वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९४ पृ. २
  • मला बदलत राहण्याची गरज आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मला बदलत राहण्याची गरज आहे का?
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • परिणामकारक असल्यास तिचा उपयोग करा!
    आमची राज्य सेवा—१९९८
  • नमुना म्हणून दिलेल्या सादरतांचा कसा वापर करावा?
    आमची राज्य सेवा—२००५
  • सत्याविषयी साक्ष देणारी मासिके द्या
    आमची राज्य सेवा—२००७
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—स्वतःचं सादरीकरण तयार करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ५/९४ पृ. २

मला बदलत राहण्याची गरज आहे का?

आमची राज्य सेवा याच्या प्रत्येक अंकात, आम्ही साक्षकार्य करताना वापरू शकतो अशा विविध शास्त्रवचनीय सादरता पुरवल्या जातात. सक्रिय असणारे पुष्कळ प्रचारक, नवीन कल्पना मिळवण्यास आणि वेगवेगळ्या प्रस्तावांचा उपयोग करण्यास उत्सुक असतात. आमची राज्य सेवा, प्रत्येक महिन्याला पुष्कळ सूचनांना पुरवून त्यांचा समावेश करते.

तथापि, तुम्ही वापरत असलेली गोष्ट बदलत राहण्याची गरज नाही असे तुम्हाला वाटेल. प्रत्येक महिन्याला, घरोघरच्या कार्यात भाग घेण्यासाठी तुमच्याकडे फारच कमी तास उपलब्ध असतील. थोड्या अवधीमध्ये तुम्ही काही प्रस्तावना बनवल्या असतील ज्या तुम्हाला बऱ्‍या वाटत असतील. त्यांचा उपयोग केल्यामुळे तुम्हाला चांगले परिणामही मिळत असतील. तुम्ही कदाचित स्तोत्र ३७:९-११, २ पेत्र ३:१३, प्रकटीकरण २१:४ व इतर अशा नेहमीच वापरण्यात येणाऱ्‍या वचनांवर अवलंबून असाल. असे असेल तर, नेहमीच बदल करण्याची गरज आहेच असे तुम्हाला वाटू नये. आमचा मुख्य उद्देश राज्य आशेची इतरांसोबत सहभागिता करणे हा आहे. तसेच यहोवाच्या आशीर्वादांसाठी पात्र होण्यास काय करावे ते शिकण्यात मदत करणे हा देखील आहे. तुम्हाला आवडल्या अशा समयोचित्त व आमंत्रणदायक सादरता, युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकात आढळल्या व त्यांचा उपयोग करून तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे तर, त्यांना वापरण्यासाठी मागेपुढे करू नका.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा