे मंडळीचे मुख्य काम आहे. तुमचा मनःपूर्वक व नियमित सहभाग तुमच्या सोबत्यांना अधिक क्रियाशील बनण्यास उत्तेजन देऊ शकतो. तुम्हाला पायनियर सेवा करण्यास शक्य असेल तर, तुमचे मित्र देखील अशाच पद्धतीने उत्तेजित होतील. सभांमध्ये उत्तरे देणे तसेच, राज्य सभागृहातील आवश्यक कामे करण्यात स्वतःहून मदत केल्यामुळे देखील एक उदाहरण ठेवले जाते.
५ पौलाने पुढील सल्ला दिला तेव्हा तीमथ्य त्याच्या यौवनावस्थेत नव्हता परंतु, तरीसुद्धा तुम्ही युवकहो त्याचे अवलंबन करू शकता: “भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो.” (१ तीम. ४:१२) यहोवाच्या सेवेत तुमच्या उत्साहपूर्वक व संपूर्ण जिवाने घेतलेल्या सहभागामुळे, तुमचे सोबती व निरीक्षण करणाऱ्या तरुणांना ते उभारणीकारक पद्धतीने उत्तेजित करील. ते त्यांस आध्यात्मिकरित्या प्रौढ मनुष्य बनण्यास प्रगती करण्यासाठी मदत करील. (इफि. ४:१३) नव्यानेच अभ्यास करणाऱ्या कुटुंबांचे सदस्य असणारे तरुण तुम्हामध्ये काही पाहिल्यामुळे सत्याकडे आकर्षित होऊ शकतील.
६ त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, ईश्वरी गुण प्रदर्शित करण्यात तुमचा मेहनतीपणा, यहोवा व त्याच्या संघटनेवर अनुकूलरित्या प्रतिबिंबित होतो. (नीती. २७:११) तुम्हातील व जगाच्या तरुण लोकांतील विरुद्धता पाहून प्रामाणिकपणे निरीक्षण करणारे त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतील. त्यासाठी, यहोवाच्या स्तुतीकरता तुम्ही एक मौल्यवान दान करीत असताना तुमच्यापेक्षा लहान असणाऱ्या तरुण लोकांची मदत करण्याची अद्वितीय संधी तुम्हाजवळ आहे.—स्तोत्र ७१:१७.