मानवजातीच्या निर्माणकर्त्यावरील विश्वास वाढवणे
१ पुष्कळ लोकांनी जीवनाचा उगम व अर्थ याविषयी काही न काही निष्कर्ष काढले आहेत. परंतु दुःखाने सांगावे लागते की, उत्क्रांती हे उत्तर असल्याचा स्वीकार करावयास पुष्कळांना चुकीच्या मार्गाने प्रभावीत करण्यात आले आहे. निर्मिती (इंग्रजी) पुस्तक या दोन्ही बाजूंवर गंभीर दृष्टी टाकते. ते पवित्र शास्त्राच्या आधारासाठी पुष्कळ पुरावा पुरवते. ऐकण्याची इच्छा दाखवलेल्या प्रामाणिक लोकांना आपण कशी मदत करू शकतो? पुनर्भेटी करण्याद्वारे. आम्ही परततो तेव्हा, आपला निर्माणकर्ता या नात्याने यहोवामध्ये विश्वास वाढवेल असे काहीतरी निश्चितपणे म्हणण्याचे मनात असणे नेहमीच चांगले असते.
२ त्या व्यक्तीने पवित्र शास्त्रावर विश्वास प्रकट केला असेल तर, तुमचे संभाषण सुरू करण्याचा हा प्रभावकारी प्रस्ताव ठरेल:
▪“यशया ४५:१८ विश्वाच्या उगमाबद्दल एक जोरदार विधान करते; तुम्हाला याबद्दल काय वाटते ते जाणण्यास मला आवडेल. [वाचा व विवेचनास वाव द्या.] यहोवा स्वतःची, आकाश व पृथ्वीचा निर्माणकर्ता अशी ओळख करून देतो. पृथ्वीवरील जीवन याबद्दल काय? यशया ४२:५ देखील याचे सर्व श्रेय त्यालाच देते. [वाचा.] पवित्र शास्त्र जे म्हणते ते खरे असले तर, उत्क्रांतीवाद खोटा असावयास हवा. तुम्हाला पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवता येऊ शकतो असे वाटते का?” निर्मिती पुस्तकातील १७ व्या अध्यायाचा संदर्भ द्या. निर्माणकर्ता या नात्याने यहोवावर विश्वास ठेवण्याच्या पुढील कारणांकडे निर्देश करा.
३ तुम्ही तुमच्या संभाषणाची सुरवात अशाप्रकारे करू शकता:
▪“मनुष्य व पृथ्वीचे भविष्य काय आहे, हा प्रश्न माझ्या मागच्या भेटीच्या वेळी उपस्थित झाला होता. मी तुम्हाला दिलेले पुस्तक या प्रश्नाचे उत्तर कसे देते याकडे लक्ष द्या.” निर्मिती पुस्तकाची पाने २३४-५ उघडा व त्यास परिच्छेद ६ आणि ७ वाचण्यासाठी उत्तेजन द्या. आणखी आस्था प्रदर्शित केल्यास, तुम्ही विचारू शकता: “पृथ्वीवर कोणते नाट्यमय बदल घडतील असे तुम्हाला वाटते?” उचित असेल तर, त्याच वेळी किंवा तुमच्या पुढील भेटीत, निर्मिती पुस्तकातील याच अध्यायाच्या इतर परिच्छेदांवरील या मुद्याची चर्चा पुढे चालू ठेवली जाऊ शकते.
४ घरमालकाने “सर्वश्रेष्ठ मनुष्य” पुस्तक स्वीकारले असल्यास तुम्ही विचारू शकता:
▪“पुष्कळ लोक आज शोधत असलेला आनंद त्यांना मिळत नाही हे तुमच्या लक्षात आले आहे का? येशू ख्रिस्ताने आनंद कसा मिळू शकतो हे शिकवले व योग्य ते केल्याने जो आनंद मिळतो तो त्याच्या जीवनात प्रतिबिंबित केला.” मत्तय ५:३-१२ मधील ‘धन्यता’ यांच्याकडे लक्ष वेधवा. त्यातील काही, सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाच्या ३५ व्या अध्यायात उल्लेखिलेल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला तिच्या आध्यात्मिक गरजेविषयी जागृत असल्याने आनंद कसा मिळतो ते विशेषकरून दाखवा. तसेच या गरजेला भागवण्यासाठी गृह पवित्र शास्त्राभ्यास घेणे हे एक उत्तम पाऊल कसे आहे हे समजावून सांगा.
५ असे म्हणण्याद्वारे पुनर्भेट सुरु करण्याचा दुसरा मार्ग, असा असू शकतो:
▪“मानवजातीने वाईटामुळे व दुष्टाईमुळे बरेच दुःख व त्रास सहन केला आहे. यहोवा, या पृथ्वीच्या निर्माणकर्त्याने असे अभिवचन दिले आहे की, या परिस्थितींचा अंत केला जाईल. [अध्याय १३३ उघडा व नीतीसूत्रे २:२१, २२ वाचा.] यहोवाने आम्हाला येशूच्या उदाहरणाद्वारे व शिक्षणाद्वारे शिकवलेल्या गोष्टींना जे शिकतात व त्यांचे आज्ञापालन करतात असेच जण आश्चर्यकारक आशीर्वादांसाठी पुढे पाहू शकतात.” अध्याय २५, २६, ३७, ४४, ४६, ४७, ५२, ५८ व ७० सारख्या अध्यायांमध्ये उल्लेखिलेल्या एक किंवा दोन चमत्कारांकडे लक्ष वेधवून अशा आशेचा आमच्याकडे भक्कम आधार कसा आहे हे दाखवा.
६ पुनर्भेटींसाठी वेळ राखून ठेवण्याची योजना करणे उत्तम आहे हे अनुभवी प्रचारकांनी जाणून घेतले आहे. या कार्यासाठी निश्चित व्यवस्था केल्याने लगेचच आस्थेचा पाठलाग करण्यास आम्हाला मदत मिळू शकते. तुमच्यासाठी व तुमच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी कोणती वेळ अत्युत्तम आहे हे ठरवा. या कार्यात नियमितपणे सहभाग घेतल्याने, तुम्हाला ‘शिष्य बनवण्याच्या’ कामगिरीला पूर्ण करण्यात आनंद प्राप्त होईल.—मत्त. २८:१९, २०.