तुम्हाला आस्था दिसून आली तेथे पुन्हा जा
१ आम्हापैकी पुष्कळांना वर्गण्या मिळवण्यामध्ये, नियतकालिकांच्या व माहितीपत्रकांच्या वितरणामध्ये यश मिळाले असेल. पुन्हा भेट देऊन पुढील आस्था उत्तेजित करणे फार महत्त्वपूर्ण आहे. असे करताना आपले यश, पुनर्भेट करण्याआधी आम्ही किती चांगल्या प्रकारे तयारी करतो यावर अवलंबून असेल.
२ हे लक्षात ठेवा की, प्रौढांना ज्या गोष्टींची चिंता वाटते त्याबद्दलच युवकही चिंताग्रस्त असतात. मेच्या अवेक! अंकांमध्ये असे लेख आहेत जे तरुण लोकांच्या नजरेतून सध्याच्या समस्यांचे परीक्षण करतात. जीवनात कोणती गोष्ट महत्त्वपूर्ण आहे याबद्दल हे लेख सूक्ष्मदृष्टी पुरवतात. ते तरुणांना तसेच त्यांच्या पालकांनाही मदत करू शकतात.
३ तुम्ही मे ८ चे “अवेक!” (पाक्षिक आवृत्तीचे) दिले असेल तर, मे २२ चे सादर करून तुम्ही मागोवा घेण्याची योजना कराल. तुम्ही म्हणू शकता:
▪“मागील अंक जो मी तुम्हाला दिला होता त्यामध्ये, मुलांसाठी आशा या विषयावर लेख सादर केले होते. आमचे तरुण लोक अशा जगात जगतात जेथे भविष्यासाठी फारच कमी आशा सादर केली जाते. पुष्कळजण बंडखोर वर्तणूकीद्वारे त्यांचा राग प्रदर्शित करतात. परंतु, समतोल राखणारे आणि चांगला आदर्श टिकवून ठेवणारे असे काही आहेत. या नवीन अवेक! नियतकालिकाच्या लेखात, उच्च न्यायालयाने एका यौवनावस्थेतील युवकाचा निर्णय कसा मान्य केला हे सांगितले आहे. मला वाटते त्यात जे सांगितले आहे त्याची तुम्ही प्रशंसा कराल.”
४ तुम्ही पहिल्यांदा भेट दिली तेव्हा घरमालकाने नियतकालिकांच्या किरकोळ प्रती मिळवल्या असतील तर, पुन्हा जाल तेव्हा हा प्रस्ताव वापरून तुम्ही वर्गणी सादर करण्याचा निर्णय घ्याल:
▪“मागच्या वेळी या पृथ्वीच्या भविष्याबद्दलची संक्षिप्त चर्चा करण्यास मला फारच आवडले. देव दुष्टाईचा व दुःखाचा अंत करील तेव्हा येथे कशाप्रकारचे जीवन असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? देवाचे राज्य कोणते आशीर्वाद आणील याकडे टेहळणी बुरुज (किंवा अवेक!), नियमितपणे लक्ष वेधतात किंवा त्याचे वर्णन देतात हे तुम्हाला माहीत होते का? [तुम्ही दिलेल्या किंवा तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या नियतकालिकातून एखादा मुद्दा निवडा.] तुम्हाला या नियतकालिकांपैकी एक (किंवा दोन्ही) नियमितपणे मिळावे असे मला वाटते.”
५ तुम्ही परताल तेव्हा घरमालकाला त्याचे स्वतःचे धार्मिक साहित्य प्राप्त होत आहे व तेच पुरे आहे असे त्याला वाटते, हे कदाचित तुम्हाला कळेल. तुम्ही म्हणू शकता:
▪“आमचा धर्म कोणताही असला तरी, आम्हा सर्वांना सारख्याच चिंता आहेत—गुन्हेगारी, गंभीर आजार, पर्यावरणाची चिंता—नाही का? [विवेचनास वाव द्या.] या समस्यांचा कोणता तरी खरा उपाय असेल असे तुम्हाला वाटते का? [२ पेत्र ३:१३ वाचा.] आमच्या साहित्याचा उद्देश, टेहळणी बुरुज नियतकालिकाच्या पान २ वर उल्लेखिण्यात आला आहे. [निवडलेली एक किंवा दोन वाक्ये वाचा.] आमच्या साहित्यांमध्ये पवित्र शास्त्रावर आधारित असणाऱ्या आशादायक संदेशामुळे, यहोवाचे साक्षीदार नसलेल्या पुष्कळजणांना आमचे साहित्य वाचण्यास आवडते.” घरमालकाचा प्रतिसाद अनुकूल असेल तर, आपला पवित्र शास्त्राभ्यासाचा कार्यक्रम समजावून द्या.
६ तुम्ही असा प्रस्ताव करू शकता:
▪“मागच्या वेळी मी येथे होतो तेव्हा आपण, आपल्या जगाच्या भविष्याच्या आशेबद्दल बोललो होतो. तुम्हाला या अहवालाविषयी काय वाटते? [चिंता वाटणाऱ्या अलिकडील बातमीचा उल्लेख करा.] लोक अशाप्रकारच्या गोष्टी ऐकतात तेव्हा, या जगाचे काय होत आहे याबद्दल त्यांना आश्चर्य वाटते, नाही का? आम्ही असा विचार करतो की, या गोष्टींद्वारे, पवित्र शास्त्रात २ तीमथ्य ३:१-५ मध्ये भाकीत केल्याप्रमाणे आम्ही ‘शेवटल्या काळी’ जगत आहोत हे दिसते.” ठळक गोष्टी वाचल्यावर, त्या वर्णनासारखे लोक त्याने पाहिले का हे तुम्ही विचारू शकता. युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तकातील पाने २३४-८ वरील एखाद्या उपशिर्षकावर चर्चा चालू ठेवा.
७ आम्ही चांगली तयारी केली आणि मदत देण्याची खरी इच्छा दाखवली तर, नम्र अंतःकरणाचे लोक ऐकतील हा आत्मविश्वास आम्हाठायी असू शकतो.—योहान १०:२७, २८.