मंडळीचा पुस्तक अभ्यास शैक्षणिक कार्यहालचालींना चालना देतो
१ यहोवाच्या संघटनेच्या शैक्षणिक कार्यक्रमात, मंडळीचा पुस्तक अभ्यास एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. हे पुस्तक अभ्यासांचे गट संपूर्ण क्षेत्रामध्ये विखुरलेले आहेत. त्यामुळे सर्वांना उपस्थित राहण्यासाठी सोयीस्कर होते. आस्थेवाईक जणांच्या क्षेत्रात एखादा अभ्यास असल्याने उपस्थित राहण्याचे आमंत्रण ते लागलीच स्वीकारतील.
२ प्रत्येक गट लहान ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे चालकास प्रत्येकांना व्यक्तिगत साहाय्य देण्यासाठी वाव मिळतो. सर्वजण एकाच गतीने शिकत नाहीत. धड्याचा आगाऊ अभ्यास करूनही एखाद्याला एखादा मुद्दा समजण्यास कठीण जात असेल तर, अभ्यासानंतर चालक पुढे त्याची चर्चा करू शकतात. त्याशिवाय, लहान गट असल्यामुळे, विवेचने देण्यास व शास्त्रवचने वाचण्यात सहभाग घेण्यासाठी अधिक संधी असते. नियमितपणे विवेचने देऊन तुम्ही चर्चेला हातभार लावता का? तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात उत्तर देण्याचा प्रयत्न करता का? सहभाग घेण्याची तयारी दाखवल्यामुळे ते, तुम्हाला तसेच इतरांना देखील लाभदायक ठरू शकते. तयारी करताना, धड्यातील काही मुद्यांना तुम्ही व्यक्तिगतपणे कसे लागू कराल हे ओळखण्यासाठी तुमच्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करा.—इब्री. ५:१४.
३ पुस्तक अभ्यास चालकांनी वापरलेल्या शिकवण्याच्या पद्धतींचे निरीक्षण करून, गृह पवित्र शास्त्राभ्यास अधिक मनोरंजक व बोधपर पद्धतीने कसे चालवावे हे तुम्ही शिकू शकाल. योग्य बांधवाने परिच्छेद वाचल्यावर, प्रश्नांची चर्चा करण्यात येते. अभ्यास चालक सर्वांना मोकळेपणाने बोलण्यास उत्तेजन देतात. वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, ते उल्लेखिलेल्या शास्त्रवचनांवरील आपली विवेचने मोकळेपणाने सांगितली जातील अशाप्रकारे काढून घेण्याचा प्रयत्न करतात. ती कशी लागू होतात हे आम्हाला समजावे म्हणून ते असे करतात. (पडताळा नहेम्या ८:८.) मुख्य मुद्दा दाखवण्यासाठी ते कधीकधी स्वतःच्या संक्षिप्त स्पष्टीकरणाच्या विवेचनाची किंवा साहाय्यकारी प्रश्नांची त्यात भर घालतील. एखाद्या उदाहरणामुळे किंवा दाखल्यामुळे, ती माहिती आमच्या जीवनाशी कशी संबंधित आहे हे पाहण्यास आम्हाला मदत मिळेल.
४ काही मंडळीच्या पुस्तक अभ्यासांमधील सभांची उपस्थिती फारच कमी आहे. तुम्ही नियमितपणे उपस्थित राहता का? जर नाही तर, तुम्ही एक महत्त्वपूर्ण तरतूद चुकवत आहात. पुस्तक अभ्यासाची व्यवस्था, यहोवाची आमच्याबद्दल असणारी काळजी प्रदर्शित करण्याचा एक मार्ग आहे. (१ पेत्र ५:७) आध्यात्मिकरित्या भक्कम बनण्याकरता आम्ही ज्ञान व बुद्धिमध्ये प्रगती करावी अशी त्याची इच्छा आहे. दुसऱ्या बाजूला पाहता, आम्ही यहोवासाठी व त्याच्या संघटनेसाठी कमी उपयोगाचे ठरू यासाठी सैतानाला आमची आध्यात्मिक वाढ कमी करण्यास व आम्हाला कमजोर करण्यास आवडेल. असे घडू देऊ नका! या अंतर्गत गटातील उबदार, प्रेमळ वातावरण तुमच्या अंतःकरणास भिडो व तुम्हास यहोवाची स्तुती करीत राहण्यासाठी उत्तेजित करो.—पडताळा स्तोत्र १११:१.
५ बहुतेक सर्वच पुस्तक अभ्यासांच्या ठिकाणी प्रचारकांसाठी सोयीस्कर अशा सेवेच्या सभा आयोजित केल्या जातात. या सप्ताहाच्या मध्यासाठी, सप्ताहांतासाठी किंवा सायंकाळच्या साक्षकार्यासाठी असू शकतील. पुरेसे क्षेत्र उपलब्ध आहे व क्षेत्रात पुढाकार घेण्यासाठी कोणी उपस्थित राहील याची खात्री पुस्तक अभ्यास चालक करतात. क्षेत्र सेवेच्या सभा १०-१५ मिनिटांपेक्षा अधिक वेळेच्या असू नयेत. दैनिक शास्त्रवचन, आमच्या प्रचाराच्या कार्याशी संबंधित असेल तर, चालक संक्षिप्त रुपात त्यावर विचार करू शकतात. ते एक किंवा दोन विशिष्ट क्षेत्र सेवेच्या सूचना सादर करू शकतात किंवा चालू सादरतेचे एखादे संक्षिप्त प्रात्यक्षिक प्रस्तुत करू शकतात.
६ त्या काळादरम्यान चालक त्यांच्या गटातील प्रत्येकासोबत व्यक्तिगतपणे कार्य करण्याचा प्रयत्न करतात. ते उचित उत्तेजन व प्रशिक्षण देतात.—पडताळा मार्क ३:१४; लूक ८:१.