यहोवाने जे केले त्याचे कथन करणे किती लाभाचे आहे!
१ ‘सियोनाभोवती फिरा, तिचे बुरुज मोजा, तिच्या प्रसादांमधून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हाला सांगता येईल,’ असे ४८ साव्या स्तोत्राच्या प्रेरित लेखकाने इस्राएलात असणाऱ्यांना आर्जवले. यहोवावरील प्रेमाने प्रवृत्त झाल्यामुळे, ईश्वरशासित राज्याच्या त्या पार्थिव केंद्राविषयी, प्रत्येक गोष्टीच्या सविस्तर माहितीमध्ये त्यांना आस्था राहणार होती. ही माहिती किती मौल्यवान असू शकली असती, कारण यहोवाने ज्या शहराला त्याचे नाव दिले होते, ते हेच शहर होते! ते त्याबद्दल बोलणार होते आणि विशेषकरून त्यांच्या अंतःकरणात साठवून ठेवलेल्या सर्व गोष्टी त्यांच्या संतानाला ऐकवल्या जात होत्या याबद्दल ते खात्री करून होते.—स्तोत्र. ४८:१२, १३.
२ यहोवाच्या मशीहाचे ईश्वरशासित राज्य आता पार्थिव सियोनावर नसून, स्वर्गीय यरुशलेमेवर केंद्रित असलेल्या काळात आम्ही राहात आहोत. (इब्री. १२:२२) येशू ख्रिस्ताच्या हाती असलेले यहोवाचे राज्य १९१४ पासून सत्ता गाजवीत आहे. (प्रकटी. १२:१०) त्याच्या हालचाली आम्हासाठी अधिक आस्थेच्या आहेत. यहोवाने पृथ्वीवरील त्याच्या सेवकांना ज्या प्रकारे मार्गदर्शित केले आहे, त्याबद्दल देखील आम्ही आस्था राखून आहोत की जेणेकरून ते, राज्याचे दृश्य प्रतिनिधी या नात्याने त्याची इच्छा पूर्ण करू शकतील. याबद्दलची आकर्षक माहिती जेहोवाज विट्नेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉडस् किंग्डम या आमच्या नवीन पुस्तकात वर्णिली आहे. आमच्या अलिकडील “ईश्वरी शिक्षण” प्रांतीय अधिवेशनात ते प्राप्त करण्यास आम्हाला किती आनंद झाला!
३ सप्टेंबर १ पर्यंत, हे पुस्तक जगभरात २० भाषांमध्ये प्रकाशित झाले आणि १३ इतर भाषेच्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भाषांतराचे आणि प्रकाशनाचे कार्य होत होते. तुमच्या कुटुंबाला त्याची एक प्रत मिळाली असेल तर तुम्ही त्याचे वाचन करत आहात का? त्यातून शिकलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही बोलत आहात का?
४ अधिवेशनात सूचना दिल्याप्रमाणे, चित्रांकडे पाहिल्यावर आणि मथळे वाचल्यावर पुष्कळ बंधू व भगिणी साहित्याच्या मुख्य भागाकडे वळाले. त्यांचे अभिप्राय काय होते? त्यापैकीचे काही येथे आहेत.
५ एका बहिणीने लिहिले: “हे असे पहिलेच पुस्तक मला मिळाले आहे, जे कधी वाचून संपेल असे मला वाटायला लागले आहे, म्हणजे मला परत एकदा त्याचे वाचन करता येईल. मी आता २५ व्या अध्यायात आहे. मी जेवढे अधिक वाचते तेवढे अधिक माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहतात आणि माझे हृदय यहोवाबद्दलच्या प्रेमाने भरून जाते. हे पुस्तक फारच उत्तेजनदायक आणि विश्वासास बळकटी देणारे आहे.”
६ यहोवाची सेवा, ४० पेक्षा अधिक वर्षांपासून करत असलेल्या बांधवाने म्हटले: “हे पुस्तक इतके मनोवेधक असेल असे मी आधी जाणले नाही. मी रात्री उशीरापर्यंत जागून व सकाळी लवकर उठून त्याचे वाचन दोन आठवड्यांमध्येच पूर्ण केले. मी वाचलेल्या पुस्तकांपैकी हे खरोखरीच सर्वात अधिक हृदय हेलावणारे पुस्तक आहे. ते संशोधनाचा उत्कृष्ठ नमुना तर आहेच, परंतु उत्तेजनाचा देखील उत्कृष्ठ नमुना आहे.”
७ वाचनाचा नियमित कार्यक्रम: ज्यांनी ते पुस्तक भराभर वाचून पूर्ण केले त्यांनी ते पुन्हा हळूहळू वाचून काढण्याचा निश्चय केला आहे.
८ तुमच्या कुटुंबात एका पेक्षा अधिक सदस्य सत्यात असतील तर, तुमच्या कौटुंबिक अभ्यासात त्याच्या भागांचा उपयोग करण्यास तुम्हाला आवडेल. काही कुटुंबांनी अधिवेशनात त्याची एक प्रत मिळाल्यानंतर काही दिवसातच तसे करण्यास सुरू केले. पण, टेहळणी बुरुज अभ्यासाची तयारी किंवा अशा इतर काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले जावे असा याचा अर्थ होत नाही. परंतु, त्याऐवजी आणखी १५ किंवा २० मिनिटांसाठी प्रोक्लेमर्स पुस्तकातून वाचणे किंवा साहित्याची चर्चा करणे खूपच लाभदायक असल्याचे तुम्हाला आढळून येईल.
९ इतर कुटुंबे दर सायंकाळी जेवणावरून उठण्याआधी दोन किंवा तीन पानांचे—कदाचित एक किंवा दोन उपशिर्षकांचे—वाचन करतात. व्यक्तिगतपणे त्यांनी पुस्तकाचा बहुतांश भाग वाचला असेल, परंतु आता हळूहळू पूर्ण करण्याद्वारे व साहित्याची चर्चा करण्यास संधी मिळत असल्यामुळे, त्यांना अधिक लाभ मिळत आहे. असे करणाऱ्यांपैकी काही जण पुष्कळ वर्षांपासून यहोवाची सेवा करत आले आहेत. वाचत असताना, त्यांच्या आवडत्या आठवणी उफाळून येतात. ते वाचत असलेल्या घटनांमध्ये त्यांच्या स्वतःच्या सहभागितेबद्दल एकत्रित चर्चा करत असताना त्यांच्या अंतःकरणाला हर्ष मिळतो.
१० तुमच्या घराच्या परिस्थितींमुळे, तुम्हाला एकट्याने वाचन करावे लागते असे दिसेल. एका बहिणीने संस्थेला असे लिहिले: “मी हे पुस्तक दररोज रात्री झोपण्याआधी थोडे वाचत असते. हे पुस्तक माझ्यामध्ये सत्यासाठी गुणग्राहकता तसेच प्रेम उत्पन्न करत आहे, आणि त्यामुळे मला यहोवाच्या जवळ असल्याचे वाटते व त्याच्या संघटनेचा एक भाग असल्यामुळे मी खूप आभारी आहे. वाचत असलेल्या प्रत्येक पानाचा मी खरोखरीच स्वाद घेत आहे.”
११ हे पुस्तक मोठे असले तरी, त्याचे वेगवेगळे विभाग मोठे नाहीत. त्याचा सुरवातीचा विभाग, केवळ १०८ पानांमध्ये, हाबेलच्या दिवसांपासून १९९२ या वर्षापर्यंतच्या घटनांना त्वरेने, परंतु आकर्षकपणे पूर्ण करतो. इतर विभाग १३ ते १५० पानांपर्यंत आहेत. यातील प्रत्येक विभागाचे विभाजन काही अध्यायात केले आहे. ते लवकर पूर्ण करण्याऐवजी, एके वेळी एखादा विभाग, अध्याय किंवा उपशिर्षक घ्या; त्याचा आनंद लुटा; आणि त्यातून लाभ मिळवा.
१२ तुम्ही वाचत असलेल्या गोष्टींवर विचार करण्यासाठी वेळ घ्या: तुम्ही वाचत असताना तुमचे ध्येय कोणते असेल? केवळ पाने संपवणे—पुस्तक पूर्ण करणे—हे तुमचे ध्येय नसावे. प्रोक्लेमर्स पुस्तकात, तुमच्या आध्यात्मिक वारसाचा अहवाल आहे. तुम्हाला त्याची माहिती असलीच पाहिजे. तुम्ही वाचत असलेल्या गोष्टींच्या अर्थावर विचार करण्यासाठी वेळ घ्या. यहोवाच्या प्राचीन साक्षीदारांच्या कार्याची जसे तुम्ही उजळणी करता तसे, तुम्ही त्यांच्या विश्वासाचे अनुकरण कसे करू शकता यावर विचार करा. (इब्री. १२:१, २) जेव्हा तुम्ही मोठ्या धर्मत्यागाच्या वाढीबद्दल वाचता तेव्हा, तुमच्या स्वतःची आध्यात्मिकता सुरक्षित ठेवण्याचा दृष्टिकोन ठेवून, जे मागे फिरले त्यांना जाळ्यात पकडणाऱ्या धोक्यांची विशेष नोंद घ्या. तसेच, आधुनिक दिवसाच्या इतिहासाची उजळणी करता तेव्हा, देवाकडून उपयोगात आणलेल्या व्यक्तींचे आध्यात्मिक गुण व देवाच्या इच्छेप्रमाणे करणे त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट असल्याचे त्यांनी कसे दर्शवले आणि देवाने अनुमती दिलेल्या काही कठीण परिस्थितींना त्यांची प्रतिक्रिया काय होती, या गोष्टी लक्षात घ्या.—इब्री. १३:७.
१३ आम्ही आता आनंद लुटत असलेल्या पवित्र शास्त्रीय सत्याच्या स्पष्ट समजुतीकडे यहोवाने त्याच्या लोकांना कसे निरवले, याबद्दलच्या माहितीचा पूर्ण अभ्यास करणे विश्वास बळकट करणारे आहे, असे तुम्हाला आढळेल. ह्या संघटनेच्या प्रगतीविषयी तुम्ही जितके अधिक परिचित व्हाल तितकी, यहोवा वापरत असलेल्या दृश्य व्यवस्थेबद्दल तुमची गुणग्राहकता वाढेल. भविष्यवाणीच्या पूर्णतेत राज्याची सुवार्ता पृथ्वीच्या सर्वात दूरच्या भागात कशी पोहोंचली, याबद्दल वाचताना तुम्हाला नक्कीच उत्तेजित झाल्यासारखे वाटेल. राज्याची घोषणा करण्यासाठी आवेशाने कार्य केलेल्या जगाच्या सर्व भागातील विश्वासू जणांच्या अनुभवाने तुमची अंतःकरणे सुखावतील. यहोवावर प्रेम असल्याने, विश्वासू बंधू व बहिणींनी जे सहन केले त्याबद्दल वाचून तुम्हाला व्यक्तिगत परीक्षांना तोंड देण्यासाठी बळकट केले जाईल.
१४ साहित्याचा काही भाग वाचल्यावर, एकत्रितपणे त्याच्या मूल्याची चर्चा करण्यासाठी आणि माहितीची उजळणी करण्यासाठी वेळ घ्या. तुमची लहान मुले असतील तर, तुम्हाला चित्रांचे स्पष्टीकरण देण्यासाठी आणि त्यात दाखवलेल्या लोकांबद्दल त्यांना काय माहिती आहे हे सांगण्यासाठी त्यांना देखील सहभागी करा. तुम्ही एकटेच वाचत असला तरी, तुम्ही शिकत असलेल्या गोष्टींची सहभागिता इतरांबरोबर करण्याचा प्रयत्न करा. उचित असेल तेथे, पुनर्भेटींमध्ये आणि पवित्र शास्त्र अभ्यास चालवत असताना साहित्याचा वापर करा. ते पुनःपुन्हा सांगितल्यामुळे तुमच्या स्वतःच्या मनावर आणि हृदयावर ते ठसवले जाईल व त्याचा इतरांना देखील लाभ होईल.
१५ माहितीमध्ये रस घ्या: प्रोक्लेमर्स पुस्तक वाचण्यासाठी तुम्ही देत असलेली वेळ आनंददायक तसेच लाभदायक असावयास हवी.
१६ तुमच्या कुटुंबाने, यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्यालयाला भेट द्यावी असे तुम्हाला वाटते का? एका शतकाआधी पिट्सबर्ग भागात, संस्था वापरत असलेल्या सोयींबद्दल पाने २०८-९ दाखवतात. ब्रुकलिन येथे, नंतर वापरण्यात आलेल्या इमारतींचा परिचय पाने २१६-१७ करून देतील. पाने ३५२-६ वरील चित्रे आजच्या जागतिक कार्यालयाचे चित्र मनासमोर उभारण्यासाठी मदत करतील. बेथेलमध्ये होत असलेल्या कामाची माहिती अध्याय २६ आणि २७ देतात, आणि बेथेल जीवनाविषयी पाने २९५-८ अधिक माहिती देतात.
१७ आम्हापैकी पुष्कळांना संस्थेच्या शाखांना भेटी देण्यास जमत नाही. प्रोक्लेमर्स पुस्तकातील पाने ३५७-४०१ तुम्हाला जागतिक दौऱ्यावर नेतील. ते घाईघाईने लवकर पूर्ण करण्याची गरज नाही. प्रत्येक देशाला थोडा वेळ देऊन त्याचा आनंद लुटा. प्रत्येक जागा शोधून काढण्यासाठी पाने ४१५-१७ वरील जगाच्या नकाशाचा वापर करा. प्रत्येक शाखेच्या चित्रासोबत दिलेली विवेचने वाचा. अनुक्रमणिकेद्वारे, तुम्हाला प्रत्येक देशाबद्दल आकर्षक माहिती देखील मिळू शकेल. इतर देशाच्या, तुमच्या आध्यात्मिक कुटुंबातील सदस्यांना जाणून घेण्यासाठी या संधीचा उपयोग करा.
१८ लोक एकत्र भेटतात तेव्हा, ते कधीकधी जगिक घटनांचे ज्ञान गोवलेले खेळ खेळतात. यहोवाच्या लोकांच्या आधुनिक दिवसाच्या इतिहासातील लक्षात घेण्यासारख्या तारखा आणि घटनांची माहिती करून घेणे त्याहून लाभदायक नसेल का? प्रोक्लेमर्स पुस्तकातील ७१८-२३ पानांवर अशा पुष्कळ गोष्टी तुम्हाला आढळतील. ती यादी एक मूलभूत रचना पुरवते; उर्वरित पुस्तकात सापडणाऱ्या माहितीला तुम्ही येथे जोडू शकता. त्यांना उजळणीसाठी आधार म्हणून वापरा. बहुतेककरून, कुटुंबातील लहान जण त्यांना लवकर पाठ करतील. आमच्यासारखे मोठे लोक त्याबाबतीत थोडे मंद असतील. परंतु ही, ईश्वरशासित इतिहासाची माहिती आहे जिचे ज्ञान मिळवून आम्हा सर्वांना लाभ प्राप्त होईल. तारखा आणि मूळ वास्तविकता जाणल्यावर, त्या पायावर उभारणी करा. प्रत्येक घटनेबद्दल तुम्हाला किती माहिती आठवते ते पाहा. त्यानंतर, देवाची इच्छा पूर्ण करण्यात प्रत्येक घटनेचा कोणता वाटा होता त्यावर बोला. पुढे, त्याचा तुमच्या जीवनावर कशाप्रकारे परिणाम झाला आणि यहोवा जे करत आहे त्यामध्ये तुम्ही कसे बसता याबद्दल चर्चा करा.
१९ तुम्हाला उपलब्ध असलेल्या संधींना पाहा: तुम्ही जेहोवाज विट्नेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉडस् किंग्डम, हे वाचाल आणि चर्चा कराल तसे, यशया ६०:२२ ची भव्य पूर्णता तुमच्या दृष्टिस उघडकीला येत असलेली तुम्हाला आढळेल. हे पुस्तक, पान ५१९ वर असे म्हणते: “‘लहानाचे सहस्त्र होतील’ या अभिवचनाची पूर्णता नक्कीच घडली आहे आणि तसे विपुलतेत घडले आहे! ५० देशांपेक्षा अधिक देशातील प्रत्येकात जेथे एखादा ‘लहान’ देखील नव्हता—जेथे १९१९ मध्ये कोणीच यहोवाचे साक्षीदार नव्हते व जेथे त्यांनी कधी प्रचार केलाच नव्हता—तेथे आज हजारापेक्षा अधिक यहोवाची स्तुती करणारे आहेत. यापैकी काही देशात, आता हजारो आहेत, होय, हजारोंपेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार, देव राज्याचे आवेशी घोषक आहेत! यहोवाचे साक्षीदार एक ‘बलाढ्य राष्ट्र’ झाले आहेत—जगाच्या निदान ८० स्वतंत्र राष्ट्रांपैकी एका राष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा त्यांची संख्या, एकत्रित जागतिक मंडळी, या नात्याने अधिक आहे.”
२० राज्य वाढीचे ते कार्य मुळीच संपुष्टात आलेले नाही. त्याऐवजी, यहोवाने एका अभूतपूर्व प्रमाणात त्याला वाढवले आहे. त्यात तुम्ही किती सहभाग घ्याल? उपलब्ध असलेल्या सर्व संधींची तुम्हाला खरोखरीच जाणीव आहे का? इतर जे करत आहेत त्याबद्दल तुम्ही शिकता तेव्हा, आमच्या दिवसात येशू ख्रिस्ताद्वारे आमचा प्रेमळ देव, निर्देशित करत असलेल्या महान कार्यात सहभाग घेण्यासाठी स्वतःला उपलब्ध करून देण्यास तुमचे अंतःकरण प्रवृत्त होवो.