वर्गणी आणि नियतकालिक वाटपांचा मागोवा घ्या
१ येशूने त्याच्या अनुयायांना, सतत शिष्य बनवत राहण्याचे उत्तेजन दिले. (मत्त. २८:१९) त्याचा अर्थ केवळ साहित्याचे वाटप करण्यापेक्षाही काही जास्त आहे. लोकांनी आध्यात्मिकरित्या प्रगती करावी म्हणून आम्हाला त्यांची मदत करण्याची इच्छा आहे. हे करण्यासाठी आस्था प्रदर्शित करणाऱ्यांना अधिक मदत पुरवण्यास आम्ही परतलेच पाहिजे.
२ तुमच्या पहिल्या भेटीत, एखाद्या नियतकालिकेतील लेख ठळकपणे दाखवल्यावर तुम्ही वर्गणी दिली असेल तर, तुम्ही परताल तेव्हा त्याच विषयाची चर्चा करणे चांगले ठरेल:
▪“मी मागच्या वेळी भेट दिली तेव्हा, टेहळणी बुरुज (किंवा अवेक!) मधील एका लेखाकडे मी तुमचे लक्ष वेधले होते. त्याने आम्हाला पवित्र शास्त्रात पाहण्याच्या गरजेचे गुणग्रहण करण्यास मदत केली होती. मानवजातीसाठी उत्तम भविष्याचा देवाचा उद्देश त्याच्या राज्य सरकारावर केंद्रित आहे. मीखा ४:३, ४ त्याच्या अभिवचनाची अशी नोंद करते की, हे राज्य सर्व युद्धांचा अंत घडवून आणील.” शास्त्रवचन वाचल्यावर, तुम्ही “पाहा!” हे माहितीपत्रक देण्यास व मुखपृष्ठावरील चित्र दाखवण्याचे निवडाल. पहिल्या परिच्छेदाचा आणि त्या परिच्छेदावर दिलेल्या शास्त्रवचनांवर विचार करा. याकडे लक्ष द्या की, मीखा ४:३, ४ त्यातील एक आहे. परिच्छेद २ ची चर्चा करण्यास चालू ठेवण्यासाठी पुनर्भेटीची योजना करा.
३ घरमालकाने केवळ नियतकालिकांच्या किरकोळ प्रती घेतल्या असतील व त्याची आस्था कमी असेल किंवा त्याच्याकडे चर्चा करण्यास वेळ नसेल तर, तुमच्या नियतकालिक मार्गाच्या यादीत त्याचे नाव जोडण्याचा निर्णय तुम्ही घ्याल:
▪“मी तुम्हाला आधी दिलेल्या नियतकालिकांमध्ये तुम्ही आवड दाखवली होती त्यासाठी तुम्हाला नवीन अंक देखील आवडतील असे मला वाटले. हा लेख तुम्हाला खासकरून आवडेल असे मला नक्की वाटते.” त्याला अपीलकारक असेल असा तुम्हाला वाटणारा एखादा लेख दाखवा. तुम्ही पुढील अंक घेऊन परताल ते सांगा.
४ घरमालकाने त्या किरकोळ प्रती वाचल्या असतील व त्यांच्याबद्दल गुणग्राहकता व्यक्त केली असेल तर, वर्गणी सादर करा:
▪“तुम्हाला टेहळणी बुरुज, (किंवा अवेक!) आवडते असे दिसते तेव्हा तुम्ही त्याची (टेहळणी बुरुज किंवा अवेक! किंवा दोघांची) वर्गणी करावी असे मला वाटते. याद्वारे तुम्ही त्यास (किंवा त्यांना) पोस्टाद्वारे नियमितपणे मिळवू शकाल. तसेच प्रत्येक अंक मिळण्याची तुम्हाला खात्री असेल.” त्याने वर्गणी स्वीकारल्यास किंवा आस्था दाखवल्यास पुन्हा भेट देण्यासाठी व्यवस्था करा.
५ पहिल्या भेटीत वर्गण्या सादर करण्यासाठी सकारात्मक असा. त्या व्यक्तिने नियतकालिकांच्या केवळ किरकोळ प्रती स्वीकारल्या तर, तुम्ही परताल तेव्हा वर्गणी सादर करा. वर्गण्यांच्या पावत्या पूर्णपणे आणि स्पष्टपणे भरण्यास विसरू नका. त्याच्या तीन प्रती करा—एक घरमालकाला पावती म्हणून द्या व दुसऱ्या दोन प्रती तुमच्या मंडळीतील वर्गण्या हाताळणाऱ्या बांधवांना किंमतीसोबत द्या. आमच्याकडे, टेहळणी बुरुज व अवेक! मध्ये, देव राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात मदत करण्यासाठी आश्चर्यकारक साधने आहेत. येशूने आज्ञापिलेल्या गोष्टींबद्दल प्रामाणिक जणांना अधिक शिकून घेण्यात उत्तेजन देण्यासाठी आपण यांचा पूर्णपणे उपयोग करू या.—मत्त. २८:२०.