वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९४ पृ. २
  • जूनसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जूनसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • उपशिर्षक
  • जून ६ ने सुरु होणारा सप्ताह
  • जून १३ ने सुरु होणारा सप्ताह
  • जून २० ने सुरु होणारा सप्ताह
  • जून २७ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९४
km ६/९४ पृ. २

जूनसाठी सेवा सभा

जून ६ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ९ (१९)

१० मि:स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यातील स्थानिकरित्या लागू होणाऱ्‍या घोषणा. या सप्ताहांती अलिकडील नियतकालिकांना घरोघरच्या कार्यात कसे सादर केले जाऊ शकते, त्याचे संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. या सप्ताहांती सेवाकार्यात वापरण्यासाठी श्रोत्यांना सर्वश्रेष्ठ मनुष्य व निर्मिती (इंग्रजी) या पुस्तकांच्या प्रती घेण्यासाठी आठवण करून द्या.

२० मि:“तुम्ही सढळ हाताने पेरणी करत आहात का?” प्रश्‍नोत्तरे. वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, श्रोत्यांना व्यक्‍तिगत अनुभव सांगण्यास व त्यांनी सेवेच्या एका पैलूत अधिक परिश्रम कसे घेतले व त्यांना त्याबद्दल आशीर्वाद कसा मिळाला हे दाखवण्यास आमंत्रण द्या.

१५ मि:“आमच्या घडवणाऱ्‍याला सन्मान देण्यासाठी इतरांना मदत करणे.” श्रोत्यांशी चर्चा करा. सूचित केलेल्या सादरतांना कसे वापरावे ते दाखवण्यासाठी दोन प्रात्यक्षिके प्रदर्शित करा.

गीत ३० (५८) व समाप्तीची प्रार्थना.

जून १३ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २८ (५)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल व संस्थेकडील कोणत्याही देणगीच्या पोचपावत्या वाचून दाखवा. उदारतेच्या आत्म्याने एखाद्याला आशीर्वाद कसे प्राप्त होतात याबद्दलच्या संक्षिप्त विवेचनांचा समावेश करा.—नीती. ११:२४अ.

१५ मि:“मानवजातीच्या निर्माणकर्त्यावरील विश्‍वास वाढवणे.” श्रोत्यांशी चर्चा करा. वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, सुचवलेल्यापैकी एका पुनर्भेटीचे प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि:“मंडळीचा पुस्तक अभ्यास शैक्षणिक कार्यहालचालींना चालना देतो.” अभ्यास चालक श्रोत्यांशी चर्चा करतात. तो लेख, (१) पुस्तक अभ्यासाची अधिक उपस्थिती, (२) अभ्यासाच्या वेळी अधिक विवेचने देणे, आणि (३) सेवेच्या सभांसाठी उत्तम पाठिंबा देण्यास कसे उत्तेजन देतो त्यावर जोर द्या.

गीत ६५ (३६) व समाप्तीची प्रार्थना.

जून २० ने सुरु होणारा सप्ताह

गीत ३१ (५१)

१० मि:स्थानिक घोषणा व ईश्‍वरशासित वृत्त. अजूनही शाळेच्या सुट्या असणाऱ्‍या तरुण लोकांनी, सेवाकार्यात सहभाग वाढवण्यासाठी त्यांना उपलब्ध असणाऱ्‍या संधींबद्दल उजळणी केली पाहिजे; काहींना साहाय्यक पायनियरींग करण्यास शक्य असेल. ज्यांनी शाळा पूर्ण केली त्यांनी राज्य आस्थेच्या गोष्टी प्रथम ठेवून भविष्याच्या त्यांच्या योजनांबद्दल गंभीर विचार केला पाहिजे.

१५ मि:स्थानिक गरजा. किंवा जून १, १९९४, टेहळणी बुरुज नियतकालिकाच्या सर्व आवृत्तींच्या पृष्ठ ३-७ वरील ‘योग्य धर्म’ या पहिल्या दोन लेखांवर आधारित भाषण.

२० मि:“तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करत आहात का?” मार्च १, १९९४, टेहळणी बुरुज नियतकालिकाच्या (पाक्षिक आवृत्त्या) पृष्ठ २८-३० वर आधारित वडिलांचे भाषण.

गीत २२३ (२२) व समाप्तीची प्रार्थना.

जून २७ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १७४ (९०)

१० मि:स्थानिक घोषणा. सप्ताहांताच्या क्षेत्र सेवेच्या आराखड्याची उजळणी करा. प्रचारकांना “ईश्‍वरी भय” अधिवेशनासाठी त्यांचे रुम रिक्वेस्ट फॉर्मस्‌, वेळेवर देण्यासाठी आठवण करून द्या. सचिव त्यांना गोळा करतील आणि या पानावरील योग्य पत्त्यावर पाठवतील.

१५ मि:“क्षेत्र सेवेसाठी अर्थपूर्ण सभा.” सेवा पर्यवेक्षकांकडून प्रश्‍नोत्तरे. परिच्छेद ३ ची चर्चा करताना, या सप्ताहांताच्या उपयोगासाठी युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकातून एक किंवा दोन प्रस्तावना दर्शवा. परिच्छेद ५ वर असताना, स्थानिकपणे निरीक्षलेल्या क्षेत्र सेवेतील वागणूकीशी संबंधित कोणत्याही समस्यांचा उल्लेख करा; सुधारणा करण्यासाठी सहानुभूतीपूर्वक सूचना द्या.

२० मि:जुलैच्या सादरतेची उजळणी करा. मंडळीकडे साठा असलेल्या पुस्तिकांना दाखवा. संभाषण सुरु करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतात अशा काही मनोरंजक वैशिष्ट्यांची आणि चित्रांची उजळणी करा. वेगवेगळ्या प्रकारच्या घरमालकांसोबत पवित्र शास्त्राभ्यास सुरु करण्यासाठी कोणत्या पुस्तिका योग्य आहेत त्यांचा उल्लेख करा. पवित्र शास्त्रीय विषयावर चर्चा कशी सुरु करावी याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. (युक्‍तिवाद पुस्तकातील पृष्ठ ११-१२ वरील “भविष्य/सुरक्षितता,” व पृष्ठ १२-१३ वरील “राज्य” यातील सूचनांचा उपयोग करा.) प्रात्यक्षिकांची समाप्ती पवित्र शास्त्राभ्यास सुरवात करण्याच्या व्यवस्थेने दाखवून केली पाहिजे.

गीत ११८ (९९) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा