वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९४ पृ. १
  • खंड पडू न देता घरोघरी जाणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खंड पडू न देता घरोघरी जाणे
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • घरोघरचे सेवाकार्य—सध्याच्या काळात इतके महत्त्वाचे का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • घरोघर साक्ष देणे
    आमची राज्य सेवा—२००६
  • जाहीरपणे व घरोघरी शिकवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • “प्रथम . . . सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ७/९४ पृ. १

खंड पडू न देता घरोघरी जाणे

१ प्राचीन इस्राएलात दररोज अर्पणे अर्पिली जात होती. (निर्ग. २९:३८-४२) वेदीची आग कायम ठेवली जात होती; त्यातून निघणारा धूर यहोवाला संतुष्ट करणारा “सुवासिक हव्य” असा होता. (निर्ग. २९:१८) आज, आम्हाला “त्याचे नाव पत्करणाऱ्‍या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ . . . देवाला नित्य अर्पण करावा,” असे आर्जवले जाते. (इब्री. १३:१५) नियमशास्त्राने नेमलेल्या यज्ञार्पणांचा उपयोग करण्याऐवजी, आम्ही खंड पडू न देता यहोवाच्या स्तुतीविषयी सांगून त्याची उपासना करतो.—यश. ४३:२१; प्रे. कृत्ये ५:४२.

२ या पृथ्वीवरील सर्वात थोर साक्षीदार, येशू ख्रिस्त याने आम्हास स्तुतीचे यज्ञ अर्पिण्याद्वारे शुद्ध भक्‍ती कशी करावी हे शिकवले. त्याने त्याच्या शिष्यांना शिकवले की, ते प्रचार करीत असलेला संदेश अतिशय निकडीचा होता. त्याला ठाऊक होते की, लोकांपर्यंत सुवार्ता पोहचविण्याचा सर्वात प्रभावकारी मार्ग म्हणजे, त्यांच्या घरात त्यांच्याशी व्यक्‍तिगतरित्या बोलणे होय. (मत्त. १०:७, १२) तर आम्हाला असे आढळते की, प्रेषितांनी घरोघरी प्रचार करण्याच्या त्याच्या ईश्‍वरी प्रेरणेचे मार्गदर्शन अनुसरले.—प्रे. कृत्ये २०:२०.

३ आज देखील त्यापेक्षा काही वेगळे नाही. येशूचे शिष्य असल्यामुळे, खरे ख्रिस्ती घरोघरी सुवार्तेचा प्रचार करून त्याचे उदाहरण अनुसरतात. त्याबद्दल आमचा उपहास केला जात असेल किंवा आम्हाला सतावले जात असेल. परंतु, तरीसुद्धा लाखो लोकांनी सत्य शिकून घेतले आहे व दर वर्षी मोठ्या लोकसमुदायाच्या गटात शेकडो, हजारो नवे शिष्य येऊन मिळत आहेत. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याचा तो त्याचा मार्ग आहे याला ते पुष्टी देतात. यासाठीच आम्ही आमच्या सेवाकार्यात कायम आहोत.

४ घरोघरी प्रचार करण्याचे लाभ: “देव पक्षपाती नाही . . . जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) आपल्या क्षेत्रातील प्रत्येक घरात थेटपणे गेल्यामुळे निपक्षपातीपणा प्रकट होतो व सर्वांना नियमितपणे राज्य संदेश ऐकण्याची संधी मिळते. त्यामुळे, स्वीकारणाऱ्‍यांना त्यांच्या वैयक्‍तिक गरजांनुसार व्यक्‍तिगत साहाय्य मिळते.

५ बहुतेक सर्वच प्रचारक म्हणजे, तरुण, वृद्ध, तसेच नवोदित देखील घरोघरच्या कार्यात सहभाग घेऊ शकतात. अशाप्रकारे, प्रत्येक जण ‘तारण होण्यासाठी मुखाने कबूल’ करू शकतो. (रोम. १०:१०) इतरांसोबत घरोघरच्या कार्यात सहभागिता घेणे हे, प्रीती व एकतेच्या बंधनात आम्हाला एकत्रित करते. त्याचवेळी, आम्ही बेपर्वाई किंवा विरोधाचा सामना करतो तेव्हा आमचा धीर प्रकट करण्याची आम्हाला संधी मिळते. आमच्या विश्‍वासाचे हे जाहीर प्रदर्शन आम्हाला एक “तमाशा” बनवते. ते प्रामाणिक जणांना हे ओळखण्यास मदत करते की, पवित्र शास्त्र शिकवण्याची आमची एक सुव्यवस्थित योजना आहे व ते त्याद्वारे लाभ मिळवू शकतात. (१ करिं. ४:९) सर्व गोष्टी स्पष्टपणे दाखवतात की, यहोवा घरोघरच्या कार्याला आशीर्वादित करत आहे व मोठ्या लोक समुदायाला त्याच्या उपासनेच्या ‘मंदिरात’ एकत्र करण्यासाठी त्याचा उपयोग करत आहे.—यश. २:२-४.

६ इतिहासातील इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक, आता लोकांना राज्य संदेश ऐकण्याची गरज आहे. यहोवा पुरे असे म्हणेपर्यंत आपण घरोघरच्या कार्यात खंड पडू न देता प्रचार करीत राहू या. (यश. ६:११) असे केल्याने, या शेवटल्या काळात महत्त्वपूर्ण व लाभदायक घरोघरच्या कार्यात सहभाग घेतल्याने मिळणाऱ्‍या आनंदाचे आम्हाला बक्षीस मिळेल.—१ करिं. १५:५८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा