वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९४ पृ. १
  • तुम्ही सढळ हाताने पेरणी करत आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही सढळ हाताने पेरणी करत आहात का?
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • ‘सढळ हाताने पेरा, सढळ हाताने कापणी करा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • सढळ हाताने पेरणी केल्यास त्याच मानाने कापणी करू
    आमची राज्य सेवा—२००२
  • धार्मिकतेची पेरणी आणि देवाच्या प्रेम-दयेची कापणी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • सढळ हाताने परंतु विचारपूर्वक पेरणी करा
    आमची राज्य सेवा—२००३
आमची राज्य सेवा—१९९४
km ६/९४ पृ. १

तुम्ही सढळ हाताने पेरणी करत आहात का?

१“एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही जितके अधिक परिश्रम करता, तितकेच अधिक फळ तुम्हाला त्यापासून प्राप्त होते,” अशी एक म्हण आहे. हे आमच्या उपासनेच्या बाबतीत अगदीच खरे आहे. सभांची तयारी, राज्य संदेशाचा प्रचार व आमच्या बांधवांना प्रेम दाखवण्यात आपण जितका वेळ आणि परिश्रम खर्च करतो तितकीच अधिक प्राप्ती आमच्या आध्यात्मिक वाढीत होईल. त्याच्या विरुद्धतेतील गोष्ट देखील खरी आहे. आम्ही जे काही करतो ते हात राखून किंवा दुटप्पी मनाने केले तर, आम्ही खरोखरच समाधानकारक परिणामांची अपेक्षा करू शकतो का?

२ प्रेषित पौलाने २ करिंथकर ९:६ येथे हे तत्त्व चांगल्या प्रकारे कथित केले आहे: “जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.” तुम्ही सढळ हाताने पेरणी करत आहात का?

३ व्यक्‍तिगत पवित्र शास्त्राभ्यास: फलदायी सेवक होण्यासाठी, आम्ही प्रथम, आमच्या व्यक्‍तिगत अभ्यासात सढळ हाताने पेरणी केली पाहिजे. आम्हाला तीव्र आध्यात्मिक भूक असावयास हवी. (स्तोत्र. ११९:९७, १०५; मत्त. ५:३) दररोजच्या जीवनाच्या चिंता आम्हावर दबाव टाकीत असताना, आमच्या आध्यात्मिक गरजेची खरी जागृतता निर्माण करण्यासाठी, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. आम्हापैकी बहुतेक सर्वांनाच, “वेळेचा सदुपयोग” करण्याची आवश्‍यकता आहे. (इफि. ५:१६) काही जण व्यक्‍तिगत अभ्यास करण्यासाठी, काही विशिष्ट दिवशी लवकर उठण्याची योजना करतात. इतरांनी त्याच उद्देशास्तव काही दिवसांची संध्याकाळ बाजूला राखून ठेवली आहे. आम्ही कोणत्या मार्गाने सढळ हाताने कापणी करतो? आम्हाला दृढ विश्‍वास, उज्ज्वल आशा, व आनंदी तसेच अधिक सकारात्मक मनाचा दृष्टिकोन प्राप्त होतो.—रोम. १०:१७; १५:४; १ पेत्र १:१३.

४ मंडळीच्या सभा: स्तोत्र १२२:१ मध्ये दाविदाने म्हटले: “आपण परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले; तेव्हा मला आनंद झाला.” तुम्हालाही तसेच वाटते का? सढळ हाताने पेरणी करणे म्हणजेच, आपल्या पाच साप्ताहिक सभांना नियमितरित्या उपस्थित राहणे होय. खराब वातावरणाला अडथळा आणण्यास अनुमती न देण्याचा तुम्ही निश्‍चय करा. बहुधा, जितक्या अधिक अडथळ्यांवर आपण मात करतो तितकेच अधिक आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात.

५ तुमच्या बांधवांसोबत उभारणीकारक संभाषणात सहभाग घेण्यासाठी, लवकर या आणि नंतर थांबून राहा. जमेल तितक्या वेगवेगळ्या लोकांचा समावेश करण्यासाठी, तुमचा सहवास विस्तारित करा. टेहळणी बुरुज अभ्यास तसेच इतर सभांची चांगली तयारी करा. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा विवेचने देऊन तुम्ही सढळ हाताने पेरणी करू शकता. सभांमध्ये इतरांना, ‘उत्तेजन दिल्याने,’ तुम्हाला देखील “उत्तेजन मिळेल.”—नीती. ११:२५, मराठी कॉमन लँग्वेज.

६ क्षेत्र सेवा: कदाचित सढळ हाताने पेरणी करण्याचे हे तत्त्व क्षेत्र सेवेपेक्षा आणखी दुसऱ्‍या कोणत्याही ठिकाणी इतके खरे ठरणार नाही. आम्ही त्यासाठी जितका अधिक वेळ देऊ, तितकीच, मनोरंजक अनुभव, फलदायी पुनर्भेटी व पवित्र शास्त्राभ्यास यांची कापणी करू शकतो.

७ क्षेत्र सेवेत सढळ हाताने पेरणी करण्यामध्ये, दर्जा तसेच प्रमाणही गोवलेले आहे. आमच्या सेवेचा दर्जा सुधारण्यात मदत करण्यासाठी युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तक, हे एक उत्तम साधन आहे. दारोदारी कार्य करताना आस्था उत्तेजित करण्यासाठी, पृष्ठ ९-१५ वर १८ विषयांवरील ४० पेक्षा अधिक प्रस्तावना आहेत. तुम्हाला आस्था दिसून आली तर, त्याची नक्की नोंद घ्या, जेणेकरून तुम्ही परत जाऊन तुमच्या पेरणीच्या फळाची कापणी करू शकता. तुमचे परिश्रम एखाद्या पवित्र शास्त्राभ्यासाकडे निरवतील अशी आशा आहे. तेथे तुम्ही आणखी दुसऱ्‍याला सढळ हाताने पेरणी कशी करावी ते शिकवू शकता.

८ आम्ही सढळ हाताने पेरणी केली तर, यहोवाकडून अधिक आशीर्वादांची अपेक्षा करू शकतो.—मला. ३:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा