सढळ हाताने पेरणी केल्यास त्याच मानाने कापणी करू
१ देवाच्या वचनातील महान अभिवचनांची पूर्णता व्हावी म्हणून आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत. आपले जीवन आणखी सुखकर व्हावे म्हणून यहोवा अजूनही आपल्याला पुष्कळ आशीर्वाद देत आहे. परंतु, या सर्वांचा व्यक्तिगतरीत्या फायदा मिळणे, आपल्या प्रयत्नांवरच अवलंबून आहे. याबाबतीत, प्रेषित पौलाने म्हटले: “जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.” (२ करिंथ. ९:६) हे तत्त्व कोणत्या दोन क्षेत्रांना लागू होते ते आपण पाहूया.
२ आपली व्यक्तिगत सेवा: आपल्याला शक्य असणाऱ्या सर्व प्रसंगी लोकांना सुवार्ता सांगून साक्ष दिल्याने चांगले प्रतिफळ मिळते. (नीति. ३:२७, २८) सेवेमध्ये जास्तीतजास्त सहभाग घेण्याद्वारे आणि सहायक व सामान्य पायनियरींग करण्याद्वारे पुष्कळ जण सढळ हाताने पेरणी करत आहेत ही प्रशंसनीय गोष्ट आहे. आपल्याला भेटणाऱ्या सर्व आस्थेवाईक लोकांची न विसरता भेट घेऊन व संधी मिळाल्यास त्यांना बायबल अभ्यास सादर करून आपण सर्वजण सढळ हाताने पेरणी करू शकतो. (रोम. १२:११) अशाप्रकारे झटल्याने आपल्याला प्रोत्साहनदायक अनुभव येतील आणि सेवेतील आपला आनंद बहुगुणित होईल.
३ देवाच्या राज्याला पाठिंबा देणे: भौतिकरीत्या देण्याच्या संबंधाने पौल सढळ हाताने पेरणी करण्याविषयी बोलला. (२ करिंथ. ९:६, ७, ११, १३) आज, आपण अनेक मार्गांनी शारीरिकरीत्या व भौतिकरीत्या देवाच्या राज्याला पाठिंबा देऊ शकतो. राज्य सभागृहांच्या बांधकामाला आपण आर्थिकरीत्या हातभार लावू शकतो आणि खऱ्या उपासनेसाठी वापरल्या जाणाऱ्या या ठिकाणांची स्वच्छता व देखभाल करण्यासाठी देखील आपण स्वच्छेने सहभाग घेऊ शकतो. शिवाय, स्थानीय मंडळीच्या खर्चासाठी आणि राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या जगभर होणाऱ्या कार्यासाठीसुद्धा आपण आर्थिकरीत्या मदत देऊ शकतो. प्रत्येकजण आपापल्या परीने आपली जबाबदारी पार पाडतो तेव्हा, देवाने दिलेल्या या कार्यावर यहोवाचा भरघोस आशीर्वाद पाहून आपण आनंदी होत नाही का?—मला. ३:१०; लूक ६:३८.
४ देवाचे वचन आपल्याला अशाप्रकारे आर्जवते: “चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे.” अशाप्रकारे आपण वागलो तर आताही भरघोस आशीर्वाद मिळवू शकतो. आणि “जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा [आपण] स्वतःसाठी” करत असतो.—१ तीम. ६:१८, १९.