रस्त्यावरील परिणामकारक साक्षकार्याद्वारे आस्थेवाईकांचा शोध घेणे
१ येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना राज्याची सुवार्ता ऐकण्यास योग्य अशा जणांना शोधून काढण्याची सूचना दिली. (मत्त. १०:११) परंतु, आज पुष्कळ भागांमध्ये, लोकांना त्यांच्या घरी भेटणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. तर, भेटू न शकलेल्या योग्य जणांपर्यंत पोहंचण्यासाठी काय केले जाऊ शकते?
२ घरोघरच्या कार्यात भेटू न शकलेल्या लोकांना शोधण्यासाठी रस्त्यावरील साक्षकार्य हा सर्वात परिणामकारक मार्ग असू शकतो. आम्ही रस्त्यावरील साक्षकार्य बस स्थानकांजवळ, अधिक सुरक्षा असलेल्या इमारतींजवळ, सार्वजनिक बागा, व लोक त्यांच्या दररोजच्या कामांमध्ये गुंतलेले असतील अशा इतर ठिकाणी करू शकतो.
३ रस्त्यावरील साक्षकार्याचा उल्लेख केल्यावर काहींच्यात भीतीच्या भावना निर्माण होतात. ते त्या कार्यात सहभाग घेण्यासाठी कुचराई करत असतील कारण, ते लाजतात किंवा राज्य संदेश ज्यांना आवडत नाही असे लोक नकार देतील असे आगाऊ गृहीत धरतात. अशी अस्वस्थता बहुधा निराधार असते. या कार्यातील अनुभवी लोक सांगतात की, ते दारोदारीच्या साक्षकार्यापेक्षा मुळीच अवघड नाही. वास्तविकतेत, त्यांना असे आढळले की, रस्त्यावर पुष्कळ लोकांना विविध कारणांसाठी थांबवले जाण्याची सवय झालेली असते. तसेच काहीजण घरच्यापेक्षा, येथे अधिक चर्चा करण्यास किंवा ऐकण्यास तयार असतात. यासाठी आपण “धैर्य [वेचले]” तर संतुष्ट करणाऱ्या परिणामांनी आश्चर्यचकित होऊ.—१ थेस्स. २:२.
४ रस्त्यावरील कार्य अधिक परिणामकारकतेने कसे केले जाऊ शकते? चांगली तयारी करणे महत्त्वाचे आहे. नियतकालिके आगाऊ वाचा. तुम्हाला भेटणाऱ्या लोकांना आवडतील असे तुम्हाला वाटते असे एक किंवा दोन बोलके मुद्दे निवडा. तीस सेकंदाची सादरता अगदीच योग्य आहे. इतरांशी व्यक्तिगत संपर्क ठेवण्याचे ध्येय असल्यामुळे, पुष्कळ लोक वर्दळ करतील असे ठिकाण निवडा. एखादा प्रचारक जवळ असणे इष्ट असले तरी, एकट्याने कार्य करणे बहुधा उत्तम ठरेल. जवळ उभे असणाऱ्या प्रचारकांना एकमेकांशी बोलण्यात वेळ घालवण्याचा कल असू शकतो व त्यामुळे राज्य संदेश ऐकण्याची इच्छा असणाऱ्या लोकांकडे त्यांचे लक्ष राहात नाही.
५ एकाच ठिकाणी उभे राहून केवळ नियतकालिके प्रदर्शित करणे हे वैयक्तिकांकडे जाऊन पुढाकार घेण्याइतके परिणामकारक नाही. दृष्टी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न करता तसे उबदार, मैत्रीपूर्ण व स्पष्ट असा. काही घटनांमध्ये, तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना तिच्यासोबत काही पावले चालावे लागेल. त्याने प्रतिसाद दिल्यास नियतकालिके सादर करा. नियतकालिके नाकारण्यात आल्यास तुम्हाला पत्रिका द्यावीशी वाटेल.
६ बहुधा, प्रश्न उपस्थित करणारे किंवा आस्था उत्पन्न करणारे वाक्य सांगणारी संक्षिप्त सादरता तयार करणे उत्तम ठरेल. उचित प्रतिसाद मिळाल्यास, त्या व्यक्तीचे नाव, पत्ता व कदाचित त्याचा दूरध्वनी क्रमांक देखील घेण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्ही आस्थेचा मागोवा घेऊ शकता. तुम्ही म्हणू शकता: “तुम्हाला अधिक शिकण्याची इच्छा असेल तर, तुमच्या घरी तुम्हाला भेटण्यास किंवा दुसऱ्या साक्षीदारास तसे करण्याची व्यवस्था करण्यासाठी मला आनंद वाटेल.”
७ रस्त्यावरील साक्षकार्यात गोवलेले एक वडील एका स्त्रीशी बोलले व त्यांना कळाले की, तिला तिच्या घरात साक्षीदारांशी बोलण्याची संधी कधीच मिळाली नव्हती. तिने एक पुस्तक स्वीकारले व तिच्या घरी एका सोयीस्कर वेळी एका बहिणीने भेट देण्याबद्दल ती सहमत झाली. आम्ही रस्त्यावरील साक्षकार्यात परिणामकारक असल्यास, पुष्कळ योग्य जण भेटतील व त्यांना मदत मिळेल.—प्रे. कृत्ये १७:१७.